मायणीत घुमणार श्रीराम नामाचा गजर; २६ मार्चला भव्य शोभायात्रेचे आयोजन मायणी नगरी राममय होणार! २६ मार्चला निघणार भव्य 'श्रीराम नवमी शोभायात्रा मायणी दि. २२:- प्रतिनिधी येत्या गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी मायणी नगरीत 'समस्त हिंदू बांधव' यांच्या वतीने प्रभु श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य 'शोभायात्रा' आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 'पर्व ६ वे' असलेल्या या सोहळ्यात यंदा तरुणाईसाठी विशेष 'रील स्पर्धेचे' आकर्षण असणार आहे. शोभायात्रेचे नियोजन अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात आले असून कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे असेल: सकाळी १० ते १२ : श्रीराम मंदिरात उत्सवाच्या मूर्तीची विधिवत पूजा. दुपारी १२ वाजता : प्रभू श्रीरामांचा पाळणा व महाआरती. दुपारी १ ते ४ : भाविकांसाठी लाडू प्रसाद वाटप. सायंकाळी ६ वाजता : 'भगवा ध्वज चौक' येथून भव्य शोभायात्रेला सुरुवात होणारं आहे. यंदाच्या शोभायात्रेत सियाराम देखावा, अश्वदळ (घोडे), पारंपारिक वाद्ये, धनगरी गजी नृत्य, अघोरी नृत्य (तांडव शो) आणि बंगाळ्या लाईट शो हे विशेष आकर्षण असतील. सातारा येथील प्रसिद्ध 'शिवधर्म साऊंड' आणि फटाक्यांच्या अतिषबाजीने ही मिरवणूक दुमदुमून जाणार आहे. शोभायात्रा भगवा ध्वज चौक - बसस्थानक परिसर - नवी पेठ - भवानी चौक (तांबेकर दवाखाना) मार्गे जाऊन मारुती मंदिर (उभी पेठ) येथे विसर्जित होईल. डिजिटल युगासाठी 'रील स्पर्धा' सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृतीचा प्रसार व्हावा, या उद्देशाने आयोजकांनी 'REEL स्पर्धा' आयोजित केली आहे. विषय: शोभायात्रा, अघोरी नृत्य आणि बजरंगबलीची कमाल. बक्षीस: प्रथम क्रमांक २१००/-, द्वितीय १५००/-, तृतीय १०००/- आणि चतुर्थ १०००/- रुपये (सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र दिले जाईल). नियम: रील किमान १ मिनिटाची असावी आणि ती 'shri_shivpratishthan_mayani' या पेजला कोलॅब (Collab) करावी. बक्षीस वितरण: २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता हनुमान मंदिर (उभी पेठ) येथे होईल. "जातीपातीमध्ये अडकलेला हिंदू समाज एकाच भगव्या ध्वजाखाली आणण्यासाठी आणि तरुणांमध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे," अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. समस्त हिंदू बांधव आणि धर्मप्रेमी मायणीकरांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मायणीत घुमणार श्रीराम नामाचा गजर; २६ मार्चला भव्य शोभायात्रेचे आयोजन मायणी नगरी राममय होणार! २६ मार्चला निघणार भव्य 'श्रीराम नवमी शोभायात्रा मायणी दि. २२:- प्रतिनिधी येत्या गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी मायणी नगरीत 'समस्त हिंदू बांधव' यांच्या वतीने प्रभु श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्य 'शोभायात्रा' आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 'पर्व ६ वे' असलेल्या या सोहळ्यात यंदा तरुणाईसाठी विशेष 'रील स्पर्धेचे' आकर्षण असणार आहे. शोभायात्रेचे नियोजन अत्यंत भव्य स्वरूपात करण्यात आले असून कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे असेल: सकाळी १० ते १२ : श्रीराम मंदिरात उत्सवाच्या मूर्तीची विधिवत पूजा. दुपारी १२ वाजता : प्रभू श्रीरामांचा पाळणा व महाआरती. दुपारी १
ते ४ : भाविकांसाठी लाडू प्रसाद वाटप. सायंकाळी ६ वाजता : 'भगवा ध्वज चौक' येथून भव्य शोभायात्रेला सुरुवात होणारं आहे. यंदाच्या शोभायात्रेत सियाराम देखावा, अश्वदळ (घोडे), पारंपारिक वाद्ये, धनगरी गजी नृत्य, अघोरी नृत्य (तांडव शो) आणि बंगाळ्या लाईट शो हे विशेष आकर्षण असतील. सातारा येथील प्रसिद्ध 'शिवधर्म साऊंड' आणि फटाक्यांच्या अतिषबाजीने ही मिरवणूक दुमदुमून जाणार आहे. शोभायात्रा भगवा ध्वज चौक - बसस्थानक परिसर - नवी पेठ - भवानी चौक (तांबेकर दवाखाना) मार्गे जाऊन मारुती मंदिर (उभी पेठ) येथे विसर्जित होईल. डिजिटल युगासाठी 'रील स्पर्धा' सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृतीचा प्रसार व्हावा, या उद्देशाने आयोजकांनी 'REEL स्पर्धा' आयोजित केली आहे. विषय:
शोभायात्रा, अघोरी नृत्य आणि बजरंगबलीची कमाल. बक्षीस: प्रथम क्रमांक २१००/-, द्वितीय १५००/-, तृतीय १०००/- आणि चतुर्थ १०००/- रुपये (सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र दिले जाईल). नियम: रील किमान १ मिनिटाची असावी आणि ती 'shri_shivpratishthan_mayani' या पेजला कोलॅब (Collab) करावी. बक्षीस वितरण: २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता हनुमान मंदिर (उभी पेठ) येथे होईल. "जातीपातीमध्ये अडकलेला हिंदू समाज एकाच भगव्या ध्वजाखाली आणण्यासाठी आणि तरुणांमध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे," अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. समस्त हिंदू बांधव आणि धर्मप्रेमी मायणीकरांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. येत्या दोन दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे देखील पत्रात अभिजित बिचुकले म्हणाले आहेत...1
- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- विक्रम शिंदे /भोर दि.४ मोसे खोर्यातील ऐतिहासिक श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड) येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .1
- वारसा अध्यात्मिक सेवेचा.... सांप्रदायिक परंपरा जोपासण्याचा...चरण हे फक्त मंदीरापर्यत घेऊन जातात...परंतु आचरण... आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते... श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि. ४-४-२०२६ किर्तन सेवा ह.भ.प. शंकर महाराज आंबवडे1
- सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- Post by E city news network1
- JAY PAWAR ON PLANE CRASH : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतानाच त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे.. या अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर भुमिका स्पष्ट करु असं सांगतानाच त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय..1