शिरूरकरांचा आधारवड हरपला : ॲड. ओमप्रकाश सतीजा यांचे निधन शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24} शहरातील सामाजिक चळवळींचे मार्गदर्शक, लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष तसेच राजधानी इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक ॲड. ओमप्रकाश बन्सीलाल सतीजा (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने शिरूरच्या सामाजिक क्षेत्रातील एक शांत, अभ्यासू आणि निष्ठावान व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. मितभाषी स्वभाव, परखड विचार आणि समाजकार्याची अखंड तळमळ ही सतीजा यांची ओळख होती. शिरूर शहरातील विविध सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी केवळ सहभागच घेतला नाही, तर अनेक उपक्रमांना दिशा देणारे मार्गदर्शक म्हणूनही ते ओळखले जात. लोकजागृती संघटना, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, स्वर्गीय धनराज नहार व्याख्यानमाला, क्रांती दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांत त्यांची सक्रिय भूमिका होती. हलवाई गणेश मित्र मंडळ, हलवाई चौक येथेही ते सल्लागार म्हणून कार्यरत होते. समाजातील विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्वक मते मांडत त्यांनी अनेकांना विचारांची दिशा दिली. कोणत्याही प्रसिद्धीच्या अपेक्षेविना कार्य करण्याची त्यांची वृत्ती अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरली. त्यामुळेच त्यांच्या निधनाने शिरूर परिसरातील सामाजिक संघटनांचा एक भक्कम आधारवड हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, नातवंडे तसेच तीन बंधू असा परिवार आहे. व्यावसायिक योगी सतीजा यांचे ते वडील होत, तर महेंद्र, किशोर व राजेश सतीजा यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजता नक्षत्र प्रीमिअर, नगर-पुणे रोड, प्रीतमप्रकाश नगर येथून निघून अमरधाम, शिरूर येथे अंत्यसंस्कारासाठी जाईल. ॲड. ओमप्रकाश सतीजा यांच्या जाण्याने शिरूरच्या सामाजिक जीवनातील एक विचारवंत, संयमी आणि निस्वार्थी कार्यकर्ता हरपला असून त्यांच्या स्मृती समाजकार्यातूनच जिवंत राहतील, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

- चांदा व अहिल्यानगर शहरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 11 गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई अहिल्यानगर (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तलीविरोधात मोठी कारवाई करत चांदा (ता. नेवासा) व अहिल्यानगर शहर परिसरातून एकूण 11 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पहाटे सोनई व कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे : 1) सोनई पोलीस स्टेशन हद्द गु.र. नं. 138/2026 अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 (सुधारीत 2015) व प्राण्यांवरील क्रूरतेच्या कलमांनुसार कारवाई करत सुमारे 90,000/- रुपये किमतीची 6 गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली. आरोपी: आसिफ आतीक कुरेशी (फरार) लियाकत इस्माईल कुरेशी (फरार) उबेद कुरेशी (फरार) (सर्व रा. चांदा, ता. नेवासा) 2) कोतवाली पोलीस स्टेशन हद्द गु.र. नं. 259/2026 अन्वये 1,02,000/- रुपये किमतीची 5 गोवंशीय जनावरे व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी: सुफियान आयाज कुरेशी (फरार), रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अहिल्यानगर एकूण कारवाई: 2 गुन्हे दाखल 11 गोवंशीय जनावरे मुक्त 1,92,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त 4 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल (सर्व फरार) ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पुढील काळातही अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.1
- Post by अमोल भालेराव4
- पतीशी अनैतिक संबंध, संशय पत्नीने विवाहित सेक्रेटरीचा जीव घेतला, चंदननगर पोलीसांनी वकील आणि त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या!1
- पिंपरी चिंचव्हडं :- नारी शक्ती वंदन विधेयक संसदेत मंजूर होण्यास विरोध करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतला.... भाजपच्या सर्व महिला नगरसेविकांनी काळे पेहराव परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व देण्यासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधी पक्षातील इंडिया आघाडीच्या खासदारांनी या विधेयकावरून घेतलेल्या भूमिकेचा भाजप महिला आघाडीने तीव्र शब्दांत निषेध केला. महिलांच्या सक्षमीकरणाचा मार्ग रोखणाऱ्या विरोधकांचा चेहरा जनतेसमोर उघड झाला आहे, अशी भावना यावेळी नगरसेविकांनी व्यक्त केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काळ्या साड्या परिधान केलेल्या भाजप नगरसेविकांनी लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणाबाजी करत विरोधकांच्या भूमिकेचा धिक्कार करण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.... #नारीशक्तीवंदनविधेयक #महिलाआरक्षण #भाजप #भाजपमहिलाआघाडी #पिंपरीचिंचवड #महापालिका #निषेधआंदोलन #काळीसाडी #राजकारण #महिलासक्षमीकरण #इंडियाआघाडी #घोषणाबाजी #NariShaktiVandanBill #WomenReservation #BJP #BJPMahilaMorcha #PimpriChinchwad #MunicipalCorporation #Protest #BlackSareeProtest #Politics #WomenEmpowerment #INDIAAlliance #Sloganeering1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by Raju Bawdiwale1
- : साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुण्यात सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स येथे नागरिकांनी सोने खरेदीसाठी मोठी रांग लावली आहे. अक्षय तृतीया हा सुवर्ण खरेदीसाठी शुभ दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख ज्वेलर्स दुकानांमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः लक्ष्मी रोड परिसर गजबजून गेला आहे. ग्राहकांकडून सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकांनी गुंतवणूक आणि शुभ मुहूर्त या दोन्ही कारणांसाठी खरेदीला प्राधान्य दिले आहे. दर वाढलेले असतानाही अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पुणेकरांचा खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पारंपरिक प्रथेनुसार सणासुदीला सोने चांदी खरेदी करण्याकडे कल असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी वाढली आहे. राष्ट्रीयकृत बँकेत सोने खरेदी करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोने-चांदीचे दर वाढले. आजपर्यंत सोन्या- चांदीत गुंतवणूक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं, असे फत्तेचंद रांका यांनी सांगितले. दरांची माहिती : * सोने (२४ कॅरेट) : अंदाजे रू.७२,००० ते रू.७४,००० प्रति १० ग्रॅम * सोने (२२ कॅरेट) : अंदाजे रू.६६,००० ते रू.६८,००० प्रति १० ग्रॅम * चांदी : अंदाजे रू.८५,००० ते रू.९०,००० प्रति किलो * सकाळपासूनच दुकानांबाहेर रांगा * महिलांचा विशेष सहभाग * दागिन्यांसह सोन्याच्या नाण्यांचीही मोठी मागणी1
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या आमदारांसह नगरसेवकांनी थेट NDA अर्थात भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केलीये. महायुतीच्या घटकपक्षांनी ही सुरातसुर मिळवला. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात काँग्रेससह आघाडीने मतदान केलं. याचा विरोध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड पालिकेत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी निदर्शने केली. भाजपच्या विधान परिषदेवरील आमदार उमा खापरे ही यावेळी आंदोलनात सहभागी होत्या. खरं तर महापालिकेत, राज्यात अन केंद्रात भाजपची सत्ता आहे. असं असताना भाजपचे सत्तारूढ पक्ष नेता प्रशांत शितोळे यांनी या सरकारचं करायचं काय? अशी घोषणा देताच आमदार खापरेंसह महापौर रवी लांडगे आणि सर्व नगरसेवकांनी खाली डोकं वर पाय, असं म्हणत सुरातसुर मिसळला. मग शितोळे गडबडले, नंतर सावरायला गेले अन NDA सरकारचं करायचं काय? असं म्हटल्यावर पुन्हा एकदा खाली डोकं वर पाय असाच नारा सर्वांनी दिला. शेवटी मात्र NDA आघाडीचा विजय असो असं म्हणत आमदार खापरेंनी हात जोडले. आपण आपल्याच सरकार विरोधात घोषणा दिल्याचं आमदारांसह महापौरांच्या लक्षात आलं खरं पण तोपर्यंत उशीर झाला होता... #पिंपरीचिंचवड #भाजप #एनडीए #महायुती #राजकारण #घोषणाबाजी #निदर्शने #उमाखापरे #प्रशांतशितोळे #रवीलांडगे #राजकीयगोंधळ #पुणेन्यूज #PimpriChinchwad #BJP #NDA #Mahayuti #Politics #Protest #Sloganeering #UmaKhapre #PrashantShitole #RaviLandge #PoliticalDrama #PuneNews1