श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणार एक लाख ११ हजार १११ रकमेचा "स्व.श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार" -श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड.गजाननराव पुंडकर यांची माहीती ;पुरस्काराची संकल्पना राष्ट्रीय नेते शरद पवारांची ;शरद पवार यांनी पुरस्कारासाठी दिली २० लाखांची रक्कम ;संस्थेतर्फे शेतकरी महिलेला प्रोत्साहनपर दिला जाणार ५१ हजाराचा "स्व.विमलाबाई भाऊसाहेब देशमुख पुरस्कार" २७ डिसेंबरला डॉ.भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंती उत्सवात पुरस्कारांचे होणार वितरण ;या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खा.सुप्रियाताई सुळे उपस्थित राहणार अकोट,ता.२१-केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी गत वर्षी त्यांना अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे प्राप्त झालेल्या शिक्षण महर्षी स्व.डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख पुरस्काराची पाच लाखांची रक्कम संस्थेला परत करुन त्यात स्वतःच्या १५ लाख रुपयांची भर घातली.या २० लाखांच्या रकमेच्या व्याजावर प्रत्यक्ष शेती करणाऱ्या महिलांसाठी पुरस्कार देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.त्यांच्या या संकल्पनेला आता मूर्त रुप लाभत आहे.संस्थेतर्फे शरद पवार यांच्या इच्छेचा मान राखत स्व.भाऊसाहेब देशमुखांच्या १२६ व्या जयंती उत्सवात २७ डिसेंबर २०२४ ला,अमरावती येथे सकाळी आयोजित सोहळ्यात शरद पवार यांच्या मातोश्री व समाजसेविका "स्व.श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार"यांच्या नावाने एक लाख ११ हजार १११ रक्कम असलेला "उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार" प्रदान करण्यात येणार आहे.तसेच प्रोत्साहनपर म्हणून दुसरा ५१ हजारांचा पुरस्कार संस्थेतर्फे स्व.भाऊसाहेब देशमुख यांच्या दिवंगत पत्नी विमलाबाई देशमुख यांच्या नावाने शेतकरी महिलेला दिला जाणार आहे,अशी माहीती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड.गजानन पुंडकर यांनी "किरण न्यूज"ला दिली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व कार्यकारीणीच्या मार्गदर्शनात देण्याचा येणाऱ्या या पुरस्कारासांठी प्रत्यक्ष शेती करणाऱ्या उत्कृष्ट शेतकरी महिलांची निवड करण्याचा निर्णय झाला.त्यानुसार जाहीर आवाहन होताच ३७ महिला शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले.त्यापैकी १८ अर्ज निकष पूर्ण न झाल्याने नामंजूर झाले.उर्वरित १९ अर्जांची सखोल छाननी,प्रत्यक्ष निरिक्षण करण्यासाठी एका समितीचे गठण करण्यात आले.या समितीचे अध्यक्ष म्हणून संस्था उपाध्यक्ष अँड.गजानन पुंडकर यांची निवड झाली.त्यांच्यासह संस्थेचे संचालक प्रा.सुभाष बनसोड,सचिव प्राचार्य डॉ.समीर लांडे,सदस्य-प्राचार्य डॉ.सी.एम.देशमुख,प्राचार्य नंदकुमार चिखले,प्राचार्य अभय ढोबळे,प्राचार्य राजेंद्र खाडे आदींनी कार्य पाहीले.समितीने प्रक्रिया पूर्ण करुन अध्यक्षांना अहवाल सादर केला.त्यानंतर संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी पाच महिला शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन "प्रत्यक्ष पाहणी"केली.आता अंतीम निर्णय येत्या २७ डिसेंबरला जयंतीउत्सव सोहळ्यात जाहीर होऊन मान्यवर पाहूण्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.विशेष म्हणजे या सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व शरद पवार यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे उपस्थित राहणार आहेत,अशी माहीती संस्था उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनी दिली. *या वर्षीचा भाऊसाहेब देशमुख पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर* या वर्षीचा स्व.डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख पुरस्कार केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांना जाहीर करण्यात आल्याचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड.गजानन पुंडकर यांनी सांगितले.भाऊसाहेबांच्या १२६ व्या जयंती उत्सवात २७ डिसेंबरला हा पुरस्कार ना.गडकरींना प्रदान करण्यात येईल,असे ते म्हणाले.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणार एक लाख ११ हजार १११ रकमेचा "स्व.श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार" -श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड.गजाननराव पुंडकर यांची माहीती ;पुरस्काराची संकल्पना राष्ट्रीय नेते शरद पवारांची ;शरद पवार यांनी पुरस्कारासाठी दिली २० लाखांची रक्कम ;संस्थेतर्फे शेतकरी महिलेला प्रोत्साहनपर दिला जाणार ५१ हजाराचा "स्व.विमलाबाई भाऊसाहेब देशमुख पुरस्कार" २७ डिसेंबरला डॉ.भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंती उत्सवात पुरस्कारांचे होणार वितरण ;या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खा.सुप्रियाताई सुळे उपस्थित राहणार अकोट,ता.२१-केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी गत वर्षी त्यांना अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे प्राप्त झालेल्या शिक्षण महर्षी स्व.डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख पुरस्काराची पाच लाखांची रक्कम संस्थेला परत करुन त्यात स्वतःच्या १५ लाख रुपयांची भर घातली.या २० लाखांच्या रकमेच्या व्याजावर प्रत्यक्ष शेती करणाऱ्या महिलांसाठी पुरस्कार देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.त्यांच्या या संकल्पनेला आता मूर्त रुप लाभत आहे.संस्थेतर्फे शरद
पवार यांच्या इच्छेचा मान राखत स्व.भाऊसाहेब देशमुखांच्या १२६ व्या जयंती उत्सवात २७ डिसेंबर २०२४ ला,अमरावती येथे सकाळी आयोजित सोहळ्यात शरद पवार यांच्या मातोश्री व समाजसेविका "स्व.श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार"यांच्या नावाने एक लाख ११ हजार १११ रक्कम असलेला "उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार" प्रदान करण्यात येणार आहे.तसेच प्रोत्साहनपर म्हणून दुसरा ५१ हजारांचा पुरस्कार संस्थेतर्फे स्व.भाऊसाहेब देशमुख यांच्या दिवंगत पत्नी विमलाबाई देशमुख यांच्या नावाने शेतकरी महिलेला दिला जाणार आहे,अशी माहीती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड.गजानन पुंडकर यांनी "किरण न्यूज"ला दिली. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व कार्यकारीणीच्या मार्गदर्शनात देण्याचा येणाऱ्या या पुरस्कारासांठी प्रत्यक्ष शेती करणाऱ्या उत्कृष्ट शेतकरी महिलांची निवड करण्याचा निर्णय झाला.त्यानुसार जाहीर आवाहन होताच ३७ महिला शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले.त्यापैकी १८ अर्ज निकष पूर्ण न झाल्याने नामंजूर झाले.उर्वरित १९ अर्जांची सखोल छाननी,प्रत्यक्ष निरिक्षण करण्यासाठी एका समितीचे गठण करण्यात आले.या समितीचे अध्यक्ष म्हणून संस्था उपाध्यक्ष अँड.गजानन पुंडकर
यांची निवड झाली.त्यांच्यासह संस्थेचे संचालक प्रा.सुभाष बनसोड,सचिव प्राचार्य डॉ.समीर लांडे,सदस्य-प्राचार्य डॉ.सी.एम.देशमुख,प्राचार्य नंदकुमार चिखले,प्राचार्य अभय ढोबळे,प्राचार्य राजेंद्र खाडे आदींनी कार्य पाहीले.समितीने प्रक्रिया पूर्ण करुन अध्यक्षांना अहवाल सादर केला.त्यानंतर संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी पाच महिला शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन "प्रत्यक्ष पाहणी"केली.आता अंतीम निर्णय येत्या २७ डिसेंबरला जयंतीउत्सव सोहळ्यात जाहीर होऊन मान्यवर पाहूण्यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.विशेष म्हणजे या सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व शरद पवार यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे उपस्थित राहणार आहेत,अशी माहीती संस्था उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनी दिली. *या वर्षीचा भाऊसाहेब देशमुख पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर* या वर्षीचा स्व.डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख पुरस्कार केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांना जाहीर करण्यात आल्याचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड.गजानन पुंडकर यांनी सांगितले.भाऊसाहेबांच्या १२६ व्या जयंती उत्सवात २७ डिसेंबरला हा पुरस्कार ना.गडकरींना प्रदान करण्यात येईल,असे ते म्हणाले.
- शिवांश कलेक्शन💖 बस स्टँड रोड तेल्हारा.महाराष्ट्र💯💥1
- आपला अंजनगाव सुर्जी1
- 🔴अंजनगाव सुर्जी,तूर भाव 9111,तूर बाजारभावात घसरण, 21 डिसेंबर 2024,Todays tur bazarbhav1
- शिवजयंती लवकरच 🚩🙏🏻🏹🌺🙇♀️ अंजनगाव सुर्जी1
- शिवजयंती लवकरच 🚩🙏🏻🏹🌺🙇♀️ अंजनगाव सुर्जी1
- दर्यापूर आमदार : गजानन लवटे यांनी पहिलीच मागणी काय केली.1
- कालिया शेष महाराज भजन मंडळ दर्यापूर ... कालिया शेष महाराज प्रगट दिन सोहळा.. 20241
- कमेंट मध्ये सांगा1
- Post by Shyam chakle1