Shuru
Apke Nagar Ki App…
जालना: ज्येष्ठ वकिलावर हल्ला; २४ तासांत टोळी अटकेत जालना हादरलं! ज्येष्ठ वकिलावर रिक्षातच हल्ला; २४ तासांत LCB कडून टोळी जेरबंद जालना : मंठा चौफुली परिसरात ७५ वर्षीय वकील विष्णुपंत पाटील यांना रिक्षात बसवून चाकूचा धाक दाखवत मारहाण व लूट केल्याची घटना घडली. आरोपींनी मोबाईल, रोख रक्कम व कागदपत्रांची ब्रीफकेस लुटून त्यांना चालत्या रिक्षातून खाली फेकले. या प्रकरणी जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच LCB पथकाने अवघ्या २४ तासांत चार आरोपींना अटक केली. पोलिसांनी रिक्षासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Sandip Gaikwad

More news from महाराष्ट्र and nearby areas
- जालन्यात वीज कोसळून दोन तरुण ठार; एक गंभीर जखमी.. जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसासह वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटाने हजेरी लावली. या दरम्यान अंबड तालुक्यातील महाकाळा ते साष्टपिंपळगाव मार्गावरील नाथनगर (थोरवे वस्ती) येथे वीज कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाकाळा येथील काही तरुण विज्ञानेश्वर आपेगाव येथे दर्शनासाठी जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी ते रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. याचवेळी झाडावर वीज कोसळली आणि या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर भाजला आहे. या दुर्घटनेत गोविंद प्रल्हाद लहाने (वय 21) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय 20, दोघेही रा. महाकाळा) यांचा मृत्यू झाला आहे. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह महाकाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील तरुणांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहत असून रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- शिवसेना नेते नानासाहेब वानखेडे यांच्या वतीने तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सत्कार, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती.3
- *जालना जयनगर, महाप्रजापती बौद्ध विहार येथे सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी*.1
- Post by वैजनाथ पावडे1
- बुलढाणा जिल्ह्यात इंधन_पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासकीय नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार, सर्व पेट्रोल पंपांवर इंधन केवळ वाहनांच्या इंधन टाकीतच वितरित करणे बंधनकारक असून कॅन, बाटली किंवा इतर उघड्या कंटेनरमध्ये इंधन देणे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधित करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आता प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.1
- Post by श्री व्यंकटेश देवराव कदम1
- Post by वैजनाथ पावडे1