आचार्य विनोबा भावे यांचे जीवनकार्य समाजासाठी दिशादर्शक: डॉ. रणजित राऊत विनोबा भावे ग्रामविकास प्रतिष्ठान, मलठण यांच्या वतीने माहिजळगाव येथे आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस युवा शास्त्रज्ञ व जैवविविधता संशोधक डॉ. रणजित रावसाहेब राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पवित्र स्मृतींस अभिवादन करण्यात आले. यावेळी विनोबा भावे ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पोपट खोसे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंच माहिजळगावचे अध्यक्ष नवनाथ शिंदे, सुहास ढोबे तसेच सचिन कुतवळ उपस्थित होते. या प्रसंगी युवा शास्त्रज्ञ डॉ. रणजित राऊत यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. त्यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीचे ऐतिहासिक महत्त्व, राष्ट्रनिर्मितीत विनोबांचे योगदान आणि त्यांच्या विचारांचे आजच्या समाजासाठी असलेले दिशादर्शक मूल्य याबाबत प्रेरक माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोबा भावे ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पोपट खोसे यांनी केले. शेवटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंचचे अध्यक्ष नवनाथ शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आचार्य विनोबा भावे यांचे जीवनकार्य समाजासाठी दिशादर्शक: डॉ. रणजित राऊत विनोबा भावे ग्रामविकास प्रतिष्ठान, मलठण यांच्या वतीने माहिजळगाव येथे आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस युवा शास्त्रज्ञ व जैवविविधता संशोधक डॉ. रणजित रावसाहेब राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पवित्र स्मृतींस अभिवादन करण्यात आले. यावेळी विनोबा भावे ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पोपट खोसे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंच माहिजळगावचे अध्यक्ष नवनाथ शिंदे, सुहास ढोबे तसेच सचिन कुतवळ उपस्थित होते. या प्रसंगी युवा शास्त्रज्ञ डॉ. रणजित राऊत यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. त्यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीचे ऐतिहासिक महत्त्व, राष्ट्रनिर्मितीत विनोबांचे योगदान आणि त्यांच्या विचारांचे आजच्या समाजासाठी असलेले दिशादर्शक मूल्य याबाबत प्रेरक माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोबा भावे ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पोपट खोसे यांनी केले. शेवटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंचचे अध्यक्ष नवनाथ शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
- माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...3
- बारामती शहर पोलिसांनी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले ऑपरेशन मॉक ड्रिल द्वारे बस स्थानकावर झाली धावपळ..1
- महंत प्रेममुर्ती शिवाजी महाराज (मठाधिपती नारायणगड संस्थान), आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (नवगण राजुरी), महंत महादेव महाराज भारती (बेलेश्वर संस्थान बेलगाव) श्री क्षेत्र भालचंद्र गणपतीच्या चरणी नतमस्तक.:-डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर1
- हलवाई चौक गणेश मंडळातर्फे चार शिक्षकांचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मान शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}समाजात विधायक परिवर्तन घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, ज्ञानदानाबरोबरच समाजहिताच्या उपक्रमांत शिक्षकांचा सहभाग मोलाचा असतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती शिक्षक पुरस्काराने सन्मानित आदर्श शिक्षक हरिभाऊ नाथू पानसरे यांनी केले. श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हरिभाऊ पानसरे, साधना संजय शितोळे, संजय पंढरीनाथ वेदपाठक आणि जयश्री ज्ञानेश्वर दांडगे यांना ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे व शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सुकुमार बोरा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पानसरे म्हणाले, “यशासाठी कष्ट, अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. शिस्त, नियमित व्यायाम अंगीकारून आळसापासून दूर राहिले पाहिजे.” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, संस्कार व शिष्यवृत्तीची दिशा देत तसेच मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती, शाळा उभारणी व समाजकार्याला हातभार लावणाऱ्या पानसरे यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. साधना शितोळे यांनी शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असून शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात, असे सांगितले. संजय वेदपाठक यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर माफक प्रमाणात करावा तसेच दैनंदिन जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करावा, असे मार्गदर्शन केले. संगणक शिक्षण क्षेत्रात ३५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षण घेतले आहे. सुकुमार बोरा म्हणाले, ज्ञानदान केल्याने ज्ञान वाढते. शिक्षकांनी सतत कार्यमग्न, कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि क्षमाशील राहून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणांची पेरणी करावी. परिवर्तनवादी शिक्षणातून विद्यार्थ्यांना जीवनाची योग्य दिशा मिळते. हलवाई चौक गणेश मंडळाचा ‘प्रेरणादायी शिक्षक’ पुरस्कार उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर व प्राचार्य डॉ. समीर ओंकार, जयश्री दांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त मंडळाच्या वतीने ३० हून अधिक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला असून, सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रम वर्षभर राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मयूर काळे, माजी उपनगराध्यक्ष डॉ. वसंत पानसरे, माजी नगरसेविका राजश्री पानसरे, माजी सभापती प्रदीप बारवकर, राजेंद्र जाधवराव, माजी अध्यक्ष रणजीत गायकवाड, प्रेम मुसळे, अशोक काळे, सिकंदर मणियार, महेंद्र डेरे, उषादेवी बढे, डॉ. क्रांती पैठणकर, राहुल निकुंभ, विजय शेजवळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल ढवळे यांनी केले तर आभार मयूर काळे यांनी मानले.4
- पत्रकार सुरक्षा कायद्यासाठी जंतर- मंतर येथील देशव्यापी आंदोलनात सहभागी व्हा - अमरजान पठाण बीड(प्रतिनिधी):अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)च्या बीड जिल्हाध्यक्षपदी उच्चशिक्षित व युवा पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांची पुनर्निवड करण्यात आली आहे. यानिमित्त शहरातील नीलकमल हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात समितीचे मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार,ज्येष्ठ समाजसेवक व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या हस्ते पठाण अमरजान यांनी नियुक्तीपत्र स्वीकारून जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. शहरातील नीलकमल हॉटेल येथे अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीच्या मार्गदर्शक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकार पठाण अमरजान आजम खान यांनी राजेश कुमार जोगदंड (मार्गदर्शक), मुक्त पत्रकार एस. एम. युसुफ, पत्रकार बालाजी जगतकर, पत्रकार नितीन जोगदंड, शेख पाशाभाई (सदस्य, मार्गदर्शक मंडळ), रमेश गंगाधरे, शेख पाशुभाई, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ पठाण आणि शेख वजीरभाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारून अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला. पुनर्निवडीनंतर बोलताना पठाण अमरजान यांनी पत्रकारांच्या समस्या, हक्कांचे संरक्षण, पत्रकारांना मिळणारा सन्मान आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न यासाठी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला.बीड जिल्ह्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठामपणे उभे राहण्यासोबतच पत्रकारांवरील हल्ले, धमक्या, दबाव तसेच खोटे गुन्हे दाखल करून होणाऱ्या कथित अन्यायाविरोधात कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांवरील हल्ले आणि पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर होत असताना देशभरात पत्रकार सुरक्षा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथील जंतर-मंतरवर १ डिसेंबरपासून आयोजित देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पठाण अमरजान यांनी उपस्थित पत्रकारांना दिली. पत्रकारांना निर्भयपणे काम करण्यासाठी सक्षम कायदेशीर संरक्षण मिळणे आवश्यक असून, देशभर पत्रकार सुरक्षा कायदा लागू होईपर्यंत लोकशाही आणि संविधानिक मार्गाने हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समिती (ABPSS)चे शेख जावेद, सय्यद रेहान हुसेनी, शेख मोहसीन, शेख इद्रीस, सह समितीचे इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीडकर सज्ज; छत्रपती शिवाजी महाराज चौकात खिचडी-पाण्याची व्यवस्था मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी बीडकर सज्ज; छत्रपती शिवाजी महाराज चौकात खिचडी-पाण्याची व्यवस्था बीड | प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षाची भूमिका घेणारे संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले असताना त्यांच्या स्वागतासाठी बीड शहरातील मराठा समाज बांधव सज्ज झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्र येत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी येणाऱ्या समाजबांधवांची गैरसोय होऊ नये, यासाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने खिचडी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी महिला भगिनींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून मनोज दादांच्या स्वागताची तयारी करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे होणाऱ्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या स्वागतासाठी विविध ठिकाणी समाजबांधवांची गर्दी होत आहे. मनोज दादांच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी बीडकर एकवटले आहेत.2
- देवळाली प्रवराच्या लोड शेंडीग बाबद दीलेल्या सर्व पक्षीय निवेदनावर काय कारवाई झाली1
- बारामती गणेश फेस्टिव्हलला अजितदादांची आठवण; भावनिक संदेशातून आदरांजली1