logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिरोळमध्ये कचरा डेपोचा प्रदूषित धुरामुळे नागरिकांचा संताप उसळला, ‘गांधीगिरी’ पद्धतीने लक्ष वेधणार  शिरोळ / प्रतिनिधी  शिरोळ शहरातील दसरा चौक येथील कचरा डेपोला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे परिसरात प्रदूषित धुर पसरत असून लहान मुले, महिलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच श्वसनाच्या गंभीर तक्रारींना सामोरे जावे लागत आहे.विशेषतः प्रभाग क्रमांक दहा मधील रहिवासी गेल्या अनेक वर्षापासून या समस्येने हैराण झाले आहेत.मात्र वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.या संदर्भात शिरोळ नगर परिषदच्या आरोग्य विभागासह लोकप्रतिनिधींना लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या.तरीही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.पूर्वी कचरा रात्रीच्या वेळी पेटवला जात होता; मात्र आता दिवसा ढवळ्या कचरा जाळण्याचे प्रकार सुरू असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.प्रभाग क्रमांक दहा मध्ये असलेल्या या डेपोमुळे संपूर्ण परिसर धुराच्या विळख्यात सापडतो. अनेकांना दमा,खोकला,डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी वाढल्या आहेत. शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून वयोवृद्ध नागरिकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. यापूर्वीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे सत्तांतर घडवून बदलाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र नव्या पदाधिकाऱ्यांकडूनही केवळ पाहणीचे नाटक होत असल्याचा आरोप होत आहे. “हाताची घडी, तोंडावर बोट” अशी भूमिका घेत चारही नगरसेवक शांत बसले आहेत,अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून नगरपरिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष,आरोग्य सभापती आणि संबंधित नगरसेवकांचा ‘गांधीगिरी’ पद्धतीने सत्कार करून निषेध नोंदवण्याचा निर्धार केला आहे. समस्या तत्काळ मार्गी लावली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने भविष्यात मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.नागरिकांच्या संयमाचा बांध तुटण्याआधी नगरपरिषद जागी होणार का,असा सवाल आता उपस्थित होत आहे.

1 hr ago
user_आमची मराठी.com
आमची मराठी.com
शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र•
1 hr ago
7ed80601-8dd3-4e8a-b759-08629c2f26df

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कोल्हापूरातील शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रस्ते व वाहनतळ विकासकामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप कोल्हापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. निविदेपूर्वी काम पूर्ण व मोजमाप पुस्तिकेत खाडाखोड केल्याचा दावा करत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून सखोल चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
    1
    कोल्हापूरातील शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रस्ते व वाहनतळ विकासकामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप कोल्हापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. निविदेपूर्वी काम पूर्ण व मोजमाप पुस्तिकेत खाडाखोड केल्याचा दावा करत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून सखोल चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
    user_Raviraj kamble
    Raviraj kamble
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • सांगोला तालुका सूतगिरणी समोर MH10AW6517 या सीएनजी टाटा गाडीला अचानक आग लागली गाडीमध्ये कोणीही व्यक्ती नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. सांगोला येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तत्काळ आग विझवण्यात आली.
    1
    सांगोला तालुका सूतगिरणी समोर MH10AW6517 या सीएनजी टाटा गाडीला अचानक आग लागली गाडीमध्ये कोणीही व्यक्ती नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. सांगोला येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले तत्काळ आग विझवण्यात आली.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • 🚩 *शिवरायांचे स्वप्नदर्शन; समाजजागृतीसाठी कार्य करण्याची महाराजांची प्रेरणा* 🚩 १९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, न्याय आणि लोककल्याणाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवराय हे केवळ एक राजा नव्हते, तर ते जनतेचे रक्षणकर्ते, स्त्रीसन्मानाचे पुरस्कर्ते आणि स्वाभिमानाची जाज्वल्य ज्योत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करून जगाला दाखवून दिले की ध्येय, धैर्य आणि योग्य विचार यांच्या बळावर अशक्यही शक्य होते. त्यांनी नेहमीच धर्मनिरपेक्षता, न्याय आणि लोकहित यांना सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या राज्यकारभारात सामान्य माणूस केंद्रस्थानी होता. महाराजांचे महानत्व केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही अनेकांच्या जीवनाला दिशा देते. माझ्या आयुष्यातही महाराजांचे स्थान अत्यंत विशेष आहे. अनेकदा स्वप्नामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते. त्या स्वप्नांमध्ये महाराज मला मार्गदर्शन करतात, समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देतात आणि “समाजाचा उद्धार कर, लोकांमध्ये जागृती निर्माण कर” असा संदेश देतात. महाराज स्वप्नामध्ये सांगतात की स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नसून लोकांच्या मनात स्वाभिमान जागवणे होय. समाजामध्ये एकता, न्याय, स्त्रीसन्मान आणि मानवतेचे मूल्य पसरवण्याचे उपदेश ते देतात. त्यांच्या आशीर्वादातून समाजसेवेची ऊर्जा आणि धैर्य मिळते. महाराजांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचवणे हीच खरी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आजच्या काळात शिवरायांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, दुर्बलांच्या पाठीशी उभे राहणे आणि समाजहिताला प्राधान्य देणे — हाच खरा शिवमार्ग आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त भूतकाळ नाही, तर तो वर्तमान आणि भविष्य घडवणारी प्रेरणा आहे. १९ फेब्रुवारी या पावन दिवशी आपण सर्वांनी शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करूया. स्वराज्याची भावना आपल्या कृतीतून जिवंत ठेवूया. 🙏 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा! 🚩 #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवजयंती #शिवराय #हिंदवीस्वराज्य #शिवप्रेरणा #समाजजागृती #महाराष्ट्रअभिमान #जयशिवराय #१९फेब्रुवारी #शिवविचार
    1
    🚩 *शिवरायांचे स्वप्नदर्शन; समाजजागृतीसाठी कार्य करण्याची महाराजांची प्रेरणा* 🚩
१९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. या दिवशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, न्याय आणि लोककल्याणाचे प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवराय हे केवळ एक राजा नव्हते, तर ते जनतेचे रक्षणकर्ते, स्त्रीसन्मानाचे पुरस्कर्ते आणि स्वाभिमानाची जाज्वल्य ज्योत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची स्थापना करून जगाला दाखवून दिले की ध्येय, धैर्य आणि योग्य विचार यांच्या बळावर अशक्यही शक्य होते. त्यांनी नेहमीच धर्मनिरपेक्षता, न्याय आणि लोकहित यांना सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या राज्यकारभारात सामान्य माणूस केंद्रस्थानी होता.
महाराजांचे महानत्व केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही. त्यांच्या विचारांची प्रेरणा आजही अनेकांच्या जीवनाला दिशा देते. माझ्या आयुष्यातही महाराजांचे स्थान अत्यंत विशेष आहे. अनेकदा स्वप्नामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन होते. त्या स्वप्नांमध्ये महाराज मला मार्गदर्शन करतात, समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देतात आणि “समाजाचा उद्धार कर, लोकांमध्ये जागृती निर्माण कर” असा संदेश देतात.
महाराज स्वप्नामध्ये सांगतात की स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नसून लोकांच्या मनात स्वाभिमान जागवणे होय. समाजामध्ये एकता, न्याय, स्त्रीसन्मान आणि मानवतेचे मूल्य पसरवण्याचे उपदेश ते देतात. त्यांच्या आशीर्वादातून समाजसेवेची ऊर्जा आणि धैर्य मिळते. महाराजांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचवणे हीच खरी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे.
आजच्या काळात शिवरायांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, दुर्बलांच्या पाठीशी उभे राहणे आणि समाजहिताला प्राधान्य देणे — हाच खरा शिवमार्ग आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त भूतकाळ नाही, तर तो वर्तमान आणि भविष्य घडवणारी प्रेरणा आहे.
१९ फेब्रुवारी या पावन दिवशी आपण सर्वांनी शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करूया. स्वराज्याची भावना आपल्या कृतीतून जिवंत ठेवूया.
🙏 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा! 🚩
#छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवजयंती #शिवराय #हिंदवीस्वराज्य #शिवप्रेरणा #समाजजागृती #महाराष्ट्रअभिमान #जयशिवराय #१९फेब्रुवारी #शिवविचार
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • इन्सुली भिसेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सावंतवाडी वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.हा प्रकार आज सकाळी घडला. तो आठ ते नऊ वर्षाचा आहे. कोणत्याही जखमा झालेल्या नाहीत. त्यामुळे त्याला दाजीपुर येथील अभयारण्यात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सावंतवाडी चे वन अधिकारी सुहास पाटील यांनी दिली.
    1
    इन्सुली भिसेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सावंतवाडी वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे.हा प्रकार आज सकाळी घडला. तो आठ ते नऊ वर्षाचा आहे. कोणत्याही जखमा झालेल्या नाहीत. त्यामुळे त्याला  दाजीपुर येथील अभयारण्यात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती सावंतवाडी चे वन अधिकारी सुहास पाटील यांनी दिली.
    user_MH07NEWS
    MH07NEWS
    कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • भिगवण मध्ये झालेल्या घटनेचा मुस्लिम संघटनाच्या वतीने निषेध निषेदाचे पत्र भिगवण पोलिसांना दिले कारवाई करण्याची मागणी तर सलोखा खराब n करण्याचे आवाहन.
    1
    भिगवण मध्ये झालेल्या घटनेचा मुस्लिम संघटनाच्या वतीने निषेध निषेदाचे पत्र भिगवण पोलिसांना दिले कारवाई करण्याची मागणी तर सलोखा खराब n करण्याचे आवाहन.
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. #AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo
    1
    BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. 
#AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सातारा शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने काढलेल्या रॅलीमध्ये अघोरी नृत्य रद्द करावे -हमीद दाभोळकर (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)
    1
    सातारा शहरात शिवजयंतीच्या निमित्ताने काढलेल्या रॅलीमध्ये अघोरी नृत्य रद्द करावे -हमीद दाभोळकर (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)
    user_Mahalaxmi News 24 Satara
    Mahalaxmi News 24 Satara
    Accountant सातारा, सातारा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.