खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा!* - हिंदु जनजागृती समिती *आधी राज्याच्या मुख्यालयातील अन्नाचा दर्जा कधी सुधारणार ?* महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गणेशोत्सव व आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षेचा बडगा दाखवताना, केवळ हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांतील ‘महाप्रसाद’ आणि ‘भंडारा’ यांचाच विशेष उल्लेख करून कारवाईचा इशारा दिला आहे. अन्न सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या धार्मिक परंपरांना परवाने, नोंदणी आणि नियमांच्या जंजाळात अडकवण्याचा हा प्रयत्न अत्यंत पक्षपाती व प्रशासकीय दुटप्पीपणाचे उत्तम उदाहरण आहे. बकरी ईद, रमझान ईद, इफ्तार पार्ट्या, नाताळ (ख्रिसमस) किंवा गुड फ्रायडे यांसारख्या इतर धर्मीयांच्या सणांच्या वेळी शिजवले जाणारे अन्न आणि होणारे सार्वजनिक अन्न वितरण एफडीएला दिसत नाही का? त्या वेळी अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जाते का, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे. इतर धर्मीयांच्या सणांनाही हे नियम लागू करून त्यावर कारवाई केली जाणार का, हे एफडीएने जाहीर करावे, *असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले आहे.* तुकाराम मुंढे हे चांगले काम असले, तरी केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य करण्याची भूमिका अजिबात स्वीकारली जाणार नाही, असेही श्री. घनवट यांनी नमूद केले आहे. *श्री. घनवट पुढे म्हणाले की,* भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ नुसार कायदा सर्वांना समान लागू झाला पाहिजे, तसेच अनुच्छेद १५ अनुसार शासनाला धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. असे असताना केवळ हिंदूंच्या श्रद्धेशी जोडलेल्या अन्नदानावर आणि भंडाऱ्यांवरच कडक कारवाईची भाषा करणे हा पक्षपात आहे. जनतेला अन्नाच्या दर्जाचे धडे देणाऱ्या प्रशासनाला स्वतःच्या इमारतींमधील अस्वच्छता दिसत नाही, हे दुर्दैवी आहे. राज्याचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालय, आमदार निवास आणि विधान भवन येथील कँटीनमधील अन्नाच्या निकृष्ट दर्जाबाबत खुद्द लोकप्रतिनिधींनीच वारंवार तक्रारी केल्या आहेत. कँटीन व्यवस्थापनाशी आमदारांचे हातघाईवर आल्याचे प्रसंगही महाराष्ट्राने पाहिले आहेत. शासकीय रुग्णालये आणि वसतिगृहांमध्ये रुग्ण व विद्यार्थ्यांना दिले जाणारे अन्न अत्यंत सुमार दर्जाचे असते. स्वतःच्या शासकीय व्यवस्थांमध्ये सुरक्षित अन्न पुरवू न शकणारे अधिकारी निष्काम सेवाभावाने तयार होणाऱ्या ‘महाप्रसादा’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, हा संतापजनक प्रकार आहे. अन्न सुरक्षेचे नियम लागू करायचे असतील, तर ते सर्व धर्मीयांच्या सण-उत्सवांतील अन्न वितरणाला समान रीतीने लागू करावेत. एफडीएने सर्वप्रथम मंत्रालय, आमदार निवास आणि सर्व शासकीय कँटीन्सची झाडाझडती घेऊन तिथल्या अन्नाच्या दर्जाचा अहवाल सार्वजनिक करावा. हिंदूंची मंदिरे, गणेशोत्सव आणि नवरात्रीतील सार्वजनिक मंडळांना परवान्यांच्या नावाखाली त्रास देण्याचा प्रकार करू नये. तसेच अन्नदानाच्या सेवाभावी प्रक्रियेत बाधा निर्माण करू नये, *असेही श्री. घनवट यांनी शेवटी म्हटले आहे.*

- अभूतपूर्व उत्साहात श्रावण कावड यात्रा संपन्न - एकमुखी श्री दत्त मंदिराचे यशस्वी संयोजन एकमुखी दत्त मंदिर आयोजित श्रावण मास कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न- करवीर मठात अभिवादन - आरती महाप्रसादाने सांगता . कोल्हापूर : पुरातन संदर्भ असलेल्या मंगळवार पेठेतील अंखड धुनी च्या एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने आयोजित श्रावण मास कावड यात्रा प्रंचड भक्तीमय वातावरणात संपन्न झाली . सकाळ च्या मंगलमय वातावरणात पंचगंगा नदी त विधीवत दत्त पादूका जल स्नान - आरती करण्यात आली . त्यानंतर 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ' च्या निनादात स्वामी सेवक मिलिंद धोंड , संजय घाटगे - मामा,पारस ओसवाल फौजी विरेंद्र हारुगले , किशोर घाटगे किरण दुसे प्रसाद जाधव नितीन केरकर आदि मान्यवरांनी मानाच्या कावडी चे पूजन करुन श्रीफळ वाढवले . आणि कावड यात्रेस प्रांरभ झाला . या वेळी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराज ' रात्री उशिरा पोलिस प्रशासनाने नियोजित मार्गावर कावड यात्रा नेऊ नका असे कळवले मात्र तमाम भाविकांच्या उत्साहावर त्याचा काही किचिंत ही परिणाम झालेला नाही मात्र प्रशासनाचा मान राखत ही कावड यात्रा करवीर शंकराचार्य मठ मठापर्यंत मठात देण्याचा निर्धार घोषित केला . या नंतर हलगी च्या निनादात ही काव यात्रा सुरु झाली . यामधे गिरनार दत्तभक्त परिवार तसेच श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्राचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . करवीर निवासिनी श्री अंबाबाई माता व श्री गुरुदत्तात्रेय यांना साक्षी ठेवून श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी शिव परमात्म्याचा आशीर्वाद घेण्यासाठी दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पंचगंगा मातेचे पवित्र जल कावडी अभिवादन करण्याचा उपक्रम भविष्यात करवीरची नवी ओळख ठरेल अशा शब्दात करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह भरती यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या . या आध्यात्मिक आनंद सोहळ्यात सर्व गुरुबंधू, दत्तभक्त, दत्तसंप्रदायातील माता-भगिनी तसेच युवकांनी मंदिरा मार्फत दिलेले टी-शर्ट घालून तसेच पिवळ्या आणि भगव्या पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावड यात्रेची शोभा वाढवली . या कावड यात्रेच्या यशस्वी साठी मठाधिपती गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पारस ओसवाल किशोर घाटगे मिलिंद कुलकर्णी राजेंद्र मकोटे संतोष गोसावी अरुण गवळी शिव म बोधे सागर ठाणेकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्ते कार्यरत होते .4
- जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे1
- खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला1
- कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!1
- पिकासाठी राबले दिवसरात्र, हातात मात्र शून्य; चोपड्यात मूग पिकावर वखर1
- लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न.4
- इन्स्टाग्राम रीलसाठी पिस्तूलचा धाक; बाबुर्डी येथील तरुणावर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा इन्स्टाग्रामवरील ‘आभासी भाईगिरी’ पडली महागात; सुपा पोलिसांची तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये कारवाई सुपा, बारामती | इन्स्टाग्रामवर रील बनवताना पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन प्रक्षोभक आणि धमकीवजा मजकूर पोस्ट करणाऱ्या तरुणावर सुपा पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. सुपा पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास २४ ऑगस्ट रोजी "prem_jagtap_0295" या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ प्रसारित झाल्याचे आढळले. या व्हिडिओमध्ये बाबुर्डी, ता. बारामती येथील प्रेम प्रताप जगताप याने पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या व्हिडिओवर “आलीशान युवा प्रतिष्ठान” असा मजकूर तसेच “शांत है इसका मतलब ये नही की हम संत है..! जंगल अपना है, और कानुन भी अपना है” अशा स्वरूपाचा प्रक्षोभक मजकूर वापरण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करून संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५), तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या पथकाने केली. पोलिसांनी सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांना स्पष्ट इशारा दिला आहे—रीलच्या माध्यमातून शस्त्रांचे प्रदर्शन करून किंवा दहशत निर्माण करणारा आशय प्रसारित करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ‘रीलसाठी रिअल लाईफ धोक्यात घालू नका’, असा संदेश सुपा पोलिसांनी दिला आहे. AP CRIME NEWS LIVE — जनहितासाठी निर्भीड बातमी, लोकजागृतीसाठी सदैव पुढे.1
- सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र! सरकारकडून माहिती प्रसारित सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित! वेळेवर उपचार हाच जीव वाचविण्याचा मंत्र!1