logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

“गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी प्रमाणे कारवाई करा” :— आमदार सुरेश धस ------- मुलींचे संरक्षण, पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी आणि ऊसतोड महिला कामगारांच्या प्रश्नांवर सभागृहात वेधले लक्ष ------- पाटोदा (प्रतिनिधी) - महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आष्टी/पाटोदा/शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी सोमवार दिनांक 9 मार्च रोजी गर्भलिंग तपासणी, मुलींचे संरक्षण आणि ग्रामीण महिलांच्या प्रश्नांवर ठाम आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यात पुन्हा गर्भलिंग तपासणीचे प्रकार समोर येत असल्याबद्दल त्यांनी गंभीर चिंता व्यक्त करत, अशा प्रकारांवर संघटित गुन्हेगारीप्रमाणे कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सभागृहात बोलताना आमदार धस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “समाजात मुलगा - मुलगी समान आहेत असे आपण बोलतो; मात्र प्रत्यक्षात अजूनही मुलींबाबत भेदभावाची मानसिकता दिसून येते. मुलींचे अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलणे ही काळाची गरज आहे.” काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर अत्यंत चिंताजनक पातळीवर गेले होते. हजार मुलांमागे केवळ ६२८ मुली इतके प्रमाण नोंदवले गेले होते. विशेषतः शिरूर तालुक्यात ही स्थिती गंभीर होती. त्या काळात सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या प्रयत्नांमुळे परिस्थितीत सुधारणा झाली. मात्र आज पुन्हा काही ठिकाणी गर्भलिंग तपासणीचे प्रकार उघड होत असल्याने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या वेळी त्यांनी Pre‑Conception and Pre‑Natal Diagnostic Techniques Act (पीसीपीएनडीटी कायदा) प्रभावीपणे राबवला जातो का, याचा आढावा घेण्याची मागणी केली. जर हा कायदा अपुरा ठरत असेल, तर त्यात आवश्यक सुधारणा करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा. गर्भलिंग तपासणी करून मुलींचे गर्भपात करणाऱ्या डॉक्टर, एजंट आणि टोळ्यांवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीप्रमाणे गुन्हे दाखल करावेत, असेही त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागात मुलींचे प्रमाण कमी झाल्यामुळे सामाजिक असंतुलन निर्माण होत असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. काही ठिकाणी बाहेरच्या राज्यांतून मुली आणून विवाहाच्या नावाखाली फसवणूक होत असल्याच्या घटनाही समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले. याच बरोबर ग्रामीण भागातील ऊसतोड महिला कामगारांची कठीण परिस्थितीही आमदार धस यांनी मांडली. अपुऱ्या आरोग्य सुविधा, कमी हिमोग्लोबिन, प्रचंड शारीरिक श्रम आणि गर्भारपणातही काम करण्याची वेळ येत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. महिला कामगारांसाठी आरोग्य तपासणी, सॅनिटरी नॅपकिनची उपलब्धता, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षित कामाच्या परिस्थितीबाबत ठोस धोरण आखण्याची मागणी त्यांनी केली. समाजात खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करायची असेल, तर मुलींचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि संपत्तीतील हक्क याबाबत ठोस पावले उचलली पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. अनेक वेळा बहिणी स्वतःहून मालमत्तेतील हक्क सोडतात; मात्र महिलांना त्यांच्या हक्कांचा सन्मान मिळाला, तर कुटुंबातील अनेक सामाजिक प्रश्न आपोआप कमी होतील, असे त्यांनी नमूद केले. मुलींचे संरक्षण, त्यांचे सन्मानाने जगणे आणि ग्रामीण महिलांचे प्रश्न सोडवणे ही केवळ शासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याची ठाम भूमिका आमदार धस यांनी सभागृहात मांडली.

13 hrs ago
user_शेख महेशर ताहेर(पञकार)
शेख महेशर ताहेर(पञकार)
बीड, बीड, महाराष्ट्र•
13 hrs ago
77187321-9a29-43ee-ac40-f2523b19cb2a

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ------- (प्रतिनिधी) - राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वराज्य संकल्पना प्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ नव्या राजमाता जिजाऊ नावाच्या ३ बाय २ आसन रचनेच्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. एसटी महामंडळाने या पूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा विविध नावांनी बससेवा सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेली लालपरी आज ही दुरावस्थेत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी एसटी बसची अवस्था अतिशय खराब असून प्रवाशांना मोडकळीस आलेल्या व धोकादायक बसमधून प्रवास करावा लागत आहे. या कडे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सोमवार दिनांक ०९ रोजी अंबेजोगाई ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करताना एसटी बसमधील आसनव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आलेली दिसून आली. या बाबत बस कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ही अवस्था अनेक दिवसांपासून असल्याचे सांगण्यात आले. एसटीच्या दुरावस्थेच्या या पूर्वीही बीड जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी एसटीच्या दुरावस्थेचे दर्शन घडवणाऱ्या तीन घटना एकाच दिवशी घडल्या होत्या. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पाटोदा - बीड - परभणी मार्गावरील बस पावसात गळत होती. छत खराब असल्याने पावसाचे पाणी थेट प्रवाशांवर पडत होते आणि प्रवाशांना छत्री घेऊन बसण्याची वेळ आली होती. नेकनूर ते मांजरसुंभा दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते लातुर जाणाऱ्या (एमएच-२४ एयू ८३३५) बसचे चाक निखळून पडले होते. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. अंबेजोगाई अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका बसमध्ये छत गळत असल्याने एका प्रवाशाला चालकाच्या डोक्यावर छत्री धरून उभे राहावे लागले होते. या घटनांमुळे लालपरीमधून प्रवास करणे अनेक ठिकाणी धोकादायक ठरत असून नादुरुस्त बसची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
    1
    -------
(प्रतिनिधी) - राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वराज्य संकल्पना प्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ नव्या राजमाता जिजाऊ नावाच्या ३ बाय २ आसन रचनेच्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. एसटी महामंडळाने या पूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा विविध नावांनी बससेवा सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेली लालपरी आज ही दुरावस्थेत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी एसटी बसची अवस्था अतिशय खराब असून प्रवाशांना मोडकळीस आलेल्या व धोकादायक बसमधून प्रवास करावा लागत आहे. या कडे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सोमवार दिनांक ०९ रोजी अंबेजोगाई ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करताना एसटी बसमधील आसनव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आलेली दिसून आली. या बाबत बस कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ही अवस्था अनेक दिवसांपासून असल्याचे सांगण्यात आले. एसटीच्या दुरावस्थेच्या या पूर्वीही बीड जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी एसटीच्या दुरावस्थेचे दर्शन घडवणाऱ्या तीन घटना एकाच दिवशी घडल्या होत्या. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पाटोदा - बीड - परभणी  मार्गावरील बस पावसात गळत होती. छत खराब असल्याने पावसाचे पाणी थेट प्रवाशांवर पडत होते आणि प्रवाशांना छत्री घेऊन बसण्याची वेळ आली होती. नेकनूर ते मांजरसुंभा दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते लातुर जाणाऱ्या (एमएच-२४ एयू ८३३५) बसचे चाक निखळून पडले होते. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. अंबेजोगाई अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका बसमध्ये छत गळत असल्याने एका प्रवाशाला चालकाच्या डोक्यावर छत्री धरून उभे राहावे लागले होते. या घटनांमुळे लालपरीमधून प्रवास करणे अनेक ठिकाणी धोकादायक ठरत असून नादुरुस्त बसची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • अयोग्य मार्गदर्शनामुळे बांबू शेती करूण शेतकऱ्यावर आर्थिक संकट आले
    1
    अयोग्य  मार्गदर्शनामुळे बांबू शेती करूण शेतकऱ्यावर आर्थिक संकट आले
    user_Vithal Khoje
    Vithal Khoje
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Dattatray Funde
    1
    Post by Dattatray Funde
    user_Dattatray Funde
    Dattatray Funde
    Shevgaon, Ahmednagar•
    14 hrs ago
  • Post by Parmeshor Khoje
    1
    Post by Parmeshor Khoje
    user_Parmeshor Khoje
    Parmeshor Khoje
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    1 day ago
  • अंबलटेक गावाचा विकास आणखीन नाही.चांगला रस्ता होता ते खंदून टाकला आहे. नवीन रस्ता करतो म्हणून आणखीन केला नाही जिथे रस्ता चांगला आहे तिथेच रस्ता करीत आहेत .दारासमोर गोट्यात सरपंचाच्या आणि सदस्याच्या गोट्यामध्ये काँक्रीट टाकून काम चालू आहे मंदिर पाशी आणि वरी आणखीन रस्ता नाही?
    2
    अंबलटेक गावाचा विकास आणखीन नाही.चांगला रस्ता होता ते खंदून टाकला आहे. नवीन रस्ता करतो म्हणून आणखीन केला नाही जिथे रस्ता चांगला आहे तिथेच रस्ता करीत आहेत .दारासमोर गोट्यात सरपंचाच्या आणि सदस्याच्या गोट्यामध्ये काँक्रीट टाकून काम चालू आहे मंदिर पाशी आणि वरी आणखीन रस्ता नाही?
    user_Boss Boss
    Boss Boss
    Rural Transportation Operator अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • यादरम्यान ६० किलोमीटर मध्ये शिरपूर आणि खलघाट (सेंदवा) असे दोन टोल आहेत. या महामार्गावरील हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी परिवहन विभागाने 26 लाखाचा निधी मंजूर केलेला होता. अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलने करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आज शिरपूर फर्स्टच्या वतींने अनोखे आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील खड्ड्यामध्ये बसून '२६ लाखाच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा' करून निषेध नोंदवला. यानंतर परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, धम्मदीप मोरे, हंसराज चौधरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. व त्वरित दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
    1
    यादरम्यान ६० किलोमीटर मध्ये शिरपूर आणि खलघाट (सेंदवा) असे दोन टोल आहेत. 
या महामार्गावरील हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी परिवहन विभागाने 26 लाखाचा निधी मंजूर केलेला होता.
अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलने करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आज शिरपूर फर्स्टच्या वतींने अनोखे आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील खड्ड्यामध्ये बसून '२६ लाखाच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा' करून निषेध  नोंदवला.
यानंतर परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, धम्मदीप मोरे, हंसराज चौधरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. व त्वरित दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • राज्यात 17 ते 25 मार्च दरम्यान पाऊस-हवामान अभ्यास पंजाब डक यांचा अंदाज
    1
    राज्यात 17 ते 25 मार्च दरम्यान पाऊस-हवामान अभ्यास पंजाब डक यांचा अंदाज
    user_Vithal Khoje
    Vithal Khoje
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.