logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राज्य कार्यकारिणीत वर्धा जिल्ह्याचा अहवाल सादर महाराष्ट्र भूषण सन्मान मिळाल्याबद्दल गजेंद्र सुरकार यांचा सत्कार राज्य कार्यकारिणीत वर्धा जिल्ह्याचा अहवाल सादर महाराष्ट्र भूषण सन्मान मिळाल्याबद्दल गजेंद्र सुरकार यांचा सत्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची दोन दिवसीय राज्य कार्यकारिणीची बैठक दि. १२ व १३ सप्टेंबर रोजी अंबाजोगाई, जि. बीड येथील मानवलोक संस्थेच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या राज्य कार्यकारिणीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्धा जिल्हा शाखेचा सविस्तर अहवाल राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी सादर केला. दि. ७ जून ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत वर्धा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती सुरकार यांनी राज्य कार्यकारिणीसमोर मांडली. वर्धा शहरातील शाळा, महाविद्यालये तसेच ग्रामीण भागात घेण्यात आलेले प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध सामाजिक उपक्रम आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट, सेलू, देवळी व समुद्रपूर या शाखांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा आणि उपक्रमांचा आढावाही त्यांनी सादर केला. अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेची सभासद नोंदणी, सदस्य नोंदणी, नियमित शहर शाखा बैठका, देणगी संकलन, जाहिराती तसेच संघटनात्मक कामकाजाची सविस्तर माहिती अहवालात देण्यात आली. यावेळी आगामी चार महिन्यांत वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे नियोजन व प्रस्तावित उपक्रम यांचेही विवेचन गजेंद्र सुरकार यांनी केले. वर्धा शाखेच्या कार्याचा आणि सादर केलेल्या अहवालाची राज्य कार्यकारिणीत विशेष नोंद घेण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने गजेंद्र सुरकार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास राज्य कार्याध्यक्ष प्रा. संजय बनसोडे (सांगली), राज्य अध्यक्ष माधव बावगे (लातूर), राज्य प्रधान सचिव विनायक सावळे (शहादा), डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक), विजय परब (मुंबई) यांच्यासह राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या राज्य कार्यकारिणीला महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांतील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. विविध जिल्ह्यांच्या कार्याध्यक्ष व प्रधान सचिवांनी आपल्या जिल्ह्यातील कार्याचा अहवाल तसेच संघटनात्मक रचना, जबाबदाऱ्या आणि आगामी चार महिन्यांच्या नियोजनाची माहिती सादर केली. तसेच २३ विभागांच्या राज्य कार्यवाहांनी आपल्या-आपल्या विभागातील कार्याचा आढावा मांडला. राज्य कार्यकारिणीच्या निमित्ताने स्थानिक शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धा जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक प्रबोधनासाठी सुरू असलेल्या कार्याला या बैठकीतून अधिक बळ मिळाले. – गजेंद्र सुरकार

5 hrs ago
user_हणमंत बिराप्पा कोळी
हणमंत बिराप्पा कोळी
News Anchor जत, सांगली, महाराष्ट्र•
5 hrs ago
1c83f72c-1dc0-4213-a10f-ba74dda7f5ae

राज्य कार्यकारिणीत वर्धा जिल्ह्याचा अहवाल सादर महाराष्ट्र भूषण सन्मान मिळाल्याबद्दल गजेंद्र सुरकार यांचा सत्कार राज्य कार्यकारिणीत वर्धा जिल्ह्याचा अहवाल सादर महाराष्ट्र भूषण सन्मान मिळाल्याबद्दल गजेंद्र सुरकार यांचा सत्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची दोन दिवसीय राज्य कार्यकारिणीची बैठक दि. १२ व १३ सप्टेंबर रोजी अंबाजोगाई, जि. बीड येथील मानवलोक संस्थेच्या सभागृहात उत्साहात पार पडली. या राज्य कार्यकारिणीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वर्धा जिल्हा शाखेचा सविस्तर अहवाल राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी सादर केला. दि. ७ जून ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत वर्धा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती सुरकार यांनी राज्य कार्यकारिणीसमोर मांडली. वर्धा शहरातील शाळा, महाविद्यालये तसेच ग्रामीण भागात घेण्यात आलेले प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध सामाजिक उपक्रम आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट, सेलू, देवळी व समुद्रपूर या शाखांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा आणि उपक्रमांचा आढावाही त्यांनी सादर केला. अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेची सभासद नोंदणी, सदस्य नोंदणी, नियमित शहर शाखा बैठका, देणगी संकलन, जाहिराती तसेच संघटनात्मक कामकाजाची सविस्तर माहिती अहवालात देण्यात आली. यावेळी आगामी चार

f23cc87b-f76a-4ece-8b33-4139ea713242

महिन्यांत वर्धा जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे नियोजन व प्रस्तावित उपक्रम यांचेही विवेचन गजेंद्र सुरकार यांनी केले. वर्धा शाखेच्या कार्याचा आणि सादर केलेल्या अहवालाची राज्य कार्यकारिणीत विशेष नोंद घेण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने गजेंद्र सुरकार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास राज्य कार्याध्यक्ष प्रा. संजय बनसोडे (सांगली), राज्य अध्यक्ष माधव बावगे (लातूर), राज्य प्रधान सचिव विनायक सावळे (शहादा), डॉ. ठकसेन गोराणे (नाशिक), विजय परब (मुंबई) यांच्यासह राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या राज्य कार्यकारिणीला महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांतील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. विविध जिल्ह्यांच्या कार्याध्यक्ष व प्रधान सचिवांनी आपल्या जिल्ह्यातील कार्याचा अहवाल तसेच संघटनात्मक रचना, जबाबदाऱ्या आणि आगामी चार महिन्यांच्या नियोजनाची माहिती सादर केली. तसेच २३ विभागांच्या राज्य कार्यवाहांनी आपल्या-आपल्या विभागातील कार्याचा आढावा मांडला. राज्य कार्यकारिणीच्या निमित्ताने स्थानिक शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धा जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक प्रबोधनासाठी सुरू असलेल्या कार्याला या बैठकीतून अधिक बळ मिळाले. – गजेंद्र सुरकार

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे. गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.
    4
    १९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात
१९९२ पासूनची परंपरा कायम; युवा गणेशोत्सव मंडळ गांधीनगर येथे गणेशोत्सव उत्साहात
वळसंग (प्रतिनिधी) : वळसंग येथील गांधीनगर परिसरातील युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि सामाजिक वातावरणात साजरा करण्यात येत आहे. सन १९९२ पासून गणेशोत्सवाची परंपरा जपत मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते.
यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या गणरायाची आकर्षक प्रतिष्ठापना करण्यात आली असून, परिसरातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व गणेशभक्त मोठ्या संख्येने एकत्र येऊन उत्सवात सहभागी होत आहेत. त्यामुळे गांधीनगर परिसरात सध्या भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनशक्ती लाईव्ह न्यूजच्या वतीने युवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सन १९९२ पासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची वाटचाल, मंडळाची वैशिष्ट्ये, आतापर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम तसेच यंदाच्या उत्सवाचे नियोजन याबाबत माहिती जाणून घेण्यात आली.
युवकांच्या कलागुणांना मिळते व्यासपीठ
युवा गणेशोत्सव मंडळाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुण युवक-युवतींच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन. गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी एकत्र यावे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित व्हावेत आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने मंडळाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम यामुळे गणेशोत्सवाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग. महिला गणेशभक्त एकत्र येऊन धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून, विविध उपक्रमांमध्येही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या एकत्रित सहभागामुळे गणेशोत्सवाला सामाजिक एकोप्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
‘एकत्र येण्याचा उत्सव’ म्हणून गणेशोत्सव
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरावे, हा मंडळाचा प्रयत्न असल्याचे यावेळी दिसून आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाने जपलेली परंपरा आणि नव्या पिढीच्या सहभागातून उत्सवाला मिळत असलेले आधुनिक स्वरूप यांचा सुंदर संगम यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे.
सन १९९२ पासून सुरू असलेली ही गणेशोत्सवाची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने पुढे नेली जात असून, आगामी काळातही सामाजिक, सांस्कृतिक व युवकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मंडळाचा मानस आहे.
गणरायाच्या भक्तीबरोबरच एकता, सामाजिक बांधिलकी, युवकांना प्रोत्साहन आणि महिला सहभाग या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ युवा गणेशोत्सव मंडळ, गांधीनगरच्या उत्सवात पाहायला मिळत आहे.
    user_हणमंत बिराप्पा कोळी
    हणमंत बिराप्पा कोळी
    News Anchor जत, सांगली, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • कवठेमंकाळ तालुक्यातील कुची येथे अंधश्रद्धेचा कळस नागरिक झाले भयभयीत कवठेमंकाळ तालुक्यातील कुच्ची येथे एका अज्ञात इसमाने गावाच्या बाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार केला यामुळे गावातील तमाम नागरिक प्रतिष्ठित युवक यांनी एकत्र येऊन या अंधश्रद्धा आगरी कृत्याचा निषेध व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की अशा अंधश्रद्धा ला कोणीही पाणी घालू नये हे सगळं थोतांड आहे नागरिकांनी घाबरू नये
    1
    कवठेमंकाळ तालुक्यातील कुची येथे अंधश्रद्धेचा कळस नागरिक झाले भयभयीत
कवठेमंकाळ तालुक्यातील कुच्ची येथे एका अज्ञात इसमाने गावाच्या बाहेर असणाऱ्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार केला यामुळे गावातील तमाम नागरिक प्रतिष्ठित युवक यांनी एकत्र येऊन या अंधश्रद्धा आगरी कृत्याचा निषेध व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की अशा अंधश्रद्धा ला कोणीही पाणी घालू नये हे सगळं थोतांड आहे नागरिकांनी घाबरू नये
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने उपचारासाठी रवाना
    1
    उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या दिशेने उपचारासाठी रवाना
    user_Tej maharashtra varta
    Tej maharashtra varta
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते
    1
    शेतकऱ्यांची व्यथा मुलाने साडी नेसून म्हशीचे दूध काढण्याचा केला प्रयत्न
आई वडील काही कामानिमित्त गावी गेले असता म्हैस दूध देत नाही हे पाहून. मुलांनी रोज आई दूध कशी काढते. याचा विचार करून साडी नेसून काढण्याचा प्रयत्न केला .पण तो फेल झाला .ही व्यथा जरी हसण्यासारखी असली तरी याच्यातून शेतकऱ्याची व्यथा नक्की करते
    user_प्रताप शेळके
    प्रताप शेळके
    Farmer मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • कंदलगावात घरफोडीसह जबरी चोरी; दोन ठिकाणी महिलांना मारहाण. सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला; दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी व जबरी चोरीच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री एक ते पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान आठ जणांच्या टोळक्याने परिसरात धुमाकूळ घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव गौरप्पा कोरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून तेथील दोन वयोवृद्ध महिलांना मारहाण केली. त्यानंतर सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन चोरटे पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच कंदलगाव मधील विंचूर रोड लगत असलेल्या बुद्धाप्पा घोडके यांच्या वस्तीवरही चोरट्यांनी धाड टाकल्याची माहिती आहे. या ठिकाणाहून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपये रोख, असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. घोडके वस्ती या ठिकाणीही महिलांना मारहाण करून धारदार शस्त्रांचा धाक दाखवण्यात आला असल्याचे घोडके कुटुंबीयांनी सांगितले . सदर घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे नूतन डी.वाय.एसपी गणेश शिंदे पाटील , पी.एस.आय अमितकुमार करपे आणि पी.एस.आय राज डांगे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पंचनामे, फिंगरप्रिंट सह श्वान पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकास पाचरण करत घटनास्थळी पाहणी करून तपास यंत्रणा गतिमान करण्यात आली आहे. दरम्यान, कंदलगाव परिसरात अलीकडील काळात चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे तसेच शक्य असल्यास घर, वस्ती आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन मंद्रूप पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.
    1
    कंदलगावात घरफोडीसह जबरी चोरी; दोन ठिकाणी महिलांना मारहाण.
सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला;  
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी व जबरी चोरीच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री एक ते पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान आठ जणांच्या टोळक्याने परिसरात धुमाकूळ घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भीमराव गौरप्पा कोरे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून तेथील दोन वयोवृद्ध महिलांना मारहाण केली. त्यानंतर सुमारे दीड तोळे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपये रोख असा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन चोरटे पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच कंदलगाव मधील विंचूर रोड लगत असलेल्या बुद्धाप्पा घोडके यांच्या वस्तीवरही चोरट्यांनी धाड टाकल्याची माहिती आहे. या ठिकाणाहून सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपये रोख, असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.  घोडके वस्ती या ठिकाणीही महिलांना मारहाण करून  धारदार शस्त्रांचा धाक दाखवण्यात आला असल्याचे घोडके कुटुंबीयांनी सांगितले .
सदर घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे नूतन डी.वाय.एसपी गणेश शिंदे पाटील ,  पी.एस.आय अमितकुमार करपे आणि पी.एस.आय राज डांगे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, पंचनामे, फिंगरप्रिंट सह  श्वान पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकास पाचरण करत घटनास्थळी पाहणी करून  तपास यंत्रणा गतिमान  करण्यात आली आहे.
दरम्यान, कंदलगाव परिसरात अलीकडील काळात चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहावे तसेच शक्य असल्यास घर, वस्ती आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन मंद्रूप पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या घटनेचा पुढील तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव
    1
    सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली; युगेंद्र पवारांची घटनास्थळी धाव
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • आरोग्य यंत्रणा गोरगरीब रुग्णाची लूट कशी करू शकते ते पहा एक अधिकारी कर्तव्यदक्ष असेल तर येवढ उघड होऊ शकतं; तर हजारो IPS, IAS, IRS, IFS अधिकारी ज्यांना देशाच्या घटनेन संरक्षण दिल आहे व राजकिय हस्तक्षेप त्यांच काहीच वाकडं करू शकत नाही मग काय होऊ शकेल!!!! पण भ्रस्टाचारान सर्व व्यवस्था पोकरली गेली आहे. ग्रामपंचायतीपासु ते दील्लीपर्यंत सरकारी अधिकारी राजकिय व्यवस्थेच बाहुल होऊन काम करतात आणि यामधे पिळला जाठतो सामान्य नागरीक. विचार करा जवळपास ७० ते ८०% जनता दिवसाला ५०० रूपये कमवत नाही आणि एक IV सेट मधिल कमाई. ही सर्वच औषधांची कहानी. हे गेली कित्तेक वर्ष चालू आहे. १० रू च्या वस्तुवर ४०० किंवा ५०० रूपये किंमत कशी छापली जाऊ शकते??? मोदीसाहेब जे जनरीक स्वस्त म्हणतात तिथे पण काही वेगळी परिस्थीती नाही. जे अरोग्य व्यवसायाशी संमंधीत आहेत त्याना सर्व माहित आहे. ही गरीबांची पिळवनुक आहे,
    1
    आरोग्य यंत्रणा गोरगरीब रुग्णाची लूट कशी करू शकते ते पहा
एक अधिकारी कर्तव्यदक्ष असेल तर येवढ उघड होऊ शकतं;
तर हजारो IPS, IAS, IRS, IFS  अधिकारी ज्यांना देशाच्या घटनेन संरक्षण दिल आहे व राजकिय हस्तक्षेप त्यांच काहीच वाकडं करू शकत नाही मग काय होऊ शकेल!!!!
पण भ्रस्टाचारान सर्व व्यवस्था पोकरली गेली आहे. ग्रामपंचायतीपासु ते दील्लीपर्यंत सरकारी अधिकारी राजकिय व्यवस्थेच बाहुल होऊन काम करतात आणि यामधे पिळला जाठतो सामान्य नागरीक.
विचार करा जवळपास ७० ते ८०% जनता दिवसाला ५०० रूपये कमवत नाही आणि एक IV सेट मधिल कमाई.
ही सर्वच औषधांची कहानी.
हे गेली कित्तेक वर्ष चालू आहे. १० रू च्या वस्तुवर ४०० किंवा ५०० रूपये किंमत कशी छापली जाऊ शकते???
मोदीसाहेब जे जनरीक स्वस्त म्हणतात तिथे पण काही वेगळी परिस्थीती नाही. जे अरोग्य व्यवसायाशी संमंधीत आहेत त्याना सर्व माहित आहे.
ही गरीबांची पिळवनुक आहे,
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • *तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर भीषण अपघात; सहा वर्षांच्या चिमुकलीसह पित्याचा मृत्यू!* *तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर भीषण अपघात; सहा वर्षांच्या चिमुकलीसह पित्याचा मृत्यू!*
    1
    *तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर भीषण अपघात; सहा वर्षांच्या चिमुकलीसह पित्याचा मृत्यू!*
*तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर भीषण अपघात; सहा वर्षांच्या चिमुकलीसह पित्याचा मृत्यू!*
    user_A1 update news
    A1 update news
    Journalist Jat, Sangli•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.