logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नाशिक येथील दुगाव येथील घाडगे लॉन्स येथे रिंग रोड बाधित शेतकऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात आणि निर्धारपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत नुकत्याच नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये विविध गावांमधून दाखल झालेल्या तक्रारी, रिंग रोडच्या अलाइनमेंटचे नकाशे तसेच प्रकल्पामुळे बाधित होणारी घरे, विहिरी, बोअरवेल, शेतीक्षेत्र आणि बाधित शेतकऱ्यांची अचूक संख्या याची माहिती संकलित करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. रिंग रोडमुळे पूर्णपणे किंवा अंशतः बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची नेमकी आकडेवारी तयार करून ती शासन व प्रशासनासमोर भक्कमपणे मांडण्याची भूमिका सर्व उपस्थितांनी घेतली. यासाठी प्रत्येक गावाने आवश्यक माहिती तातडीने संकलित करून आंदोलन समितीकडे सादर करण्याचे ठरवण्यात आले. या बैठकीत पुढील पंधरा दिवसांच्या आंदोलनात्मक कार्यक्रमाचा आराखडाही निश्चित करण्यात आला असून, शासन व प्रशासनावर लोकशाही मार्गाने दबाव निर्माण करून शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. याच अनुषंगाने येत्या सोमवारी, दिनांक १ जून रोजी सकाळी १० वाजता अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयावर रिंग रोड बाधित शेतकरी सहकुटुंब व सहपरिवार उपस्थित राहून धडक मोर्चा आंदोलन करणार असल्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. या आंदोलनाच्या पूर्वतयारीबाबत अंतिम नियोजनही बैठकीत करण्यात आले. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या कमलाबाई खिरकाडे यांच्या संदर्भातील माहितीवरही यावेळी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कमलाबाई खिरकाडे यांचे घर बाधित होत नसले तरी त्यांची सुमारे ७५ गुंठे जमीन रिंग रोड प्रकल्पात जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कोणताही सर्वेक्षण अहवाल तयार केलेला नसताना चुकीची माहिती वरिष्ठांकडे सादर केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांनी याकडे लक्ष वेधले की, कमलाबाई खिरकाडे यांची जमीन यापूर्वीही तीन वेळा विविध प्रकल्पांमुळे बाधित झाली आहे, ज्यात एकदा वडिलोपार्जित हिश्श्यातील जमीन तर दोन वेळा स्वतःच्या मालकीची जमीन संपादित झाली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून वस्तुस्थिती न तपासता चुकीची माहिती प्रसारित करणे हे दुर्दैवी असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. करण गायकर यांनी मार्गदर्शन करताना मागणी केली की, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांबाबत दाखवलेल्या सकारात्मकता व सहानुभूतीचे स्वागत करतानाच, शेतकऱ्यांच्या भावनांशी विसंगत आणि दिशाभूल करणारी विधाने टाळावीत, तसेच संबंधित चुकीच्या माहितीबाबत खुलासा करून प्रसारमाध्यमांना वस्तुस्थिती कळवावी आणि आवश्यक असल्यास जाहीर दिलगिरी व्यक्त करावी. रिंग रोड प्रकल्पामुळे शेकडो कुटुंबे विस्थापित होण्याच्या मार्गावर असताना केवळ एका प्रकरणाचा संदर्भ देऊन आंदोलनाची दिशा भरकटविण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, अन्यथा प्रशासनाविरोधात अधिक तीव्र भूमिका घेण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला. छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला दीपक हगवणे, अक्षय कातड, बाळासाहेब जोंधळे, खंडेराव सांडखोरे, संदीप भागवत, गुलाब म्हैसधुणे, कमलाबाई खिरकाडे, अनिल रिकामे, रवी पेखळे, बाजीराव पिंगळे, शांताराम पिंगळे, प्रकाश बर्वे, रघुनाथ सूर्यवंशी, विनोद कातड यांच्यासह मोठ्या संख्येने रिंग रोड बाधित शेतकरी उपस्थित होते. सर्वांनी एकजुटीने संघर्ष उभारून न्याय, योग्य मोबदला आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण मिळविण्यासाठी अखेरपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

1 hr ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
1 hr ago
fc26267f-5531-403f-a719-f38acf950c9e

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ‘S ब्रेकिंग न्यूज एक्सक्लुझिव्ह’ने दिलेल्या विशेष बातमीचा मोठा परिणाम दिसून आला आहे. काळाबाजारीचा आरोप असलेल्या एका PDS डीलरचे दुकान रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
    1
    ‘S ब्रेकिंग न्यूज एक्सक्लुझिव्ह’ने दिलेल्या विशेष बातमीचा मोठा परिणाम दिसून आला आहे. काळाबाजारीचा आरोप असलेल्या एका PDS डीलरचे दुकान रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील पोस्टमन श्रीराम कोंड यांनी 42 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्ती घेतली आहे. त्यांनी 1983 मध्ये पांडाणे येथील पोस्ट कार्यालयात आपल्या सेवेला सुरुवात केली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पांडाणे येथील हनुमंत राय यांच्या मंदिरात आयोजित करण्यात आला होता.
    2
    नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील पोस्टमन श्रीराम कोंड यांनी 42 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्ती घेतली आहे. त्यांनी 1983 मध्ये पांडाणे येथील पोस्ट कार्यालयात आपल्या सेवेला सुरुवात केली होती. त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पांडाणे येथील हनुमंत राय यांच्या मंदिरात आयोजित करण्यात आला होता.
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारने अनेक महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेदरम्यान ५८ लाख कुणबी नोंदी, प्रमाणपत्रांची वैधता आणि मराठा मंत्रालय यांसारख्या विविध मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवण्याचा हा निर्णय घेतला.
    1
    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारने अनेक महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्याची माहिती समोर आली आहे.

या चर्चेदरम्यान ५८ लाख कुणबी नोंदी, प्रमाणपत्रांची वैधता आणि मराठा मंत्रालय यांसारख्या विविध मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवण्याचा हा निर्णय घेतला.
    user_महाराष्ट्र टुडे टीव्ही न्युज
    महाराष्ट्र टुडे टीव्ही न्युज
    Local News Reporter Dindori, Nashik•
    10 hrs ago
  • शिवसेना तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरगाणा तालुक्यातील चिखली येथील मारुती मंदिर आणि नरेंद्र महाराज दीक्षा केंद्र परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी दत्तू पिठे, भास्कर हाडस, धनराज डंबाळे, गणपत भोये, स्वप्नील आहेर, तुळशीदास पिठे, मनोहर गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देण्याचा संकल्प केला. कार्यक्रमात मोहन गांगुर्डे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच वृक्षारोपणासारखा सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.
    1
    शिवसेना तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरगाणा तालुक्यातील चिखली येथील मारुती मंदिर आणि नरेंद्र महाराज दीक्षा केंद्र परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी दत्तू पिठे, भास्कर हाडस, धनराज डंबाळे, गणपत भोये, स्वप्नील आहेर, तुळशीदास पिठे, मनोहर गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देण्याचा संकल्प केला. कार्यक्रमात मोहन गांगुर्डे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच वृक्षारोपणासारखा सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • दिंडोरी रोडवरील रस्त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे स्थानिक दुकानदारांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या सद्यस्थितीमुळे ग्राहकांनी या परिसरातील दुकानांकडे पाठ फिरवली असून, यामुळे दुकानदारांचे व्यवसायिक व्यवहार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत.
    1
    दिंडोरी रोडवरील रस्त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे स्थानिक दुकानदारांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या सद्यस्थितीमुळे ग्राहकांनी या परिसरातील दुकानांकडे पाठ फिरवली असून, यामुळे दुकानदारांचे व्यवसायिक व्यवहार मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत.
    user_7083035346
    7083035346
    सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • महाराष्ट्रामध्ये मराठा, ओबीसी आणि इतर समाजांमध्ये जाणीवपूर्वक निर्माण होत चाललेल्या वाढत्या दरीवर आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी या सद्यस्थितीवर नेमका उपाय काय असू शकतो आणि या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. पटोले यांच्या मतानुसार, महाराष्ट्राला विकासाच्या मुख्य मुद्द्यांवरून भरकटवण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे मूळ प्रश्न लपवण्यासाठी मुद्दाम समाज-समाजामध्ये वाद निर्माण केले जात आहेत. याचसोबत, अनुसूचित जातींमधील (SC) उपवर्गीकरणाचा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर, आता मूळ प्रश्नांवर एकत्र येण्याची आणि महाराष्ट्राची सामाजिक वीण घट्ट करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन नानाभाऊ पटोले यांनी केले आहे.
    1
    महाराष्ट्रामध्ये मराठा, ओबीसी आणि इतर समाजांमध्ये जाणीवपूर्वक निर्माण होत चाललेल्या वाढत्या दरीवर आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी या सद्यस्थितीवर नेमका उपाय काय असू शकतो आणि या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

पटोले यांच्या मतानुसार, महाराष्ट्राला विकासाच्या मुख्य मुद्द्यांवरून भरकटवण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे मूळ प्रश्न लपवण्यासाठी मुद्दाम समाज-समाजामध्ये वाद निर्माण केले जात आहेत. याचसोबत, अनुसूचित जातींमधील (SC) उपवर्गीकरणाचा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर, आता मूळ प्रश्नांवर एकत्र येण्याची आणि महाराष्ट्राची सामाजिक वीण घट्ट करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन नानाभाऊ पटोले यांनी केले आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मोकामामधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८० (NH 80) सध्या अत्यंत जीवघेणा ठरत आहे. विशेषतः हाथीदह येथील महेंद्रपूर भागात महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे रस्ताच बंद पडला आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी एका व्हिडिओद्वारे याबाबतची गंभीर परिस्थिती समोर आणली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे लोक मासेमारी करत नसून, गाडीतून खाली पडल्यानंतर हरवलेले फोन शोधत आहेत. गेल्या अवघ्या दोन दिवसांत गाडीतून पडल्याने फोन हरवल्याच्या अशा सुमारे २० ते २५ घटना घडल्याची माहिती आहे, ज्यावरून रस्त्याची दुरवस्था किती भयावह आहे हे स्पष्ट होते. या गंभीर परिस्थितीकडे खासदार महोदय आणि आमदार महोदयांनी तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    1
    मोकामामधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८० (NH 80) सध्या अत्यंत जीवघेणा ठरत आहे. विशेषतः हाथीदह येथील महेंद्रपूर भागात महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे रस्ताच बंद पडला आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी एका व्हिडिओद्वारे याबाबतची गंभीर परिस्थिती समोर आणली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे लोक मासेमारी करत नसून, गाडीतून खाली पडल्यानंतर हरवलेले फोन शोधत आहेत. गेल्या अवघ्या दोन दिवसांत गाडीतून पडल्याने फोन हरवल्याच्या अशा सुमारे २० ते २५ घटना घडल्याची माहिती आहे, ज्यावरून रस्त्याची दुरवस्था किती भयावह आहे हे स्पष्ट होते.

या गंभीर परिस्थितीकडे खासदार महोदय आणि आमदार महोदयांनी तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात ३० मे रोजी पौर्णिमेच्या मध्यरात्री जुन्या अमरधाम (स्मशानभूमी) परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. काही संशयित व्यक्ती आलीशान गाड्यांमधून एका भगवे वस्त्र धारण केलेल्या मांत्रिकाला घेऊन घटनास्थळी आल्या होत्या. या टोळीने चिता जळत असलेल्या ठिकाणी अंडे, लिंबू, उडीद, कवड्या, कापूर, नारळ, पुष्प, कंकू आणि तांत्रिक साहित्याचा वापर करून अघोरी पूजा केली. त्यानंतर ते काही संशयास्पद वस्तू घेऊन तेथून पसार झाले. मध्यरात्री गाड्यांचा संशयास्पद वावर पाहून रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव आणि त्यांच्या मित्रांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. प्रा. अमोल बच्छाव यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत म्हटले की, "विज्ञानयुगातही अशा प्रकारे अंधश्रद्धेतून अघोरी कृत्ये केली जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. सटाणासारख्या सुजाण शहरात हे खपवून घेतले जाणार नाही!" या अघोरी कृत्याचा तीव्र निषेध करत, रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रा. अमोल बच्छाव यांनी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित दोषींवर 'जादूटोणा विरोधी कायद्या' अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली आहे. घटनास्थळाची पाहणी करतेवेळी दत्ता पवार, खुशाल भोसले, प्रथमेश पाटोळे, अजय बच्छाव आणि इतर सहकारी उपस्थित होते.
    1
    नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात ३० मे रोजी पौर्णिमेच्या मध्यरात्री जुन्या अमरधाम (स्मशानभूमी) परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. काही संशयित व्यक्ती आलीशान गाड्यांमधून एका भगवे वस्त्र धारण केलेल्या मांत्रिकाला घेऊन घटनास्थळी आल्या होत्या. या टोळीने चिता जळत असलेल्या ठिकाणी अंडे, लिंबू, उडीद, कवड्या, कापूर, नारळ, पुष्प, कंकू आणि तांत्रिक साहित्याचा वापर करून अघोरी पूजा केली. त्यानंतर ते काही संशयास्पद वस्तू घेऊन तेथून पसार झाले.

मध्यरात्री गाड्यांचा संशयास्पद वावर पाहून रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव आणि त्यांच्या मित्रांनी तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. प्रा. अमोल बच्छाव यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत म्हटले की, "विज्ञानयुगातही अशा प्रकारे अंधश्रद्धेतून अघोरी कृत्ये केली जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. सटाणासारख्या सुजाण शहरात हे खपवून घेतले जाणार नाही!"

या अघोरी कृत्याचा तीव्र निषेध करत, रिपब्लिकन सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रा. अमोल बच्छाव यांनी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित दोषींवर 'जादूटोणा विरोधी कायद्या' अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी केली आहे. घटनास्थळाची पाहणी करतेवेळी दत्ता पवार, खुशाल भोसले, प्रथमेश पाटोळे, अजय बच्छाव आणि इतर सहकारी उपस्थित होते.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.