logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मांगली ग्रामपंचायतीतील ७ लाखांच्या वस्ती विकास निधीच्या कामावर प्रश्नचिन्ह; विभागीय आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रतिनिधी भंडारा जिल्ह्यातील पवनी पंचायत समिती अंतर्गत मांगली ग्रामपंचायतीचे सरपंच भोजराज मेघेशाम वैद्य यांच्याविरोधात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास निधीतून करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, महसूल विभागाच्या नोंदी व तलाठी अभिलेखांप्रमाणे गट क्रमांक ८ ही शेती वैद्य परिवाराची खाजगी भात पिकाचे शेतीक्षेत्र असून, त्या ठिकाणी सुमारे ७ लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता बांधण्यात आला. हा निधी शासनाच्या उद्देशानुसार खर्च न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी समितीश्री. कवीश्वर खोब्रागडे व श्री. हजारे यांनी केली होती. त्यानंतर गटविकास अधिकारी पवनी श्री. माने यांनी सादर केलेल्या अहवालात निधीचा कोणताही गैरवापर अथवा चुकीचा विनियोग झालेला नसल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, तक्रारदारांचा आरोप आहे की चौकशीदरम्यान त्यांनी सादर केलेले महसुली पुरावे व इतर कागदपत्रांचा विचार करण्यात आला नाही. तसेच नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन न करता केवळ प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, १३ एप्रिल २०२६ रोजी गल्ली क्रमांक ११ येथे करण्यात आलेल्या पाहणीवेळी संबंधित कामाचा माहिती फलकही लावलेला नव्हता. तसेच ६ ऑक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेचा लाभ पात्र वस्तीला मिळणे अपेक्षित असताना, संबंधित रस्त्याचा प्रत्यक्ष लाभ केवळ एका अनुसूचित जातीच्या कुटुंबाला होत असून इतर लाभार्थी सरपंचांचे नातेवाईक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी व्हावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या अहवालाची फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

11 hrs ago
user_अनिल  सुखदेवे
अनिल सुखदेवे
पाऊनी, भंडारा, महाराष्ट्र•
11 hrs ago

मांगली ग्रामपंचायतीतील ७ लाखांच्या वस्ती विकास निधीच्या कामावर प्रश्नचिन्ह; विभागीय आयुक्तांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी प्रतिनिधी भंडारा जिल्ह्यातील पवनी पंचायत समिती अंतर्गत मांगली ग्रामपंचायतीचे सरपंच भोजराज मेघेशाम वैद्य यांच्याविरोधात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास निधीतून करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, महसूल विभागाच्या नोंदी व तलाठी अभिलेखांप्रमाणे गट क्रमांक ८ ही शेती वैद्य परिवाराची खाजगी भात पिकाचे शेतीक्षेत्र असून, त्या ठिकाणी सुमारे ७ लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता बांधण्यात आला. हा निधी शासनाच्या उद्देशानुसार खर्च न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी समितीश्री. कवीश्वर खोब्रागडे व श्री. हजारे यांनी केली होती. त्यानंतर गटविकास अधिकारी पवनी श्री. माने यांनी सादर केलेल्या अहवालात निधीचा कोणताही गैरवापर अथवा चुकीचा विनियोग झालेला नसल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, तक्रारदारांचा आरोप आहे की चौकशीदरम्यान त्यांनी सादर केलेले महसुली पुरावे व इतर कागदपत्रांचा विचार करण्यात आला नाही. तसेच नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन न करता केवळ प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, १३ एप्रिल २०२६ रोजी गल्ली क्रमांक ११ येथे करण्यात आलेल्या पाहणीवेळी संबंधित कामाचा माहिती फलकही लावलेला नव्हता. तसेच ६ ऑक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेचा लाभ पात्र वस्तीला मिळणे अपेक्षित असताना, संबंधित रस्त्याचा प्रत्यक्ष लाभ केवळ एका अनुसूचित जातीच्या कुटुंबाला होत असून इतर लाभार्थी सरपंचांचे नातेवाईक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी व्हावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या अहवालाची फेरतपासणी करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट) नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की। अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी। BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की। (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    1
    SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील
SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील
(नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की।
अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है।
उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी।
BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की।
(नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात..... तालुका प्रतिनिधी हिंगणा हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.
    1
    एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात.....
तालुका प्रतिनिधी हिंगणा 
हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू 
उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • क्या आपका Liver अंदर से स्वस्थ है? 20 सेकंड में करें ये 4 Home Tests ! | 💡 🌸 आज ही अपनी सेहत का ध्यान रखें 🌸हर स्वास्थ्य समस्या का सही और सुरक्षित समाधान ✨ Heart Diseases ✨ Diabetes ✨ Kidney Diseases ✨ Liver Diseases ✨ Lung(Asthma & TB) 📍 स्वस्थ जीवन की शुरुआत सही सलाह से 📞 Appointment Book करें: +91 9125734374 #DrMeherAbbas #LiverFunctionTest #LiverHealth #FattyLiver&NAFLD #Fibrousscan @TopFan
    2
    क्या आपका Liver अंदर से स्वस्थ है? 20 सेकंड में करें ये 4 Home Tests ! | 💡
🌸 आज ही अपनी सेहत का ध्यान रखें 

🌸हर स्वास्थ्य समस्या का सही और सुरक्षित समाधान  

✨ Heart Diseases
✨ Diabetes 
✨ Kidney Diseases
✨ Liver Diseases
✨ Lung(Asthma & TB)

📍 स्वस्थ जीवन की शुरुआत सही सलाह से  
📞 Appointment Book करें: +91 9125734374
#DrMeherAbbas
#LiverFunctionTest
#LiverHealth
#FattyLiver&NAFLD
#Fibrousscan




@TopFan
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    17 hrs ago
  • ऑरेंज अलर्टमध्येही प्रशिक्षणाची सक्ती? हिंगणघाट हायवेवरील भीषण अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू वर्धा. हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असतानाही प्रशिक्षणासाठी प्रवास करावा लागल्याने एका शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ घडली. या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शिक्षकांमध्ये व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. जोशना खेमनाद रामटेके (नारायणजे), रा. हिंगणघाट या शाळेचे काम पूर्ण करून चिंचोली येथे आयोजित प्रशिक्षणासाठी आपल्या मोपेडने निघाल्या होत्या. हिंगणघाट–चिंचोली मार्गावर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तरीही शिक्षकांना नियमित शाळा पूर्ण करून दुपारी आयोजित शिक्षण परिषद/प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रशिक्षण शहराऐवजी चिंचोलीसारख्या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आल्याने शिक्षकांना प्रतिकूल हवामानात प्रवास करावा लागल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सौ. रामटेके (नारायणजे) यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शिक्षकांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांच्या ताणाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत शिक्षिकेच्या नातेवाईकांनी तसेच काही शिक्षकांनी प्रतिकूल हवामानात प्रशिक्षणासाठी सक्तीने प्रवास करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ यापूर्वीही अनेक अपघात घडले असून या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याची तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
    1
    ऑरेंज अलर्टमध्येही प्रशिक्षणाची सक्ती? हिंगणघाट हायवेवरील भीषण अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू
वर्धा. हिंगणघाट
: वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असतानाही प्रशिक्षणासाठी प्रवास करावा लागल्याने एका शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ घडली. या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शिक्षकांमध्ये व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. जोशना खेमनाद रामटेके (नारायणजे), रा. हिंगणघाट या शाळेचे काम पूर्ण करून चिंचोली येथे आयोजित प्रशिक्षणासाठी आपल्या मोपेडने निघाल्या होत्या. हिंगणघाट–चिंचोली मार्गावर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तरीही शिक्षकांना नियमित शाळा पूर्ण करून दुपारी आयोजित शिक्षण परिषद/प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रशिक्षण शहराऐवजी चिंचोलीसारख्या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आल्याने शिक्षकांना प्रतिकूल हवामानात प्रवास करावा लागल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सौ. रामटेके (नारायणजे) यांचा मृत्यू झाला होता.
घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शिक्षकांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांच्या ताणाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत शिक्षिकेच्या नातेवाईकांनी तसेच काही शिक्षकांनी प्रतिकूल हवामानात प्रशिक्षणासाठी सक्तीने प्रवास करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ यापूर्वीही अनेक अपघात घडले असून या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याची तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...* शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही. चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया. चला, एकत्र काम करूया. चला, भारतासाठी काम करूया
    1
    *भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युवा पिढी विद्यार्थी ना नवीन मार्गदर्शन केले..*मला तर शिव्या दिल्या पण माझ्या आई ला सुद्धा हिच आपली संस्कृती,संस्कार आहे का? मूल मुलींनो..? असे ते म्हणाले...*
शिवीगाळीने कधीच काहीही साध्य होत नाही.
चला, भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया.
चला, एकत्र काम करूया.
चला, भारतासाठी काम करूया
    user_Harshal kukadkar
    Harshal kukadkar
    Security Guard सावनेर, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ
    1
    ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ
ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • वाडा बिअर बार मध्ये जुगार खेळतां ना सात आरोपीवर कारवाई , शहरात एकच खळबळ ८ कक्ष ५६ हजार ५० हजारचा मुद्देमाल जप्त उमरेड । भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर पासून २ किमी अंतरावर असलेल्या भिवापूर - उमरेड महामार्गवर असलेला वाडा बार मधील एका खोलीत जुगार खेळत असतांना ७ जणांवर कारवाई करीत ८ लक्ष ५६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केला. सदरच्या कारवाई मुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. दि. ३० जुलै सायंकाळच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारावर वाडा बार येथे एका बंदिस्त जागेत सात व्यक्ति पैशाची बाजी लावून हारजीत जुगार खेळतांना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये कायदेशिर कारवाई ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या मार्गदर्शनात ए. एस. आय किशोर सिंग ठाकूर यांनी केली आहे.सदरच्या कारवाई मध्ये आरोपीकडून ४४ ६०० रूपये नगदी, मोबाईल हन्डसेट ९ नग २,६५, ००० रुपये , दुचाकी वाहने १,४५, ००० रुपये, चारचाकी वाहन ४,००, ००० रुपये असा सर्व मिळून एकूण ८, ५६, ०५० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    1
    वाडा बिअर बार मध्ये जुगार खेळतां ना सात आरोपीवर कारवाई , शहरात एकच खळबळ
८ कक्ष ५६ हजार ५० हजारचा मुद्देमाल जप्त
उमरेड । भिवापूर (प्रतिनिधी )
भिवापूर पासून २ किमी अंतरावर असलेल्या
भिवापूर - उमरेड महामार्गवर असलेला वाडा बार मधील एका खोलीत जुगार खेळत असतांना ७ जणांवर कारवाई करीत ८ लक्ष ५६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केला. सदरच्या कारवाई मुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. दि. ३० जुलै सायंकाळच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारावर वाडा बार येथे एका बंदिस्त जागेत सात व्यक्ति पैशाची बाजी लावून हारजीत
जुगार खेळतांना मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये कायदेशिर कारवाई ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या मार्गदर्शनात ए. एस. आय किशोर सिंग ठाकूर यांनी केली आहे.सदरच्या कारवाई मध्ये आरोपीकडून ४४ ६०० रूपये नगदी, मोबाईल हन्डसेट ९ नग २,६५, ००० रुपये , दुचाकी वाहने १,४५, ००० रुपये, चारचाकी वाहन ४,००, ००० रुपये असा सर्व मिळून एकूण ८, ५६, ०५० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.