नागपूरच्या कलाकारांसाठी सुवर्णसंधी ! पाटील ग्रुप आणणार दोन मोठे चित्रपट प्रोजेक्ट, मुंबई-नागपुरात लवकरच सुरू होणार शूटिंग नागपूरच्या कलाकारांसाठी सुवर्णसंधी ! पाटील ग्रुप आणणार दोन मोठे चित्रपट प्रोजेक्ट, मुंबई-नागपुरात लवकरच सुरू होणार शूटिंग नागपूर :- हिंगणा शहरातील कला, संस्कृती आणि चित्रपट क्षेत्रासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पाटील ग्रुपकडून लवकरच दोन मोठे चित्रपट प्रोजेक्ट सुरू केले जाणार आहेत, ज्यामध्ये हिंदी चित्रपट "कुंती राघव" तसेच मराठी चित्रपट "कस्तुरी" यांचा समावेश आहे. या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण लवकरच मुंबई आणि नागपूर येथे सुरू होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती निर्माता व कलाकार गणेश पाटील यांनी त्यांच्या नव्या कार्यालयात 201 कृष्ण कुंज रेसिडेन्सी, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन जवळ आयोजित विशेष बैठकीत दिली. गणेश पाटील यांनी सांगितले की, या दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून नागपूरसह विदर्भातील प्रतिभावान कलाकार, तंत्रज्ञ आणि नवोदित युवकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नागपुरात वाढत असलेल्या चित्रपट क्षेत्राच्या संधी लक्षात घेता हा प्रोजेक्ट शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई सारख्या मोठ्या चित्रपट नगरीसोबत नागपुरात शूटिंग होणार असल्याने स्थानिक कलाकारांना थेट मोठ्या प्रोडक्शन हाऊस बरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. या विशेष प्रसंगी मराठी चित्रपट "प्रेमासाठी वाटेल ते" मधील कलाकार प्रकाश मेंडुले तसेच सामाजिक कार्यकर्ते गजानन ढाकुलकर उपस्थित होते. सर्वांनी गणेश पाटील यांना नव्या प्रोजेक्ट्ससाठी शुभेच्छा देत चित्रपटांच्या यशासाठी शुभकामना व्यक्त केल्या. उल्लेखनीय म्हणजे, गणेश पाटील यांचा याआधी "तू तिथे असावे" हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये त्यांनी नागपूर शहरातील अनेक स्थानिक कलाकारांना संधी देऊन अभिनय क्षेत्रात नवी ओळख निर्माण करून दिली होती. त्यामुळे आज नागपूरमधील अनेक युवा कलाकार त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगून आहेत. चित्रपट निर्मिती सोबतच गणेश पाटील हे संगीत क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्यांचे अनेक गाण्यांचे अल्बम प्रदर्शित झाले असून त्यामध्ये त्यांनी स्वतःचा आवाज दिला आहे. कला क्षेत्रातील त्यांची जिद्द आणि नवोदितांना पुढे आणण्याची भूमिका यामुळे ते सातत्याने चर्चेत असतात. अलीकडेच त्यांच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन पार पडले, जिथे शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गजानन ढाकुलकर यांनीही त्यांचे अभिनंदन करत नागपूरच्या कलाकारांना पुढे नेण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आता सर्वांचे लक्ष या आगामी "कुंती राघव" आणि "कस्तुरी" या दोन्ही चित्रपटांकडे लागले असून, यामुळे नागपूरच्या चित्रपट क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- Post by कु सुषमा डबराल1
- 🔴 किसान सभेचा १०० किमी पायी लाँग मार्चला उस्फुर्त सुरुवात 🔴 पिंपळखुटी ते यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर चार दिवसांच्या पायी लाँग मार्च 🔴 शेतकरी, योजना कर्मचारी व वनजमीन कसणाऱ्या चा आक्रोश ___________ पाटनबोरी : शेतकरी शेतमजूर कष्टकरी योजना कर्मचारी व वन जमीन कसणाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभा, आशा कर्मचारी संघटना सीटू च्या वतीने तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी या गावावरून यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय वर धडक १०० किमी पायी लाँग मार्च ला पिंपळखुटी येथील सरपंच व स्थानिक नेते सामी अण्णा मरेड्डीवार यांनी शुभारंभ करून दिला. अखिल भारतीय किसान सभेचे ॲड कुमार मोहरमपूरी, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर सिडाम, ॲड डी बी नाईक, देविदास मोहकर, उषा मुरखे, अनिता खुनकर, मनीष इसाळकर यांचे नेतृत्वात हा पायी लाँग काढण्यात आला. हा पायी लाँग मार्च १९ एप्रिल ते 22 एप्रिल २०२६ दरम्यान चार दिवस भर उन्हाळ्यात चालणार आहे. ह्या पायी लाँग मार्च चा पहिला मुक्काम १५ किमी वर असलेल्या सूना येथील गणेश मंदिरात आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू होऊन कोंघरा येथील शिव मंदिरात दुपारचे जेवण घेऊन ढेगाले महाराज मंदिरात होणार आहे. भर उन्हाळा असूनही शेतकरी शेतमजूर कामगार आणि योजना कर्मचारी मोठ्या जिद्दीने तरुण, म्हातारे, स्त्रिया पायदळ चालत आहे. जिल्हास्तरावर सुटणाऱ्या प्रलंबित मागण्या असल्याने ताबडतोब ही प्रश्न सोडवावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- कृउबा समिती मार्केट मध्ये विक्रमी कापसाची आवक भिवापूर । उमरेड भिवापूर तालुक्यात कापसाचे लागवड क्षेत्र वाढल्याने कापसाचे उत्पादन मोठया प्रमाणात झाले असल्याने शेतकरी वर्ग कृउबा समितीच्या मार्केट यार्ड मध्ये कापसा माल मोठया प्रमाणात आणित असल्याने जिकडे - तिकडे भरगच्च कापसाचे ठिग भरून असल्याचे दृष्टिक्षेपणास येत आहे. मार्च अखेर पर्यंत 53,656 क्विंटल इतकी विक्रमी आवक झाल्याची माहिती कृषी उत्पन बाजार समिती सचिव रामकृष्ण गोगल. यांनी दिली असून याबाबतची त्याची प्रतिक्रिया तसेच मार्केट यार्ड मध्ये दि.5 एप्रिलला 1876 क्विंटल आवक होती. व दर 6300 -8500 रुपये प्राप्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे. भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये रविवार, बुधवार ,गुरुवार हे तीन दिवस कापूस खरेदी चे आहे. गेल्या वर्षी क्विंटल मागे 6330 ते 7600 रुपये भाव इतका होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केल्या जात आहे. खाजगी जिनिंग मध्ये कापसाच्या भावामध्ये तफावत असल्याने शेतकरी वर्ग कृउबा समिती कडे आकृष्ट होत असून कापसाचा माल यार्डत आणत असल्याची माहीती कृउबा समितीचे सभापती बालु इंगोले यांनी दिली आहे.1
- मुजफ्फरपुर में नाबालिग गुम/शुदगी से मचा हड़/कंप #viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #BiharPolice #Muzaffarpur1
- Post by RAJA news1
- न्यु लाईफ हॉस्पिटल बीड च्या नव्या सुसज्ज वास्तूचे उद्घाटन व स्थलांतर समारंभ...1
- नागपुरात पहिला हिंदी साय-फाय चित्रपट 'नर मशीना'चा 'एलियन रिव्हील' व्हिडिओ प्रदर्शित नागपूर: माँ एलएफएक्स स्टुडिओजची निर्मिती1