logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफीच्या निर्णयात असलेल्या जाचक अटी, त्यामुळे संभाव्य वंचित राहणारे शेतकरी, Agristack सक्ती, तसेच अपील व फेरतपासणी यंत्रणेच्या अभावामुळे निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या न्यायविषयक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी "बळीराजा कर्जमाफी न्याय संसद" या एकदिवसीय लाक्षणिक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन ९ जून २०२६ रोजी (मंगळवार) सकाळी ११.०० वाजता जळगाव (जामोद) येथील तहसील कार्यालय परिसरात होणार आहे. या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांचे नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडणार आहेत. जात, पात, धर्म आणि पक्षभेद विसरून शेतकरी म्हणून एकत्र येण्याची ही वेळ असून, पक्ष वेगळे असले तरी शेतकऱ्यांचा प्रश्न एकच आहे, असे या निमित्ताने आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे जाहीर आवाहनकर्ते म्हणून मा. प्रसेंजित दादा पाटील, मा. प्रकाश भाऊ पाटील, मा. स्वातीताई वाकेकर, मा. रामविजय बाप्पू बुरुंगले, मा. गजानन भाऊ वाघ, मा. दत्ताभाऊ पाटील, मा. सांगितराव भाऊ भोंगळ, मा. रंगराव बाप्पू देशमुख, मा. विजय भाऊ पोहणकर, मा. संजय भाऊ पारवे, मा. अविनाश उमरकर, मा. रामेश्वर भाऊ काळे, मा. अमोल भाऊ पाटील टिकार, मा. विजय भाऊ ठाकरे, मा. प्रशांत भाऊ अवसरमोल, मा. सुनिल भाऊ बोदडे, मा. अँड. भाऊराव भालेराव, मा. संतोष भाऊ दांडगे, मा. देवा भाऊ दामोदर, मा. विश्वास भालेराव, मा. प्रमोद भाऊ सपकाळ, मा. रमेश भाऊ ताडे, मा. अँड अमर भाऊ पाचपोर, मा. इरफानभाई खान, मा. तुकाराम भाऊ काळपांडे, मा. भिमरावजी पाटील, मा. देवेंद्र सिंग सोमवंशी, मा. प्रा. नितीन भाऊ घोपे आणि मा. प्रकाश विठ्ठलराव भिसे (शेतकरी आंदोलक) यांचा समावेश आहे. जागेच्या मर्यादेमुळे सर्व मान्यवरांची नावे नमूद करणे शक्य नसले तरी शेतकरी हितासाठी कार्य करणाऱ्या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना व लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक निमंत्रण देण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या आंदोलनाचे आयोजक असून, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सामूहिक भूमिका मांडण्याकरिता सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी संघटना आणि शेतकरी बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

on 7 June
user_Prakash Bhise
Prakash Bhise
Farmer जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
on 7 June

महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफीच्या निर्णयात असलेल्या जाचक अटी, त्यामुळे संभाव्य वंचित राहणारे शेतकरी, Agristack सक्ती, तसेच अपील व फेरतपासणी यंत्रणेच्या अभावामुळे निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या न्यायविषयक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी "बळीराजा कर्जमाफी न्याय संसद" या एकदिवसीय लाक्षणिक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन ९ जून २०२६ रोजी (मंगळवार) सकाळी ११.०० वाजता जळगाव (जामोद) येथील तहसील कार्यालय परिसरात होणार आहे. या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांचे नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडणार आहेत. जात, पात, धर्म आणि पक्षभेद विसरून शेतकरी म्हणून एकत्र येण्याची ही वेळ असून, पक्ष वेगळे असले तरी शेतकऱ्यांचा प्रश्न एकच आहे, असे या निमित्ताने आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे जाहीर आवाहनकर्ते म्हणून मा. प्रसेंजित दादा पाटील, मा. प्रकाश भाऊ पाटील, मा. स्वातीताई वाकेकर, मा. रामविजय बाप्पू बुरुंगले, मा. गजानन भाऊ वाघ, मा. दत्ताभाऊ पाटील, मा. सांगितराव भाऊ भोंगळ, मा. रंगराव बाप्पू देशमुख, मा. विजय भाऊ पोहणकर, मा. संजय भाऊ पारवे, मा. अविनाश उमरकर, मा. रामेश्वर भाऊ काळे, मा. अमोल भाऊ पाटील टिकार, मा. विजय भाऊ ठाकरे, मा. प्रशांत भाऊ अवसरमोल, मा. सुनिल भाऊ बोदडे, मा. अँड. भाऊराव भालेराव, मा. संतोष भाऊ दांडगे, मा. देवा भाऊ दामोदर, मा. विश्वास भालेराव, मा. प्रमोद भाऊ सपकाळ, मा. रमेश भाऊ ताडे, मा. अँड अमर भाऊ पाचपोर, मा. इरफानभाई खान, मा. तुकाराम भाऊ काळपांडे, मा. भिमरावजी पाटील, मा. देवेंद्र सिंग सोमवंशी, मा. प्रा. नितीन भाऊ घोपे आणि मा. प्रकाश विठ्ठलराव भिसे (शेतकरी आंदोलक) यांचा समावेश आहे. जागेच्या मर्यादेमुळे सर्व मान्यवरांची नावे नमूद करणे शक्य नसले तरी शेतकरी हितासाठी कार्य करणाऱ्या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना व लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक निमंत्रण देण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव या आंदोलनाचे आयोजक असून, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सामूहिक भूमिका मांडण्याकरिता सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी संघटना आणि शेतकरी बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) तालुक्यातील तरोडा खुर्द गावातील रस्त्याच्या सद्यस्थितीची नोंद घेण्यात आली आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) तालुक्यातील तरोडा खुर्द गावातील रस्त्याच्या सद्यस्थितीची नोंद घेण्यात आली आहे.
    user_संजय चिंधाजी पवार
    संजय चिंधाजी पवार
    Farmer जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • राज्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून पोलिओमुक्त महाराष्ट्राचा मान कायम राखण्यासाठी आज, रविवार (28 जून 2026) रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या मोहिमेतून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे कडक आवाहन केले आहे. ही मोहीम राज्यभर युद्धपातळीवर राबविण्यात येणार असून, यासाठी 89,489 लसीकरण बुथ, 26,530 ट्रान्झिट पथके, 13,518 मोबाईल पथके आणि 586 रात्रपाळी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. दुर्गम भागांपासून शहरांपर्यंत प्रत्येक बालकापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहे. प्रशासनाने पालकांना 'दोन थेंब जीवनाचे' ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी आपल्या 0 ते 5 वर्षांच्या प्रत्येक बालकाला आज जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः, 'दोन थेंब चुकले, तर धोका वाढेल... पोलिओमुक्त महाराष्ट्रासाठी प्रत्येक बालकाचे लसीकरण अत्यावश्यक!' या संदेशातून राज्यात आज 'पोलिओविरुद्ध महासंग्राम' पुकारण्यात आला आहे, जेणेकरून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही.
    1
    राज्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून पोलिओमुक्त महाराष्ट्राचा मान कायम राखण्यासाठी आज, रविवार (28 जून 2026) रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या मोहिमेतून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, असे कडक आवाहन केले आहे.

ही मोहीम राज्यभर युद्धपातळीवर राबविण्यात येणार असून, यासाठी 89,489 लसीकरण बुथ, 26,530 ट्रान्झिट पथके, 13,518 मोबाईल पथके आणि 586 रात्रपाळी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. दुर्गम भागांपासून शहरांपर्यंत प्रत्येक बालकापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहे. प्रशासनाने पालकांना 'दोन थेंब जीवनाचे' ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी आपल्या 0 ते 5 वर्षांच्या प्रत्येक बालकाला आज जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजण्याचे आवाहन केले आहे.

विशेषतः, 'दोन थेंब चुकले, तर धोका वाढेल... पोलिओमुक्त महाराष्ट्रासाठी प्रत्येक बालकाचे लसीकरण अत्यावश्यक!' या संदेशातून राज्यात आज 'पोलिओविरुद्ध महासंग्राम' पुकारण्यात आला आहे, जेणेकरून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    2 hrs ago
  • खामगाव येथे युवक काँग्रेसने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडल्याच्या निषेधार्थ हा 'गलथान कारभार' असल्याची टीका करण्यात आली. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्ट कारभारावर जोरदार टीका करत, यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या कोट्यवधी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले. या प्रकरणी मोदी सरकारच्या अपयसाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित या आंदोलनात जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी "धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या!" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
    3
    खामगाव येथे युवक काँग्रेसने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडल्याच्या निषेधार्थ हा 'गलथान कारभार' असल्याची टीका करण्यात आली. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्ट कारभारावर जोरदार टीका करत, यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या कोट्यवधी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले.

या प्रकरणी मोदी सरकारच्या अपयसाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित या आंदोलनात जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी "धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या!" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत २८ जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणी शिक्षकांमध्ये आणि भावी शिक्षकांमध्ये मोठ्या संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाच्या संदर्भात, तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, परीक्षेच्या अवघ्या पूर्वसंध्येलाच हे प्रकरण उघडकीस आल्याने भावी शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
    2
    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत २८ जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणी शिक्षकांमध्ये आणि भावी शिक्षकांमध्ये मोठ्या संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाच्या संदर्भात, तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, परीक्षेच्या अवघ्या पूर्वसंध्येलाच हे प्रकरण उघडकीस आल्याने भावी शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
    user_सागर वानखेडे sagar wankhede
    सागर वानखेडे sagar wankhede
    Teacher मोताळा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे दर रविवारी व्यसनाधीन व्यक्तींना मोफत व्यसनमुक्तीचे धडे दिले जातात. येथील व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक दशरथ ठाकरे हे गेल्या १५ वर्षांपासून शेषराव महाराजांच्या आशीर्वादाने आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत आहेत. या व्यसनमुक्ती आश्रमाच्या भिंतींवर 'दारूत रंगला संसार भंगला' अशा म्हणी रेखाटलेल्या असून, दशरथ ठाकरे प्रत्येक व्यसनाधीन व्यक्तीला मोफत सल्ला देतात. ते व्यसनाची सवय कशी लागते आणि ती कशी सोडवता येते, याबद्दल मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक व्यसनाधीन व्यक्ती येथे येऊन व्यसनमुक्त झाले आहेत. दशरथ ठाकरे यांनी 'व्यसनमुक्ती सप्ताह' साजरा करत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन व्यसनमुक्तीचे धडे दिले आहेत. त्यांनी राज्यभर 'नशा मुक्ती जनजागृती अभियान'ही राबवले, ज्याला अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आणि यासाठी त्यांचा अनेक ठिकाणी सत्कारही करण्यात आला.
    4
    अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे दर रविवारी व्यसनाधीन व्यक्तींना मोफत व्यसनमुक्तीचे धडे दिले जातात. येथील व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक दशरथ ठाकरे हे गेल्या १५ वर्षांपासून शेषराव महाराजांच्या आशीर्वादाने आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत आहेत.

या व्यसनमुक्ती आश्रमाच्या भिंतींवर 'दारूत रंगला संसार भंगला' अशा म्हणी रेखाटलेल्या असून, दशरथ ठाकरे प्रत्येक व्यसनाधीन व्यक्तीला मोफत सल्ला देतात. ते व्यसनाची सवय कशी लागते आणि ती कशी सोडवता येते, याबद्दल मार्गदर्शन करतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक व्यसनाधीन व्यक्ती येथे येऊन व्यसनमुक्त झाले आहेत.

दशरथ ठाकरे यांनी 'व्यसनमुक्ती सप्ताह' साजरा करत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन व्यसनमुक्तीचे धडे दिले आहेत. त्यांनी राज्यभर 'नशा मुक्ती जनजागृती अभियान'ही राबवले, ज्याला अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आणि यासाठी त्यांचा अनेक ठिकाणी सत्कारही करण्यात आला.
    user_राजकुमार वानखडे
    राजकुमार वानखडे
    News Anchor अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत असताना, मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की गावाजवळ एका नाल्यात प्रवाशांनी भरलेली बस अडकून पडली होती. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पुराच्या पाण्यात अडकलेल्या या बसमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठे धाडस दाखवले. अथक प्रयत्नांनी त्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप रेस्क्यू केले. या थरारक बचाव कार्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ग्रामस्थांचा साहसीपणा स्पष्टपणे दिसत आहे.
    1
    जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत असताना, मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की गावाजवळ एका नाल्यात प्रवाशांनी भरलेली बस अडकून पडली होती. या घटनेमुळे बसमधील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

पुराच्या पाण्यात अडकलेल्या या बसमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठे धाडस दाखवले. अथक प्रयत्नांनी त्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप रेस्क्यू केले. या थरारक बचाव कार्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ग्रामस्थांचा साहसीपणा स्पष्टपणे दिसत आहे.
    user_R Media
    R Media
    रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर संतांच्या पालखी सोहळ्यांच्या आयोजनासाठी राज्य प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वाहतूक, गर्दी व्यवस्थापन, वैद्यकीय पथके, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने सर्व जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित विभागांना समन्वयाने काम करून पालखी सोहळा शांततापूर्ण, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
    1
    आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर संतांच्या पालखी सोहळ्यांच्या आयोजनासाठी राज्य प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वाहतूक, गर्दी व्यवस्थापन, वैद्यकीय पथके, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाने सर्व जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित विभागांना समन्वयाने काम करून पालखी सोहळा शांततापूर्ण, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    14 hrs ago
  • अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात एका सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे एक मोठी घटना टळली आहे. उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या वॉर्डबाहेर संशयास्पदरित्या हालचाल करणाऱ्या एका तरुणाकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला. सुरक्षा रक्षकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत असून, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
    1
    अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात एका सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे एक मोठी घटना टळली आहे. उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या वॉर्डबाहेर संशयास्पदरित्या हालचाल करणाऱ्या एका तरुणाकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला. सुरक्षा रक्षकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत असून, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
    user_Akola daily news update
    Akola daily news update
    Local News Reporter अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.