logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

संस्कार पोद्दार लर्न स्कूलच्या क्रीडा शिक्षक सचिन शिंदे चे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुयश उमरखेड : येथे आयोजित भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहात पार पडली. यवतमाळ जिल्हा बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन व सोनुभाऊ सोनटक्के मित्र मंडळ यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा जिल्हा समन्वयक (यवतमाळ-पुसद) श्री. नितीन भाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत संस्कार पोद्दार लर्न स्कूल, उमरखेड येथील क्रीडा शिक्षक सचिन शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत ६० किलोवरील गटात तृतीय क्रमांक पटकावला. तसेच त्यांच्या आकर्षक शरीरयष्टी व उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्यांना “उदयोनमुख खेळाडू – उमरखेड शहर औदुंबर श्री” हा मानाचा किताबही प्रदान करण्यात आला. सचिन शिंदे हे आरोग्य व फिटनेसविषयी अत्यंत समर्पित असून ते नियमित जिममध्ये व्यायाम करतात. ते उत्तम सायकलिस्ट असून मजबूत स्नायूंमुळे त्यांची शरीरयष्टी प्रभावी आहे. तसेच ते कराटे ब्लॅक बेल्ट धारक व कराटे चॅम्पियन असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मानले जातात. सचिन शिंदे यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

19 hrs ago
user_Shaikh irfan Shaikh isa
Shaikh irfan Shaikh isa
उमरखेड, यवतमाळ, महाराष्ट्र•
19 hrs ago
441a0429-3a4d-44fa-ab9d-6da9e2a2e0b4

संस्कार पोद्दार लर्न स्कूलच्या क्रीडा शिक्षक सचिन शिंदे चे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुयश उमरखेड : येथे आयोजित भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहात पार पडली. यवतमाळ जिल्हा बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन व सोनुभाऊ सोनटक्के मित्र मंडळ यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा जिल्हा समन्वयक (यवतमाळ-पुसद) श्री. नितीन भाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत संस्कार पोद्दार लर्न स्कूल, उमरखेड येथील क्रीडा शिक्षक सचिन शिंदे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत ६० किलोवरील गटात तृतीय क्रमांक पटकावला. तसेच त्यांच्या आकर्षक शरीरयष्टी व उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्यांना “उदयोनमुख खेळाडू – उमरखेड शहर औदुंबर श्री” हा मानाचा किताबही प्रदान करण्यात आला. सचिन शिंदे हे आरोग्य व फिटनेसविषयी अत्यंत समर्पित असून ते नियमित जिममध्ये व्यायाम करतात. ते उत्तम सायकलिस्ट असून मजबूत स्नायूंमुळे त्यांची शरीरयष्टी प्रभावी आहे. तसेच ते कराटे ब्लॅक बेल्ट धारक व कराटे चॅम्पियन असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मानले जातात. सचिन शिंदे यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अमरण उपोषणाचा दुसरा दिवस भानेगाव येथील विविध प्रश्नांवर न्याय मिळावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सुरू केलेल्या अमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. भानेगाव येथील जल जीवन मिशन (JJM) व पाणीपुरवठा कामातील अनियमितता, बनावट कागदपत्रे व सह्या, सन 2021–23 मधील ग्रामपंचायत विकास कामांची चौकशी, जि.प. प्राथमिक शाळेतील कामांची चौकशी, तसेच माजी मुख्याध्यापक चौकशीत दोषी आढळूनही कारवाई न झाल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पूरामुळे बंद होणारा गावाचा जीवनावश्यक रस्ता पुनर्वसन जागेतून तात्काळ खुला करावा व बेलगव्हाण–भानेगाव पांदन रस्ता तात्काळ सुरू करावा, या मागण्यांसाठी उपोषण सुरू असल्याचे सांगण्यात आले.
    1
    अमरण उपोषणाचा दुसरा दिवस
भानेगाव येथील विविध प्रश्नांवर न्याय मिळावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सुरू केलेल्या अमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.
भानेगाव येथील जल जीवन मिशन (JJM) व पाणीपुरवठा कामातील अनियमितता, बनावट कागदपत्रे व सह्या, सन 2021–23 मधील ग्रामपंचायत विकास कामांची चौकशी, जि.प. प्राथमिक शाळेतील कामांची चौकशी, तसेच माजी मुख्याध्यापक चौकशीत दोषी आढळूनही कारवाई न झाल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पूरामुळे बंद होणारा गावाचा जीवनावश्यक रस्ता पुनर्वसन जागेतून तात्काळ खुला करावा व बेलगव्हाण–भानेगाव पांदन रस्ता तात्काळ सुरू करावा, या मागण्यांसाठी उपोषण सुरू असल्याचे सांगण्यात आले.
    user_Prashant singanwad
    Prashant singanwad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    40 min ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • 🚩 पिंपळगाव येथील श्री दत्त मंदिरात भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩 हिमायतनगर, भोकर, हदगांव तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव येथे २० मार्च ते २७ मार्च २०२६ दरम्यान भव्य श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णाजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार असून विविध संत-महंतांची उपस्थिती लाभणार आहे. भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन तसेच महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी केले आहे. 🙏 #Himayatnagar #RamKatha #DattYagya #NamSankirtan #ReligiousEvent #Maharashtra #SpiritualProgram #Bhakti #SanatanDharma 🚩🙏
    1
    🚩 पिंपळगाव येथील श्री दत्त मंदिरात भव्य ‘श्री रामकथा’ व १०८ कुंडी दत्तयज्ञ सोहळा 🚩
हिमायतनगर, भोकर, हदगांव तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या पिंपळगाव येथे २० मार्च ते २७ मार्च २०२६ दरम्यान भव्य श्री रामकथा, १०८ कुंडी दत्तयज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णाजी महाराज (जोधपूर) यांच्या वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण होणार असून विविध संत-महंतांची उपस्थिती लाभणार आहे.
भाविकांसाठी प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन तसेच महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी केले आहे. 🙏
#Himayatnagar #RamKatha #DattYagya #NamSankirtan #ReligiousEvent #Maharashtra #SpiritualProgram #Bhakti #SanatanDharma 🚩🙏
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसची संघर्ष पदयात्रा; कळमनुरी ते हिंगोली गांधी चौकात समारोप
    1
    शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसची संघर्ष पदयात्रा; कळमनुरी ते हिंगोली गांधी चौकात समारोप
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल
नांदेड:
शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला
या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.
प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.
नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.
"आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल."
— स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते
आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    6 hrs ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.