महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर 119 -येवला विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या द्वितीय प्रशिक्षण वर्गाच्या आयोजन महात्मा फुले नाट्यगृह येथे करण्यात आले होते. सदरचे प्रशिक्षण दोन टप्प्यात देण्यात आले. प्रशिक्षणाच्या सकाळ-सत्रामध्ये महात्मा फुले नाट्यगृह येथे पीपीटी, व्हिडिओ यांच्यामार्फत उपस्थित मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान प्रक्रियेतील विविध टप्प्यांचे मार्गदर्शन करण्यात आले. तर दुपारच्या सत्रामध्ये जनता महाविद्यालय येवला येथे प्रत्यक्ष evm मशीन हाताळणी व जोडणी याचे प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी विविध तालुक्यातून मतदानासाठी नियुक्त केलेले मतदान अधिकारी उपस्थित होते. सदरच्या द्वितीय प्रशिक्षण वर्गास 368 मतदान केंद्राध्यक्ष, 366 प्रथम मतदान अधिकारी व 815 इतर मतदान अधिकारी हजर होते. प्रशिक्षणाच्या मध्यंतरामध्ये उपस्थित मतदान अधिकाऱ्यांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. सदरच्या प्रशिक्षणास गैरहजर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कठोर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी गाढवे यांनी दिले. या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार पंकज मगर, नितीन बाहिकर निरंजना पराते, हिरा हिरे, विवेक चांदवडकर तसेच निवडणूक शाखेतील सर्व कर्मचारी व तंत्रज्ञ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. *निवडणूक मुख्य निरीक्षकांची प्रशिक्षण वर्गात भेट!* महात्मा फुले नाट्यगृह येथे प्रशिक्षण वर्ग सुरू असताना 119 येवला विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त असलेले निवडणूक मुख्य निरीक्षक राहुल शर्मा यांनी आकस्मिक भेट देऊन प्रशिक्षणाबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षणाबाबत बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर 119 -येवला विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आबा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या द्वितीय प्रशिक्षण वर्गाच्या आयोजन महात्मा फुले नाट्यगृह येथे करण्यात आले होते. सदरचे प्रशिक्षण दोन टप्प्यात देण्यात आले. प्रशिक्षणाच्या सकाळ-सत्रामध्ये महात्मा फुले नाट्यगृह येथे पीपीटी, व्हिडिओ यांच्यामार्फत उपस्थित मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मतदान प्रक्रियेतील विविध टप्प्यांचे मार्गदर्शन करण्यात आले. तर दुपारच्या
सत्रामध्ये जनता महाविद्यालय येवला येथे प्रत्यक्ष evm मशीन हाताळणी व जोडणी याचे प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी विविध तालुक्यातून मतदानासाठी नियुक्त केलेले मतदान अधिकारी उपस्थित होते. सदरच्या द्वितीय प्रशिक्षण वर्गास 368 मतदान केंद्राध्यक्ष, 366 प्रथम मतदान अधिकारी व 815 इतर मतदान अधिकारी हजर होते. प्रशिक्षणाच्या मध्यंतरामध्ये उपस्थित मतदान अधिकाऱ्यांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. सदरच्या प्रशिक्षणास गैरहजर असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कठोर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी गाढवे यांनी दिले. या
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार पंकज मगर, नितीन बाहिकर निरंजना पराते, हिरा हिरे, विवेक चांदवडकर तसेच निवडणूक शाखेतील सर्व कर्मचारी व तंत्रज्ञ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. *निवडणूक मुख्य निरीक्षकांची प्रशिक्षण वर्गात भेट!* महात्मा फुले नाट्यगृह येथे प्रशिक्षण वर्ग सुरू असताना 119 येवला विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त असलेले निवडणूक मुख्य निरीक्षक राहुल शर्मा यांनी आकस्मिक भेट देऊन प्रशिक्षणाबाबतचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना मार्गदर्शन केले तसेच प्रशिक्षणाबाबत बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
- अंगणगाव येवला काकड आरती 20241
- राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह घेऊन मा छगनरावजी भुजबळ येवला 5 वेळा उमेदवार समक्ष भेट शंकरराव लिंगे1
- येवला पैठणी साडी लव्हर.#youtubeshorts #saree #yeolapaithani ##trendingshorts Paithani lover1
- आता येणार... तुमचे राज्य... रयतेचे राज्य... 119, येवला -लासलगाव विधानसभा1
- शरद पवार आणि छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर येवला येथे एकाच ठिकाण उतरले1
- परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार भागवतराव सोनवणे यांचा जाहीरनामा येवला लासलगाव मतदार संघ1
- येवला, नाशिक येथे आयोजित मा. श्री शरदचंद्र पवार साहेब यांची जाहीर सभा - लाईव्ह1
- लासलगाव! येवला मतदार संघ! जनतेचा कौल कोणाच्या बाजूने1