logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

32 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय पावर लिफ्टिंग आणि सिंगल इव्हेंट बेंचप्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर: (दि १८) ३२ वी अखिल भारतीय राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग आणि सिंगल इव्हेंट बेंच प्रेस पुरुष-महिला अजिंक्यपद स्पर्धा (RAW)-२०२५ -२०२६ दि.१५ फेब्रुवारी रोजी श्री महावीर (हनुमान) मंदिर संस्कृतीक परिसर, आझाद चौक सदर, नागपूर येथे संपन्न झाली. महाराष्ट्र राज्यातील प्लविंदर सिंग सैनी यांना ६४० किलो आणि ४२६ गुणांसह २०२५ -२६ चा भारताचा स्ट्रॉग मॅन म्हणून घोषित करण्यात आले, तर महाराष्ट्राच्या रश्मी ए जिझीलवार यांना महिला गटात ३९२.५ किलो आणि २८२.५ गुणांसह तिसऱ्यांदा २०२५-२६ चा भारताचा स्ट्रॉग वुमन खेळाडू म्हणून सन्मानित केले. १४ फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक प्रभाग क्रमांक १० येथील प्रमोद सिंग ठाकूर आणि श्रीमती सरस्वती सलामे उपस्थित होते आणि त्यांनी सब-ज्युनियर आणि ज्युनियर विजेत्यांना बक्षिसे वाटली. १५ तारखेला नवनिर्वाचित नगरसेवक आणि मनपामधील सत्ताधारी पक्षाचे उपनेते विनोद कान्हेरे आणि नगरसेविका श्रीमती माधुरी ललित फुलसुंगे आणि अभिजीत झा यांच्या उपस्थितीत समारोप समारंभ पार पडला. त्यांनी सिनीअर आणि मास्टर्सना पदके वाटली. अखिल भारतीय टायटल विजेते आहेत, १. स्वप्निल जमगडे (महाराष्ट्र)- स्ट्रॉंग टीन ऑफ इंडिया २०२६ २. आर्या मोरे (मुंबई)- स्ट्रॉंग टीन गर्ल ऑफ इंडिया २०२६ ३. आदित्य अदे (महाराष्ट्र)- स्ट्रॉंग बॉय ऑफ इंडिया २०२६ ४. सुश्री आर्या डबीर (मुंबई)- स्ट्रॉंग गर्ल ऑफ इंडिया २०२६ ५. श्री.ए. चंद्रप्पा (कर्नाटक)- भारताचा स्ट्रॉग मास्टर 2026 ६. कु.अनिता देवईकर (महाराष्ट्र)- भारतातील स्ट्राँग मास्टर वुमन 2026 आहेत. श्री. साळवी, करकरे, वनकर, प्रधान, निमखेडकर, संतोष नरसेकर, विजय बहादूर, आरिफ शेख, निलेश हिंगे आणि सुभाष कामडी यांनी राष्ट्रीय पंचाची भूमिका यशस्वीपणे पार पाडली.

2 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
606dab89-36ec-4457-b7f8-0c17c8ce6d4d

32 व्या अखिल भारतीय राष्ट्रीय पावर लिफ्टिंग आणि सिंगल इव्हेंट बेंचप्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर: (दि १८) ३२ वी अखिल भारतीय राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग आणि सिंगल इव्हेंट बेंच प्रेस पुरुष-महिला अजिंक्यपद स्पर्धा (RAW)-२०२५ -२०२६ दि.१५ फेब्रुवारी रोजी श्री महावीर (हनुमान) मंदिर संस्कृतीक परिसर, आझाद चौक सदर, नागपूर येथे संपन्न झाली. महाराष्ट्र राज्यातील प्लविंदर सिंग सैनी यांना ६४० किलो आणि ४२६ गुणांसह २०२५ -२६ चा भारताचा स्ट्रॉग मॅन म्हणून घोषित करण्यात आले, तर महाराष्ट्राच्या रश्मी ए जिझीलवार यांना महिला गटात ३९२.५ किलो आणि २८२.५ गुणांसह तिसऱ्यांदा २०२५-२६ चा भारताचा स्ट्रॉग वुमन खेळाडू म्हणून सन्मानित केले. १४ फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये नवनिर्वाचित नगरसेवक प्रभाग क्रमांक १० येथील प्रमोद सिंग ठाकूर आणि श्रीमती सरस्वती सलामे उपस्थित होते आणि त्यांनी सब-ज्युनियर आणि ज्युनियर विजेत्यांना बक्षिसे वाटली. १५ तारखेला नवनिर्वाचित नगरसेवक आणि मनपामधील सत्ताधारी पक्षाचे उपनेते विनोद कान्हेरे आणि नगरसेविका श्रीमती माधुरी ललित फुलसुंगे आणि अभिजीत झा यांच्या उपस्थितीत समारोप समारंभ पार पडला. त्यांनी सिनीअर आणि मास्टर्सना पदके वाटली. अखिल भारतीय टायटल विजेते आहेत, १. स्वप्निल जमगडे (महाराष्ट्र)- स्ट्रॉंग टीन ऑफ इंडिया २०२६ २. आर्या मोरे (मुंबई)- स्ट्रॉंग टीन गर्ल ऑफ इंडिया २०२६ ३. आदित्य अदे (महाराष्ट्र)- स्ट्रॉंग बॉय ऑफ इंडिया २०२६ ४. सुश्री आर्या डबीर (मुंबई)- स्ट्रॉंग गर्ल ऑफ इंडिया २०२६ ५. श्री.ए. चंद्रप्पा (कर्नाटक)- भारताचा स्ट्रॉग मास्टर 2026 ६. कु.अनिता देवईकर (महाराष्ट्र)- भारतातील स्ट्राँग मास्टर वुमन 2026 आहेत. श्री. साळवी, करकरे, वनकर, प्रधान, निमखेडकर, संतोष नरसेकर, विजय बहादूर, आरिफ शेख, निलेश हिंगे आणि सुभाष कामडी यांनी राष्ट्रीय पंचाची भूमिका यशस्वीपणे पार पाडली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नागपूर जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज वृत्तसेवा नागपूर: (दि १८) नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    1
    नागपूर जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर: (दि १८) नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    13 min ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    1 hr ago
  • Post by The Indian Matrimony
    1
    Post by The Indian Matrimony
    user_The Indian Matrimony
    The Indian Matrimony
    Marriage Registry Office नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    1
    Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    user_Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    Nagpur (Urban), Maharashtra•
    18 hrs ago
  • कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव कुही (शरद शहारे) कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव
    1
    कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव 
कुही (शरद शहारे)
कृषी उत्पन्न बाजार समिती मांढळ चे आजचे कापूस बाजार भाव
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    22 min ago
  • Routine Heart Checkup की ऐतिहासिक गलती: कौन-सा Test ज़रूरी है और कौन-सा सिर्फ़ पैसा बर्बाद करता है ?🫀🚀🏥🙏 #drmeherabbas #hearthealth #routinehearttest #HeartHealthAwareness #heartattack DrMeher Abbas TopFans @highlight
    1
    Routine Heart Checkup की ऐतिहासिक गलती: कौन-सा Test ज़रूरी है और कौन-सा सिर्फ़ पैसा बर्बाद करता है ?🫀🚀🏥🙏
#drmeherabbas
#hearthealth 
#routinehearttest 
#HeartHealthAwareness 
#heartattack 
DrMeher Abbas 
TopFans 
@highlight
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    2 hrs ago
  • जिला पंचायत अध्यक्ष ने गरीब व्यक्ति को इलाज के लिए दी सहायता अमेठी पूरे मोतीराम मजरे करौदी गांव निवासी एक गरीब ग्रामीण को कूल्हे के इलाज के लिए जिला पंचायत अध्यक्ष ने मदद किया है बुधवार को पूरे मोती रामनिवासी शुभम पाल जिला पंचायत अध्यक्ष राजेश अग्रहरि के पास अपने भाई के कूल्हे के इलाज के लिए आर्थिक मदद मांगने गया उसने बताया कि उसके भाई के कूल्हे की हड्डी टूट गई है जिसे बदलने के लिए पैसे की आवश्यकता है उसके पास पैसा नहीं है जिला पंचायत अध्यक्ष राजेश ने पीड़ित व्यक्ति को 25हजार की आर्थिक मदद देकर कहा और जो आवश्यकता होगी उसे भी पूरा किया जाएगा वीरेंद्र यादव हरिकेश श्रीवास्तव आदि लोग थे
    1
    जिला पंचायत अध्यक्ष ने गरीब व्यक्ति को इलाज के लिए दी सहायता 
अमेठी 
पूरे मोतीराम मजरे करौदी गांव निवासी एक गरीब ग्रामीण को कूल्हे के इलाज के लिए जिला पंचायत अध्यक्ष ने मदद किया है 
बुधवार को पूरे मोती रामनिवासी शुभम पाल जिला पंचायत अध्यक्ष राजेश अग्रहरि के पास अपने भाई के कूल्हे के इलाज के लिए आर्थिक मदद मांगने गया उसने बताया कि उसके भाई के कूल्हे की हड्डी टूट गई है जिसे बदलने के लिए पैसे की आवश्यकता है उसके पास पैसा नहीं है जिला पंचायत अध्यक्ष राजेश ने पीड़ित व्यक्ति को 25हजार की आर्थिक मदद देकर कहा और जो आवश्यकता होगी उसे भी पूरा किया जाएगा वीरेंद्र यादव हरिकेश श्रीवास्तव आदि लोग थे
    user_Madusoodan
    Madusoodan
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • काळ पुढे सरकत जातो. जबाबदाऱ्या वाढत जातात. जीवनाच्या व्यापात दिवस निघून जातात. पण मनाच्या एका कोपऱ्यात मैत्री मात्र शांतपणे थांबून राहते' फक्त पुन्हा एकदा हाक येण्याची वाट पाहत… आणि अशीच एक हाक आली.. चला.. अंकुर व्हॅली येथे . 'दे धमाल… बेमिसाल… गेट टुगेदर!' साठी. जवळजवळ चार दशकांनंतर कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय चे माजी विद्यार्थी ‘आनंद मेळावा’ या नावाखाली पुन्हा एकत्र आले. ही भेट केवळ पुनर्भेट नव्हती; ती विस्मरणात गेलेल्या आठवणींची पुनःप्रत्ययाची पर्वणी होती. ती काळाच्या पडद्याआड हरवलेल्या क्षणांची पुनर्भेट होती. अहमदनगरपासून काही अंतरावर, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या भाळवणी येथील 'अंकुर व्हॅली'मध्ये जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आगमनाच्या क्षणीच गुलाबपुष्प देऊन झालेले स्वागत मनाला स्पर्शून गेले. त्या सुगंधी क्षणांनी मेळाव्याच्या आनंदाला पहिल्याच भेटीत सुंदर सुरुवात दिली. धुळीत हरवलेली पायवाट आज पुन्हा हसत भेटली; वय वाढलं, काळ बदलला, पण मैत्री तशीच राहिली. रुपेरी केसांची छटा अलगद डोकावत होती, मेकअप मागचं वय हलकेच स्मित करत होतं; पण मन मात्र पुन्हा कॉलेजच्या दिवसांत रमलं होतं. एकेक आठवण उलगडत गेली, हास्याच्या लहरींमध्ये भूतकाळ वर्तमानात येऊन विसावला. या सुंदर मेळाव्यामागे ग्रुप ॲडमिन संजय भैलुमे यांची शोधक वृत्ती, जिद्द आणि आपुलकी होती. एकेक मित्र शोधत त्यांनी तब्बल १३५ माजी विद्यार्थ्यांना एकाच स्नेहसूत्रात गुंफले आहे. त्यातील आम्ही 33 सदस्य आज इथे जमलो होतो. त्यांना साथ देणारे सुरेश साळुंके, आप्पासाहेब होले , दत्ता नेवसे, सुनील चाफे, रंगनाथ सुपेकर, रावसाहेब साळवे, , सुरेंद्र चव्हाण, शोभा महामुनी,शकुंतला जेवरे यांचे आणि उपस्थित सर्वांचेच..परिश्रम या यशामागे मोलाचे ठरले. प्रसंग क्षणभर आठवणी जीवनभर जपून ठेवण्यासाठी आशा गिरमे,अनिता व्यवहारे यांनी सर्वांचे हसरे चेहरे बोलके डोळे आपल्या मोबाईलमध्ये एका क्लिक ने जपून ठेवले.. दादा पाटील महाविद्यालयातून ज्ञानरूपी शिक्षणाची शिदोरी घेऊन आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालो. गुरुजनांचे संस्कार, आई-वडिलांची पुण्याई आणि स्वतःच्या कष्टांची जोड देत प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिक वाटचाल केली. शिक्षण, नोकरी, संसार या त्रिसूत्रीत आयुष्य गुंतलं होतं; स्वतःसाठी वेळ कमी पडत गेला,पण मैत्री मात्र मनात जपली गेली. “तेव्हाचा मी आणि आजचा मी” असं मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने संघर्ष, कर्तृत्व आणि समाधानाचा प्रवास उलगडला. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत साठीकडे झुकलेलं वय.. पण मन मात्र अजूनही तरुण! हसताना नकळत डोळ्यांच्या कडेला ओल आली; आठवणी बोलक्या झाल्या; आज पुन्हा एकदा आपण ‘आपले’ झालो. या आनंद मेळाव्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे मित्र–मैत्रिणींसोबत त्यांच्या पती-पत्नींचाही सहभाग. गप्पा, गाणी, नृत्य, मिश्किल टोमणे आणि मनमोकळं हास्य या साऱ्यांनी वातावरण भारावून गेलं. मैत्री जेव्हा कुटुंबांपर्यंत पोहोचते, तेव्हा नात्यांना नवं बळ मिळतं. हसण्यातून हसू वाढतं, आणि आयुष्य अधिक हलकं होतं. या प्रसंगी कर्जतवरून आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्वांना "प्रफुल्लित मने" हे ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी पुस्तक भेट दिले. ही भेट म्हणजे केवळ पुस्तक नव्हते; तर विचारांची, प्रेरणेची आणि सकारात्मकतेची शिदोरी होती. निरोपाच्या क्षणी आप्पासाहेब होले यांनी एक छोटीशी ऑफिशियल बॅग देऊन आदरपूर्वक निरोप दिला. त्या क्षणातही आपुलकीची ऊब होती. 'अंकुर व्हॅलीचे निसर्गरम्य वातावरण, आपुलकीचे आदरातिथ्य, सुग्रास भोजन आणि उत्तम व्यवस्था' या सर्वांनी आनंद द्विगुणित केला. हा मेळावा म्हणजे केवळ भेट नव्हती; तो काळाशी केलेला संवाद होता. मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे. ती जुनी होत नाही; ती फक्त नव्याने उमलत राहते. मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे. ती जुनी होत नाही.. ती फक्त नव्याने उमलत राहते… असे आनंद मेळावे पुन्हा पुन्हा घडत राहोत… मैत्रीचा हा स्नेहसोहळा असाच दरवेळी फुलत राहो. हा अनुभव, हा आनंद पुन्हा पुन्हा मिळत राहो आणि लवकरच पुन्हा भेटण्याचा सुंदर योग यावा… हीच मनापासून इच्छा...!
    2
    काळ पुढे सरकत जातो.
जबाबदाऱ्या वाढत जातात.
जीवनाच्या व्यापात दिवस निघून जातात.
पण मनाच्या एका कोपऱ्यात
मैत्री मात्र शांतपणे थांबून राहते'
फक्त पुन्हा एकदा हाक येण्याची वाट पाहत…
आणि अशीच एक हाक आली..
चला.. अंकुर व्हॅली येथे .
'दे धमाल… बेमिसाल… गेट टुगेदर!' साठी. 
जवळजवळ चार दशकांनंतर
कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय चे माजी विद्यार्थी
‘आनंद मेळावा’ या नावाखाली पुन्हा एकत्र आले.
ही भेट केवळ पुनर्भेट नव्हती;
ती विस्मरणात गेलेल्या आठवणींची पुनःप्रत्ययाची पर्वणी होती.
ती काळाच्या पडद्याआड हरवलेल्या क्षणांची पुनर्भेट होती.
अहमदनगरपासून काही अंतरावर,
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या भाळवणी येथील 'अंकुर व्हॅली'मध्ये
जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो,
तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद
ओसंडून वाहत होता.
आगमनाच्या क्षणीच
गुलाबपुष्प देऊन झालेले स्वागत
मनाला स्पर्शून गेले.
त्या सुगंधी क्षणांनी
मेळाव्याच्या आनंदाला पहिल्याच भेटीत सुंदर सुरुवात दिली.
धुळीत हरवलेली पायवाट
आज पुन्हा हसत भेटली;
वय वाढलं, काळ बदलला,
पण मैत्री तशीच राहिली.
रुपेरी केसांची छटा अलगद डोकावत होती,
मेकअप मागचं वय हलकेच स्मित करत होतं;
पण मन मात्र पुन्हा कॉलेजच्या दिवसांत रमलं होतं.
एकेक आठवण उलगडत गेली,
हास्याच्या लहरींमध्ये भूतकाळ वर्तमानात येऊन विसावला.
या सुंदर मेळाव्यामागे
ग्रुप ॲडमिन संजय भैलुमे यांची शोधक वृत्ती, जिद्द आणि आपुलकी होती.
एकेक मित्र शोधत त्यांनी तब्बल १३५ माजी विद्यार्थ्यांना
एकाच स्नेहसूत्रात गुंफले आहे. त्यातील आम्ही 33 सदस्य आज इथे जमलो होतो. 
त्यांना साथ देणारे
सुरेश साळुंके, आप्पासाहेब होले , दत्ता नेवसे,
सुनील चाफे, रंगनाथ सुपेकर, रावसाहेब साळवे,
, सुरेंद्र चव्हाण, शोभा महामुनी,शकुंतला जेवरे 
यांचे   आणि उपस्थित सर्वांचेच..परिश्रम या यशामागे मोलाचे ठरले.
प्रसंग क्षणभर आठवणी जीवनभर जपून ठेवण्यासाठी आशा गिरमे,अनिता व्यवहारे यांनी सर्वांचे हसरे चेहरे बोलके डोळे आपल्या मोबाईलमध्ये एका क्लिक ने जपून ठेवले..
दादा पाटील महाविद्यालयातून
ज्ञानरूपी शिक्षणाची शिदोरी घेऊन
आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालो.
गुरुजनांचे संस्कार,
आई-वडिलांची पुण्याई
आणि स्वतःच्या कष्टांची जोड देत
प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिक वाटचाल केली.
शिक्षण, नोकरी, संसार
या त्रिसूत्रीत आयुष्य गुंतलं होतं;
स्वतःसाठी वेळ कमी पडत गेला,पण मैत्री मात्र मनात जपली गेली.
“तेव्हाचा मी आणि आजचा मी”
असं मनोगत व्यक्त करताना
प्रत्येकाने संघर्ष, कर्तृत्व आणि समाधानाचा प्रवास उलगडला.
संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत
साठीकडे झुकलेलं वय..
पण मन मात्र अजूनही तरुण!
हसताना नकळत डोळ्यांच्या कडेला ओल आली;
आठवणी बोलक्या झाल्या;
आज पुन्हा एकदा
आपण ‘आपले’ झालो.
या आनंद मेळाव्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे
मित्र–मैत्रिणींसोबत त्यांच्या पती-पत्नींचाही सहभाग.
गप्पा, गाणी, नृत्य, मिश्किल टोमणे
आणि मनमोकळं हास्य
या साऱ्यांनी वातावरण भारावून गेलं.
मैत्री जेव्हा कुटुंबांपर्यंत पोहोचते,
तेव्हा नात्यांना नवं बळ मिळतं.
हसण्यातून हसू वाढतं,
आणि आयुष्य अधिक हलकं होतं.
या प्रसंगी कर्जतवरून आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी
उपस्थित सर्वांना "प्रफुल्लित मने" हे
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी पुस्तक भेट दिले.
ही भेट म्हणजे केवळ पुस्तक नव्हते;
तर विचारांची, प्रेरणेची आणि सकारात्मकतेची शिदोरी होती.
निरोपाच्या क्षणी
आप्पासाहेब होले यांनी
एक छोटीशी ऑफिशियल बॅग देऊन
आदरपूर्वक निरोप दिला.
त्या क्षणातही आपुलकीची ऊब होती.
'अंकुर व्हॅलीचे निसर्गरम्य वातावरण,
आपुलकीचे आदरातिथ्य,
सुग्रास भोजन आणि उत्तम व्यवस्था'
या सर्वांनी आनंद द्विगुणित केला.
हा मेळावा म्हणजे केवळ भेट नव्हती;
तो काळाशी केलेला संवाद होता.
मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे.
ती जुनी होत नाही; ती फक्त नव्याने उमलत राहते.
मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे.
ती जुनी होत नाही..
ती फक्त नव्याने उमलत राहते…
असे आनंद मेळावे पुन्हा पुन्हा घडत राहोत…
मैत्रीचा हा स्नेहसोहळा असाच दरवेळी फुलत राहो.
हा अनुभव, हा आनंद पुन्हा पुन्हा मिळत राहो
आणि लवकरच पुन्हा भेटण्याचा सुंदर योग यावा… हीच मनापासून इच्छा...!
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.