प्रथम पारितोषिक अकरा हजार रुपये;१ मे ला होणार बक्षीस वितरण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त 'सामाजिक समता सप्ताह 'उत्साहात साजरा करण्यात आला. या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता, मानवी हक्क तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे हा होता . पंचायत समिती शिक्षण विभाग अक्कलकोट यांच्या वतीने तालुकास्तरीय इयत्ता ७ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रेया योगीनाथ हिरेमठ इंडियन मॉडेल स्कूल अक्कलकोट,द्वितीय क्रमांक ग्रामीण विकास विद्यालय चपळगाव प्रशालेचे विध्यार्थीनी क्रांती श्रीकृष्ण शिवशरण तर तृतीय क्रमांक उडगी हायस्कूल उडगीचे सौम्या संतोषकुमार रंगदाळ ह्यांनी पटकावली आहेत. गट शिक्षण अधिकारी प्रशांत आरबळे यांच्या वतीने स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून संतोष नरे, बापूसाहेब निंबाळकर, राजशेखर विजापूरे, दत्तात्रय सावंत, तुकरराम जाधव, आशिष कांबळे यांनी नियोजन आणि कामकाज पाहिले. याप्रसंगी मुख्याध्यापक संजय जानराव, राजू रंगदाळ आदी मान्यवर उपस्थित होते. ------- वकृत्व स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक ११,०००रुपये ,द्वितीय पारितोषिक ९,००० रुपये तृतीय पारितोषिक ७,००० हजार रुपये आहे.१ मे २०२६ रोजी अक्कलकोट येथे पारितोषिक वितरण होणार आहे.

- Post by Digital media.1
- लातूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक जीव गमावला भूलतज्ञाच्या अज्ञानामुळे1
- 17 लाख सरकारी कर्मचारी, जि प शिक्षक,-शिक्षके तर कर्मचारी आज पासून संपावर संपकाऱ्यांवर कार्यवाही चा सरकार चा इशारा.1
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. वाहन चालकासह कार जळून खाक. सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.1
- अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ₹89,500/- चा मुद्देमाल जप्त. लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात अवैध दारू विक्री व निर्मितीविरोधात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली आहे. पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील आण्णाभाऊ साठे चौक परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने सुमारे 09:15 वा. छापा टाकला.सदर कारवाईत गोविंद दिगंबर खोसे (वय 38 वर्षे, रा. माटेफळ, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देशी दारू 90 एमएलच्या 70 सिलबंद बाटल्या एकूण किंमत – ₹3,500/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माटेफळ शिवारातील तळ्याजवळ दुसरी कारवाई करण्यात आली. या कारवाईत मलकू विठोबा पवार (वय 47 वर्षे, रा. तुकाई नगर, मुरुड, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 6 प्लास्टिक बॅरलमध्ये साठवलेले आंबट रसायन –1200 लिटर,गावठी दारू – 20 लिटर असा एकूण ₹86,000/- असा दोन्ही कारवाईत एकूण – ₹89,500/- (एकोणनव्वद हजार पाचशे रुपये) हस्तगत करण्यात आला आहे.व सदर रसायन व दारूचा नमुना घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले,पाराजी पुठठेवाड, प्रदीप चोपणे,पोलीस ठाणे मुरुड येथील सफौ हिंगमीरे, बाबासाहेब खोपे यांनी केली असून दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (2) व 65 (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.4
- लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.1
- ----- (प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या विहिरीमुळे लहान मुले, दुचाकीस्वार, बैलगाड्या तसेच जनावरांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ध्रुपदी खिल्लारे, गोरख खिल्लारे, मधुकर खिल्लारे, मच्छिंद्र खिल्लारे, बबन खिल्लारे, जालिंदर खिल्लारे, हौसराव खिल्लारे, साहेबराव धुमाळ, दत्तु खिल्लारे यांच्या सह खिल्लारे, मुळीक व झांजुर्णे वस्तीवरील ग्रामस्थांनी संबंधित विहिरीला तातडीने संरक्षक कठडा किंवा भिंत उभारण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी “दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाय योजना कराव्यात,” अशी ठाम भूमिका घेतली असून, या कडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.1
- 📍खळबळ जनक घटना लातूर येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ? पहा व्हिडीओ1