logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन आमदार हिकमत उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिकमत दादा उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी प्रादेशिक असमतोल दूर करण्याची जोरदार मागणी केली. घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे अधोरेखित केले. नदीजोड प्रकल्पांतर्गत वैतरणा व उल्हास खोऱ्यातील वाढीव पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले. मात्र असे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत स्थानिक लघु सिंचन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “२५-३० वर्षांपूर्वी उभारलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (KT Weirs) आज जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे चांगला पाऊस पडूनही पाणी साठत नाही. या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून जायकवाडी धरणातून वाहून जाणारे पाणी अडवले, तर परिसरातील ३० ते ३५ गावांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो,” असे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हतवन प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. रस्त्यांच्या विषयावर बोलताना आमदार हिकमत दादा उढाण यांनी मुंबईसारख्या शहरांना माेठ्या प्रमाणात निधी तर ग्रामीण भागासाठी तुलनेने कमी निधी मिळत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ महामार्ग यांसारखे मोठे प्रकल्प महत्त्वाचे असले तरी ग्रामीण भागातील ओडीआर (ODR) व एमडीआर (MDR) रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी भरीव निधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंट काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले; मात्र यासाठी करण्यात आलेली साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडताना आमदार उढाण यांनी साखर कारखान्यांवरील २५ किलोमीटर हवाई अंतराच्या नियमावर जोरदार टीका केली. “जगात असा कोणताही उद्योग नसेल जिथे नवीन युनिट सुरू करण्यासाठी इतके कडक निर्बंध असतील. या नियमामुळे ज्या भागात ऊस उत्पादन जास्त आहे, त्या ठिकाणी नवीन कारखाने उभे राहू शकत नाहीत आणि शेतकऱ्यांची कोंडी होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा २५ किमीचा नियम रद्द करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच ऊस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्यांवरील काटामारी रोखण्यासाठी सरकारने डिजिटल काटे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार हिकमत दादा उढाण यांनी मांडलेल्या या मुद्द्यांमुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाडा आणि ग्रामीण महाराष्ट्रातील प्रश्नांवर सभागृहात व्यापक चर्चा झाली

on 10 March
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हृदयद्रावक व अतिशय दुर्दैवी घटना; पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात आज गुरवारी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना हारूनबाग भागात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उतरल्याने चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. मुलांना पाण्याची खोली लक्षात न आल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मुलांचे बूट, चप्पल आणि गणवेश आढळून आले असून मृत मुलांचे वय ८ ते १२ वर्षांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुरू असलेल्या कामामुळे हा खड्डा तयार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महापालिका व पोलीस प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू आहे.
    1
    हृदयद्रावक व अतिशय दुर्दैवी घटना; पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू
नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात आज गुरवारी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना हारूनबाग भागात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उतरल्याने चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला.
मुलांना पाण्याची खोली लक्षात न आल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मुलांचे बूट, चप्पल आणि गणवेश आढळून आले असून मृत मुलांचे वय ८ ते १२ वर्षांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सुरू असलेल्या कामामुळे हा खड्डा तयार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महापालिका व पोलीस प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • mumbai malad infinity mall
    1
    mumbai malad infinity mall
    user_Aamer Khan
    Aamer Khan
    Voice of people जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अभाविप व विद्यार्थ्यांविषयी केलेल्या अपमानास्पद व धमकीजनक वक्तव्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) जालना शाखेच्या वतीने छेडण्यात आलेल्या “विद्यार्थी आत्मसन्मान आंदोलन” ला मोठा प्रतिसाद मिळाला. दिनांक ११ एप्रिल रोजी ‘पक्षी मित्र अभियान’ या उपक्रमादरम्यान संबंधित प्राचार्यांनी अभाविप व कार्यकर्त्यांविषयी अवमानकारक व अशोभनीय भाषा वापरली होती. तसेच, विद्यार्थ्यांनी याचा निषेध केल्यानंतर “तुमचे शैक्षणिक करिअर उद्ध्वस्त करीन” व “जीवे मारीन” अशा स्वरूपाच्या गंभीर धमक्या दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अभाविपने आक्रमक भूमिका घेत संस्थेच्या अध्यक्षांना निवेदन सादर केले होते. आंदोलनाची चाहूल लागताच प्राचार्य रजेवर निघून गेले असतांना सुद्धा आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता संबंधित प्राचार्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल व्हिडिओ कॉल वरून माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, संस्थेकडून या प्रकरणात उद्या योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही समजते. अभाविपची भूमिका पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आली आहे: • प्राचार्यांची माफी ही सकारात्मक पाऊल असले तरी, केवळ माफी पुरेशी नाही • संबंधित प्राचार्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा • संस्थेकडून ठोस व पारदर्शक कारवाई करण्यात यावी यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही. आंदोलनानंतर प्राचार्यांनी माफी मागितली, ही बाब लक्षात घेतली आहे; मात्र इतक्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात केवळ माफी पुरेशी ठरत नाही. संस्थेकडून उद्या होणाऱ्या कारवाईकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. जर कारवाई समाधानकारक नसेल, तर अभाविप पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन उभारेल.” अभाविपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी लढा सुरूच राहील आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम राहील. यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, जालना जिल्हा संयोजक पवन नरवडे, शहर मंत्री गणेश बोंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
    1
    महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अभाविप व विद्यार्थ्यांविषयी केलेल्या अपमानास्पद व धमकीजनक वक्तव्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) जालना शाखेच्या वतीने छेडण्यात आलेल्या “विद्यार्थी आत्मसन्मान आंदोलन” ला मोठा प्रतिसाद मिळाला.
दिनांक ११ एप्रिल रोजी ‘पक्षी मित्र अभियान’ या उपक्रमादरम्यान संबंधित प्राचार्यांनी अभाविप व कार्यकर्त्यांविषयी अवमानकारक व अशोभनीय भाषा वापरली होती. तसेच, विद्यार्थ्यांनी याचा निषेध केल्यानंतर “तुमचे शैक्षणिक करिअर उद्ध्वस्त करीन” व “जीवे मारीन” अशा स्वरूपाच्या गंभीर धमक्या दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी अभाविपने आक्रमक भूमिका घेत संस्थेच्या अध्यक्षांना निवेदन सादर केले होते. आंदोलनाची चाहूल लागताच प्राचार्य रजेवर निघून गेले असतांना सुद्धा आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता संबंधित प्राचार्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल व्हिडिओ कॉल वरून माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, संस्थेकडून या प्रकरणात उद्या योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही समजते.
अभाविपची भूमिका पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आली आहे:
• प्राचार्यांची माफी ही सकारात्मक पाऊल असले तरी, केवळ माफी पुरेशी नाही
• संबंधित प्राचार्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा
• संस्थेकडून ठोस व पारदर्शक कारवाई करण्यात यावी
यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले की,
“विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही. आंदोलनानंतर प्राचार्यांनी माफी मागितली, ही बाब लक्षात घेतली आहे; मात्र इतक्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात केवळ माफी पुरेशी ठरत नाही. संस्थेकडून उद्या होणाऱ्या कारवाईकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. जर कारवाई समाधानकारक नसेल, तर अभाविप पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन उभारेल.”
अभाविपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी लढा सुरूच राहील आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम राहील. यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, जालना जिल्हा संयोजक पवन नरवडे, शहर मंत्री गणेश बोंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मोबाइल चोरी का विरोध करने पर युवक को चाकू मारा; CCTV फुटेज सामने आया छत्रपति संभाजीनगर: मुकुंदवाड़ी इलाके से सामने आई एक चौंकाने वाली घटना में, एक युवक को लुटेरों ने बेरहमी से चाकू मार दिया। युवक ने लुटेरों द्वारा उसका मोबाइल फोन छीनने की कोशिश का विरोध किया था। इस घटना ने शहर में सार्वजनिक सुरक्षा को लेकर चिंताएँ बढ़ा दी हैं।
    1
    मोबाइल चोरी का विरोध करने पर युवक को चाकू मारा; CCTV फुटेज सामने आया
छत्रपति संभाजीनगर: मुकुंदवाड़ी इलाके से सामने आई एक चौंकाने वाली घटना में, एक युवक को लुटेरों ने बेरहमी से चाकू मार दिया। युवक ने लुटेरों द्वारा उसका मोबाइल फोन छीनने की कोशिश का विरोध किया था।
इस घटना ने शहर में सार्वजनिक सुरक्षा को लेकर चिंताएँ बढ़ा दी हैं।
    user_Bimlesh thakur
    Bimlesh thakur
    Majalgaon, Beed•
    13 hrs ago
  • नासिक के टीसीएस बीपीओ (TCS BPO) कैंपस से जुड़े कथित धर्म परिवर्तन और यौन उत्पीड़न मामले में अब पहली पीड़िता का बयान सामने आया है. इस बयान में दोस्ती, नौकरी का लालच, शादी का झांसा, जबरन संबंध, धर्म बदलने का दबाव और निजी तस्वीरों से ब्लैकमेल जैसे कई गंभीर आरोप लगाए गए हैं. पीड़िता ने 2022 से 2026 तक की पूरी घटनाओं को क्रमवार बताया है, जिससे मामले की गंभीरता का पता चलता है.
    1
    नासिक के टीसीएस बीपीओ (TCS BPO) कैंपस से जुड़े कथित धर्म परिवर्तन और यौन उत्पीड़न मामले में अब पहली पीड़िता का बयान सामने आया है. इस बयान में दोस्ती, नौकरी का लालच, शादी का झांसा, जबरन संबंध, धर्म बदलने का दबाव और निजी तस्वीरों से ब्लैकमेल जैसे कई गंभीर आरोप लगाए गए हैं. पीड़िता ने 2022 से 2026 तक की पूरी घटनाओं को क्रमवार बताया है, जिससे मामले की गंभीरता का पता चलता है.
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    14 hrs ago
  • वडवणी प्रतिनिधी वडवणी शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
    1
    वडवणी प्रतिनिधी 
वडवणी शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    7 hrs ago
  • महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी सचिव - तारेक खान दुर्राणीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनके 135 वे जयंती के मौके पर दी मुबारकबाद
    1
    महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी सचिव - तारेक खान दुर्राणीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनके 135 वे जयंती के मौके पर दी मुबारकबाद
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरात मोबाईल चोरीतून एका तरुणाला चाकूने मारले! काल मधरात्री छत्रपती संभाजीनगर येथे मोबाईल चोरीतून एका तरुणाला चाकूने मारून जखमी केल्याची घटना घडली असून ती CCTV मध्ये कैद झाली आहे
    1
    छत्रपती संभाजीनगरात मोबाईल चोरीतून एका तरुणाला चाकूने मारले!
काल मधरात्री छत्रपती संभाजीनगर येथे मोबाईल चोरीतून एका तरुणाला चाकूने मारून जखमी केल्याची घटना घडली असून ती CCTV मध्ये कैद झाली आहे
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.