logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक : रणजीतसिंह मोहिते पाटलांची होणार डीसीसी बँकेत एन्ट्री..? सोलापूरच्या राजकारणात मागील काही निवडणुकांमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते-पाटील असा संघर्ष दिसून आला आहे. आता सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोहिते-पाटील यांची बार्गेनिंग पॉवर किती आणि काय असणार, भाजपच्या पॅनेलमध्ये मोहिते-पाटील असणार का?, याच्या उत्तरात डीसीसीच्या निवडणुकीची खरी चुरस दडलेली आहे. माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची डीसीसीबाबत काय भूमिका असणार, यावर निवडणुकीतील पुढील समीकरणे अवलंबून राहणार आहेत. भाजप आणि मोहिते-पाटील यांच्यात समेट झाल्यास नव्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे मोहिते-पाटील गटाची भूमिका सध्या डीसीसीच्या राजकारणातील सर्वांत महत्त्वाचा घटक मानली जात आहे. माळशिरसची जागा कोणाकडे? आगामी निवडणुकीत माळशिरस सोसायटी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कोण करणार, याबाबतही सहकार क्षेत्रात उत्सुकता आहे. माळशिरस तालुक्यातील सोसायट्यांच्या राजकारणात मोहिते-पाटील यांचा प्रभाव कायम असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील १४५ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांपैकी १४१ संस्था मतदानासाठी पात्र असून, त्यातील सुमारे १०० संस्था मोहिते-पाटील यांच्या प्रभावाखाली असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे माळशिरस सोसायटी मतदारसंघातून डीसीसीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा डीसीसीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी विविध मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे माळशिरसच्या जागेवर त्यांची संभाव्य उमेदवारी ही निवडणुकीतील महत्त्वाची घडामोड ठरू शकते. तीन जागांवर निर्णायक ताकद माळशिरसपुरतीच मोहिते-पाटील यांची ताकद मर्यादित नसून, डीसीसीच्या शेतमाल प्रक्रिया संस्था आणि दुग्ध संस्था या दोन मतदारसंघांतही त्यांच्याकडे निर्णायक संख्याबळ असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दोन जागांसह माळशिरस सोसायटी मतदारसंघ अशा तीन जागांवर मोहिते-पाटील गटाचा प्रभाव कायम असल्याचे चित्र आहे. डीसीसीच्या संचालक मंडळात सोसायटी मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यातून एक अशा ११ जागा, तर इतर विविध मतदारसंघांतून आठ संचालक निवडले जातात. त्यामुळे एखाद्या गटाकडे विशिष्ट मतदारसंघांमध्ये असलेले संख्याबळ संपूर्ण पॅनेलच्या समीकरणांवर परिणाम करू शकते. भाजपसाठी मोहिते-पाटील महत्त्वाचे? डीसीसी बँकेच्या निवडणुकीत भाजपकडे जिल्ह्यातील अनेक प्रभावी सहकार नेते असल्याने भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, माळशिरससह काही मतदारसंघांमध्ये मोहिते-पाटील यांचे असलेले संघटन आणि संस्थात्मक संख्याबळ भाजपसाठीही दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे मोहिते-पाटील यांना सोबत घेऊन निवडणूक लढवायची की स्वतंत्रपणे ताकद आजमावायची, हा भाजपसमोरील महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी पाहता, डीसीसीची निवडणूक सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्याच्या राजकारणातील शक्तिप्रदर्शन ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहिते-पाटील गटाची भूमिका, माळशिरसची उमेदवारी आणि भाजपसोबतचे संभाव्य समीकरण यावरच डीसीसीच्या निवडणुकीची खरी चुरस किती रंगणार, हे स्पष्ट होणार आहे.

5 hrs ago
user_Akkalkot news
Akkalkot news
Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
5 hrs ago
ad88d6ab-e008-4648-8970-7c31bd99358c

सोलापूर डीसीसी बँक निवडणूक : रणजीतसिंह मोहिते पाटलांची होणार डीसीसी बँकेत एन्ट्री..? सोलापूरच्या राजकारणात मागील काही निवडणुकांमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते-पाटील असा संघर्ष दिसून आला आहे. आता सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोहिते-पाटील यांची बार्गेनिंग पॉवर किती आणि काय असणार, भाजपच्या पॅनेलमध्ये मोहिते-पाटील असणार का?, याच्या उत्तरात डीसीसीच्या निवडणुकीची खरी चुरस दडलेली आहे. माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची डीसीसीबाबत काय भूमिका असणार, यावर निवडणुकीतील पुढील समीकरणे अवलंबून राहणार आहेत. भाजप आणि मोहिते-पाटील यांच्यात समेट झाल्यास नव्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे मोहिते-पाटील गटाची भूमिका सध्या डीसीसीच्या राजकारणातील सर्वांत महत्त्वाचा घटक मानली जात आहे. माळशिरसची जागा कोणाकडे? आगामी निवडणुकीत माळशिरस सोसायटी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कोण करणार, याबाबतही सहकार क्षेत्रात उत्सुकता आहे. माळशिरस तालुक्यातील सोसायट्यांच्या राजकारणात मोहिते-पाटील यांचा प्रभाव कायम असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील १४५ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांपैकी १४१ संस्था मतदानासाठी पात्र असून, त्यातील सुमारे १०० संस्था मोहिते-पाटील यांच्या प्रभावाखाली असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे माळशिरस सोसायटी मतदारसंघातून डीसीसीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा डीसीसीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी विविध मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे माळशिरसच्या जागेवर त्यांची संभाव्य उमेदवारी ही निवडणुकीतील महत्त्वाची घडामोड ठरू शकते. तीन जागांवर निर्णायक ताकद माळशिरसपुरतीच मोहिते-पाटील यांची ताकद मर्यादित नसून, डीसीसीच्या शेतमाल प्रक्रिया संस्था आणि दुग्ध संस्था या दोन मतदारसंघांतही त्यांच्याकडे निर्णायक संख्याबळ असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दोन जागांसह माळशिरस सोसायटी मतदारसंघ अशा तीन जागांवर मोहिते-पाटील गटाचा प्रभाव कायम असल्याचे चित्र आहे. डीसीसीच्या संचालक मंडळात सोसायटी मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यातून एक अशा ११ जागा, तर इतर विविध मतदारसंघांतून आठ संचालक निवडले जातात. त्यामुळे एखाद्या गटाकडे विशिष्ट मतदारसंघांमध्ये असलेले संख्याबळ संपूर्ण पॅनेलच्या समीकरणांवर परिणाम करू शकते. भाजपसाठी मोहिते-पाटील महत्त्वाचे? डीसीसी बँकेच्या निवडणुकीत भाजपकडे जिल्ह्यातील अनेक प्रभावी सहकार नेते असल्याने भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, माळशिरससह काही मतदारसंघांमध्ये मोहिते-पाटील यांचे असलेले संघटन आणि संस्थात्मक संख्याबळ भाजपसाठीही दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे मोहिते-पाटील यांना सोबत घेऊन निवडणूक लढवायची की स्वतंत्रपणे ताकद आजमावायची, हा भाजपसमोरील महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी पाहता, डीसीसीची निवडणूक सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्याच्या राजकारणातील शक्तिप्रदर्शन ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोहिते-पाटील गटाची भूमिका, माळशिरसची उमेदवारी आणि भाजपसोबतचे संभाव्य समीकरण यावरच डीसीसीच्या निवडणुकीची खरी चुरस किती रंगणार, हे स्पष्ट होणार आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शिवसेना नेते शंकर (मालक) म्हेत्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिवसेना नेते शंकर (मालक) म्हेत्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे. शिवसेना नेते तथा अक्कलकोट तालुक्याचे दानशूर नेतृत्व मा. शंकर (मालक) म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त दुधनी येथे त्यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुबारक कोरबू, आझम शेख, जी. अशपाक मुजावर, मजीद कोरबू आदी उपस्थित होते.
    1
    शिवसेना नेते शंकर (मालक) म्हेत्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 
शिवसेना नेते शंकर (मालक) म्हेत्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा  करण्यात आला आहे.
शिवसेना नेते तथा अक्कलकोट तालुक्याचे दानशूर नेतृत्व मा. शंकर (मालक) म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त दुधनी येथे त्यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मुबारक कोरबू, आझम शेख, जी. अशपाक मुजावर, मजीद कोरबू आदी उपस्थित होते.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्ती, पदोन्नती व सेवा नियमांमधील चौकशीबाबत दिलेल्या निवेदनावर महिनाभर उलटूनही प्रशासनाने लेखी उत्तर न दिल्याने, रिपब्लिकन सेनेने आज लातूर महानगरपालिकेत अनोखे 'गांधीगिरी' आंदोलन केले. निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आस्थापना प्रमुख अभिमन्यू पाटील यांना थेट पुष्पहार घालून प्रशासनाच्या संथ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला. रिपब्लिकन सेनेने ३० जुलै २०२६ रोजी प्रशासनाला हे निवेदन दिले होते. परंतु, महिनाभराचा कालावधी उलटूनही महापालिकेकडून कोणतेही लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या व संघटनांच्या निवेदनांना प्रशासनाने वेळेत उत्तर देणे बंधनकारक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ कोरडे, युवक जिल्हाध्यक्ष पंकज गायकवाड, शहराध्यक्ष वैभव सुरवसे, शहर सचिव लखनजी कांबळे, सिद्धार्थ जाकते, अमित गायकवाड आणि सल्लागार पप्पूजी कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या निवेदनावर तात्काळ नियमानुसार कार्यवाही न झाल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
    1
    निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन.
निवेदनावर कार्यवाही नाही: रिपब्लिकन सेनेचे लातूर महापालिकेत 'गांधीगिरी' आंदोलन.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. 
बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. 
स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्ती, पदोन्नती व सेवा नियमांमधील चौकशीबाबत दिलेल्या निवेदनावर महिनाभर उलटूनही प्रशासनाने लेखी उत्तर न दिल्याने, रिपब्लिकन सेनेने आज लातूर महानगरपालिकेत अनोखे 'गांधीगिरी' आंदोलन केले. निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आस्थापना प्रमुख अभिमन्यू पाटील यांना थेट पुष्पहार घालून प्रशासनाच्या संथ कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.
रिपब्लिकन सेनेने ३० जुलै २०२६ रोजी प्रशासनाला हे निवेदन दिले होते. परंतु, महिनाभराचा कालावधी उलटूनही महापालिकेकडून कोणतेही लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या व संघटनांच्या निवेदनांना प्रशासनाने वेळेत उत्तर देणे बंधनकारक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे लातूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ कोरडे, युवक जिल्हाध्यक्ष पंकज गायकवाड, शहराध्यक्ष वैभव सुरवसे, शहर सचिव लखनजी कांबळे, सिद्धार्थ जाकते, अमित गायकवाड आणि सल्लागार पप्पूजी कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या निवेदनावर तात्काळ नियमानुसार कार्यवाही न झाल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • रस्त्यावरच महिलेची प्रसूती जिल्हा रुग्णालय स्टाफ नर्सचा प्रसुती साठी नकार बुलढाणा मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावरच एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला प्रसूतीच्या वेदनांनी रस्त्यावर तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्सने मदतीसाठी घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप होत आहे. शेवटी एका खाजगी नर्सच्या मदतीने रस्त्यावर या महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात आली.आज सकाळी सहा वाजता अचानक प्रसव वेदना सुरु झाल्या. त्या महिलेचे पोट दुखू लागल्याने आणि महिलेला रुग्णालयात नेण्याकरिता घरात कोणीच नव्हते आणि महिला जेव्हा चालत आली तेव्हा ती ओट्यावर पडली. अर्भकाचा काही भाग बाहेर आणि काही भाग आत होता.
    1
    रस्त्यावरच महिलेची प्रसूती जिल्हा रुग्णालय स्टाफ नर्सचा प्रसुती साठी नकार 
बुलढाणा मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० ते १०० मीटर अंतरावरच एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला प्रसूतीच्या वेदनांनी रस्त्यावर तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्सने मदतीसाठी घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप होत आहे. शेवटी एका खाजगी नर्सच्या मदतीने रस्त्यावर या महिलेची सुखरुप प्रसुती करण्यात आली.आज सकाळी सहा वाजता अचानक प्रसव वेदना सुरु झाल्या. त्या महिलेचे पोट दुखू लागल्याने आणि महिलेला रुग्णालयात नेण्याकरिता घरात कोणीच नव्हते आणि महिला जेव्हा चालत आली तेव्हा ती ओट्यावर पडली. अर्भकाचा काही भाग बाहेर आणि काही भाग आत होता.
    user_Santosh Dhanure S D news
    Santosh Dhanure S D news
    लातूर, लातूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • 📍लातूरकरांनो 1 /9 /2026 पासून लातुरात सुरु होणार हेल्मेट शक्ती. हेल्मेट वापरा आणि आपला अमूल्य जीव वाचवा.
    1
    📍लातूरकरांनो 1 /9 /2026 पासून लातुरात सुरु होणार हेल्मेट शक्ती.
हेल्मेट वापरा आणि आपला अमूल्य जीव वाचवा.
    user_लक्ष लातूर न्यूज
    लक्ष लातूर न्यूज
    Advertising Photographer Latur, Maharashtra•
    21 hrs ago
  • मोटरसायकली चोरून भंगार करायचा, भंगाराचे साहित्य विकून पैसे कमवायचे मोटारसायकल चोरीचा छडा; चोरीच्या दुचाकींची तोडफोड करून भंगारात विक्री करणारा आरोपी जेरबंद. १२ गुन्हे उघडकीस लातूर (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी करून त्यांची तोडफोड करत सुट्टे पार्ट करून भंगारात विक्री करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली, मोटार सायकलीचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट, विक्रीतून मिळालेली रोकड तसेच मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पथकाने हत्ते नगर परिसरातील एका घरावर कारवाई केली. तेथे तौसिफ बादल शेख (वय २६ वर्षे, रा. इस्लामपूरा, लातूर. सध्या राहणार हत्ते नगर गल्ली नंबर ५, लातूर) हा चोरीच्या मोटारसायकलींची तोडफोड करून त्यांचे सुट्टे पार्ट तयार करून फिरस्ती भंगारवाल्यांना विक्री करत असल्याचे आढळून आले. आरोपीच्या ताब्यातून विविध मोटार सायकलींचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट तसेच चोरीच्या दोन मोटरसायकल, मोटार सायकलींचे पार्ट विक्री करून मिळालेली २ लाख ५७ हजारांची रोकड, मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात आरोपीने लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, लातूर ग्रामीण तसेच चाकूर व कासारशिरसी परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गांधी चौक पोलीस ठाण्याचे ८, शिवाजीनगरचे १, लातूर ग्रामीणचे १, चाकूरचे १ आणि कासारशिरसीचे १, असे एकूण १२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त मुद्देमालामध्ये होंडा युनिकॉर्न, हिरो स्प्लेंडर, होंडा शाईन, हिरो पॅशन, बजाज पल्सर, हिरो पॅशन प्रो, हिरो एचएफ डिलक्स आदी मोटारसायकलींचे सुट्टे पार्ट, पेट्रोल टाक्या, सायलेन्सर, हँडल, चाके, इंजिनचे भाग, चेसिस, नंबर प्लेट तसेच करवत, नट-बोल्ट, पाना, स्क्रुड्रायव्हर, हातोडी, छन्नी, पक्कड आदी साहित्याचा समावेश आहे. सदर कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि पांडुरंग माने, पोलीस अंमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, तुराबखान पठाण, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, प्रेम राठोड, शैलेष सुडे, श्रीनिवास जांभळे, हरी पतंगे, रामदास बाचीफळे यांनी केले आहे. आरोपी तौसिफ बादल शेख यास पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस तपास सुरू आहे.
    1
    मोटरसायकली चोरून भंगार करायचा, भंगाराचे साहित्य विकून पैसे कमवायचे
मोटारसायकल चोरीचा छडा; चोरीच्या दुचाकींची तोडफोड करून भंगारात विक्री करणारा आरोपी जेरबंद.  १२ गुन्हे उघडकीस
लातूर  (प्रतिनिधी) शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी करून त्यांची तोडफोड करत सुट्टे पार्ट करून भंगारात विक्री करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली, मोटार सायकलीचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट, विक्रीतून मिळालेली रोकड तसेच मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पथकाने हत्ते नगर परिसरातील एका घरावर कारवाई केली. तेथे तौसिफ बादल शेख (वय २६ वर्षे, रा. इस्लामपूरा, लातूर. सध्या राहणार हत्ते नगर गल्ली नंबर ५, लातूर) हा चोरीच्या मोटारसायकलींची तोडफोड करून त्यांचे सुट्टे पार्ट तयार करून फिरस्ती भंगारवाल्यांना विक्री करत असल्याचे आढळून आले. आरोपीच्या ताब्यातून विविध मोटार सायकलींचे सुट्टे पार्ट, नंबर प्लेट तसेच चोरीच्या दोन मोटरसायकल, मोटार सायकलींचे पार्ट विक्री करून मिळालेली २ लाख ५७ हजारांची रोकड, मोटारसायकली तोडण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात आरोपीने लातूर शहरातील गांधी चौक, शिवाजीनगर, लातूर ग्रामीण तसेच चाकूर व कासारशिरसी परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गांधी चौक पोलीस ठाण्याचे ८, शिवाजीनगरचे १, लातूर ग्रामीणचे १, चाकूरचे १ आणि कासारशिरसीचे १, असे एकूण १२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
जप्त मुद्देमालामध्ये होंडा युनिकॉर्न, हिरो स्प्लेंडर, होंडा शाईन, हिरो पॅशन, बजाज पल्सर, हिरो पॅशन प्रो, हिरो एचएफ डिलक्स आदी मोटारसायकलींचे सुट्टे पार्ट, पेट्रोल टाक्या, सायलेन्सर, हँडल, चाके, इंजिनचे भाग, चेसिस, नंबर प्लेट तसेच करवत, नट-बोल्ट, पाना, स्क्रुड्रायव्हर, हातोडी, छन्नी, पक्कड आदी साहित्याचा समावेश आहे.
सदर कारवाई  वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक  सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि पांडुरंग माने,  पोलीस अंमलदार नवनाथ हासबे, माधव बिलापट्टे, तुराबखान पठाण, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी, गणेश साठे, पाराजी पुट्टेवाड, प्रेम राठोड, शैलेष सुडे, श्रीनिवास जांभळे, हरी पतंगे, रामदास बाचीफळे यांनी केले आहे. 
आरोपी तौसिफ बादल शेख यास पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी गांधी चौक पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याकडून आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस तपास सुरू आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • लातूर वाहतूक शाखेचा 'फटाका सायलेन्सर' लावणाऱ्यांवर बडगा; सात बुलेटस्वारांना ठोठावला दंड लातूर वाहतूक शाखेचा 'फटाका सायलेन्सर' लावणाऱ्यांवर बडगा; सात बुलेटस्वारांना ठोठावला दंड. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर​. बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026. शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणारे नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर लातूर शहर वाहतूक शाखेने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. काल राबवलेल्या विशेष मोहिमेत अशा 7 बुलेटस्वारांवर दंडात्मक कार्यवाही करत ७,०००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ​काही वाहनचालक आपल्या बुलेटमध्ये बेकायदेशीरपणे फटाका सायलेन्सर बसवून शहरातून वावरत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या कर्णकर्कश आणि अवाजवी आवाजामुळे लहान मुले, रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत वाहतूक शाखेने ही विशेष मोहीम हाती घेतली. ​नॉईज लेव्हल मीटरने होणार तपासणी: येत्या दिवसांत ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. वाहनांच्या आवाजाची पातळी मोजण्यासाठी 'नॉईज लेव्हल मीटर'चा वापर करून थेट कायदेशीर कारवाई केली जाईल. ज्या दुचाकीस्वारांनी नियमबाह्य सायलेन्सर बसवले आहेत, त्यांनी ते तात्काळ काढून कंपनीचे अधिकृत सायलेन्सर लावावेत, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. ​पोलीस प्रशासनाचे आवाहन: "वाहनाचा कर्णकर्कश आवाज ही स्टाईल नसून, तो इतरांच्या त्रासाचे कारण ठरतो. सायलेन्सरचा गैरवापर करून ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी नियम पाळून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे."
    3
    लातूर वाहतूक शाखेचा 'फटाका सायलेन्सर' लावणाऱ्यांवर बडगा; सात बुलेटस्वारांना ठोठावला दंड
लातूर वाहतूक शाखेचा 'फटाका सायलेन्सर' लावणाऱ्यांवर बडगा; सात बुलेटस्वारांना ठोठावला दंड.
सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर​.
बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026.
शहरातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणारे नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर लातूर शहर वाहतूक शाखेने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. काल राबवलेल्या विशेष मोहिमेत अशा 7 बुलेटस्वारांवर दंडात्मक कार्यवाही करत ७,०००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
​काही वाहनचालक आपल्या बुलेटमध्ये बेकायदेशीरपणे फटाका सायलेन्सर बसवून शहरातून वावरत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या कर्णकर्कश आणि अवाजवी आवाजामुळे लहान मुले, रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत वाहतूक शाखेने ही विशेष मोहीम हाती घेतली.
​नॉईज लेव्हल मीटरने होणार तपासणी: 
येत्या दिवसांत ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. वाहनांच्या आवाजाची पातळी मोजण्यासाठी 'नॉईज लेव्हल मीटर'चा वापर करून थेट कायदेशीर कारवाई केली जाईल. ज्या दुचाकीस्वारांनी नियमबाह्य सायलेन्सर बसवले आहेत, त्यांनी ते तात्काळ काढून कंपनीचे अधिकृत सायलेन्सर लावावेत, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
​पोलीस प्रशासनाचे आवाहन:
"वाहनाचा कर्णकर्कश आवाज ही स्टाईल नसून, तो इतरांच्या त्रासाचे कारण ठरतो. सायलेन्सरचा गैरवापर करून ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांनी नियम पाळून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे."
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप झुंजार S C 37 NEWS OSMANABAD “दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप झुंजार S C 37 NEWS OSMANABAD “दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — ५ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवर इचलकरंजी पोलिसांची अरेरावी? खाकीच्या दादागिरीवर संताप! इचलकरंजीमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत कथितरित्या झालेल्या ‘घाणेरड्या स्पर्शा’च्या गंभीर प्रकाराने संतापाची लाट निर्माण झाली आहे. आपल्या चिमुकलीला न्याय मिळावा, यासाठी आई पोलीस ठाण्यात धाव घेते; मात्र तिथे तक्रार ऐकून घेण्याऐवजी पोलिसांकडून कथितरित्या “आम्ही दखल घेणार नाही, कोर्टात जा” असे सांगण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या कथित प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पाच वर्षांच्या निष्पाप मुलीच्या सुरक्षेचा आणि लैंगिक अत्याचाराच्या संशयाचा प्रश्न असताना, तक्रारदार महिलेची व्यथा ऐकून घेणे आणि कायद्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया करणे अपेक्षित असताना तिला थेट न्यायालयाचा मार्ग दाखवण्यात आला का, असा सवाल उपस्थित होत आहे. POCSO कायद्यांतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांना अत्यंत गांभीर्याने हाताळण्याची गरज असते. अशा संवेदनशील प्रकरणात पीडित बालक आणि तिच्या कुटुंबाला आधार देण्याऐवजी जर पोलीस अधिकाऱ्याकडून अरेरावी झाली असेल, तर ही बाब अधिक गंभीर ठरते. आई आपल्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचते. तिच्या डोळ्यासमोर केवळ आपल्या पाच वर्षांच्या मुलीची सुरक्षितता आणि न्याय असतो. अशा वेळी खाकी वर्दीकडून तिला धीर, कायदेशीर मार्गदर्शन आणि संरक्षणाची अपेक्षा असते. मात्र, तक्रारच ऐकून घेण्यास नकार दिल्याचा आरोप खरा असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी दाद मागायची तरी कुणाकडे? हा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्याने नेमके काय म्हटले, तक्रार घेण्यास नकार देण्यात आला का, घटनेबाबत कायदेशीर प्रक्रिया का सुरू झाली नाही आणि पीडित बालिकेच्या संरक्षणासाठी कोणती पावले उचलण्यात आली, याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात दोषी कोण आहे, हे तपासातून स्पष्ट होईल; मात्र तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले असेल, तर त्या भूमिकेचीही चौकशी झालीच पाहिजे. बालकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा अरेरावी खपवून घेतली जाऊ नये. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी! विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या कथित प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे. दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि चिमुकलीच्या कुटुंबाला आवश्यक कायदेशीर मदत मिळवून द्यावी. पाच वर्षांच्या लेकराच्या न्यायाचा प्रश्न आहे. हा प्रश्न दाबण्याचा नाही, तर सत्य बाहेर आणण्याचा आहे! खाकीचा मान राखायचा असेल तर आधी खाकीवरचा विश्वास कायम ठेवावा लागेल. #IchalkaranjiPolice #KolhapurPolice #JusticeForChild #POCSO #PoliceAccountability #KolhapurSP #IGPKolhapur #MaharashtraPolice #JusticeForVictim #ChildSafety
    1
    दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप
झुंजार S C 37 NEWS OSMANABAD
“दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — पाच वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवरून इचलकरंजी पोलिसांची आरोपीच्या बाबतीत हुजरेगिरी? पीडितेच्या आईवर अरेरावी व दादागिरी; इचलकरंजी पोलिसांच्या खाकी वर्दीवर जनतेचा संताप
झुंजार S C 37 NEWS OSMANABAD
“दखल घेणार नाही, कोर्टात जा!” — ५ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या तक्रारीवर इचलकरंजी पोलिसांची अरेरावी? खाकीच्या दादागिरीवर संताप!
इचलकरंजीमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत कथितरित्या झालेल्या ‘घाणेरड्या स्पर्शा’च्या गंभीर प्रकाराने संतापाची लाट निर्माण झाली आहे. आपल्या चिमुकलीला न्याय मिळावा, यासाठी आई पोलीस ठाण्यात धाव घेते; मात्र तिथे तक्रार ऐकून घेण्याऐवजी पोलिसांकडून कथितरित्या “आम्ही दखल घेणार नाही, कोर्टात जा” असे सांगण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे.
या कथित प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पाच वर्षांच्या निष्पाप मुलीच्या सुरक्षेचा आणि लैंगिक अत्याचाराच्या संशयाचा प्रश्न असताना, तक्रारदार महिलेची व्यथा ऐकून घेणे आणि कायद्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया करणे अपेक्षित असताना तिला थेट न्यायालयाचा मार्ग दाखवण्यात आला का, असा सवाल उपस्थित होत आहे.
POCSO कायद्यांतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांना अत्यंत गांभीर्याने हाताळण्याची गरज असते. अशा संवेदनशील प्रकरणात पीडित बालक आणि तिच्या कुटुंबाला आधार देण्याऐवजी जर पोलीस अधिकाऱ्याकडून अरेरावी झाली असेल, तर ही बाब अधिक गंभीर ठरते.
आई आपल्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचते. तिच्या डोळ्यासमोर केवळ आपल्या पाच वर्षांच्या मुलीची सुरक्षितता आणि न्याय असतो. अशा वेळी खाकी वर्दीकडून तिला धीर, कायदेशीर मार्गदर्शन आणि संरक्षणाची अपेक्षा असते. मात्र, तक्रारच ऐकून घेण्यास नकार दिल्याचा आरोप खरा असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी दाद मागायची तरी कुणाकडे? हा प्रश्न निर्माण होतो.
या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्याने नेमके काय म्हटले, तक्रार घेण्यास नकार देण्यात आला का, घटनेबाबत कायदेशीर प्रक्रिया का सुरू झाली नाही आणि पीडित बालिकेच्या संरक्षणासाठी कोणती पावले उचलण्यात आली, याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणात दोषी कोण आहे, हे तपासातून स्पष्ट होईल; मात्र तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले असेल, तर त्या भूमिकेचीही चौकशी झालीच पाहिजे. बालकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा अरेरावी खपवून घेतली जाऊ नये.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी!
विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी या कथित प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे. दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि चिमुकलीच्या कुटुंबाला आवश्यक कायदेशीर मदत मिळवून द्यावी.
पाच वर्षांच्या लेकराच्या न्यायाचा प्रश्न आहे. हा प्रश्न दाबण्याचा नाही, तर सत्य बाहेर आणण्याचा आहे!
खाकीचा मान राखायचा असेल तर आधी खाकीवरचा विश्वास कायम ठेवावा लागेल.
#IchalkaranjiPolice #KolhapurPolice #JusticeForChild #POCSO #PoliceAccountability #KolhapurSP #IGPKolhapur #MaharashtraPolice #JusticeForVictim #ChildSafety
    user_आप्पा भगवान सिरसाठे
    आप्पा भगवान सिरसाठे
    Newspaper publisher उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • शेळी चोरून नेताना चोर रंगेहात नागरिकांनी पकडला; घटना व्हिडिओ पहा
    2
    शेळी चोरून नेताना चोर रंगेहात नागरिकांनी पकडला; घटना 
व्हिडिओ पहा
    user_Beed News Express
    Beed News Express
    अंबाजोगाई, बीड, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.