*डॉ. संजय डी. पाटील यांचा सन्मान* -पुणे येथील सोहळ्यात हॉटेल सयाजीचाही गौरव *इंडिया माईस जीवनगौरव पुरस्काराने* *डॉ. संजय डी. पाटील यांचा सन्मान* -पुणे येथील सोहळ्यात हॉटेल सयाजीचाही गौरव हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना 'इंडिया माईस जीवनगौरव' पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे झालेल्या 'इंडिया माईस अवार्ड’ सोहळ्यात उदयपुर राजघराण्याच्या निवृत्ती कुमारी मेवाड यांच्याहस्ते डॉ. संजय डी. पाटील यांना गौरविण्यात आले. त्याचबरोबर हॉटेल सयाजीचे व्यवस्थापकिय संचालक रौफ धनानी आणि कोल्हापूरमधील हॉटेल सयाजी यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. भारतातील मीटिंग्स, इन्सेंटिव्ह्स, कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन (MICE) पर्यटन क्षेत्रातील सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या ‘इंडिया माईस अवॉर्ड्स’ सोहळा पुण्यात संपन्न झाला. यावेळी देशभरातील हॉटेल व्यावसायिक, कन्व्हेन्शन सेंटर्स, डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपन्या, एअरलाईन्स, पर्यटन मंडळे आणि इव्हेंट प्रोफेशनल्स यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतातील पहिले आणि एकमेव 'माईस' पर्यटन मासिक असलेल्या 'ट्रॅव्हटूर माईस गाईड' कडून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. भारतातील पर्यटन उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हे मासिक सलग १२ वर्षांपासून या पुरस्कारांचे आयोजन करत आहे. या कार्यक्रमात कोल्हापूरमध्ये हॉटेल सयाजी या पंचतारांकित हॉटेलच्या माध्यमातून, खानपान, निवास, पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. उदयपूरच्या निवृत्ती कुमारी मेवाड यांच्या हस्ते डॉ. पाटील यानी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी आयोजक 'ट्रॅव्हटूर माईस गाईड'चे संपादक अरविंद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात सयाजी हॉटेलचे एमडी रौफ धनानी यांना ‘हॉटेलियर ऑफ द इयर’ सन्मान प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर हॉस्पीटलिटी क्षेत्रात कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सयाजी हॉटेलचा 'बेस्ट बिझनेस हॉटेल इन महाराष्ट्र’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. डॉ. संजय डी. पाटील यांनी २०१५ मध्ये ‘हॉटेल सयाजी’च्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये जागतिक दर्जाच्या हॉस्पीटलिटी सुविधा उपलब्ध करून दिल्या. पर्यटन आणि उद्योग क्षेत्रातील वाढत्या गरजा ओळखून त्यांनी आधुनिक बँक्वेट हॉल्स, आलिशान निवास व्यवस्था, उत्तम रेस्टोरंटस आणि प्रशिक्षित कर्मचारीवर्ग यावर विशेष भर दिला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांचे यशस्वी आयोजन आणि स्वच्छता व सेवेमधील सातत्य यामुळे हॉटेल सयाजीने वेगळे स्थान निर्माण केले आहे. या योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला.

- Post by E city news network1
- सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.1
- वारसा अध्यात्मिक सेवेचा.... सांप्रदायिक परंपरा जोपासण्याचा...चरण हे फक्त मंदीरापर्यत घेऊन जातात...परंतु आचरण... आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते... श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि. ४-४-२०२६ किर्तन सेवा ह.भ.प. शंकर महाराज आंबवडे1
- diva nagar sevak (enjoy life)1
- विक्रम शिंदे /भोर दि.४ मोसे खोर्यातील ऐतिहासिक श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड) येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .1
- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. येत्या दोन दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे देखील पत्रात अभिजित बिचुकले म्हणाले आहेत...1
- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥ हेचि विष्णूची महापूजा । अनुभव नाही दुजा ॥धृपद॥ सत्य बोले मुखे । दुखवे आणिकाच्या दुःखे ॥२॥ निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ ॥३॥ अर्थ स्वामी चे काम, गुरुभक्ती, थोर व्यक्तींनी सांगितलेली आज्ञा आणि पतीची सेवा ही यथा योग्य केली पाहिजे. हीच खरी विष्णूची महा पूजा आहे यात काहीच संदेह नाही. नेहमी मुखाने सत्य बोलावे आणि दुसऱ्यांच्या दुःखात दुःख मानत जावे. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ करण्याविषयी आणि इतर चांगल्या गोष्टी करण्या विषयी दृढनिश्चय असावा मग निश्चयाचे बळ दृढ असेल तर कोणतेही फळ ते देणारे असते.1