लाईटचा लपंडाव! महिन्यातून कटिंग, रोज १० ट्रिपिंग; सावळदबारा सबस्टेशनच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त लाईटचा लपंडाव! महिन्यातून कटिंग, रोज १० ट्रिपिंग; सावळदबारा सबस्टेशनच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त सोयगाव तालुका येथील सावळदबारा सबस्टेशनशी जोडलेल्या तब्बल २० गावांमध्ये विजेच्या समस्येमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. आज सकाळी ७ वाजल्यापासून ट्री कटिंगच्या कामामुळे वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला असून, प्रचंड उष्णतेत नागरिकांचे हाल होत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, महिन्यातून दोन वेळा ट्री कटिंगच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला जातो, तर लाईट सुरू असतानाही दिवसभरात सुमारे १० वेळा ट्रिपिंग होते. या सततच्या समस्येमुळे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. स्थानिकांनी आरोप केला आहे की, सावळदबारा सबस्टेशनच्या अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे ही समस्या गंभीर बनली आहे. वेळेवर देखभाल न करणे, योग्य नियोजनाचा अभाव आणि वारंवार होणारे ट्रिपिंग यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उकाड्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना विशेष त्रास सहन करावा लागत असून पाणीपुरवठा, घरगुती कामे आणि व्यवसायावरही मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरण विभाग च्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “लाईट असतानाही सतत ट्रिपिंग आणि वारंवार कटिंग—नागरिकांनी जगायचं कसं?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

- 😯😯😯😯1
- SBI बँकेलगत भंगार गोदामाला भीषण आग; फुलंब्रीत धुराचे लोट, नागरिकांत घबराट1
- Post by Gautam Hiwrale1
- नागपूर मुंबई महामार्गावरील वैजापूर शहरात जवळ भीषण अपघात झाला आहे यामध्ये एक जण गंभीर जखमी झाले आहे स्थानिक पोलीस व महामार्ग पोलीस ट्राफिक सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे1
- खुलताबादमध्ये ओमनी कारमध्ये भीषण स्पोर्ट ; कारला आग, गॅस सिलेंडर बाहेर खुलताबाद शहरातील कमला नेहरू भद्रा कॉलनी रोडलगत उभी असलेल्या एका ओमनी कारमध्ये अचानक भीषण स्पोर्ट होऊन आग लागल्याची घटना घडली. आगीदरम्यान गाडीत असलेला गॅस सिलेंडर उडून बाहेर पडल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली. घटनेनंतर अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच नगरपरिषदेकडून कोणताही आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी काही वेळाने पाण्याच्या सहाय्याने आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.नगरपरिषदेकडे अग्निशमन गाडी उपलब्ध असूनही त्यावर प्रशिक्षित फायरमन नसल्याची बाब समोर आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. .1
- Post by Vikash Thakare1
- Post by तुकाराम आश्रय वृद्धाश्रम1
- जामनेर1