Shuru
Apke Nagar Ki App…
किनवट तालुक्यात संततधार पाऊस; पिंपळगावमधील पूरपरिस्थितीत विधवा महिलेच्या घरात शिरले पाणी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आल्यामुळे अनेक गावातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. या पावसामुळे पिंपळगाव फाटा येथील विधवा महिला कमलाबाई गुलाब गुरनुले यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असून, हवालदिल झालेल्या या माऊलीला अश्रू अनावर झाले आहेत. या नैसर्गिक संकटामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून, शासनाने तातडीने मदत करावी, अशी आर्त हाक परिसरातील नागरिकांनी दिली आहे.
महाराष्ट्र वृत्तवेध
किनवट तालुक्यात संततधार पाऊस; पिंपळगावमधील पूरपरिस्थितीत विधवा महिलेच्या घरात शिरले पाणी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आल्यामुळे अनेक गावातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. या पावसामुळे पिंपळगाव फाटा येथील विधवा महिला कमलाबाई गुलाब गुरनुले यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असून, हवालदिल झालेल्या या माऊलीला अश्रू अनावर झाले आहेत. या नैसर्गिक संकटामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून, शासनाने तातडीने मदत करावी, अशी आर्त हाक परिसरातील नागरिकांनी दिली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.1
- मानवी शरीर तस्करी संदर्भामध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थी सुसंवाद संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक कामुल तांबे यांनी प्रत्यक्ष राबवायला सुरुवात केली आहे त्या संदर्भात त्यांचे म्हणणे...1
- पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi1
- 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! 8 दिवसानंतर आलेल्या घंटागाडीचे पुष्पहार घालून अनोखे स्वागत; महादेवनगरमध्ये 'गांधीगिरी'ने वेधले लक्ष! रोज कचरा संकलन करण्याची नागरिकांची मागणी. महादेव नगरात अनोख्या पद्धतीने महापालिकेचा निषेध! सूरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026. लातूर येथील वार्ड क्रमांक 3 मधील महादेवनगर आणि गरुड चौक परिसरात तब्बल 8 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज घंटागाडी दाखल झाली. नेहमी रखडणाऱ्या या सेवेमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे यांनी घंटागाडीला चक्क पुष्पहार बांधून आणि कर्मचाऱ्यांना फुले देऊन 'गांधीगिरी' पद्धतीने अनोखे आंदोलन केले. लातूर जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या महादेवनगर व गरुड चौक परिसरात गेल्या 8 दिवसांपासून घंटागाडी आली नव्हती. त्यामुळे घरात साचलेला कचरा कुठे टाकायचा? असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला होता. नाईलाजास्तव काही नागरिकांना खुल्या जागेत व रस्त्याच्या कडेला कचरा टाकावा लागत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथीचे आजार व रोगराई पसरण्याची तीव्र भीती व्यक्त केली जात होती. तब्बल आठ दिवसांनंतर आज परिसरात घंटागाडी येताच सामाजिक कार्यकर्ते दीपक गंगणे व स्थानिक नागरिकांनी घंटागाडी चालकाचे स्वागत केले. गाडीला पुष्पहार घालून आणि चालकाला पुष्प देऊन प्रशासनाचा उपरोधिक निषेध नोंदवण्यात आला. "गेल्या 8 दिवसांपासून परिसरात घंटागाडी न आल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावणे कठीण झाले होते. कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती आहे. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन या भागात रोजच्या रोज नियमित वेळात घंटागाडी पाठवावी." यावेळी नागरिकांनी दररोज नियमितपणे परिसरात घंटागाडी पाठवून कचरा संकलन करण्याची आग्रही मागणी दीपक गंगणे (सामाजिक कार्यकर्ते) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. या अनोख्या 'गांधीगिरी' आंदोलनाची सध्या संपूर्ण प्रभागात चर्चा रंगली आहे.1
- लातूर. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती आज लातूर शहरात आणि जिल्हाभरात उत्साहात साजरी1
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लाल सलाम1
- साहित्यरत्न, लोकशाहीर, सामाजिक परिवर्तनाचे महान प्रणेते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 💐🙏 "माझी लेखणी ही केवळ मनोरंजनासाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि शोषितांच्या संघर्षाला वाचा फोडण्यासाठी आहे." आपल्या समृद्ध साहित्यातून, ज्वलंत शाहिरीतून आणि धगधगत्या विचारांतून त्यांनी उपेक्षित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. 'फकिरा'सारख्या अजरामर कादंबऱ्या आणि लावणी-पोवाड्यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यात एक नवी क्रांती घडवून आणली. साहित्यरत्न, लोकशाहीर, सामाजिक परिवर्तनाचे महान प्रणेते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 💐🙏 "माझी लेखणी ही केवळ मनोरंजनासाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि शोषितांच्या संघर्षाला वाचा फोडण्यासाठी आहे." आपल्या समृद्ध साहित्यातून, ज्वलंत शाहिरीतून आणि धगधगत्या विचारांतून त्यांनी उपेक्षित, कष्टकरी आणि वंचित समाजाच्या वेदना जगासमोर मांडल्या. 'फकिरा'सारख्या अजरामर कादंबऱ्या आणि लावणी-पोवाड्यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यात एक नवी क्रांती घडवून आणली.1