माजी सैनिक व वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी 181 पदांची भरती : सशस्त्र दलातील भूतपूर्व सैनिक तसेच वने व हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील किमान 20 वर्षे सेवा केलेल्या भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी 136 इन्फंट्री बटालियन (टीए) इको महार येथे विविध पदांची भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 181 रिक्त पदे उपलब्ध असून, महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील पात्र उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. या भरती मेळाव्याचे आयोजन दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिला टप्पा कोल्हापूर येथील 109 इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा एलआय येथे दि. 1 ते 4 सप्टेंबर 2026 दरम्यान सकाळी 5 वाजल्यापासून, तर दुसरा टप्पा छत्रपती संभाजीनगर येथील एआरओ प्रांगणात दि. 8 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान सकाळी 5 वाजल्यापासून होणार आहे. भरतीमध्ये जेसीओची 4 पदे, सोल्जर (जीडी)ची 162 पदे आणि ट्रेड्समनची 15 पदे आहेत. सोल्जर (जीडी) पदांसाठी केवळ महाराष्ट्रातील उमेदवार पात्र असतील. ट्रेड्समन पदांमध्ये सोल क्लार्क (जीडी)-7, हेअर ड्रेसर-1, मेस कीपर-1, स्टिवर्ड-1, हाऊस कीपर-1, शेफ कम्युनिटी-2 आणि वॉशरमन-2 पदांचा समावेश आहे. या पदांसाठी संपूर्ण भारतातील उमेदवार पात्र आहेत. पात्रता व सेवा अटी उमेदवार हा सशस्त्र दलातील भूतपूर्व सैनिक (निवृत्तिवेतनधारक) किंवा वने व हवामान बदल मंत्रालय तसेच राज्य वन विभागात किमान 20 वर्षे सेवा केलेला भूतपूर्व महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेची किमान अट नाही. मात्र, सेवानिवृत्ती अथवा सेवामुक्तीच्या तारखेपासून भरतीच्या तारखेपर्यंत पाच वर्षांच्या आत नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराची वैद्यकीय श्रेणी शेष-1 आणि चारित्र्य अनुकरणीय अथवा अतिशय चांगले असावे. उमेदवार कोणत्याही दिवाणी अथवा फौजदारी प्रकरणात सहभागी नसावा. निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागणार आहे. शारीरिक पात्रता भूतपूर्व सैनिकांसाठी उंची 160 सेंमी, तर गोरखा, गढवाली व आसामी उमेदवारांसाठी 152 सेंमी उंची आवश्यक आहे. वने व हवामान बदल मंत्रालय तसेच राज्य वन विभागातील भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी उंची 150 सेंमी आवश्यक आहे. वजन माजी सैनिकांसाठी किमान 50 किलो, तर महिला कर्मचाऱ्यांसाठी किमान 42 किलो असावे. माजी सैनिकांसाठी छाती 82 सेंमी व किमान 5 सेंमी विस्तार आवश्यक आहे. महिला कर्मचाऱ्यांची छाती किमान 5 सेंमी विस्तारण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया सैनिकांसाठी प्रारंभिक कागदपत्र तपासणी, 1 मैल धाव, 9 फूट खंदक, पुलअप्स, बॅलन्स बीम, बीओओमार्फत मुलाखत व वैद्यकीय तपासणी अशी प्रक्रिया राहणार आहे. वने व हवामान बदल मंत्रालय व राज्य वन विभागातील महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रारंभिक कागदपत्रे तपासणी, बीओओमार्फत मुलाखत, संबंधित कामातील प्रावीण्य चाचणी व वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी मूळ निवृत्तिवेतन आदेश (पीपीओ), मूळ डिस्चार्ज बुक व स्वयं-साक्षांकित प्रत, मूळ अधिवास प्रमाणपत्र, सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड व स्वयं-साक्षांकित प्रत, अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराची 10 छायाचित्रे तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. ही भरती गुणवत्ता व रिक्त पदांच्या आधारे केली जाणार आहे. इको टीए मधील सेवा निवृत्तिवेतनास पात्र नसलेली आहे. उमेदवाराची सुरुवातीला दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात येईल. कामगिरीच्या आधारे एक वर्षाची मुदतवाढ दिली जाऊ शकते. सैनिक जेसीओंना वयाच्या 55 वर्षांपर्यंत, तर भूतपूर्व सैनिक शिपायांना 50 वर्षांपर्यंत सेवा करता येईल. सैनिकांचे सध्याचे निवृत्तिवेतन अबाधित राहणार आहे. महत्त्वाच्या सूचना या भरती मेळाव्यादरम्यान मोबाईल फोनला परवानगी राहणार नाही. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य व निष्पक्ष असून उमेदवारांनी कोणालाही लाच देऊ नये तसेच दलालांपासून सावध राहावे. खोटी अथवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारी रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नमूद केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेत उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. भरतीबाबत चौकशी अथवा स्पष्टीकरणासाठी 9168168136 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.1
- भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांच्या उपस्थितीत नांदेड शहरात ५ ऑगस्ट रोजी शेतकरी मेळावा नांदेड - भारतीय किसान युनियनच्या वतीने बुधवार ५ ऑगस्ट सकाळी ११ वाजता शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम, नांदेड येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या मार्गदर्शन होणार असून राकेश टिकैत हे कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या शेतीमाल व्यापार करार (टैरिफ ट्रेड डील) धोरणामुळे भारतीय शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भारतीय किसान युनियन महाराष्ट्र प्रदेश च्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला रामचंद्र येईलवाड, शिवाजी पाटील पारवेकर, मोहन पाटील शिरसाटउमरेकर,नांदेडचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकत्ते, जयवंतराव रुंजे, जगदीश जाधव आदींची उपस्थिती होती.1
- डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! फसवणूक डिजिटल अटक (Digital Arrest) – फसवणूक... सावधान! 📞 जर कोणी स्वतःला पोलीस, CBI, ED किंवा इतर सरकारी अधिकारी सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर तुम्हाला "डिजिटल अटक" झाल्याचे सांगत असेल, तर तो नक्कीच सायबर फसवणुकीचा प्रयत्न आहे. ⚠️ लक्षात ठेवा: ✅ कोणताही सरकारी अधिकारी फोनवरून अटक करत नाही. ✅ OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक तपशील कधीही शेअर करू नका. ✅ घाबरून पैसे ट्रान्सफर करू नका. ✅ संशयास्पद कॉल त्वरित बंद करा. ✅ सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा वर तक्रार नोंदवा. 🛡️ सतर्क नागरिकच सायबर गुन्हेगारांवर सर्वात मोठे शस्त्र आहेत. माहितीपूर्ण राहा, सुरक्षित राहा! #DigitalArrest #CyberFraud #CyberCrime #CyberSafety #NandedPolice #MaharashtraPolice #StopCyberFraud #OnlineSafety #CyberAwareness #Dial1930 #CyberCrimeHelpline #ThinkBeforeYouTrust #StayAlert #SafeDigitalIndia #ALMBharat #NNLMarathi1
- उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर1
- पुरात कार गेली वाहून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर गावजवळील पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार पाण्यात वाहून गेली असुन सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसुन ड्रायव्हरने तात्काळ गाडीचा दरवाजा उघडून बाहेर सुखरूप पणे निघून आले. गाडी क्र MH14EH9382 ह्या क्रमांकाची गाडी सालेगाव येथील प्रल्हाद थोरात यांची असल्याची माहिती मिळाली आहे. सेनगाव तालुक्यातील हत्ता ते तळणी या राज्य मार्गचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे कापडशिंगी जावळील रामप्रसाद नगर येथील पुलाचे काम पूर्ण झाले होते मात्र केवळ पुलाच्या दोन्ही बाजूने भराव न भरल्यामुळे हा पुल वाहतुकी साठी सुरू करण्यात आला नाही पुलाच्या साईडने जो रस्ता काढून दिला होता त्या रस्त्यावर नदीला पूर आल्यावर रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होत आहे. त्यामुळे सुमारे दहा ते पंधरा गावाचा संपर्क तुटत आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराच्या वतीने जेव्हा काल पुलाच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली वाहून गेलेली गाडी आज क्रेनच्या साह्याने बाहेर काढली आहे या मध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.2