एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; वाहन चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत, १८ दुचाकी जप्त एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; वाहन चोरी प्रकरणातील आरोपी अटकेत, १८ दुचाकी जप्त सतीश भालेराव नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वाहन चोरी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी मोठी कारवाई करत एक आरोपी अटक करून तब्बल १८ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. या जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे ७ लाख ३० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा क्रमांक १५१/२०२६ कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी शशिकांत तुलशीराम राऊत (वय ४५ वर्षे, पंचशील नगर, अंबेडकर मार्ग, नागपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ०२ मार्च २०२६ रोजी सकाळी ०७.२५ ते ०७.५५ दरम्यान त्यांच्या ताब्यातील होंडा ड्रीम युगा (MH-49-AZ-5421) ही दुचाकी कार्यालयासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे प्रवेश कन्हेलाल कंगाले (वय ३८ वर्षे, पोलिस लाईन टाकळी, नागपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीकडून एकूण १८ दुचाकी वाहने जप्त केली, ज्यामध्ये होंडा, स्प्लेंडर, पॅशन प्रो, बजाज फ्लेअर यांसारख्या विविध कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. जप्त वाहनांची एकूण किंमत ७ लाख ३० हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस उपायुक्त (परिमंडळ ०२) सिंगल रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गुरव, तसेच पोलीस निरीक्षक वपोनि गोकुळ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोउपनि पंकज सखाराम, पोहेकॉ राजेश वरठी, विजय जाने, पोशी सचिन सोनवणे, पोशी मुरलीधर केवट आणि मनोज सोनवणे यांचा सहभाग होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाणे, नागपूर करत असून आरोपीकडून आणखी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- मुंबई/ चंद्रपूर: महिला आयोगाच्या निधीच्या मागणीबद्दल आज सभागृहात भूमिका मांडली. महिला आयोगाने खर्च केलेल्या ४.५ कोटी रुपये निधी पैकी किती निधी हा महिला आयोगाच्या कर्मचारी वेतनासाठी खर्च झाला ? महिला आयोगाची सध्याची मनुष्यबळ संख्या ३५ आहे, राज्यातील ६.५ कोटी महिलांना सेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे आहे का ? आवश्यकता असल्यास या मनुष्यबळात वाढ करणार का ? असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले.1
- औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?" #Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi1
- Post by Pitam Parjapati4
- Post by मारोती काकडे1
- Post by Dil Muhammad Ansari1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- देवळी (जि. वर्धा) : परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीचा पर्दाफाश केल्याच्या कारणावरून एका पत्रकारावर व त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना देवळी येथे घडली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे पत्रकार शंकर अंबादास केवदे (रा. देवळी, जि. वर्धा) यांनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीबाबत बातमी प्रसारित केली होती. तसेच या संदर्भात संबंधित पोलिसांसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सोशल मीडियावर प्रसारित केली होती. सदर बाबीची माहिती संबंधित व्यक्तींना मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार शंकर केवदे यांना घरातून बोलावून घेतले व त्यांनीच ती रेकॉर्डिंग त्यांना ऐकवली. त्यानंतर “तू आमच्या विरोधात तक्रार का करतोस” या कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर तसेच त्यांच्या पत्नीवर एकत्रितपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून घटनेदरम्यान आरोपींकडे शस्त्र असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले आहे : रामदास डायरे विशाल पारिसे (देवळी)श्रावण डाहे (रा. निंबोली) सदर सर्व व्यक्ती बेकायदेशीर दारू विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत असून परिसरात त्यांच्या दादागिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केवळ भारतीय दंड संहिता कलम 115 व 352 अंतर्गत गुन्हा नोंद केल्याचे समजते. मात्र घटनेचे स्वरूप गंभीर असताना अधिक कठोर व संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पत्रकार शंकर केवदे यांच्या पत्नीचा मेडिकल रिपोर्ट (MLC) देण्यात न आल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. — शंकर अंबादास केवदे पत्रकार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशन रा. देवळी, जि. वर्धा मोबाईल : 70584167432
- इंडिया में थी ट्रक पर हॉस्पिटल कैसी हालत थी मैंने किसी से बोल मदद करने की तो उसने भी बात नहीं की और मेरा काम करता था उसने भी मदद की इस क्षेत्र में मैं क्या कर सकता था और मन भरोस इलाज करवाता रहा और आज मीटिंग चाहिए लेकिन किसी ने मदद नहीं की है देख सकते हो आप2