राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गडचिरोलीत महत्त्वपूर्ण बैठक; अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा गडचिरोली: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने गडचिरोली येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांतजी शिंदे आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री मा. अनिलजी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या बैठकीदरम्यान अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, स्थानिक विकासकामे आणि आगामी काळातील पक्ष विस्तारावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची पुरोगामी विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती: या बैठकीस पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते, ज्यामध्ये प्रामुख्याने: श्यामजी धाईत, हरिश्चंद्रजी बोरकुटे इंद्रपालजी गेडाम (सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष) श्रीनिवासजी विरगोनवार (अहेरी तालुकाध्यक्ष) अमोलजी मुक्कावार (नगरसेवक, अहेरी न.प.) संजना मडावी (नगरसेविका, अहेरी न.प.) प्रमिला रामटेके (महिला जिल्हाध्यक्ष), सविता चव्हाण (सरचिटणीस) दीपकजी मडावी (सरपंच, लगाम), सुशिलजी खराती (मा. सरपंच, शांतिग्राम), दिवाकरजी उराडे (उपसरपंच, येल्ला) नरेशजी राऊत, संजयजी कोचे, आकाश पगाडे, विष्णुजी रॉय, स्वप्निलजी श्रीरामवार, विज्जूजी रंगूवार, समीरजी अरिगेला, दादा भाई, सुभाषजी आत्राम, जम्पन्ना कंबागोनी, राजेशजी बद्दी, सुमितजी मोतकूरवार, प्रभाकरजी कुसराम, राजूभाऊ नसपुरवार, रवीभाऊ पेद्दल यांच्यासह विविध स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गडचिरोलीत महत्त्वपूर्ण बैठक; अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा गडचिरोली: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने गडचिरोली येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांतजी शिंदे आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री मा. अनिलजी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या बैठकीदरम्यान अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, स्थानिक विकासकामे आणि आगामी काळातील पक्ष विस्तारावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची पुरोगामी विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती: या बैठकीस पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते, ज्यामध्ये प्रामुख्याने: श्यामजी धाईत, हरिश्चंद्रजी बोरकुटे इंद्रपालजी गेडाम (सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष) श्रीनिवासजी विरगोनवार (अहेरी तालुकाध्यक्ष) अमोलजी मुक्कावार (नगरसेवक, अहेरी न.प.) संजना मडावी (नगरसेविका, अहेरी न.प.) प्रमिला रामटेके (महिला जिल्हाध्यक्ष), सविता चव्हाण (सरचिटणीस) दीपकजी मडावी (सरपंच, लगाम), सुशिलजी खराती (मा. सरपंच, शांतिग्राम), दिवाकरजी उराडे (उपसरपंच, येल्ला) नरेशजी राऊत, संजयजी कोचे, आकाश पगाडे, विष्णुजी रॉय, स्वप्निलजी श्रीरामवार, विज्जूजी रंगूवार, समीरजी अरिगेला, दादा भाई, सुभाषजी आत्राम, जम्पन्ना कंबागोनी, राजेशजी बद्दी, सुमितजी मोतकूरवार, प्रभाकरजी कुसराम, राजूभाऊ नसपुरवार, रवीभाऊ पेद्दल यांच्यासह विविध स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा येथे स्मशानभूमीत अघोरी प्रकार; मृतदेहाच्या चितेजवळ पूजापाठ केल्याने खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू* *साळवा* स्थानिक साळवा येथिल स्मशानभूमीत एका मृतदेहाच्या चितेजवळ अघोरी पूजापाठ व भानामतीसदृश प्रकार घडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आधुनिक काळातही अशा अघोरी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रवृत्तींवर सुज्ञ नागरिकांमधून तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साळवा येथील एका ५१ वर्षीय इसमाचा २४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, २५ ऑगस्ट रोजी सकाळी मृतकाचे नातेवाईक व घरातील मंडळी नियमानुसार अस्थी गोळा करण्यासाठी (अस्थि विसर्जन) स्मशानभूमीत गेले. त्यावेळी चितेच्या अगदी बाजूलाच अज्ञात व्यक्तीने अघोरी पूजापाठ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी आढळले संशयास्पद साहित्य घटनास्थळी अज्ञात व्यक्तीचे कपडे, बूट, पूजेचे साहित्य, विविध रंगांचे धागे आणि तेलाची बॉटल विखुरलेल्या अवस्थेत आढळली. चितेजवळ घडलेला हा अघोरी प्रकार पाहून नातेवाईक आणि ग्रामस्थ अवाक झाले. कुही पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती कुही पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व परिसराची पाहणी केली. याप्रकरणी कुही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व अघोरी कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस कसून शोध घेत आहेत. विसाव्या शतकातही समाजात असे अंधश्रद्धेचे आणि अघोरी पूजेचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरावे की यामागे काही वेगळा हेतू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. *प्रतिक्रीया* कुटुंबियांना तात्काळ तक्रार देण्यास सांगितले आहे... नागरिकांनी अंधश्रद्धेसारख्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. -राजेंद्र पाटील, ठाणेदार कुही. #SalwaCrime #KuhiPolice #SuperstitionNews #MaharashtraNews #NagpurNews विषयानुरूप हॅशटॅग (मराठी): #अंधश्रद्धा #साळवा #कुही #अघोरीपूजा #भानामती #स्मशानभूमी #महाराष्ट्रबातम्या #जादूटोणाविरोधीकायदा विषयानुरूप हॅशटॅग (इंग्रजी): #BlackMagicNews #StopSuperstition #CrimeUpdate #PoliceInvestigation #LocalNews1
- भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश ! भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोविंदा लीगमधून एकतेचा संदेश !1
- ईद-ए-मीलादुन्नबी च्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात पोलिसांचे भव्य पथ संचलन शहरात सुरक्षेचा आढावा1
- 𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏][𝐌𝐀𝐋𝐄][𝐇𝐈𝐍𝐃𝐇𝐔;𝐑𝐄𝐋𝐈𝐆𝐈𝐎𝐍#𝐁𝐂-𝐁;𝐏𝐀𝐃𝐇𝐌𝐀𝐒𝐇𝐀𝐀𝐋𝐈 𝐂𝐀𝐒𝐓:𝐎𝐍𝐋𝐘][𝐆𝐎𝐕𝐓.𝐊𝐀𝐀𝐊𝐀𝐓𝐇𝐄𝐘𝐀 𝐃𝐄𝐆𝐑𝐄𝐄 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄(𝐊𝐀𝐀𝐊𝐄𝐀𝐆√);𝐁𝐀 3𝐑𝐃 𝐘𝐄𝐀𝐑☆𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀]][𝐈𝐍𝐓𝐀𝐑(𝐁𝐢𝐏𝐂,1𝐒𝐓-𝐏𝐑𝐈𝐕𝐄𝐓 𝐂𝐎𝐋𝐋𝐄𝐆𝐄&𝐇𝐀𝐀𝐒𝐓𝐀𝐋)1992.𝐘𝐄𝐀𝐑☆𝐀𝐌𝐄𝐄𝐑𝐏𝐄𝐓-𝐍𝐄𝐀𝐑 𝐒𝐑𝐈 𝐍𝐀𝐆𝐀𝐑 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘 -𝐆𝐎𝐕𝐓. 𝐏𝐎𝐒𝐓 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄# 𝐇𝐘𝐃𝐑𝐄𝐀𝐁𝐀𝐃][𝐑𝐄𝐃𝐃𝐘 𝐂𝐎𝐋𝐎𝐍𝐘#𝐑𝐎𝐀𝐃 𝐍𝐎.1#(100%𝐎𝐖𝐍 𝐇𝐎𝐔𝐒𝐄(50𝐘𝐄𝐀𝐑,𝐒##42.𝐘𝐄𝐀𝐑,𝐒 𝐖𝐇𝐈𝐓𝐄 𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐁𝐈𝐋𝐃𝐈𝐍𝐆☆𝐎𝐍𝐀𝐑;𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏🕉️☸️[𝐌𝐀𝐋𝐄]𝐇𝐎𝐔𝐒𝐄 𝐍𝐎.;3-9-592#☆100%𝐎𝐍𝐀𝐑 :𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄̨𝐄𝐏[𝐌𝐀𝐋𝐄][𝐅𝐀𝐂𝐄 𝐁𝐎𝐎𝐊,𝐒 &𝐓𝐇𝐎𝐔𝐓𝐀𝐌 𝐒𝐀𝐍𝐃𝐄𝐄𝐏 ;𝐈𝐍𝐒𝐓𝐀𝐀𝐆𝐑𝐀𝐀𝐌𝐒]](𝐎𝐍𝐋𝐘 -𝐎𝐍𝐄 𝐇𝐔𝐍𝐃𝐑𝐄𝐃:100)𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄 𝐂𝐇𝐀𝐍𝐍𝐄𝐋𝐒(𝐆𝐎𝐎𝐆𝐋𝐄 &𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁𝐄//𝐎𝐑//𝐔-𝐓𝐔𝐁//𝐎𝐑//𝐘𝐎𝐔 𝐓𝐔𝐁; 𝐒𝐄𝐀𝐑𝐂𝐇))[𝐇𝐀𝐍𝐀𝐌 𝐊𝐎𝐍𝐃𝐀-(𝐎𝐖𝐍)𝐂𝐈𝐓𝐘&𝐃𝐈𝐒𝐓𝐑𝐈𝐂#𝐓𝐇𝐄𝐋𝐀𝐍𝐆𝐀𝐀𝐍𝐀-𝐓𝐇𝐄𝐋𝐔𝐆𝐔- 𝐒𝐓𝐀𝐓𝐄#𝐈𝐍𝐃𝐈𝐀#𝐀𝐒𝐈𝐀#𝐖𝐎𝐑𝐋𝐃][1
- *सिंदखेड राजा तालुक्यात बजरंग दलाच्या कार्यकारिणी विस्तार बैठक संपन्न* *जय श्रीराम च्या जयघोषात शेकडो युवकांचा संघटनेत प्रवेश* *अखिल आर्यवर्त संघ* *आंतरराष्ट्रीय बजरंग दल / आंतरराष्ट्रीय दुर्गाशक्ती परिषद* *विदर्भ प्रांत, बुलढाणा जिल्हा* *दिनांक: 25-08-2026, मंगळवार* --- *सिंदखेड राजा तालुक्यात बजरंग दलाच्या कार्यकारिणी विस्तार बैठक संपन्न* *जय श्रीराम च्या जयघोषात शेकडो युवकांचा संघटनेत प्रवेश* *बुलढाणा:* आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे *संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री दिनेश दादा पाटील जी* यांच्या मार्गदर्शनात आज विदर्भ प्रांतात संघटन विस्ताराचे कार्य जोमात सुरू आहे. आज मंगळवार दिनांक 25-08-2026 रोजी *विदर्भ प्रांत अध्यक्ष मा. श्री संतोष सिंह ठाकूर जी* यांच्या मार्गदर्शनात व *बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. श्री शुभम राजेश पाटमासे जी* यांच्या नेतृत्वात सिंदखेड राजा तालुक्यातील *पिंपळखुटा व परिसरातील गावांची* आंतरराष्ट्रीय बजरंग दल कार्यकारिणी विस्तार बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत संघटनेच्या पुढील कार्याची दिशा, हिंदुत्वाचे कार्य गावागावात पोहोचवणे आणि युवकांना धर्मकार्यात जोडणे यावर चर्चा करण्यात आली. *यावेळी उपस्थित वीर बजरंगी:* आदित्य टाले, सतिश शिवाजी दराडे, देवानंद आनंद जायभाये, समाधान सानप, अभिषेक ताठे, सतिश गुठे, ऋषिकेश काकड, हर्षल दराडे, नितीन घुगे, भगवान घुगे, गणेश दहीवाळ, शिवम घुगे, भागवत घुगे, ऋषिकेश घुगे, आदित्य घुगे, सुजीत ताठे, सिद्धेश्वर दराडे, स्वप्नील घुगे, संदीप ताठे, रघुनंदन ताठे, शिवानंद नागरे, गणेश ताठे, समाधान जायभाये, उमेश ताठे व अन्य असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचा समारोप *।। जय श्रीराम ।।* च्या प्रचंड जयघोषाने झाला. *निवेदक:* *श्री शुभम राजेश पाटमासे* *जिल्हाध्यक्ष - बुलढाणा* *आंतरराष्ट्रीय बजरंग दल, विदर्भ प्रांत*1
- देश की शिक्षा पर खुलकर चर्चा | बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू Rok Tok Hindustan news imran shaikh देश की शिक्षा व्यवस्था, मौजूदा चुनौतियों और बच्चों के भविष्य जैसे अहम मुद्दों पर बाबा खान से खास बातचीत। देखिए Rok Tok Hindustan News पर बाबा खान का एक्सक्लूसिव इंटरव्यू और जानिए शिक्षा को लेकर उनकी बेबाक राय। सच • साहस • सवाल | Rok Tok Hindustan News #RokTokHindustanNews #बाबाखान #शिक्षा #Education #EducationSystem #ExclusiveInterview #देशकीशिक्षा #MumbaiNews #MumbraNews #News #BreakingNews1
- सिरसपेठ तेलीपुरा येथे कपालेश्वर महादेव कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ सिरसपेठ तेलीपुरा येथे कपालेश्वर महादेव कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ नागपूर : सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून शिवशक्ती नागाब्दार स्वामी सेवा मंडळ व नवयुवक हनुमान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कपालेश्वर महादेव कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी या कावड यात्रेचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. यावेळी किर्तन, फळवाटप व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ढोल- ताशे, भजन व जयघोषाच्या गजरात कावडधारी शिवभक्तांनी सिरसपेठ तेलीपुरा येथील हनुमान मंदिरातून तुळशीबाग, महाल येथील कपालेश्वर महादेव मंदिरापर्यंत कावड यात्रा काढली. संपूर्ण मार्गावर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वातावरण शिवमय झाले होते. कपालेश्वर महादेव मंदिरात पोहोचल्यानंतर कावडधारी शिवभक्तांनी विधिवत पूजन व महादेवाचा अभिषेक केला. यानंतर कडई व प्रसादाचे आयोजन करण्यात आले. कावड यात्रेत सहभागी झालेल्या सर्व कावड यात्रेकरूंसह शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक उपक्रमाच्या आयोजनासाठी शिवभक्त प्रशांत मोटघरे, दिलीप माखाडे, प्रकाश तांदुळकर, राजू तितरे, भगवान नरड, सुनील नांदुरकर, अरविंद शेंडे, किशोर पेटकर व प्रभू रणदिवे यांच्यासह सिरसपेठ परिसरातील महिला व पुरुष शिवभक्तांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मोरया फांऊन्डेशनची संस्थापिका सौ. रजनीताई चौहान, सौ. सारिका नांदुरकर, प्र.क्र. १८ च्या नगरसेविका तथा महिला व बाल कल्याण समिती सभापती मनपा, यांची उपस्थिती होती. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी शिवभक्तीन सौ.चित्रा मोटघरे, नितू ठाकूर, कुंदा हिंगणकर, माधुरी आष्टणकर, वर्षा आकरे, छाया मलेवार, चंदा चकोले, सुनीता शेंडे व राणी गायधने यांच्यासह परिसरातील महिला शिवभक्तांनी सहकार्य केले. या कावड यात्रेला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.3
- भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोंविदा लीगमधून एकतेचा संदेश ! भक्तीचा सोहळा, आणि प्रो - गोंविदा लीगमधून एकतेचा संदेश !1
- आमगाव नगरपरिषद वाद मिटला; दरमहा बैठकीचे आश्वासन सबलाईन: बनगाववासीयांच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून समस्या सोडवण्याचे आश्वासन. नमस्कार, सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आमगाव: आमगाव नगरपरिषदेत अलीकडेच करण्यात आलेला रोष आणि आंदोलन अत्यंत लाजीमी होते, कारण शहरातील समस्या अतिशय गंभीर बनल्या होत्या, अशी प्रतिक्रिया बनगाव येथील निवासी राम चक्रवर्ती यांनी दिली आहे. या आंदोलनानंतर आमदार साहेबांनी तातडीने बैठक बोलावून एस.डी.ओ. मॅडम, नगरपरिषदेचे सी.ओ. साहेब आणि सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करत एक चर्चा सत्र आयोजित केले. नगरपरिषदेत प्रशासक आल्यापासून कोणतीही आमसभा किंवा चर्चा बैठक होत नसल्याने मिसकम्युनिकेशन वाढत होते, मात्र या बैठकीत साफसफाई, लाईट, बोअरिंग, ब्लिचिंग पावडर, घरकूल, पट्टे आणि झुडपी जंगलाचे पट्टे यांसारख्या प्रत्येक वैयक्तिक व सार्वजनिक मुद्द्यावर खुलकर चर्चा झाली असून प्रशासन सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक असल्याचे राम चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रत्येक महिन्यात नगरपरिषदेची एक नियमित बैठक घेण्याचे आश्वासन आमदार साहेबांनी दिले आहे, ज्यामध्ये कर्मचारी आणि गावकरी एकत्र येऊन चर्चा करतील. मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ओ.) यांची स्पष्टोक्ती आणि विकासकामांचे नियोजन: नागरिकांच्या आक्रमक भूमिका आणि बैठकीनंतर नगरपरिषदेचे सी.ओ. यांनी शहरातील विविध विकासकामांबद्दल आणि समस्यांच्या निवारणाबद्दल सविस्तर माहिती दिली: * स्वच्छता नियोजन: स्वच्छतेसाठीचे आठवड्याचे नियोजन संबंधित विभागाला लागू करण्यात आले असून, त्यांवर आता दररोज (डे-टू-डे) काम केले जाईल. * पट्टे वाटप: जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून पट्टे तयार होत आहेत; आगामी १५ दिवसांत १६५ पट्ट्यांचे वाटप केले जाईल, तर इतर पट्ट्यांची समस्या १० ते १५ दिवसांत मार्गी लागेल. * रस्ते आणि नाले: रस्ते व नाले दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांचे नियोजन ठरले असून, पुढील १ ते २ महिन्यांत शहरात पक्के रस्ते तयार झालेले दिसून येतील. * माती टाकण्याचे कारण: पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि आगामी नियोजनात पक्के रस्ते बनवायचे असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांवर माती टाकण्यात आली आहे. * अधिकारी उपस्थिती: आमदार साहेबांच्या निर्देशानुसार सी.ओ. हे प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी दुपारी ३ ते ६ या वेळेत कार्यालयात नियमित उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न ऐकणार आहेत. * इमारत दुरुस्ती: नगरपरिषदेची इमारत गळण्याच्या समस्येवरही प्रस्ताव तयार करण्यात आला असून, निधी मंजूर झाल्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात होईल. या सर्व घडामोडींमुळे नगरपरिषद प्रशासन आणि नागरिकांमधील दुरावा मिटून विकासाचा मार्ग सुकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. — आमगाव तालुका प्रतिनिधी, स्वराज्यदूत1