३१ ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिनाचा कार्यक्रम होणार साजरा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजन हिंगोली, दि. २७ ऑगस्ट : सन 1871 मध्ये ब्रिटिश सरकारने Criminal Tribes Act अंतर्गत काही जातींना ‘गुन्हेगार जाती’ म्हणून घोषित केले. या अन्यायकारक कायद्यामुळे या समाजातील बांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अत्याचार व सामाजिक अन्याय सहन करावा लागला. स्वातंत्र्यानंतरही भटके विमुक्त समाज दीर्घकाळ मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने त्यांना सामाजिक न्याय व विकासाच्या संधी मिळण्यास विलंब झाला. परिणामी, या समाजावर दीर्घकालीन सामाजिक परिणाम झाले. स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी Criminal Tribes Act रद्द करण्यात आला आणि या समाजातील जातींना ‘भटके विमुक्त जाती’ म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीमध्ये भटके विमुक्त समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. स्वातंत्र्य चळवळ तसेच राष्ट्र उभारणीतील या समाजाचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन सभागृह येथे भटके विमुक्त दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास संबंधित अधिकारी, कर्मचारी, भटके विमुक्त समाजाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
३१ ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिनाचा कार्यक्रम होणार साजरा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजन हिंगोली, दि. २७ ऑगस्ट : सन 1871 मध्ये ब्रिटिश सरकारने Criminal Tribes Act अंतर्गत काही जातींना ‘गुन्हेगार जाती’ म्हणून घोषित केले. या अन्यायकारक कायद्यामुळे या समाजातील बांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अत्याचार व सामाजिक अन्याय सहन करावा लागला. स्वातंत्र्यानंतरही भटके विमुक्त समाज दीर्घकाळ मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने त्यांना सामाजिक न्याय व विकासाच्या संधी मिळण्यास विलंब झाला. परिणामी, या समाजावर दीर्घकालीन सामाजिक परिणाम झाले. स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी Criminal Tribes Act रद्द करण्यात आला आणि या समाजातील जातींना ‘भटके विमुक्त जाती’ म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीमध्ये भटके विमुक्त समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. स्वातंत्र्य चळवळ तसेच राष्ट्र उभारणीतील या समाजाचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन सभागृह येथे भटके विमुक्त दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास संबंधित अधिकारी, कर्मचारी, भटके विमुक्त समाजाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- बैलगाडा शर्यतीतील आता सर्वात चर्चेचा विषय म्हणजे हृदया दीपक शेठ पाटील हृदया दीपक शेठ पाटील हि मुलगी बैलगाडा शर्यतीतील आताचा मोठा विषय आहे ही मुलगी खुप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.1
- वडिलांच्या पुण्यतिथीचा अनाठायी खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनाठायी खर्च न करता सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा गोजेगाव येथील पांडुरंग बळीरामजी सांगळे यांनी याही वर्षी कायम ठेवली. दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गोजेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी चार सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. शाळेची सुरक्षितता व निगराणी व्यवस्थित राहावी, तसेच शाळेच्या आवारात गैरप्रकार घडू नयेत, या उद्देशाने सांगळे यांनी स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. या उपक्रमाचे उद्घाटन २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले. विशेष म्हणजे शाळेला सुट्टी असतानाही या सामाजिक उपक्रमासाठी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खास जालन्याहून आलेले बालाजी पाचफुले उर्मिला पाचफुले हजर होते तसेच यावेळी दहीफळे मॅडम, शेप सर, सरपंच अचित नागरे, सुभाषराव सांगळे, नाजुकराव सांगळे, नामदेवराव जायभाये, नामदेव खिल्लारे, सुदर्शन जायभाये, बालाजी जायभाये, प्रमोद सांगळे, कीसन सांगळे, भगवानराव जायभाये, राजू सांगळे, शाम जायभाये, विष्णू नागरे, यादव गिते, उद्धव कांदे, संदिप घुगे, सुरेश जायभाये, राजू रवंदळे, रमेश सांगळे, पत्रकार तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. पांडुरंग सांगळे यांनी गावातील शाळेला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्याबद्दल उपस्थितांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सुदर्शन जायभाये व किरण जायभाये यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजाच्या आणि गावाच्या उपयोगी उपक्रम राबविण्याची प्रेरणा पांडुरंग सांगळे यांच्या कार्यातून घ्यावी, असे आवाहन ग्रामस्थांना केले. यापूर्वीही सांगळे यांनी वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी, ऑपरेशन व इतर वैद्यकीय खर्चासाठी मदत केली होती. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. पुण्यतिथीचा खर्च समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा पांडुरंग सांगळे यांचा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.1
- गिरामवाडी शिवारात गायीची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल कत्तलीच्या उद्देशाने गायीची चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता आखूड दोरीने बांधून निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गाय व पिकअप वाहन असा 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .दि. 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास सांडस ते पारडी दरम्यान रस्त्यावर, गिरामवाडी शेत शिवारातील रस्त्यावरील वाड्याजवळ, ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी शेख मजीत, मोहम्मद आमीर हे दोघे एका गायीची निर्दयपणे वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी गाय व पिकअप क्र. एमएच 30 एबी 3760 मधून 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास आडे यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात संबंधित दोघाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.या प्रकरणी कळमनुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत .1
- बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... प्रतिनिधी गजानन राऊत असा तांदूळ जनावरंही खात नाहीत असा संतापही त्यांनी व्यक्त केलाय...बुलढाणा ब्रेकिंग या राशन च्या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांच्या बायका पोरांसोबत खावी.. मग, आम्ही सुद्धा खाऊ हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही . संतप्त लाभार्थ्यानी चिखली तहसीलदारांच्या कॅबिनसमोर फेकला निकृष्ट दर्जाचा रेशनचा तांदूळ राशन चे दुकानातून मिळालेल्या या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांचा बायका पोरांसोबत खावी मग आम्ही सुद्धा खाऊ अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात चिखलीत लाभार्थी नागरिकांनी थेट तहसीलदार यांच्या केबिन समोर पोहोचले.. रेशन दुकानातून वाटप करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ हातात घेऊन त्यांनी चक्क तहसीलदारांच्या कॅबीनसमोरच ते ओतून देत या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ आमच्या कोंबड्या सुद्धा हा तांदूळ खात नाही, असे म्हणत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.. या अनोख्या आंदोलनामुळे महसूल तसेच पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. शिवाय राशन दुकानातून मिळणारा तांदूळ किती निकृष्ट आहे , यावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .. बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून शासनामार्फत वितरित होणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेक नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिखली शहरातील काही लाभार्थ्यी कुटुंबाला वितरित करण्यात आलेले तांदूळ खराब, चुरियुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे .. संतापलेल्या नागरिकाने हे धान्य थेट तहसील कार्यालयात आणले आणि तहसीलदारांच्या कॅबीनसमोर ओतून आपला रोष व्यक्त केला.. जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.. बाईट - लाभार्थी .. बाईट - प्रियंका सोनकुसळे , निरीक्षण अधिकारी ..4
- नेपाळमध्ये जालना जिल्ह्यातील पर्यटक अडकले? प्रशासनाचे आवाहन; तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधा!1
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३० ऑगस्टच्या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे पाटील1
- ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली? ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला ‘बुटाने मारेन’ म्हणण्याइतकी प्रशासनाची मस्ती कुठून आली? हिमायतनगरच्या भूमी अभिलेख कार्यालयात बोरगड येथील पांदण रस्ता मोकळा करून देण्यासाठी अधिकृत शुल्क भरल्यानंतरही अतिरिक्त ₹२० हजारांची मागणी केल्याचा आणि पैसे घेतल्यानंतर ते नाकारत वृद्ध शेतकऱ्याला अपमानास्पद भाषा केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. त्या बाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा केवळ एका शेतकऱ्याचा अपमान नाही; हा शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. शासकीय कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी आहे, पैशांची मागणी आणि दादागिरी करण्यासाठी नाही! या प्रकरणाची तातडीने चौकशी झाली पाहिजे. आरोप खरे ठरल्यास संबंधितांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. ७५ वर्षांच्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही — वामनराव पाटील वडगावकर #रोखठोक #हिमायतनगर #नांदेड #भूमीअभिलेख #शेतकरी शेतकरीसन्मान शेतकरीन्याय बोरगड पांदणरस1
- नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .1