logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील* तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर पाळधी/धरणगाव/जळगाव (प्रतिनिधी) दिनांक 20 एप्रिल -“वारकऱ्यांचे व्यासपीठ हे संतांच्या विचारांचे व्यासपीठ आहे. या ठिकाणी राजकारण नको. येथे येताना मला नेहमीच वेगळी ऊर्जा मिळते. संतांचे विचार केवळ ऐकण्यासाठी नाहीत, तर आचरणात आणण्यासाठी आहेत. याच विचारांतून माणूस आणि समाज घडतो. वारकरी संप्रदाय ही आपली संस्कृती आणि ओळख असून तिचे जतन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत श्रीकांतदासजी महाराज होते.* पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, तरडे सारख्या पवित्र भूमीत परमार्थाचे जे कार्य सुरू आहे, ते समाजासाठी प्रेरणादायी आहे. संतांच्या मार्गावर चालणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करतो असेही त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. धरणगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र तरडे खुर्द येथे वारकरी परंपरेच्या भक्तीमय वातावरणात वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ह.भ.प. बाबुलाल सीताराम पाटील (नाना) यांना संत नामदेव खालसा आखाड्याचे प्रमुख हभप महामंडलेश्वर अनंतदासजी महाराज यांच्या हस्ते महंत पदवी व वारकरी गुणीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. *यांची होती उपस्थिती* कार्यक्रमाला महंत प्रणवगिरी बाबाजी, महंत नागेशानंदजी, महंत योगी ऋषिनाथजी, हभप सौरभ महाराज, हभप नवनाथ महाराज, हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, गौप्रेमी गजानन वरसाडेकर, हभप गोविंद महाराज पाचोरा, हभप रुपचंद बाबा, हभप कौतिक महाराज लोणीकर, स्वयंभू त्रिवेणेश्वर महादेव संस्थानाधिपती निमगाव, हभप कृष्णा महाराज, हभप रमेश महाराज तसेच नाशिकहून आलेले विविध संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संत नामदेव खालसा आखाड्याच्या वतीने ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हभप बाबुलाल नाना यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सुमारे दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटील हे पूर्ण वेळ श्रोत्यांमध्ये बसून सहभागी झाले होते. व्यासपीठावर केवळ वारकरी, साधूसंत व कीर्तनकार मंडळी विराजमान होती. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. सूत्रसंचालन हभप प्रा. सी. एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमानंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी आमरस-पुरणपोळीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी तरडे येथील तरुण मित्रमंडळ, संत तानसेन भजनी मंडळ व महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले.

2 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
2 hrs ago
8f1c757a-54d9-45e0-b898-4f20c91cb858

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, यावल नगरपालिका, यावल महोदय, यावल नगरपालिका हद्दीतील वॉर्ड क्रमांक २, आयशानगर परिसरामध्ये असलेला नाला अनेक दिवसांपासून साफसफाई न करता तसाच पडून आहे. नाल्याची नियमित सफाई होत नसल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यात साचलेल्या घाण व पाण्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरिया यांसारखे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सदर बाबीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्यापूर्वी संबंधित विभागाने तात्काळ नाला सफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, ही नम्र विनंती. अन्यथा उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांची जबाबदारी प्रशासनावर राहील.
    1
    मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,
यावल नगरपालिका, यावल
महोदय,
यावल नगरपालिका हद्दीतील वॉर्ड क्रमांक २, आयशानगर परिसरामध्ये असलेला नाला अनेक दिवसांपासून साफसफाई न करता तसाच पडून आहे. नाल्याची नियमित सफाई होत नसल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नाल्यात साचलेल्या घाण व पाण्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरिया यांसारखे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
सदर बाबीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्यापूर्वी संबंधित विभागाने तात्काळ नाला सफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, ही नम्र विनंती.
अन्यथा उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांची जबाबदारी प्रशासनावर राहील.
    user_Saqlain Shaikh Rafique
    Saqlain Shaikh Rafique
    जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”
    1
    राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    22 hrs ago
  • पिंपळनेर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, बैलांच्या झुंजीत सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत राजधर गंभीर भोई हे गंभीर जखमी झाले आहेत.
    1
    पिंपळनेर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, बैलांच्या झुंजीत सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत राजधर गंभीर भोई हे गंभीर जखमी झाले आहेत.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • प्रतिनिधी D.M... घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही. कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    प्रतिनिधी D.M...
घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप
मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही.
कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_DILIP DESHMUKH
    DILIP DESHMUKH
    Farmer सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 🔹 घटनेचा तपशील: माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही. 🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग: घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. 🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 🔹 पोलिसांचे आवाहन: पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.
    1
    संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद 
छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
🔹 घटनेचा तपशील:
माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही.
🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग:
घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.
🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण:
भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
🔹 पोलिसांचे आवाहन:
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल
    2
    माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल
    user_Samadhan More
    Samadhan More
    Dhule, Maharashtra•
    22 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे
    1
    सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथे पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ललिता सुनिल पावरा असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती सुनिल सायमल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
    1
    शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथे पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ललिता सुनिल पावरा असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती सुनिल सायमल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.