logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भाजप संविधानाची पायमल्ली करत ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांना लक्ष्य करत आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे अस्थिर करून देशात हुकूमशाही आणण्याचा आणि "वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी" या अजेंड्याद्वारे एकपक्षीय व्यवस्था निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे आयोजित भव्य बहुजन कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्यसमिती सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर कान्हेरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अनंत मोहोड आणि वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनिल कोल्हे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन सपकाळ यांनी महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांची सांगड घालत काँग्रेस वर्षभर राज्यभर जनजागृती अभियान राबविणार असल्याचे जाहीर केले. गावोगावी व्याख्याने, जनसंवाद आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार केला जाईल. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्तेच्या फायद्यासाठी सामाजिक विषमता आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर टीका करत शेतकरी, बेरोजगारी आणि महागाईच्या ज्वलंत प्रश्नांवरून संविधानाच्या रक्षणासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचे आवाहन केले. चंद्रकांत हंडोरे यांनी जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावर टीका करत कार्यकर्त्यांना फुले यांच्या समतावादी विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन केले. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी ओबीसी समाजाचा केवळ राजकीय वापर करून त्यांना न्याय आणि विकासापासून वंचित ठेवणाऱ्यांवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. "आम्ही सत्तेसोबत नाही, समाजासोबत आहोत," असा ठाम संदेश त्यांनी यावेळी दिला. या मेळाव्यात महापुरुषांच्या विचारांवर आधारित राज्यव्यापी वैचारिक चळवळ गावोगावी सक्रियपणे चालवण्याचा संकल्प काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.

1 hr ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
1 hr ago
5d98db6a-5001-4655-8061-d7c3d82dc900

भाजप संविधानाची पायमल्ली करत ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांना लक्ष्य करत आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे अस्थिर करून देशात हुकूमशाही आणण्याचा आणि "वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी" या अजेंड्याद्वारे एकपक्षीय व्यवस्था निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे

b770bba3-1ee5-4940-b52e-6b517a11259e

आयोजित भव्य बहुजन कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्यसमिती सदस्य खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष किशोर कान्हेरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अनंत मोहोड आणि वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनिल कोल्हे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन सपकाळ यांनी महात्मा फुले, छत्रपती

e039436e-ea04-4c9a-baf4-3b53083bf871

शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांची सांगड घालत काँग्रेस वर्षभर राज्यभर जनजागृती अभियान राबविणार असल्याचे जाहीर केले. गावोगावी व्याख्याने, जनसंवाद आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार केला जाईल. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्तेच्या फायद्यासाठी सामाजिक विषमता आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर टीका करत शेतकरी, बेरोजगारी आणि महागाईच्या ज्वलंत प्रश्नांवरून संविधानाच्या रक्षणासाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याचे

1bbe5043-b355-483b-b859-72f3b9afe5f1

आवाहन केले. चंद्रकांत हंडोरे यांनी जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावर टीका करत कार्यकर्त्यांना फुले यांच्या समतावादी विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन केले. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी ओबीसी समाजाचा केवळ राजकीय वापर करून त्यांना न्याय आणि विकासापासून वंचित ठेवणाऱ्यांवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. "आम्ही सत्तेसोबत नाही, समाजासोबत आहोत," असा ठाम संदेश त्यांनी यावेळी दिला. या मेळाव्यात महापुरुषांच्या विचारांवर आधारित राज्यव्यापी वैचारिक चळवळ गावोगावी सक्रियपणे चालवण्याचा संकल्प काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. पिंपळसेत-खरोंडा ग्रामपंचायत हद्दीतील शिंगारपाडा ते मांडवीहरा-हुंबरण या पाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पूर्णपणे वाहून गेला आहे. या रस्त्यासोबतच पाईप आणि मोऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असून, यामुळे मांडवीहरा आणि हुंबरण या दोन पाड्यांमधील नागरिकांचा इतर भागांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. रस्ता वाहून गेल्यामुळे या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दररोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांचे शिक्षणही धोक्यात आले असून, शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि वृद्ध नागरिकांना उपचारासाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात नेणे अत्यंत कठीण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकाही या भागात पोहोचू शकत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळसेत-खरोंडाचे सरपंच दिनेश जाधव यांनी प्रशासनाकडे तातडीने घटनास्थळाची पाहणी करून युद्धपातळीवर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी रस्ता, पाईप, मोऱ्या आणि संरक्षण भिंतीचे नुकसान होते, मात्र संबंधित बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते, असा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच दिनेश जाधव यांनी दिला आहे।
    2
    गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. पिंपळसेत-खरोंडा ग्रामपंचायत हद्दीतील शिंगारपाडा ते मांडवीहरा-हुंबरण या पाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता पाण्याच्या प्रचंड प्रवाहात पूर्णपणे वाहून गेला आहे. या रस्त्यासोबतच पाईप आणि मोऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असून, यामुळे मांडवीहरा आणि हुंबरण या दोन पाड्यांमधील नागरिकांचा इतर भागांशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

रस्ता वाहून गेल्यामुळे या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दररोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थ्यांचे शिक्षणही धोक्यात आले असून, शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि वृद्ध नागरिकांना उपचारासाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात नेणे अत्यंत कठीण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकाही या भागात पोहोचू शकत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पिंपळसेत-खरोंडाचे सरपंच दिनेश जाधव यांनी प्रशासनाकडे तातडीने घटनास्थळाची पाहणी करून युद्धपातळीवर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी रस्ता, पाईप, मोऱ्या आणि संरक्षण भिंतीचे नुकसान होते, मात्र संबंधित बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते, असा आरोप त्यांनी केला आहे. प्रशासनाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच दिनेश जाधव यांनी दिला आहे।
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    58 min ago
  • गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिर परिसरात शनिवारी आयोजित 'जनता दर्शन' कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विविध जिल्ह्यांतून आलेल्या लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या जनसमस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत।
    1
    गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिर परिसरात शनिवारी आयोजित 'जनता दर्शन' कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विविध जिल्ह्यांतून आलेल्या लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या जनसमस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत।
    user_BST news prayagraj
    BST news prayagraj
    Lawyer मुरबाड, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात नाल्यांची सफाई करण्यासाठी २ कोटी ४० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे टेंडर काढण्यात आले होते. मात्र, असे असूनही येथील नालेसफाईचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. भिवंडीत सध्या केवळ ४० ते ५० टक्केच नालेसफाई पूर्ण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे भिवंडी शहर पाण्यात बुडणार आणि येथील जनतेचे मोठे नुकसान होणार हे आता निश्चित मानले जात आहे.
    3
    ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात नाल्यांची सफाई करण्यासाठी २ कोटी ४० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे टेंडर काढण्यात आले होते. मात्र, असे असूनही येथील नालेसफाईचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. भिवंडीत सध्या केवळ ४० ते ५० टक्केच नालेसफाई पूर्ण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे भिवंडी शहर पाण्यात बुडणार आणि येथील जनतेचे मोठे नुकसान होणार हे आता निश्चित मानले जात आहे.
    user_Shivam
    Shivam
    भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ठाणे येथील जनता टाईम्स न्यूजचे मुख्य संपादक सरवर खान यांनी एक इशारा दिला आहे. हतबल आणि मजबूर लोकांच्या पाठीशी जनता टाईम्स न्यूज पूर्ण ताकदीनिशी खंबीरपणे उभी आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
    1
    ठाणे येथील जनता टाईम्स न्यूजचे मुख्य संपादक सरवर खान यांनी एक इशारा दिला आहे. हतबल आणि मजबूर लोकांच्या पाठीशी जनता टाईम्स न्यूज पूर्ण ताकदीनिशी खंबीरपणे उभी आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
    user_Janta times news
    Janta times news
    Local News Reporter ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे 'एसआयआर' (SIR) आणि 'टॉरेंट' (TORENT) यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंनंतर आम आदमी पार्टीचे नेते शाह आलम यांनी यावर भाष्य केले आहे. या गंभीर निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंबाबत शाह आलम यांनी नेमके काय म्हटले आहे आणि काय भूमिका मांडली आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे 'एसआयआर' (SIR) आणि 'टॉरेंट' (TORENT) यांच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंनंतर आम आदमी पार्टीचे नेते शाह आलम यांनी यावर भाष्य केले आहे. या गंभीर निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूंबाबत शाह आलम यांनी नेमके काय म्हटले आहे आणि काय भूमिका मांडली आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_मुंब्रा टाइम्स
    मुंब्रा टाइम्स
    Local News Reporter अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील खापरी येथील जिल्हा परिषद शाळा (कामतपाडा) येथे रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊनच्या वतीने विनामूल्य श्रवण तपासणी व कर्णयंत्र मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ॲड. निता देशमुख (सूर्यराव) यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी, १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराचा शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांच्या श्रवणदोष, बहिरेपणा आणि कानात सतत आवाज येणे (टिनिटस) यांसारख्या समस्यांची तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. तसेच, कर्णबधिर रुग्णांना स्पष्ट ऐकू येण्यासाठी योग्य हिअरिंग एडची (कर्णयंत्र) निवड, त्याचा वापर आणि देखभालीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या संपूर्ण उपक्रमाचे व्यवस्थापन दत्ताप्रसाद व प्राप्ती झाला यांनी पाहिले. शिबिरात डॉ. शीतल कदम, डॉ. कोमल गुडेंवार आणि डॉ. वैशाली सांगोले (स्पेशालिस्ट) यांनी रुग्णांची तपासणी केली, तर डॉ. आदित्य पांडे, डॉ. उदित पांडे आणि स्नेहा झा यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अशोक सूर्यराव, उपसरपंच सुरेश भांगरथ, सुभाष सूर्यराव, प्रभाकर सूर्यराव आणि शाम राऊत यांनी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी तज्ज्ञ डॉक्टरांनी ग्रामीण भागात अशा आरोग्य शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले. श्रवणदोषाचे वेळेवर निदान व उपचार झाल्यास नागरिकांना कायमस्वरूपी होणाऱ्या अडचणी टाळता येतात, असा मोलाचा सल्ला डॉक्टरांनी यावेळी दिला.
    2
    ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील खापरी येथील जिल्हा परिषद शाळा (कामतपाडा) येथे रोटरी क्लब ऑफ खारघर मिडटाऊनच्या वतीने विनामूल्य श्रवण तपासणी व कर्णयंत्र मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ॲड. निता देशमुख (सूर्यराव) यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी, १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराचा शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला.

या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांच्या श्रवणदोष, बहिरेपणा आणि कानात सतत आवाज येणे (टिनिटस) यांसारख्या समस्यांची तपासणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. तसेच, कर्णबधिर रुग्णांना स्पष्ट ऐकू येण्यासाठी योग्य हिअरिंग एडची (कर्णयंत्र) निवड, त्याचा वापर आणि देखभालीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या संपूर्ण उपक्रमाचे व्यवस्थापन दत्ताप्रसाद व प्राप्ती झाला यांनी पाहिले. शिबिरात डॉ. शीतल कदम, डॉ. कोमल गुडेंवार आणि डॉ. वैशाली सांगोले (स्पेशालिस्ट) यांनी रुग्णांची तपासणी केली, तर डॉ. आदित्य पांडे, डॉ. उदित पांडे आणि स्नेहा झा यांचे विशेष सहकार्य लाभले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अशोक सूर्यराव, उपसरपंच सुरेश भांगरथ, सुभाष सूर्यराव, प्रभाकर सूर्यराव आणि शाम राऊत यांनी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी तज्ज्ञ डॉक्टरांनी ग्रामीण भागात अशा आरोग्य शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले. श्रवणदोषाचे वेळेवर निदान व उपचार झाल्यास नागरिकांना कायमस्वरूपी होणाऱ्या अडचणी टाळता येतात, असा मोलाचा सल्ला डॉक्टरांनी यावेळी दिला.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. परिसरात 'गेला पाऊस कुणीकडे' अशी स्थिती निर्माण झाली असून, पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
    2
    पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे. परिसरात 'गेला पाऊस कुणीकडे' अशी स्थिती निर्माण झाली असून, पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
    user_Ravindra Laxman pardhi
    Ravindra Laxman pardhi
    Teacher वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.