शहापूर येथे स्वच्छ भारत मिशन निधीतील 52 लाखांचा कथित अपहार; चौकशीची मागणी तालुका औंढा नागनाथ अंतर्गत मौजे शिरड शहापूर येथे स्वच्छ भारत मिशन (SBM) योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ५२ लाख रुपयांच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व अपहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. मा. समाज रत्न अनिल भाऊ कांबळे, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, हिंगोली यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी मंजूर निधी असूनही गावामध्ये प्रत्यक्षात कोणतीही नवीन कामे करण्यात आलेली नाहीत. उलट, इतर शासकीय योजनांमधून (१५वा वित्त आयोग, जिल्हा नियोजन समिती, पीडब्ल्यूडी) आधीच करण्यात आलेल्या कामांचेच खोटे मूल्यांकन करून ते SBM अंतर्गत दाखविण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, संबंधित कंत्राटदाराने गावामध्ये कोणतेही काम न करता निधी उचलल्याचा संशय असून, शाखा अभियंता श्री. बोरकर यांनीही खोटे मोजमाप व मूल्यांकन पुस्तिकेत नोंदी करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोघांनी संगनमताने निधीचा अपहार केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, कामासंदर्भातील आवश्यक पुरावे जसे की काम सुरू करण्यापूर्वीचे, प्रगतीतील व पूर्ण झाल्यानंतरचे फोटो तसेच कंत्राटदाराचे GST इन्व्हॉईस उपलब्ध नसल्यामुळे संपूर्ण व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 409, 420, 467, 468, 471 व 120(ब) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमून कोणती कार्यवाही केली जाणार आहे, याबाबत लेखी माहिती देण्याची मागणीही करण्यात आली आहे. या गंभीर आरोपांमुळे शहापूर परिसरात खळबळ उडाली असून, प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

- Post by वैजनाथ पावडे1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- मंठा, पूर्णा नदीपात्रातील कानडी-उस्वद वाळू घाटांवर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. निवेदनानुसार, रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन, जेसीबी-पोकलेनचा वापर, रॉयल्टीत तफावत व मोबाईलवर बंदी अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तसेच मजुरांची नोंद नसणे व नदीपात्रात अवैध रस्ते तयार केल्याने पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याचेही नमूद आहे. या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.1
- हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption1
- इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.1
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- दारव्हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मार्च अखेरीस वाढत्या उन्हामुळे तसेच लग्नसराईचा हंगाम आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत बसस्थानकावर ठेवलेले माठ रिकामे असून पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने (यवतमाळ-वाशीम) यांनी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेऊन दारव्हा बसस्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रसिद्धी माध्यमांतून केली आहे.1
- Post by वैजनाथ पावडे1