logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांना घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ चे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, या संस्थांनी ओल्या कचऱ्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करणे बंधनकारक असून, नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार, दररोज १०० किलो किंवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या, २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या किंवा दररोज ४० हजार लिटरपेक्षा अधिक पाणी वापरणाऱ्या आस्थापनांचा ‘बल्क वेस्ट जनरेटर्स’ या वर्गात समावेश होतो. या संस्थांनी त्यांच्या परिसरातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, ‘एक्स्टेण्डेड बल्क वेस्ट जनरेटर रिस्पॉन्सिबिलिटी’ अंतर्गत आवश्यक कार्यवाही करणे, केंद्रीकृत पोर्टलवर नोंदणी करणे आणि कचरा व्यवस्थापनाची नियमित नोंद ठेवणे अनिवार्य आहे. महापालिकेने स्पष्ट केले आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या आणि आस्थापनांनी त्यांच्या स्तरावरच ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या संदर्भात, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने संबंधित संस्थांना नोटिसा बजावल्या असून, याबाबतची माहिती वर्तमानपत्रांमधूनही प्रसिद्ध केली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या संस्था आणि आस्थापनांवर प्रथम स्तरावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, वारंवार उल्लंघन आढळल्यास पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाईचीही तरतूद असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. या नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, शहरातील सर्व मोठ्या कचरा निर्मिती संस्थांनी निर्धारित प्रक्रियांचे पालन करून आवश्यक नोंदणी व कचरा प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्यासाठी कचऱ्याचे स्त्रोतावर व्यवस्थापन अत्यावश्यक आहे आणि सर्व घटकांनी सक्रिय सहकार्य करावे. तसेच, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार ओल्या कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करत नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले. स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवडसाठी सर्व संबंधित संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

1 hr ago
user_City Mirror News
City Mirror News
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुण्यातील विकाश नगर देहूरोड विभागाच्या भीमा शंकर कॉलनी परिसरात महानगरपालिकेचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
    4
    पुण्यातील विकाश नगर देहूरोड विभागाच्या भीमा शंकर कॉलनी परिसरात महानगरपालिकेचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
    user_Kamlesh wankhade
    Kamlesh wankhade
    Social Media Manager पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    42 min ago
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.
    1
    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • घडलेली घटना ही एक प्रकारे हत्याच आहे असे ठामपणे सांगण्यात आले आहे. या घटनेच्या पाठीमागे जे कोणीही असतील, त्यांना पोलीस शोधून काढतील अशी खात्री व्यक्त करण्यात आली आहे.
    1
    घडलेली घटना ही एक प्रकारे हत्याच आहे असे ठामपणे सांगण्यात आले आहे. या घटनेच्या पाठीमागे जे कोणीही असतील, त्यांना पोलीस शोधून काढतील अशी खात्री व्यक्त करण्यात आली आहे.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तोतया पोलिसाने मनी लाँड्रिंगच्या नावाखाली एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या घटनेत फसवणूकदाराने पीडित व्यक्तीकडून तब्बल १२.२८ लाख रुपये हडपले आहेत.
    1
    वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तोतया पोलिसाने मनी लाँड्रिंगच्या नावाखाली एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या घटनेत फसवणूकदाराने पीडित व्यक्तीकडून तब्बल १२.२८ लाख रुपये हडपले आहेत.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारूच्या सेवनामुळे २० नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, प्रशासन अखेर जागे झाल्याचे चित्र दिसत आहे. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत, वाकड परिसरातील एका घरातून सुरू असलेल्या दारूच्या गुत्त्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली. घरातूनच हा अवैध दारूचा व्यवसाय सुरू असल्याने स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विषारी दारू प्रकरणाच्या गंभीरतेनंतर, पोलिसांकडून आता शहरभरातील अशाच इतर अवैध दारू अड्ड्यांवरही व्यापक कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
    1
    पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारूच्या सेवनामुळे २० नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, प्रशासन अखेर जागे झाल्याचे चित्र दिसत आहे. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.

या कारवाईअंतर्गत, वाकड परिसरातील एका घरातून सुरू असलेल्या दारूच्या गुत्त्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली. घरातूनच हा अवैध दारूचा व्यवसाय सुरू असल्याने स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

विषारी दारू प्रकरणाच्या गंभीरतेनंतर, पोलिसांकडून आता शहरभरातील अशाच इतर अवैध दारू अड्ड्यांवरही व्यापक कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जलसंपदा विभागाने आपली १४ कार्यालये नाशिक अहिल्यानगरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मराठवाड्यातून तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. प्रदीप चव्हाण यांनी या निर्णयावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, हा मराठवाड्याला वाळवंट करण्याचा डाव आहे.
    1
    जलसंपदा विभागाने आपली १४ कार्यालये नाशिक अहिल्यानगरला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला मराठवाड्यातून तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. प्रदीप चव्हाण यांनी या निर्णयावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, हा मराठवाड्याला वाळवंट करण्याचा डाव आहे.
    user_स्वराज्य वार्ता
    स्वराज्य वार्ता
    Khed, Pune•
    11 hrs ago
  • पुणे शहरात शिवसेनेने अवैध दारूच्या अड्ड्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या कारवाईदरम्यान शेकडो लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली.
    1
    पुणे शहरात शिवसेनेने अवैध दारूच्या अड्ड्यांवर जोरदार हल्लाबोल केला. या कारवाईदरम्यान शेकडो लिटर गावठी दारू नष्ट करण्यात आली.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • विजयपूरमध्ये एक थरारक आणि निर्घृण सामूहिक हत्याकांड घडले आहे. या घटनेत एकूण ६ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, हल्लेखोरांनी गोळीबार करत आणि कोयत्याने गळे चिरून हे क्रूर कृत्य केले.
    1
    विजयपूरमध्ये एक थरारक आणि निर्घृण सामूहिक हत्याकांड घडले आहे. या घटनेत एकूण ६ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली असून, हल्लेखोरांनी गोळीबार करत आणि कोयत्याने गळे चिरून हे क्रूर कृत्य केले.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.