महसूलमंत्री बावनकुळे यांनी चिखलीत नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या.. आ.श्वेता महाले यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन उपाययोजनांचे निर्देश.. राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे आज चिखली येथे आले असता, तहसील कार्यालय, चिखली येथे त्यांनी नागरिकांच्या महसूलविषयक तक्रारी प्रत्यक्ष ऐकल्या व लेखी निवेदने स्वीकारली. या कार्यक्रमात चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांची विशेष उपस्थिती होती. मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांनी हे सत्र आयोजित केले होते. सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत झालेल्या या सत्रात मोठ्या संख्येने नागरिक आपल्या तक्रारी घेऊन उपस्थित राहिले. भूमी अभिलेख दुरुस्ती, जमिनीच्या नोंदींशी संबंधित वाद, तहसील कार्यालयातील प्रलंबित प्रकरणे, सातबारा उताऱ्यांतील चुका, वारस नोंदी, फेरफार नोंदणी, शेतजमिनींचे वाटप आणि महसूल विभागाशी निगडित इतर अनेक विषयांवरील निवेदने मंत्र्यांना सादर करण्यात आली. या सर्व निवेदनांची महसूलमंत्री बावनकुळे यांनी गांभीर्याने दखल घेतली. या संपूर्ण कार्यक्रमात आमदार सौ.श्वेता महाले पाटील यानीं महसूलमंत्र्यांच्या बाजूने ठामपणे उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींचे सूत्रसंचालन केले. मतदारसंघातील नागरिकांच्या महसूलविषयक समस्या किती गंभीर आहेत, हे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. आमदार सौ.महाले पाटील म्हणाल्या की, "चिखली मतदारसंघातील नागरिकांच्या भूमी अभिलेख व महसूलविषयक समस्या दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. महसूलमंत्र्यांनी आज प्रत्यक्ष येऊन जनतेच्या तक्रारी ऐकणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या निवेदनांवर त्वरित कार्यवाही होईल यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेन." नागरिकांकडून निवेदने स्वीकारल्यानंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी तहसील कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत प्राप्त तक्रारींचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. भूमी अभिलेख विभाग, तहसील कार्यालय आणि इतर संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रकरणे निश्चित कालमर्यादेत निकाली काढण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. कोणत्याही नागरिकाला विनाकारण हेलपाटे मारावे लागणार नाहीत यासाठी कार्यप्रणाली अधिक गतिमान व पारदर्शक करण्याचे आदेशही मंत्र्यांनी दिले. या जनदर्शन सत्रामुळे चिखली परिसरातील अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या महसूलविषयक समस्यांवर थेट मंत्र्यांपर्यंत आवाज पोहोचवण्याची संधी मिळाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आमदार सौ.श्वेता महाले पाटील यांनी मतदारसंघातील जनतेसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले...

- *राज्यात सध्या 'खरात' प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. नेमके काय आरोप केलेत श्याम मानवांनी? पाहूया हा रिपोर्ट.बुलढाण्यातील शासकीय विश्रामगृहात आज श्याम मानव यांनी घेतलेली पत्रकार परिषद चांगलीच गाजली. २०१३ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर, २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच असल्याचे श्याम मानवांनी म्हटले आहे.अंमलबजावणीसाठी समिती नेमली गेली, परंतु निधी मिळवण्यासाठी त्यांना मंत्रालयात वारंवार चकरा माराव्या लागल्या. सरकारने आपल्याला केवळ 'झुलवत' ठेवले, असा थेट आरोप त्यांनी केला.केवळ वरिष्ठ पातळीवरच नव्हे, तर स्थानिक स्तरावरही अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचे सांगत, एका भाजप नगरसेवकाने प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.काँग्रेसच्या कार्यकाळात अशा कार्यात कधीही अडथळा आला नव्हता, मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात उदासीनता दाखवली जात असल्याचे मानवांनी सूचित केले.1
- पिकांची नासाडी आणि रोगराईचे सावट; भेंडवळच्या अंदाजाने बळीराजाची चिंता वाढली.1
- महाराष्ट्रातील लाखो शेतकरी, व्यापारी आणि नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, ती भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी 2026 अखेर जाहीर झाली आहे. यंदा पाऊस कसा राहणार? शेती पिकांची स्थिती काय असेल? बाजारभाव कसे राहू शकतात? आणि शेतकऱ्यांसाठी कोणते संकेत समोर आले आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पारंपरिक पद्धतीने घटमांडणी केली जाते. अनेक दशकांपासून ही परंपरा सुरू आहे. ग्रामीण भागात या संकेतांकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जाते. यंदाच्या घटमांडणीतील सर्वात मोठा मुद्दा – पावसाचा अंदाज यंदा मान्सून समाधानकारक राहण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून काही भागात पावसाची सुरुवात चांगली होऊ शकते. सुरुवातीच्या सरींमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू शकतो. काही भागात मुसळधार पाऊस आणि नदी-नाले भरून वाहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑगस्ट महिन्यातही काही ठिकाणी चांगला पाऊस कायम राहू शकतो. मात्र काही भागात अतिवृष्टीचे संकेत व्यक्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. शेती पिकांबाबत मोठे संकेत यंदा खरीप हंगामासाठी वातावरण अनुकूल राहू शकते असे सांगितले जात आहे. विशेषतः: कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांसाठी चांगले वातावरण तयार होऊ शकते. मात्र पाऊस जास्त झाल्यास काही भागात पिकांवर रोगराई, किडीचा प्रादुर्भाव किंवा पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. बाजारभाव कसे राहू शकतात? घटमांडणीनुसार काही पिकांना चांगला दर मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः: कापूस तीळ या पिकांमध्ये चांगली तेजी राहू शकते. तर काही डाळी व इतर पिकांमध्ये चढ-उतार राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्री करताना बाजाराचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. जनजीवनावर परिणाम जर मुसळधार पाऊस झाला तर काही भागात: रस्ते वाहतूक विस्कळीत होणे वीजपुरवठा खंडित होणे पूरस्थिती निर्माण होणे शेतातील नुकसान होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला पेरणी घाईघाईत करू नका. स्थानिक पावसाची खात्री करून निर्णय घ्या. पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा. बियाणे, खत आणि औषधे आधीच तयार ठेवा. पीक विमा आणि नोंदणी वेळेत करा. हवामान खात्याचा अधिकृत अंदाज बघत राहा. महत्वाची सूचना मित्रांनो, भेंडवळची घटमांडणी ही पारंपरिक लोकपरंपरेवर आधारित संकेत पद्धती आहे. हा अधिकृत वैज्ञानिक हवामान अंदाज नाही. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना हवामान विभाग आणि कृषी तज्ञांचा सल्ला घ्या. निष्कर्ष एकूणच पाहता, यंदा चांगल्या पावसासह काही भागात अतिवृष्टी, शेतीसाठी संधी आणि काही ठिकाणी आव्हाने असे मिश्र चित्र दिसत आहे.1
- * जळगाव जामोद तालुक्यातील भेडवळ येथील घट मांडनी चे भाकीत राजा काय पण तनावात राहील युद्ध जण्य परीस्तीती राहील*1
- खामगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका २६ वर्षीय जेसीबी ऑपरेटरला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना जळका भडंग फाट्यावर घडली आहे. या मारहाणीत ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून त्याच्या खिशातील २५ हजार रुपयेही गहाळ झाल्याची तक्रार त्याने पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंकरनगर येथील रहिवासी पवन रामदास क्षीरसागर (वय २६) हे निपाणा येथील ज्ञानेश्वर बोचरे यांच्या जेसीबीवर ऑपरेटर म्हणून काम करतात. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, जेसीबीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुरुस्तीसाठी खामगावकडे जात होते. जळका भडंग येथील वाकुड जाणाऱ्या रस्त्याच्या फाट्यावर एक चारचाकी गाडी उभी होती, जिचा दरवाजा उघडा होता. पवन यांनी गाडीतील व्यक्तीला दरवाजा लावून घेण्यास सांगितले. याच साध्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि गाडीतील व्यक्तींनी पवन यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पवन क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रवी सोळंके, महेंद्र दामोदर, अरविंद दामोदर आणि कपिल दामोदर (सर्व रा. जळका भडंग) यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत पवन यांच्या तोंडावर, छातीवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीदरम्यान त्यांचे शर्ट फाटले असून खिशातील २५,००० रुपये देखील गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. पवन यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, पवनला रक्ताची उलट्या झाल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तो सध्या आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.1
- छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर हिवरखेड येथे संपन्न1
- Post by नंदकिशोर साखरकर1
- प्रवाशांना त्रास देणाऱ्या महिला कंडक्टरची चौकशी; बुलढाणा आगाराचा निर्णय1