आरोग्य शिबिराचा पत्रकारांना लाभ विक्रम शिंदें /भोर दि.३ मराठी पत्रकार परिषद मुंबई वर्धापन दिनाचे औचित्याने आज (दि.३) पत्रकार संघ भोरच्या वतीने पत्रकार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुसळे यांनी सांगितले.शहरातील आनंद क्लिनिकचे डॉ.आनंदा कंक यांचे सहयोगाने संपन्न आरोग्य शिबिरात १५ हून अधिक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांची रक्तदाब ,रक्त शर्करा, ईसीजी आणि इतर तपासणी करण्यात आली.डॉ.कंक यांनी ताण- तणावाचे व्यवस्थापन याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.तसेच रोटरी क्लब ऑफ भोर-राजगडचे माजी अध्यक्ष डॉ.आनंदा कंक लिखित नुकतेच प्रकाशित झालेला युद्ध नको बुद्ध हवा हा काव्यसंग्रह पत्रकारांना भेट देण्यात आला.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस .एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष हाजी मन्सूरभाई शेख,राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर राबविण्यात आले.यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष म्हस्के,सदस्य दत्तात्रय बांदल ,पत्रकार संघ भोरचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुसळे,उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, सोशल मीडिया अध्यक्ष कुंदन झांजले, उपाध्यक्ष दीपक पारठे ,विक्रम शिंदे,रुपेश जाधव ,ज्ञानेश्वर जेधे, महेश उभे आदींसह पत्रकार उपस्थित होते.