logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आज, सोमवार, १ जून रोजी सकाळी सुमारे ६:३० वाजता मध्य प्रदेशातील सेंदवा टोल नाक्याजवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर आणि महालगाव येथील तरुण मित्रांच्या कारला भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत गंगापूर-महालगाव येथील चार तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने सेंदवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच गंगापूरचे उपनगराध्यक्ष अमोल जगताप, संदीप साबणे, भगवान हिवाळे आणि अनिल काळे यांनी तात्काळ सेंदवाकडे धाव घेतली असून, ते जखमींना आवश्यक मदत व सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या अपघाताची बातमी परिसरात पसरताच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सर्वजण जखमी तरुणांनी लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करत आहेत.

5 hrs ago
user_RahimKhan Pathan
RahimKhan Pathan
Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
5 hrs ago

आज, सोमवार, १ जून रोजी सकाळी सुमारे ६:३० वाजता मध्य प्रदेशातील सेंदवा टोल नाक्याजवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर आणि महालगाव येथील तरुण मित्रांच्या कारला भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत गंगापूर-महालगाव येथील चार तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने सेंदवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच गंगापूरचे उपनगराध्यक्ष अमोल जगताप, संदीप साबणे, भगवान हिवाळे आणि अनिल काळे यांनी तात्काळ सेंदवाकडे धाव घेतली असून, ते जखमींना आवश्यक मदत व सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या अपघाताची बातमी परिसरात पसरताच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सर्वजण जखमी तरुणांनी लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करत आहेत.

More news from Aurangabad and nearby areas
  • Post by Anis qureshi sillod
    1
    Post by Anis qureshi sillod
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    18 hrs ago
  • महानगरपालिकाचे बाहुबली नगरसेवक महावीर जी ढक्का यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
    1
    महानगरपालिकाचे बाहुबली नगरसेवक महावीर जी ढक्का यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
    1
    मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकारात्मक चर्चा झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, काँग्रेसच्या वतीने प्रतिकात्मकरित्या कार ओढून दरवाढीचा निषेध करण्यात आला.
    1
    पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, काँग्रेसच्या वतीने प्रतिकात्मकरित्या कार ओढून दरवाढीचा निषेध करण्यात आला.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जालना स्थानिक गुन्हे शाखेने मानवी आरोग्यास घातक असलेल्या प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान दोन वाहनांमधून एकूण रु.25,84,042/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
    1
    जालना स्थानिक गुन्हे शाखेने मानवी आरोग्यास घातक असलेल्या प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान दोन वाहनांमधून एकूण रु.25,84,042/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगांव यांच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या पायी वारीच्या ५७ व्या पालखी सोहळ्याची २०२६ ची वेळपत्रिका जाहीर करण्यात आली आहे.
    1
    श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगांव यांच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या पायी वारीच्या ५७ व्या पालखी सोहळ्याची २०२६ ची वेळपत्रिका जाहीर करण्यात आली आहे.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    9 hrs ago
  • खामगावात सोमवारी सायंकाळी अचानक हवामानात बदल होऊन प्रचंड वेगाने वादळी वारा सुटला, ज्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील मोठे होर्डिंग्स आणि बॅनर्स जागोजागी फाटून रस्त्यावर लोंबकळू लागले. यामुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला असून, "या बॅनर्समुळे दुर्दैवाने अपघात झाल्यास जबाबदार कोण?" असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. या वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते, ज्यामुळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी झाली आणि वाहनचालकांना वाहने चालवताना प्रचंड कसरत करावी लागली. यासोबतच शहरातील अनेक भागांत जुन्या झाडांचीही पडझड झाल्याच्या घटना समोर आल्या, सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला. शहरातील प्रमुख चौक, दुभाजक आणि वर्दळीच्या रस्त्यांवर लावण्यात आलेले राजकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे मोठे बॅनर्स वाऱ्यामुळे फाटून थेट रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या अंगावर किंवा डोळ्यांसमोर येण्याची परिस्थिती निर्माण झाली होती, कारण यापूर्वीही वादळ-वाऱ्याच्या काळात असे बॅनर्स कोसळून अनेक गंभीर अपघात घडले आहेत. हवामान खात्याने आधीच वादळी वाऱ्याचा इशारा दिला असतानाही स्थानिक प्रशासनाकडून या धोकादायक बॅनर्सकडे डोळेझाक केली जात असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "जर या लोंबकळणाऱ्या बॅनर्समुळे एखाद्याचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी पालिका प्रशासन घेणार की बॅनर्स लावणारे घेणार?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. भविष्यातील संभाव्य जीवितहानी किंवा मोठा अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने मोहीम राबवून हे फाटलेले आणि धोकादायक बॅनर्स हटवावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
    1
    खामगावात सोमवारी सायंकाळी अचानक हवामानात बदल होऊन प्रचंड वेगाने वादळी वारा सुटला, ज्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील मोठे होर्डिंग्स आणि बॅनर्स जागोजागी फाटून रस्त्यावर लोंबकळू लागले. यामुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला असून, "या बॅनर्समुळे दुर्दैवाने अपघात झाल्यास जबाबदार कोण?" असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

या वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते, ज्यामुळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी झाली आणि वाहनचालकांना वाहने चालवताना प्रचंड कसरत करावी लागली. यासोबतच शहरातील अनेक भागांत जुन्या झाडांचीही पडझड झाल्याच्या घटना समोर आल्या, सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला. शहरातील प्रमुख चौक, दुभाजक आणि वर्दळीच्या रस्त्यांवर लावण्यात आलेले राजकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे मोठे बॅनर्स वाऱ्यामुळे फाटून थेट रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या अंगावर किंवा डोळ्यांसमोर येण्याची परिस्थिती निर्माण झाली होती, कारण यापूर्वीही वादळ-वाऱ्याच्या काळात असे बॅनर्स कोसळून अनेक गंभीर अपघात घडले आहेत.

हवामान खात्याने आधीच वादळी वाऱ्याचा इशारा दिला असतानाही स्थानिक प्रशासनाकडून या धोकादायक बॅनर्सकडे डोळेझाक केली जात असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. "जर या लोंबकळणाऱ्या बॅनर्समुळे एखाद्याचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी पालिका प्रशासन घेणार की बॅनर्स लावणारे घेणार?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. भविष्यातील संभाव्य जीवितहानी किंवा मोठा अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने मोहीम राबवून हे फाटलेले आणि धोकादायक बॅनर्स हटवावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.