बारावी परीक्षा केंद्रावर तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट ! घनसावंगी तालुक्यात बारावी परीक्षा केंद्रावर तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट ! तीन केंद्रांवर एकूण १ हजार ४७३ परीक्षार्थी... कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन सज्ज; १०० मीटर परिसरात कलम १४४ लागू घनसावंगी ओमप्रकाश उढाण विद्यार्थी जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेला मंगळवार (दि. १०) पासून सुरुवात झाली असून घनसावंगी तालुक्यातील तिन्ही परीक्षा केंद्रांवर पेपर शांत व सुरळीत वातावरणात पार पडत आहेत. यंदा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिक्षण विभागाबरोबरच तहसीलदारांनीही थेट परीक्षा केंद्रांना भेट देत पाहणी केल्याने प्रशासनाची सजगता अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी तालुक्यातील तीन केंद्रांवर एकूण १ हजार ४७३ परीक्षार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी २८ विद्यार्थी गैरहजर राहिल्याने १ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पहिला पेपर दिला. परीक्षा १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. तालुक्यातील संत रामदास महाविद्यालय (घनसावंगी), कै. दत्तासाहेब देशमुख महाविद्यालय (घनसावंगी) आणि मत्स्योदरी कनिष्ठ महाविद्यालय (तीर्थपुरी) या तीन केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, तपासणी प्रक्रिया व सुरक्षा उपाय काटेकोरपणे राबविण्यात आले. कित्येक वर्षांनंतर तहसीलदारांची थेट भेट.. यंदा विशेष म्हणजे कित्येक वर्षांनंतर जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच तहसीलदारांनी प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांना भेट देत पाहणी केली. तहसीलदार रमेश पागोटे, गटशिक्षण अधिकारी रविंद्र जोशी तसेच केंद्रप्रमुखांनी केंद्रांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कॉपीमुक्त अभियानाची तंतोतंत अंमलबजावणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. भरारी व बैठे पथकांची करडी नजर.. परीक्षेदरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी भरारी पथके व बैठे पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून परीक्षा केंद्रापासून १०० मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील झेरॉक्स केंद्रेही बंद ठेवण्यात आली आहेत. केंद्राच्या १०० मीटर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून पालक व अनधिकृत व्यक्तींना प्रवेशास सक्त मनाई आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गैरप्रकार आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टिस अॅक्ट १९८२ तसेच भादंवि कलम १८८ व २१७ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी भीती आणि उत्सुकता दिसून आली. परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधीच विद्यार्थी व पालक केंद्राबाहेर उपस्थित होते. दुपारी पेपर सोडवून बाहेर आलेल्या काही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेची पातळी थोडी कठीण असल्याचे सांगितले, तर काहींनी पेपर चांगला गेल्याची प्रतिक्रिया दिली. पालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे तसेच प्रशासनाचे आवाहन बारावीची परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. गैरप्रकार करताना कोणी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार रमेश पागोटे व गटशिक्षण अधिकारी रविंद्र जोशी यांनी सांगितले. एकूणच, घनसावंगी तालुक्यात बारावीच्या परीक्षा शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली असून प्रशासनाच्या कडक उपाययोजनांमुळे कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवले जात असल्याचे चित्र आहे. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपूरी येथील मत्स्योदरी महाविद्यालय परीक्षा केंद्रावर तहसीलदार रमेश पागोटे व गट शिक्षण अधिकारी रवींद्र जोशी यांनी भेट दिली.
बारावी परीक्षा केंद्रावर तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट ! घनसावंगी तालुक्यात बारावी परीक्षा केंद्रावर तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट ! तीन केंद्रांवर एकूण १ हजार ४७३ परीक्षार्थी... कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासन सज्ज; १०० मीटर परिसरात कलम १४४ लागू घनसावंगी ओमप्रकाश उढाण विद्यार्थी जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेला मंगळवार (दि. १०) पासून सुरुवात झाली असून घनसावंगी तालुक्यातील तिन्ही परीक्षा केंद्रांवर पेपर शांत व सुरळीत वातावरणात पार पडत आहेत. यंदा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिक्षण विभागाबरोबरच तहसीलदारांनीही थेट परीक्षा केंद्रांना भेट देत पाहणी केल्याने प्रशासनाची सजगता अधोरेखित झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी तालुक्यातील तीन केंद्रांवर एकूण १ हजार ४७३ परीक्षार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी २८ विद्यार्थी गैरहजर राहिल्याने १ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पहिला पेपर दिला. परीक्षा १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. तालुक्यातील संत रामदास महाविद्यालय (घनसावंगी), कै. दत्तासाहेब देशमुख महाविद्यालय (घनसावंगी) आणि मत्स्योदरी कनिष्ठ महाविद्यालय (तीर्थपुरी) या तीन केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, तपासणी प्रक्रिया व सुरक्षा उपाय काटेकोरपणे राबविण्यात आले. कित्येक वर्षांनंतर तहसीलदारांची थेट भेट.. यंदा विशेष म्हणजे कित्येक वर्षांनंतर जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच तहसीलदारांनी प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांना भेट देत पाहणी केली. तहसीलदार रमेश पागोटे, गटशिक्षण अधिकारी रविंद्र जोशी तसेच केंद्रप्रमुखांनी केंद्रांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कॉपीमुक्त अभियानाची तंतोतंत अंमलबजावणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. भरारी व बैठे पथकांची करडी नजर.. परीक्षेदरम्यान
कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी भरारी पथके व बैठे पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून परीक्षा केंद्रापासून १०० मीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील झेरॉक्स केंद्रेही बंद ठेवण्यात आली आहेत. केंद्राच्या १०० मीटर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले असून पालक व अनधिकृत व्यक्तींना प्रवेशास सक्त मनाई आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गैरप्रकार आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टिस अॅक्ट १९८२ तसेच भादंवि कलम १८८ व २१७ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी भीती आणि उत्सुकता दिसून आली. परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधीच विद्यार्थी व पालक केंद्राबाहेर उपस्थित होते. दुपारी पेपर सोडवून बाहेर आलेल्या काही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेची पातळी थोडी कठीण असल्याचे सांगितले, तर काहींनी पेपर चांगला गेल्याची प्रतिक्रिया दिली. पालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे तसेच प्रशासनाचे आवाहन बारावीची परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. गैरप्रकार करताना कोणी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार रमेश पागोटे व गटशिक्षण अधिकारी रविंद्र जोशी यांनी सांगितले. एकूणच, घनसावंगी तालुक्यात बारावीच्या परीक्षा शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली असून प्रशासनाच्या कडक उपाययोजनांमुळे कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवले जात असल्याचे चित्र आहे. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपूरी येथील मत्स्योदरी महाविद्यालय परीक्षा केंद्रावर तहसीलदार रमेश पागोटे व गट शिक्षण अधिकारी रवींद्र जोशी यांनी भेट दिली.
- जालना - आयशर व दुचाकीचा अपघात एकजण ठार एक गंभीर ! भरघाव आयशर दुचाकीला धडकला जालन्यात भीषण अपघाताची एक घटना समोर येत असून भारघव आयशर व दुचाकीचा अपघात होऊन एक तरुण जण ठार तर एक गंभीर झाल्याची घटना आज मंगळवारी 17 फेब्रुवारी रोजी घडलीय.1
- भोकरदन मराठी पत्रकार संघाची निवडणूक बिनविरोध, अध्यक्ष पदी सांडू पाटील नामदे, सचिव पदी दिपक सोळंके, तर उपाध्यक्ष पदी सुरेश शेळके, शेख सलीम यांची निवड Bharat 24taas News1
- Post by YUVA JALNA NEWS1
- शरद मोरे यांची तारीख 16 समोर रोजी स्वीकृत नगरसेवक म्हणून मुख्याधिकारी सुरज बिस्किटे यांचे उपस्थितीत निवड करण्यात आली.1
- जालना महानगरपालिका में व्यापारी प्रतिनिधित्व की मांग तेज सतीश पंच को स्वीकृत सदस्य बनाए जाने की अपील, कैट मराठवाड़ा अध्यक्ष हस्तीमल बंब ने उठाई आवाज जालना: शहर के विकास में व्यापारी वर्ग के महत्वपूर्ण योगदान को रेखांकित करते हुए कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) के मराठवाड़ा अध्यक्ष हस्तीमल बंब ने नवनिर्वाचित जालना महानगरपालिका में एक सशक्त व्यापारी प्रतिनिधि को शामिल करने की मांग की है. उन्होंने जालना व्यापारी महासंघ के अध्यक्ष एवं कैट के राज्य उपाध्यक्ष सतीश पंच को महानगरपालिका में स्वीकृत सदस्य नियुक्त करने की जोरदार अपील की है. इस संबंध में हस्तीमल बंब ने भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता एवं पूर्व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील से मुलाकात कर उन्हें लिखित निवेदन सौंपा. बंब ने कहा कि जालना को व्यापारियों और उद्यमियों का शहर माना जाता है, ऐसे में नगर प्रशासन में व्यापारिक हितों की प्रभावी पैरवी के लिए अनुभवी और प्रतिबद्ध व्यापारी प्रतिनिधि की उपस्थिति आवश्यक है. *व्यापारियों की मजबूत आवाज जरूरी हस्तीमल बंब ने बताया कि वर्षों से मांग के बावजूद अब तक व्यापारियों के लिए अलग निर्वाचन क्षेत्र की व्यवस्था नहीं हो सकी है. ऐसी स्थिति में कम से कम महानगरपालिका में व्यापारियों का आधिकारिक प्रतिनिधि होना समय की आवश्यकता बन गई है. सतीश पंच ने विभिन्न व्यापारिक और सामाजिक संगठनों में कार्य करते हुए व्यापक अनुभव प्राप्त किया है. उनकी नियुक्ति से कर प्रणाली, बाजारों की बुनियादी सुविधाएं, लाइसेंस प्रक्रिया और यातायात जैसी व्यापारियों की लंबित समस्याओं को प्रशासन तक प्रभावी ढंग से पहुंचाया जा सकेगा. *पार्टी से जुड़ाव और राष्ट्रीय स्तर का समर्थन गौरतलब है कि सतीश पंच हाल ही में भारतीय जनता पार्टी से जुड़े है. व्यापारी वर्ग का भाजपा के साथ लंबे समय से विश्वासपूर्ण संबंध रहा है. मुंबई में आयोजित कैट की एक महत्वपूर्ण बैठक के दौरान संगठन के राष्ट्रीय महासचिव एवं सांसद प्रवीण खंडेलवाल ने भी रावसाहेब दानवे से चर्चा कर व्यापारियों को राजनीति और निर्णय प्रक्रिया में उचित प्रतिनिधित्व दिए जाने की आवश्यकता पर जोर दिया था. *जालना के विकास के लिए अहम कदम हस्तीमल बंब ने विश्वास व्यक्त किया कि राष्ट्रीय नेतृत्व के संकेतों और व्यापारी समुदाय की भावनाओं को ध्यान में रखते हुए यदि सतीश पंच जैसे अनुभवी व्यक्ति को महानगरपालिका में स्थान दिया जाता है, तो इससे जालना के व्यापारिक और औद्योगिक विकास को नई दिशा मिलेगी. शहर के व्यापारी वर्ग से इस मांग को व्यापक समर्थन मिल रहा है और नियुक्ति होने पर व्यापारिक माहौल में सकारात्मक परिवर्तन की उम्मीद जताई जा रही है.1
- नागपुर से वर्धा जा रही ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन में लगी भीषण आग, सामने आया खौफनाक वीडियो। महाराष्ट्र के वर्धा से एक बड़ी खबर सामने आ रही है। यहां ग्रैंड ट्रैक एक्सप्रेस ट्रेन की एक बोगी में भीषण आग लग गई। आग लगने की सूचना मिलटे ही ट्रेन को रुकवा गया और सभी यात्रियों को बाहर निकाला गया। इस हादसे में किसी यात्री के घायल होने की खबर नहीं है। ट्रेन में आग लगने का वीडियो भी सामने आया है। वीडियो में साफ देखा जा सकता है कि ट्रेन की बोगी से आग की लपटें निकल रही है। ट्रेन रेलवे ट्रैक पर खड़ी है और आग बुझाने की कोशिश की जा रही है। जानाकरी के अनुसार, यह ट्रेन नागपुर से वर्धा जा रही थी। हेलोडी के पास अचानक ट्रेन की एक बोगी में आग लग गई। फिलहाल आग पर काबू पा लिया गया है।1
- महाशिवरात्रीच्या पवित्र प्रभातकाळी मंठा नगरी जणू शिवतत्त्वाच्या अलौकिक स्पंदनांनी न्हाऊन निघाली होती. मंदिरांच्या घंटानादात, मंत्रोच्चारांच्या गंभीर लयीत आणि भक्तिभावाच्या ओलाव्यात अध्यात्म, सेवा आणि समाजबंध यांचा दिव्य त्रिवेणी संगम साकार झाला. या मंगल क्षणी Press Council of Maharashtra (पीसीएम) पत्रकार संघ, मंठा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमय फराळ-वाटप उपक्रमाने सेवाभावाची साक्षात मूर्तीच उभी केली. श्री लक्ष्मीनारायण मंदिर तसेच जगदंबादेवी मार्गावरील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक व सात्विक भावनेने फराळाचे वितरण करण्यात आले. पहाटे ६.४५ ते ११.०० या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात प्रत्येक क्षण ‘ॐ नमः शिवाय’च्या अखंड गजराने दुमदुमत होता. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या स्वरांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता; जणू भक्ती आणि सेवा एकरूप होऊन शिवआराधनेचे सजीव रूप धारण करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. मदने माऊली महाराज विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून पीसीएम पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार हरिराम तिवारी (बाबूजी तिवारी) तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रदीप देशमुख उपस्थित होते. व्यासपीठावर पीसीएम पत्रकार संघ मंठाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी, योगेश देशमुख, जीवन काळे, अतुल खरात, गजानन माळकर, आतिश राठोड, अंकुश देशमाने, सुभाष झरेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. अध्यक्षीय मनोगतात ह.भ.प. मदने माऊली महाराजांनी अन्नदानाचे दैवी महात्म्य अत्यंत भावपूर्ण शब्दांत अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अन्नदान ही केवळ सामाजिक कृती नसून ती आत्म्याला परमेश्वराशी जोडणारी साधना आहे. सेवा हीच खरी शिवपूजा असून, गरजूंना प्रेमाने अन्न देणे म्हणजे शिवतत्त्वाची प्रत्यक्ष आराधना होय. या प्रसंगी त्यांनी अभंगाच्या ओव्या सादर करत वातावरण अधिक भक्तिमय केले— “तेथे एक शीत दिधल्या अन्न! कोटी कुळांचे होय उद्धरण! कोटी याग केले पूर्ण! ऐसे महिमान ये तीर्थाचे!” प्रेमपूर्वक अर्पण केलेला अन्नाचा एक घासही कोटी कुळांच्या उद्धाराचे कारण ठरतो, असे सांगत त्यांनी या उपक्रमास ‘शिवपूजेचे साक्षात रूप’ असे संबोधले. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांप्रती अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेले फराळ-वाटप हे निस्सीम सेवाभावाचे तेजस्वी उदाहरण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. समाजात समत्व, करुणा आणि बांधिलकी जपण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रा. प्रदीप देशमुख यांनीही आपल्या मनोगतात सेवा आणि औदार्य हीच खरी संस्कृतीची ओळख असल्याचे प्रतिपादन केले. “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही भावना जपली तर समाजपरिवर्तन सहज शक्य होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीसीएम पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अतुल खरात यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश देशमुख, गणेश खराबे, आतिश राठोड, बाळासाहेब खराबे, राजकुमार कांगणे, रशीद पठाण, विजय राठोड, उस्मान पठाण, एकनाथ एंडइत, जिजाभाऊ गते, शेंडगेभाऊ आदींनी परिश्रम घेतले. फराळाची सात्विक व रुचकर तयारी आचारी कैलास पवार, हुकुमसिंग राजपुरोहित आणि प्रल्हाद नरवडे यांनी केली. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर साकारलेली ही प्रसादवाटप केवळ अन्नवितरणाचा उपक्रम न ठरता समत्व, सेवा आणि श्रद्धेचा सजीव उत्सव ठरली. शिवनामाच्या अखंड गजरात आणि सेवाभावाच्या ऊर्जेतून प्रकटलेली ही शिवआराधना मंठा नगरीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरली—जिथे सेवा म्हणजेच साधना आणि दान म्हणजेच देवत्व, याची अनुभूती सर्वांना लाभली.1
- संजीवनी समाधी सोहळा... घनसावंगी तालुक्यातील तीर्थपूरी येथील एस. पी. पाटील इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात शेतकरी गीत, देशभक्तीपर गितांवर विद्यार्थ्यांचे धम्माल सादरीकर1