logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

साकोली तालुक्यातील विर्सी येथे नरभक्षक वाघिनीने घेतला चवथा बळी पाच वर्षीच्या मुलीला पहाटे केले ठार साकोली: - तालुक्यात नरभक्षक वाघिणीने विर्सी येथे पहाटे पाच वाजता विटा भट्टीच्या शेजारीच असलेल्या पालीमध्ये झोपलेल्या पाच वर्षांच्या मुलीवर हल्ला करून ठार केले आहे.आतापर्यंत या वाघिनीने चार जणांवर हल्ला असून वनविभाग आता अडचणीत सापडलेला आहे. तालुक्यातील नागरिक आता भयभीत झाले असून कर्मचारी आणि अधिकारी दहशतीत आले आहेत. नरभक्षक वाघिणीने आतापर्यंत चौघांवर हल्ला केल्याने सध्या नरभक्षक वाघिणीने तीन जणांचा बळी घेतला असून वन्यजीव विभागाच्या कामावर प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे साकोली तालुक्यात केवळ २६ दिवसात ही चौथी घटना असून आज पहाटे विर्सी गावा लगतच्या विटा भट्टीवर काम करणाऱ्या एका कुटुंबातील ५ वर्षाच्या चिमुकलीवर वाघाने हल्ला केल्याने चिमुकली गतप्राण झाली.नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पच्या बफर झोनमध्ये वाघिणीचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास साकोली तालुक्यातील वीरसी येथे एका ५ वर्षाच्या मुलीला वाघिणीने झोपेतून उचलून नेले आणि ठार केले. आशिका काशिनाथ मिरी असे या दुर्दैवी बालिकेचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि तनावाचे वातावरण पसरलेले आहे. छत्तीसगड राज्यातील जिल्हा बलोदा बाजार अंतर्गत सुहेला येथील रहिवासी काशिनाथ मिरी हे आपल्या कुटुंबासह विर्सी येथील संजय कापगते यांच्या शेतात विटाभट्टीवर कामासाठी आले आहेत. रोजच्या प्रमाणे कुटुंब झोपलेले असतांना पहाटे ५ वाजता दबा धरून बसलेल्या वाघिणीने अचानक हल्ला केला. काही कळण्याच्या आतच वाघिणीने पाच वर्षाच्या चिमुकलीला जबड्यात पकडून ओढून नेले आणि क्षणात ठार केले. वाघीणच्या शोधासाठी १७० कर्मचाऱ्यांची फौज रणरणत्या उन्हाचा पारा चढतीवर आहे. १५ एप्रिल नंतरची ऊन्ह आता घामाच्या धारा वाहू लागली आहे. असे असतांना नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट अरण्यात सध्या वेगळाच थरार अनुभवायला मिळत आहे. टी-27 या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे १७० हून अधिक कर्मचारी जीवाची बाजी लावून तैनात असतांना वीरसी येथे वाघाने हल्ला केल्याची चौथी घटना घडली. गेल्या २६ दिवसापासून ही चतुर वाघीण वनविभागाच्या हातावर तुरी देऊन जंगलाच्या कानाकोपऱ्यात हुलकावणी देत आहे. रखरखत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असतांनाही वनविभागाचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता या हिंस्र श्वापदाचा मार्ग शोधत आहे हे विशेष. १९ मार्च २०२६ रोजी वसंत मेश्राम यांच्यावरील पहिल्या हल्ल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले. त्यानंतर २८ मार्च २०२६ रोजी माया सोनवाने यांचा बळी गेला. तर १ एप्रिल २०२६ रोजी छाया मूंगमोडे यांना गंभीर जखमी करत या वाघिणीने नरभक्षक रूप धारण केल्याचे स्पष्ट झाले. आज १५ एप्रिल उजाडले तरी ही वाघीण हाती लागली नाही. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभाग, वन विकास महामंडळ, प्रादेशिक विभाग आणि नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस जंगलाचा कानाकोपरा पालथा घालित असून सध्या या विभागाची तारेवरची कसरत सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सध्या नागझिरा नवेगाव वनपरिक्षेत्रात तणावपूर्ण शांतता असून २६ दिवसापासून सुरू असलेला हा वन्य प्राणी आणि माणसाचा संघर्ष कधी संपतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. उमरझरीच्या घटनेनंतर त्या परिसरात परिसरात मोठे फलक लावून जन जागृतीचा वेग वाढविण्यात आला असून वाघिणीला जेरबंद करेपर्यंत ही मोहीम थांबणार नाही असा निर्णय वन विभागाने घेतलेला आहे. वनविभागाने वाघिणीला एका जागी स्थिर करण्यासाठी आणि तिची भूक शमविण्यासाठी जंगलात ८ विविध ठिकाणी' बेट' ('रेडको आणि बकरे ) बांधलेले आहेत. तांत्रिक गणितानुसार वाघीण भक्ष्य खाण्यासाठी तिथे येईल आणि त्यानंतर तिला डार्ट करून बेशुद्ध करने सोपे जाईल अशी योजना होती. मात्र ही वाघीण अत्यंत बुद्धिमान असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वाघिणीसाठी ठेवलेले दोन भक्ष्य चक्क बिबट्यांनी फस्त केल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलेले आहे. यामुळे वनविभागाच्या रणनितीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जंगलात वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ९० अत्याधुनिक ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. उमरझरी, बामपेवाडा, शिवनटोला आणि निपरटोला या गावालगाच्या भागात ही वाघीण सातत्याने आपले स्थान बदलत असल्याचे दिसून आलेली आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या ( एसटीपीएफ) ३०-३० जणांच्या ३ तुकड्या डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. सोबत आरआरटीचे ३० जवान २४ तास सज्ज आहेत.

18 hrs ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
18 hrs ago
95234bdc-ac8e-4a7b-98fb-a16e824027bf

साकोली तालुक्यातील विर्सी येथे नरभक्षक वाघिनीने घेतला चवथा बळी पाच वर्षीच्या मुलीला पहाटे केले ठार साकोली: - तालुक्यात नरभक्षक वाघिणीने विर्सी येथे पहाटे पाच वाजता विटा भट्टीच्या शेजारीच असलेल्या पालीमध्ये झोपलेल्या पाच वर्षांच्या मुलीवर हल्ला करून ठार केले आहे.आतापर्यंत या वाघिनीने चार जणांवर हल्ला असून वनविभाग आता अडचणीत सापडलेला आहे. तालुक्यातील नागरिक आता भयभीत झाले असून कर्मचारी आणि अधिकारी दहशतीत आले आहेत. नरभक्षक वाघिणीने आतापर्यंत चौघांवर हल्ला केल्याने सध्या नरभक्षक वाघिणीने तीन जणांचा बळी घेतला असून वन्यजीव विभागाच्या कामावर प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे साकोली तालुक्यात केवळ २६ दिवसात ही चौथी घटना असून आज पहाटे विर्सी गावा लगतच्या विटा भट्टीवर काम करणाऱ्या एका कुटुंबातील ५ वर्षाच्या चिमुकलीवर वाघाने हल्ला केल्याने चिमुकली गतप्राण झाली.नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पच्या बफर झोनमध्ये वाघिणीचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास साकोली तालुक्यातील वीरसी येथे एका ५ वर्षाच्या मुलीला वाघिणीने झोपेतून उचलून नेले आणि ठार केले. आशिका काशिनाथ मिरी असे या दुर्दैवी बालिकेचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि तनावाचे वातावरण पसरलेले आहे. छत्तीसगड राज्यातील जिल्हा बलोदा बाजार अंतर्गत सुहेला येथील रहिवासी काशिनाथ मिरी हे आपल्या कुटुंबासह विर्सी येथील संजय कापगते यांच्या शेतात विटाभट्टीवर कामासाठी आले आहेत. रोजच्या प्रमाणे कुटुंब झोपलेले असतांना

5b7a0b60-e8cc-4045-a46a-184c703921f1

पहाटे ५ वाजता दबा धरून बसलेल्या वाघिणीने अचानक हल्ला केला. काही कळण्याच्या आतच वाघिणीने पाच वर्षाच्या चिमुकलीला जबड्यात पकडून ओढून नेले आणि क्षणात ठार केले. वाघीणच्या शोधासाठी १७० कर्मचाऱ्यांची फौज रणरणत्या उन्हाचा पारा चढतीवर आहे. १५ एप्रिल नंतरची ऊन्ह आता घामाच्या धारा वाहू लागली आहे. असे असतांना नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट अरण्यात सध्या वेगळाच थरार अनुभवायला मिळत आहे. टी-27 या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे १७० हून अधिक कर्मचारी जीवाची बाजी लावून तैनात असतांना वीरसी येथे वाघाने हल्ला केल्याची चौथी घटना घडली. गेल्या २६ दिवसापासून ही चतुर वाघीण वनविभागाच्या हातावर तुरी देऊन जंगलाच्या कानाकोपऱ्यात हुलकावणी देत आहे. रखरखत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असतांनाही वनविभागाचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता या हिंस्र श्वापदाचा मार्ग शोधत आहे हे विशेष. १९ मार्च २०२६ रोजी वसंत मेश्राम यांच्यावरील पहिल्या हल्ल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले. त्यानंतर २८ मार्च २०२६ रोजी माया सोनवाने यांचा बळी गेला. तर १ एप्रिल २०२६ रोजी छाया मूंगमोडे यांना गंभीर जखमी करत या वाघिणीने नरभक्षक रूप धारण केल्याचे स्पष्ट झाले. आज १५ एप्रिल उजाडले तरी ही वाघीण हाती लागली नाही. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभाग, वन विकास महामंडळ, प्रादेशिक विभाग आणि नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस जंगलाचा कानाकोपरा पालथा घालित

008cce0a-80aa-4d57-9a22-7e89a5d1f3b6

असून सध्या या विभागाची तारेवरची कसरत सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सध्या नागझिरा नवेगाव वनपरिक्षेत्रात तणावपूर्ण शांतता असून २६ दिवसापासून सुरू असलेला हा वन्य प्राणी आणि माणसाचा संघर्ष कधी संपतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. उमरझरीच्या घटनेनंतर त्या परिसरात परिसरात मोठे फलक लावून जन जागृतीचा वेग वाढविण्यात आला असून वाघिणीला जेरबंद करेपर्यंत ही मोहीम थांबणार नाही असा निर्णय वन विभागाने घेतलेला आहे. वनविभागाने वाघिणीला एका जागी स्थिर करण्यासाठी आणि तिची भूक शमविण्यासाठी जंगलात ८ विविध ठिकाणी' बेट' ('रेडको आणि बकरे ) बांधलेले आहेत. तांत्रिक गणितानुसार वाघीण भक्ष्य खाण्यासाठी तिथे येईल आणि त्यानंतर तिला डार्ट करून बेशुद्ध करने सोपे जाईल अशी योजना होती. मात्र ही वाघीण अत्यंत बुद्धिमान असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे वाघिणीसाठी ठेवलेले दोन भक्ष्य चक्क बिबट्यांनी फस्त केल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलेले आहे. यामुळे वनविभागाच्या रणनितीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. जंगलात वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ९० अत्याधुनिक ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. उमरझरी, बामपेवाडा, शिवनटोला आणि निपरटोला या गावालगाच्या भागात ही वाघीण सातत्याने आपले स्थान बदलत असल्याचे दिसून आलेली आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या ( एसटीपीएफ) ३०-३० जणांच्या ३ तुकड्या डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. सोबत आरआरटीचे ३० जवान २४ तास सज्ज आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by मनिषा विजय काशीवार
    1
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मोरथमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी; 'जय भीम'च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोरथ येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. निळ्या रंगाच्या पताकांनी आणि विद्युत रोषणाईने सजलेल्या मोरथ परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. मुख्य सोहळा आणि अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी स्थानिक बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो", "भारतीय संविधानाचा विजय असो" आणि "जय भीम" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
    2
    मोरथमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी; 'जय भीम'च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोरथ येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. निळ्या रंगाच्या पताकांनी आणि विद्युत रोषणाईने सजलेल्या मोरथ परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते.
मुख्य सोहळा आणि अभिवादन
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी स्थानिक बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो", "भारतीय संविधानाचा विजय असो" आणि "जय भीम" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • गोंदिया जिले के एकोडी स्थित जिला परिषद भारतीय उच्च माध्यमिक विद्यालय में लगातार तोड़फोड़ की घटनाएं सामने आ रही हैं। हाल ही में अज्ञात लोगों ने स्कूल की खिड़कियों के कांच तोड़ दिए, जिससे परिसर में नुकसान हुआ है। इससे पहले स्कूल में आयोजित लावणी व छत्तीसगढ़ी डांस कार्यक्रम के दौरान कुछ बच्चों द्वारा CCTV कैमरे तोड़े गए थे, जिनकी फुटेज भी सामने आई थी। उस समय डांस कमेटी ने नुकसान की भरपाई करने का आश्वासन दिया था, लेकिन अब तक कोई भरपाई नहीं की गई। घटना को लेकर प्राचार्य की ओर से गंगाझरी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई है, लेकिन 9-10 दिन बीत जाने के बावजूद भी पुलिस द्वारा कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। लगातार हो रही घटनाओं और पुलिस की निष्क्रियता से स्कूल की सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं।
    1
    गोंदिया जिले के एकोडी स्थित जिला परिषद भारतीय उच्च माध्यमिक विद्यालय में लगातार तोड़फोड़ की घटनाएं सामने आ रही हैं। हाल ही में अज्ञात लोगों ने स्कूल की खिड़कियों के कांच तोड़ दिए, जिससे परिसर में नुकसान हुआ है।
इससे पहले स्कूल में आयोजित लावणी व छत्तीसगढ़ी डांस कार्यक्रम के दौरान कुछ बच्चों द्वारा CCTV कैमरे तोड़े गए थे, जिनकी फुटेज भी सामने आई थी। उस समय डांस कमेटी ने नुकसान की भरपाई करने का आश्वासन दिया था, लेकिन अब तक कोई भरपाई नहीं की गई।
घटना को लेकर प्राचार्य की ओर से गंगाझरी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई है, लेकिन 9-10 दिन बीत जाने के बावजूद भी पुलिस द्वारा कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है।
लगातार हो रही घटनाओं और पुलिस की निष्क्रियता से स्कूल की सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं।
    user_Town news
    Town news
    Media company Gondiya, Gondia•
    3 hrs ago
  • *९४*रक्तदात्यांनी केले रक्तदान* उमरेड (प्रतिनिधी ) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणुसकीने वागविण्याचा सल्ला दिला.अगदी तोच सल्ला शिरोधार्थ मानत त्यांच्या जयंती दिनी काही तरी सत्कर्म हातून घडावे म्हणून उमरेड शहरात १३५ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिरात महिला पुरुष एकूण *९४* रक्तदात्यांनी रक्तदान करीत महामानवाला अभिवादन केले. स्थानिक साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ भवन येथे उमरेड युथ फाउंडेशन, इंडिया पॉवर जिम, ओम साई स्पोर्टिंग क्लब, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. उन्हाचा तडाखा असताना सुद्धा यामध्ये पुरुष व महिला रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासून राष्ट्रकार्यात सहभागी झाले.प्रसंगी डॉ.हर्षल रेवतकर, डॉ.जितेश चव्हाण,संस्थेचे संस्थापक अनिलकुमार गोविंदानी, संयोजक सचिन कुहीकर, संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार,अध्यक्ष मनीष बालपांडे ,पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर,दीपक पटले,ओम साई स्पोर्टिंग क्लब चे रितेश राऊत, रिलायबल कोचिंग चे संचालक सुबोध धनविजय,नगरसेविका शालिनी गवळी,इंडिया पॉवर जिम चे किशोर आदमने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.रक्तपेढी लाईफ लाइन ब्लड बँक नागपूर चे डॉ.अविनाश बभारे,प्रवीण साठवणे यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांनी संस्थेचे अध्यक्ष यांना स्मृती चिन्ह भेट अभिनंदन केले.कार्यक्रम संयोजक किशोर आदमने यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वीरीत्या पार पडला.यशस्वीतेसाठी आशिष वंजारी,विशाल बावणे,मुकेश गौतम,अक्षय श्रीखंडे,नरेंद्र बालपांडे,दिनेश ढेबूदास,प्रवीण लाडेकर,सतीश चकोले,समीर वैद्य,प्रांजल डहाके,रोशन पोकळे,उज्वल चिंदमवार,तोसिफ शेख,मुकेश गौतम,हितेश गडबोरीकर,शुभम सिर्सिकर,सतीश तांबेकर ,सचिन जोधे ,राजू चाचरकर,संदीप दांडेकर,आदींचे योगदान लाभले.
    1
    *९४*रक्तदात्यांनी केले रक्तदान*
उमरेड (प्रतिनिधी )
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणुसकीने वागविण्याचा सल्ला दिला.अगदी तोच सल्ला शिरोधार्थ मानत त्यांच्या जयंती दिनी काही तरी सत्कर्म हातून घडावे म्हणून उमरेड शहरात १३५ व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिरात महिला पुरुष एकूण *९४* रक्तदात्यांनी रक्तदान करीत महामानवाला अभिवादन केले. स्थानिक साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ भवन येथे उमरेड युथ फाउंडेशन, इंडिया पॉवर जिम, ओम साई स्पोर्टिंग क्लब, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. उन्हाचा तडाखा असताना सुद्धा यामध्ये पुरुष व महिला  रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासून राष्ट्रकार्यात सहभागी झाले.प्रसंगी डॉ.हर्षल रेवतकर, डॉ.जितेश चव्हाण,संस्थेचे संस्थापक अनिलकुमार गोविंदानी, संयोजक सचिन कुहीकर, संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार,अध्यक्ष मनीष बालपांडे ,पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर,दीपक पटले,ओम साई स्पोर्टिंग क्लब चे रितेश राऊत, रिलायबल कोचिंग चे संचालक  सुबोध  धनविजय,नगरसेविका शालिनी गवळी,इंडिया पॉवर जिम चे किशोर आदमने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.रक्तपेढी लाईफ लाइन ब्लड बँक नागपूर चे डॉ.अविनाश बभारे,प्रवीण साठवणे यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांनी संस्थेचे अध्यक्ष यांना स्मृती चिन्ह भेट अभिनंदन केले.कार्यक्रम संयोजक किशोर आदमने यांच्या उपस्थितीत शिबिर यशस्वीरीत्या पार पडला.यशस्वीतेसाठी आशिष वंजारी,विशाल बावणे,मुकेश गौतम,अक्षय श्रीखंडे,नरेंद्र बालपांडे,दिनेश ढेबूदास,प्रवीण लाडेकर,सतीश चकोले,समीर वैद्य,प्रांजल डहाके,रोशन पोकळे,उज्वल चिंदमवार,तोसिफ शेख,मुकेश गौतम,हितेश गडबोरीकर,शुभम सिर्सिकर,सतीश तांबेकर ,सचिन जोधे ,राजू चाचरकर,संदीप दांडेकर,आदींचे योगदान लाभले.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • नागपूर दंगल पूर्वनियोजित . तर मग तुम्ही झोपला होता काय
    1
    नागपूर दंगल पूर्वनियोजित . तर मग तुम्ही झोपला होता काय
    user_Mangesh Dmaduji Shivaruke
    Mangesh Dmaduji Shivaruke
    Waiter/Waitress नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना! मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राज्य पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली.
    1
    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना!
मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राज्य पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली.
    user_Johney Raiborde
    Johney Raiborde
    Local News Reporter नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    2
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.