एकाच कुटुंबातील चार मुले व एक महिला धरणाच्या धबधब्यात वाहून गेले. लोणावळा येथील भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्यात अन्सारी कुटुंब वाहून गेले. तीस जून रोजी रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. या घटनेत नूर शाहिस्ता अन्सारी वय 35 वर्ष, अमिना आदिल अन्सारी वय तेरा वर्ष, मारिया अन्सारी वय सात वर्ष, हुमेदा अन्सारी वय सहा वर्ष, अदनान अन्सारी अशी एकाच कुटुंबातील वाहून गेलेल्यांची नावे आहेत. हे सर्व राहणार हडपसर पुणे येथील असून या परिवारातील 15 जण या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्याकरता आलेले होते. पावसाचा जोर वाढल्याने या कुटुंबास त्याचा अंदाज आला नाही. बराच वेळ आजूबाजूच्या लोकांनी धीर देण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना नूर अन्सारी याही जोरदार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. पाण्याचा प्रवाह वाढतच असल्यामुळे इतरांनाही वाचवणे शक्य झाले नाही. पावसाळ्यात नागरिकांनी पाण्याच्या ठिकाणी फिरायला जाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने लावलेले सूचनाफलक व स्थळा विषयी इतर माहिती घेणे आवश्यक आहे.

- RRamravJalna, Maharashtra😂1 day ago
- Divyani TiwariWardha, Maharashtra🙏1 day ago
- 99529552454Chikhaldara, Amravati🛕1 day ago
- II श्री काळाराम मंदिर संस्थान ll1
- कुख्यात गँगस्टर अबू सालेमला तळोजा जेलमधून नाशिक जेलमध्ये नेणार? काय आहे कारण?? | Crime News1
- आ.किशोर दराडे 'कोल्हे- गुळवें'वर भारी : नाशिक शिक्षक मतदार संघातून महायुतीचे किशोर दराडे विजयी1
- World Famous Ishan Mataka Kulfi Nashik | Best Street Food In India1
- Vlog #video #like #pet #follow Karen #pet Ghat Nashik1
- नाशिक विभागाच्या शिक्षक निवडणूक ,24 तासांनी निकाल शिवसेनेचे झाले आमदार1
- Mumbai-Nashik Highway News | मुंबई-नाशिक महामार्ग खड्ड्यात! खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा..1
- जळगाव-आशुतोष हजारे । नाशिक शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षीक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे यांचा विजय झाला आहे. या अनुषंगाने जळगावातील काशीबाई कोल्हे शाळेजवळ शिंदे गटाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...1