logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तिगाव ग्रामपंचायतीच्या 'मेरी पंचायत' ॲपवरील कामांत तफावत; चौकशी अधिकाऱ्यांकडून दोषींना वाचवण्याचा प्रयत्न? गोंदिया: आमगाव तालुक्यातील तिगाव ग्रामपंचायतीमध्ये १५ वा वित्त आयोग आणि सामान्य फंडातून झालेल्या विकासकामांबाबत गंभीर अनियमितता समोर आली आहे. 'मेरी पंचायत' ॲप्लिकेशनवर कामांची नावे दुसऱ्याच व्यक्तींच्या किंवा फर्मच्या नावाने दिसणे आणि जुन्या कामांचे फोटो अपलोड असणे, असा खळबळजनक प्रकार गावचे उपसरपंच संदीप तिरले यांनी उघडकीस आणला. या प्रकरणावरून ९ फेब्रुवारी रोजी झालेली तहकूब ग्रामसभा चांगलीच गाजली. ग्रामविकास अधिकाऱ्यांची 'अरेरावी' आणि संशयास्पद भूमिका ग्रामसभेत युवक आणि नागरिकांनी या विसंगतीबाबत जाब विचारला असता, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर देण्याऐजी "काम झालेच नाही तर पैसे कसे निघतील?" अशी अरेरावीची भाषा वापरली. "मेरी पंचायत ॲपवर काहीही दिसत असले तरी माझ्या कागदावर तसे नाही," असे विधान त्यांनी संतापून केल्याने ग्रामस्थांमध्ये संशयाचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. तक्रार आणि जिल्हा परिषदेची दखल या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तक्रारदार नरेश बोपचे यांनी १२ आणि १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) वासनिक साहेब यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर ५ मार्च रोजी सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि ऑपरेटर यांचे बयान नोंदवण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सर्वांनी 'मेरी पंचायत' ॲपवर जुने फोटो कसे काय दिसत आहेत, याबाबत स्वतःच आश्चर्य व्यक्त करून हात वर केले. चौकशी की 'वेळकाढूपणा'? उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी पराते यांना दोन दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १२ मार्च रोजी जिल्हा परिषदेचे सहाय्यक गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी पराते चौकशीसाठी तिगाव ग्रामपंचायत येथे पोहोचले. चौकशीदरम्यान सन २०२२ ते २०२६ या काळातील १५ वा वित्त आयोग आणि सामान्य फंडाचे रेकॉर्ड मागितले असता, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी धक्कादायक उत्तर दिले. त्यांच्याकडे सन २४-२५ आणि २५-२६ चे रजिस्टर उपलब्ध नसून ते ऑडिटला दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हे ऑडिट नक्की कोणाकडे सुरू आहे, याची कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. तक्रारदाराचा संशय: रेकॉर्ड 'मॅनेज' करण्यासाठी वेळ दिला जातोय का? चौकशी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना रेकॉर्ड सादर करण्यासाठी वाढीव वेळ दिल्याने तक्रारदाराच्या मनात संशय निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत अहवाल मागितला असताना, चौकशी अधिकारी संबंधित दोषी कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? गहाळ असलेले रेकॉर्ड नव्याने तयार करण्यासाठी हा वेळ दिला जात आहे का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. उपसरपंचांची अनुपस्थिती ठरतेय चर्चेचा विषय विशेष म्हणजे, ज्या उपसरपंच संदीप तिरले यांनी हा भ्रष्टाचाराचा मुद्दा चव्हाट्यावर आणला आणि ग्रामस्थांना माहिती दिली, तेच उपसरपंच दोन्ही वेळा चौकशी दरम्यान अनुपस्थित का राहिले? यावरूनही गावात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आता जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणातील 'रेकॉर्ड'ची सत्यता तपासणार की दोषींना पाठीशी घालणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

on 12 March
user_नरेश बोपचे
नरेश बोपचे
Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•

More news from Gondia and nearby areas
  • गोंदिया जिले के एकोडी स्थित जिला परिषद भारतीय उच्च माध्यमिक विद्यालय में लगातार तोड़फोड़ की घटनाएं सामने आ रही हैं। हाल ही में अज्ञात लोगों ने स्कूल की खिड़कियों के कांच तोड़ दिए, जिससे परिसर में नुकसान हुआ है। इससे पहले स्कूल में आयोजित लावणी व छत्तीसगढ़ी डांस कार्यक्रम के दौरान कुछ बच्चों द्वारा CCTV कैमरे तोड़े गए थे, जिनकी फुटेज भी सामने आई थी। उस समय डांस कमेटी ने नुकसान की भरपाई करने का आश्वासन दिया था, लेकिन अब तक कोई भरपाई नहीं की गई। घटना को लेकर प्राचार्य की ओर से गंगाझरी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई है, लेकिन 9-10 दिन बीत जाने के बावजूद भी पुलिस द्वारा कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। लगातार हो रही घटनाओं और पुलिस की निष्क्रियता से स्कूल की सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं।
    1
    गोंदिया जिले के एकोडी स्थित जिला परिषद भारतीय उच्च माध्यमिक विद्यालय में लगातार तोड़फोड़ की घटनाएं सामने आ रही हैं। हाल ही में अज्ञात लोगों ने स्कूल की खिड़कियों के कांच तोड़ दिए, जिससे परिसर में नुकसान हुआ है।
इससे पहले स्कूल में आयोजित लावणी व छत्तीसगढ़ी डांस कार्यक्रम के दौरान कुछ बच्चों द्वारा CCTV कैमरे तोड़े गए थे, जिनकी फुटेज भी सामने आई थी। उस समय डांस कमेटी ने नुकसान की भरपाई करने का आश्वासन दिया था, लेकिन अब तक कोई भरपाई नहीं की गई।
घटना को लेकर प्राचार्य की ओर से गंगाझरी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई है, लेकिन 9-10 दिन बीत जाने के बावजूद भी पुलिस द्वारा कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है।
लगातार हो रही घटनाओं और पुलिस की निष्क्रियता से स्कूल की सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं।
    user_Town news
    Town news
    Media company Gondiya, Gondia•
    4 hrs ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    1
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मोरथमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी; 'जय भीम'च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोरथ येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. निळ्या रंगाच्या पताकांनी आणि विद्युत रोषणाईने सजलेल्या मोरथ परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. मुख्य सोहळा आणि अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी स्थानिक बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो", "भारतीय संविधानाचा विजय असो" आणि "जय भीम" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
    2
    मोरथमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी; 'जय भीम'च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोरथ येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. निळ्या रंगाच्या पताकांनी आणि विद्युत रोषणाईने सजलेल्या मोरथ परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते.
मुख्य सोहळा आणि अभिवादन
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी स्थानिक बुद्ध विहारात पंचशील ध्वजारोहणाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो", "भारतीय संविधानाचा विजय असो" आणि "जय भीम" च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
    1
    माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
    user_Mangesh Dmaduji Shivaruke
    Mangesh Dmaduji Shivaruke
    Waiter/Waitress नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    7 min ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना! मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राज्य पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली.
    1
    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना!
मा. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज चैत्यभूमी, दादर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त राज्य पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली.
    user_Johney Raiborde
    Johney Raiborde
    Local News Reporter नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    1
    मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार
#viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    2
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.