मिशन लक्ष्यवेध जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्रा अंतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित नांदेड दि. 30 मार्च:- क्रीडा व युवक सेवा संचालनालयमार्फत राज्यातील विकासाकरीता “मिशन लक्ष्यवेध” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत खेळाडू निवड चाचणी आयोजित करण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये विविध क्रीडा प्रकारांतील होतकरू व गुणवान खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार, खेळांडूना करीअर मार्गदर्शन खेळांडूच्या क्षमता विकासासाठी देशी, विदेशी संस्थाचा सहयोग हे सर्व घटक विकसित करणे अभिप्रेत आहे. उपरोत घटक विकसीत करण्याकरीता आवश्यक प्रयत्न हे फक्त राज्यस्तरावरून नव्हे तर जिल्हास्तरावरून देखील होणे अपेक्षित आहे. त्या करीता नांदेड जिल्हयास मिशन लक्ष्यवेध या योजने अंतर्गत जिल्हास्तरावर प्रतिभा विकास केंद्र नांदेंड करीता टेबल टेनिस, बॅडमिंटन, आर्चरी, हॉकी, ॲथलेटीक्स या पाच क्रीडाप्रकारांचे खेळांची केंद्र सुरू करावयाची आदेश प्राप्त झाले होते. परंतू 29.03.2026 रोजी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या ऑनलाइन बैठकीतील चर्चा नुसार आर्चरी, हॉकी व ॲथलेटीक्स या खेळांचे जिल्हा क्रीडा संकूल येथे या खेळाचे मैदान उपलब्ध नसल्यामुळे जिल्हा प्रतिभा केंद्र अंतर्गत आर्चरी, हॉकी व ॲथलेटीक्स खेळ रदद करण्यात आलेले आहेत. याची नोंद घ्यावी. सदर निवड प्रक्रियेदरम्यान खेळाडूंची शारीरिक क्षमता, तांत्रिक कौशल्य, मानसिक तयारी तसेच खेळातील कामगिरी यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. अनुभवी प्रशिक्षक व तज्ज्ञांच्या उपस्थितीत ही निवड चाचणी पार पडणार आहे. या उपक्रमाचा उद्देश गुणवंत खेळाडूंची निवड करून त्यांना उच्चस्तरीय प्रशिक्षण देणे व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तयार करणे हा आहे. खालील प्रमाणे निवड चाचणी ठिकाण व खेळप्रकार नमुद करण्यात आलेले आहेत. 1) टेबल टेनिस 2) बॅडमिंटन या खेळाची निवड चाचणी दि.02/04/2026 वेळ स.10.00 वा. जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड संपर्क क्रं. चंद्रप्रकाश होनवडजकर (रा.क्री.मा.) मो.7972953141, हानमंत नरवाडे मो.9604866253. खेळाडू निवड चाचणीचे निकष व पात्रता- (1).वयोमर्यादा 21 वर्षाआतील मुले/मुली त्यावर्षाच्या 31 डिसेंबर रोजी) (2) जन्म दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्डे,गत 02 वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज 03 फोटोग्राफ, शाळा महाविद्यालयीन बोनाफाईड प्रमाणपत्र, पालंकाचे संमतीपत्र इ. (3.) महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असला पाहिजे. (4) क्रीडा कामगिरी- किमान राज्यस्तरावरील सहभाग किंवा पदक प्राप्त खेळाडू) (शालेय/संघटना अधिकृत स्पर्धा) गत 2 वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुस्ती फिटनेस चाचण्यामध्ये पात्र होणे आवश्यक आहे. (5) शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलेले वैध वैद्यकिय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य आहे.वरील सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. सदर निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी संबंधित आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी सुचविले आहे अधिक माहितीसाठी चंद्रप्रकाश होनवडजकर राज्य क्रीडा मार्गदर्शक- मो.7972953141 यांचेशी संपर्क साधावा.

- हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption1
- इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.1
- Post by वैजनाथ पावडे1
- दारव्हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मार्च अखेरीस वाढत्या उन्हामुळे तसेच लग्नसराईचा हंगाम आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत बसस्थानकावर ठेवलेले माठ रिकामे असून पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने (यवतमाळ-वाशीम) यांनी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेऊन दारव्हा बसस्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रसिद्धी माध्यमांतून केली आहे.1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- 30 लाखांचा अवैध रेतीसाठा जप्त, प्रशासनाची धडक कारवाई1
- *वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर सुविधाचा अभाव, अनेक समस्यांनी नगरीक वचीत गेल्या अनेक वर्षापासून कुठली सुविधा नाही रेल्वे स्टेशन.वर वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशन येथे सुविधाचा अभाव आहे. कारण या रेल्वे स्थानकावर कसलीच सुविधा नाही. या रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था नाही येथे कसलाच निवारा नाही. 16000 लोकसंख्येचे गाव असलेले वडवळ नागनाथ येथे रेल्वे टेशन आहे येथे दिवसभरातून आठ रेल्वे गाडी थांबतात. आणि दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे स्थानकावर सुविधा कसलीच नाही. महत्त्वाची म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही कारण आता उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे पाण्याची सुविधा नाही. दुसरी म्हणजे निवारा नाही कडक उन्हामध्ये प्रवाशांना थांबावे लागत आहे कारण येथे निवारा नाही. तसेच येथे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. कारण येथे प्लॅटफॉर्म ची उंची खूप कमी आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध यांना रेल्वे चढण्यासाठी खूप त्रास होत आहे. तरी रेल्वे प्रशासन याची लवकरच दखल घ्यावी ही मागणी नागरिकातून होत आहे. आणि त्वरित येथे रेल्वे स्थानकामध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच निवार्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.4
- खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो #RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory1