महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांनी घेतली स्वच्छता विभागाची आढावा बैठक! नांदेड,दि.१८ फेब्रुवारी :- छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि आगामी पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेचे *अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम* यांनी बुधवारी दि.१८.०२.२०२६ रोजी स्वच्छता विभागाची महत्त्वाची आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत प्रामुख्याने जयंती उत्सव आणि रमजान दरम्यान शहरातील मुख्य रस्ते, चौक, आणि विशेषतः धार्मिक स्थळांच्या परिसरातील स्वच्छता अधिक वेगाने करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. जयंतीचा मिरवणूक मार्ग आणि मशिदींच्या परिसरातील कचरा नियमितपणे उचलण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात येणार असल्याचे यावेळी स्वच्छता विभागाचे उपायुक्त नितीन गाढवे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सण-उत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक प्रभागामध्ये सर्व स्वच्छता निरीक्षकांनी दक्ष राहुन स्वच्छतेचे काम प्राधाण्याने करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले की, शहराचे सौंदर्य राखणे आणि सण शांततेत व स्वच्छ वातावरणात पार पाडणे ही महानगरपालिकेची प्राथमिकता आहे. यासाठी त्यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सतर्क राहण्याचे आणि नियमित देखरेख करण्याचे आदेश दिले. या बैठकीस उपायुक्त नितीन गाढवे, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, मुख्य स्वच्छता निरीक्षक वसीम तडवी, सर्व स्वच्छता निरीक्षक व शहर स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या अमृत कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

- *नांदेडमध्ये शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; मध्यरात्री १२ वाजता भव्य आतिशबाजीने आसमंत उजळला* नांदेड जिल्ह्या प्रतिनिधी शिवकुमार काळे नांदेड: गेला आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (शिवजयंती) आज नांदेड शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. १९ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर, मध्यरात्री ठीक १२:०० वाजता शहरातील मुख्य चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर भव्य आतिशबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी पुतळा परिसरात गर्दी केली होती. "जय भवानी, जय शिवाजी" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या झगमगाटात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. ठळक वैशिष्ट्ये: भव्य आतिशबाजी रात्री १२ वाजता झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने नांदेडचा आसमंत उजळून निघाला होता. शिवप्रेमींची उपस्थिती तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी या सोहळ्याला हजेरी लावली. पुतळ्याची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. आज दिवसभर शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भव्य मिरवणुकाही निघणार आहेत. प्रशासनाकडूनही या निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे4
- 🔥 सिरपल्ली येथे शेतकऱ्याच्या घराला आग; सहा शेळीपिल्लांचा मृत्यू हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे दुपारी सुमारे १.३० वाजता शेतकरी किसन आबाजी जाधव यांच्या घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या भीषण घटनेत सहा शेळीपिल्लांचा होरपळून मृत्यू झाला असून घरातील साहित्य व टिनपत्रा जळून खाक झाले. आधीच खरीप व रब्बी हंगामातील नुकसानीने त्रस्त असलेल्या शेतकरी कुटुंबावर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 🙏 #सिरपल्ली #हिमायतनगर #शेतकरीसंकट #आगघटना #ग्रामीणवार्ता #शासनमदत #FarmerDistress #मदतीचीगरज #NNLDigitalMedia1
- Post by Today One Live1
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- Post by Mohammad Rafikh1
- मुखेड तालुक्यातील जाहूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जाहूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य कुस्त्यांच्या हंगाव्याचे आयोजन करण्यात आले होते दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते ११,००० रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंजीतजी घाटे गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर गोणगोपले देविदास पाटील बोडके मारोती पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रु पाटील बोडके यांची उपस्थिती होती7
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Today One Live1