logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे येथे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' आणि समस्त ग्रामस्थ शिरदाळे यांच्या वतीने वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावाला लाभलेल्या ऐतिहासिक आणि गावाची ३६५ दिवस तहान भागवणाऱ्या तलावाचे सुशोभीकरण व्हावे, या दृष्टीने गावातील अनेक तरुणांनी एकत्र येऊन या वृक्षरोपणाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमाला शिवऋण महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षयजी बोऱ्हाडे, दै. सामनाचे उपसंपादक मा.श्री. विठ्ठलरावजी जाधव, हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे (महाराष्ट्र राज्य) अध्यक्ष मा.श्री. बाबाजीदादा चासकर, सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. चंद्रकांतजी जाधव, मा. सरपंच सागर जाधव पाटील, दै. प्रभातचे पत्रकार मा. श्री. अंकुशजी भुमकर आणि गावातील ज्येष्ठ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित सर्व मान्यवरांचा प्रत्येकी एक रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. याच दरम्यान, धामणी येथील खंडोबाचे मूळस्थान असलेल्या सागदऱ्यामध्ये भाविकांच्या सोयीसाठी रस्ता बनवणाऱ्या ग्रामस्थांचा विशेष गौरव करण्यात आला. हा भाग खोल दरीत असल्याने चंपाषष्ठी उत्सव किंवा यात्रेच्या काळात भाविकांना ये-जा करण्यासाठी अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेऊन गावातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत, तरुण आणि महिला भगिनींच्या मदतीने एक सुंदर रस्ता तयार केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल या सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 'वृक्षवल्ली सोयरे ग्रुप'च्या सर्व सदस्यांनी अथक प्रयत्न केले.

7 hrs ago
user_Tejas Walunj
Tejas Walunj
Local News Reporter आंबेगाव, पुणे, महाराष्ट्र•
7 hrs ago
ef30f07f-f29f-4911-a74e-e3e9460bb87a

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे येथे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' आणि समस्त ग्रामस्थ शिरदाळे यांच्या वतीने वृक्षरोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावाला लाभलेल्या ऐतिहासिक आणि गावाची ३६५ दिवस तहान भागवणाऱ्या तलावाचे सुशोभीकरण व्हावे, या दृष्टीने गावातील अनेक तरुणांनी एकत्र येऊन या वृक्षरोपणाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमाला शिवऋण महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षयजी बोऱ्हाडे, दै. सामनाचे उपसंपादक मा.श्री. विठ्ठलरावजी जाधव, हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे (महाराष्ट्र राज्य) अध्यक्ष मा.श्री. बाबाजीदादा चासकर, सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. चंद्रकांतजी जाधव, मा. सरपंच सागर जाधव पाटील, दै. प्रभातचे पत्रकार मा. श्री. अंकुशजी भुमकर आणि गावातील ज्येष्ठ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित सर्व मान्यवरांचा प्रत्येकी एक रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. याच दरम्यान, धामणी येथील खंडोबाचे मूळस्थान असलेल्या सागदऱ्यामध्ये भाविकांच्या सोयीसाठी रस्ता बनवणाऱ्या ग्रामस्थांचा विशेष गौरव करण्यात आला. हा भाग खोल दरीत असल्याने चंपाषष्ठी उत्सव किंवा यात्रेच्या काळात भाविकांना ये-जा करण्यासाठी अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेऊन गावातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत, तरुण आणि महिला भगिनींच्या मदतीने एक सुंदर रस्ता तयार केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल या सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 'वृक्षवल्ली सोयरे ग्रुप'च्या सर्व सदस्यांनी अथक प्रयत्न केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण १६ व्या दिवशीही म्हणजे १३ जुलै रोजी सुरूच आहे. दीर्घकाळ अन्नत्याग केल्यामुळे त्यांना अशक्तपणा आला असून आरोग्याच्या इतर तक्रारी जाणवत आहेत, ज्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. सध्या सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
    1
    नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण १६ व्या दिवशीही म्हणजे १३ जुलै रोजी सुरूच आहे. दीर्घकाळ अन्नत्याग केल्यामुळे त्यांना अशक्तपणा आला असून आरोग्याच्या इतर तक्रारी जाणवत आहेत, ज्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. सध्या सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये 'लग्नासाठी मुलगी हवी' असा मजकूर असलेला फ्लेक्स सध्या नागरिकांमध्ये जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, या फ्लेक्सवर कोणताही मोबाईल नंबर किंवा संपर्काची इतर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. संपर्क साधण्यासाठी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्यामुळे, हा फ्लेक्स खरोखरच लग्नासाठी लावला आहे की केवळ चर्चा रंगवण्यासाठी लावला आहे, असा प्रश्न आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
    1
    पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये 'लग्नासाठी मुलगी हवी' असा मजकूर असलेला फ्लेक्स सध्या नागरिकांमध्ये जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, या फ्लेक्सवर कोणताही मोबाईल नंबर किंवा संपर्काची इतर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. संपर्क साधण्यासाठी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्यामुळे, हा फ्लेक्स खरोखरच लग्नासाठी लावला आहे की केवळ चर्चा रंगवण्यासाठी लावला आहे, असा प्रश्न आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    Pest control service पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • कुदळवाडी मधील अतिक्रमण काढण्यासाठी २५ जेसीबी वापरले गेले, मात्र मोशी येथील दुर्घटनेत एवढे कमी जेसीबी का वापरण्यात आले, असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाई आणि मोशीतील दुर्घटना या दोन्ही प्रसंगांमधील जेसीबीच्या संख्येतील फरकावर त्यांनी बोट ठेवले आहे।
    1
    कुदळवाडी मधील अतिक्रमण काढण्यासाठी २५ जेसीबी वापरले गेले, मात्र मोशी येथील दुर्घटनेत एवढे कमी जेसीबी का वापरण्यात आले, असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाई आणि मोशीतील दुर्घटना या दोन्ही प्रसंगांमधील जेसीबीच्या संख्येतील फरकावर त्यांनी बोट ठेवले आहे।
    user_Vruttshakti Digital News
    Vruttshakti Digital News
    Local News Reporter हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पुण्याच्या पुरंदरमधून गरिबांच्या दुरवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गरिबांचे प्रचंड हाल होत असतानाही त्यांना अजून शिव्या आणि धमक्या दिल्या जात असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या भाषेवर "वाह रे वाह, बघा आपल्या मुख्यमंत्र्यांची भाषा" असा जोरदार टोमणा मारला आहे. या सर्व अन्यायाविरोधात लोकांमध्ये चीड निर्माण करण्याचा प्रयत्न करत, "अरे भावांनो, तुमचे रक्त का थंड पडले आहे?" असा अत्यंत आक्रमक आणि थेट सवाल विचारण्यात आला आहे.
    1
    पुण्याच्या पुरंदरमधून गरिबांच्या दुरवस्थेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गरिबांचे प्रचंड हाल होत असतानाही त्यांना अजून शिव्या आणि धमक्या दिल्या जात असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या भाषेवर "वाह रे वाह, बघा आपल्या मुख्यमंत्र्यांची भाषा" असा जोरदार टोमणा मारला आहे. या सर्व अन्यायाविरोधात लोकांमध्ये चीड निर्माण करण्याचा प्रयत्न करत, "अरे भावांनो, तुमचे रक्त का थंड पडले आहे?" असा अत्यंत आक्रमक आणि थेट सवाल विचारण्यात आला आहे.
    user_Jay shree Krishna
    Jay shree Krishna
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • ठाण्यात थेट लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. येथील एका फूटओव्हर ब्रिजवर लावलेला वाढदिवसाचा प्रचंड बॅनर अचानक खाली कोसळला. या प्रचंड बॅनरमुळे एक मोठी दुर्घटना घडली असती, मात्र सुदैवाने ही मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे.
    1
    ठाण्यात थेट लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. येथील एका फूटओव्हर ब्रिजवर लावलेला वाढदिवसाचा प्रचंड बॅनर अचानक खाली कोसळला. या प्रचंड बॅनरमुळे एक मोठी दुर्घटना घडली असती, मात्र सुदैवाने ही मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    57 min ago
  • आषाढी वारीसाठी देहू येथून संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली असून, दोन दिवस पुण्यात मुक्काम केल्यानंतर ती पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली आहे. या दरम्यान, यवत तालुका दौंड येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखीचा मुक्काम असल्यामुळे तिथे सहभागी असणाऱ्या महिला वारकऱ्यांसाठी भाकरी बनवत (थापत) होत्या. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः देखील भाकरी थापल्या आणि वारकऱ्यांच्या प्रति आपली सेवा केली.
    1
    आषाढी वारीसाठी देहू येथून संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली असून, दोन दिवस पुण्यात मुक्काम केल्यानंतर ती पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली आहे.

या दरम्यान, यवत तालुका दौंड येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखीचा मुक्काम असल्यामुळे तिथे सहभागी असणाऱ्या महिला वारकऱ्यांसाठी भाकरी बनवत (थापत) होत्या. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः देखील भाकरी थापल्या आणि वारकऱ्यांच्या प्रति आपली सेवा केली.
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • पिंपरी चिंचवड येथील मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केली आहे. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या दुर्घटनेस प्रशासन आणि संबंधित अधिकारीच जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, कंत्राटी पद्धत बंद करून सर्व कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी आग्रही मागणी भोसले यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटीमार्फत (SIT) चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे. प्रशासनाने पुढील १५ दिवसांत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा आक्रमक इशारा कामगार नेत्यांनी दिला आहे.
    1
    पिंपरी चिंचवड येथील मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केली आहे. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या दुर्घटनेस प्रशासन आणि संबंधित अधिकारीच जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे.

या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, कंत्राटी पद्धत बंद करून सर्व कामगारांना कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी आग्रही मागणी भोसले यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटीमार्फत (SIT) चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे.

प्रशासनाने पुढील १५ दिवसांत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा आक्रमक इशारा कामगार नेत्यांनी दिला आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पिंपरी चिंचवड येथील मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर आता राजकीय प्रतिक्रिया अत्यंत तीव्र झाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट जखमी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. या भेटीदरम्यान त्यांनी दुर्घटनेच्या दिवशी नेमके काय घडले होते, सुरक्षेच्या कोणत्या त्रुटी होत्या आणि कामगारांना कोणत्या सुविधा उपलब्ध होत्या, याविषयी जखमी कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती घेतली. माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी या दुर्घटनेसाठी प्रशासन आणि संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे. ही दुर्घटना केवळ एक अपघात नसून निष्काळजीपणाचाच परिणाम असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी संबंधित अधिकारी, कंपनी व्यवस्थापन आणि जबाबदार प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासोबतच, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सन्मानपूर्वक आणि योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच जखमींवर सर्वोत्तम उपचार केले जावेत, अशी मागणी करत त्यांनी कामगारांना न्याय देण्याची जोरदार वकिली केली.
    1
    पिंपरी चिंचवड येथील मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर आता राजकीय प्रतिक्रिया अत्यंत तीव्र झाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट जखमी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. या भेटीदरम्यान त्यांनी दुर्घटनेच्या दिवशी नेमके काय घडले होते, सुरक्षेच्या कोणत्या त्रुटी होत्या आणि कामगारांना कोणत्या सुविधा उपलब्ध होत्या, याविषयी जखमी कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती घेतली.

माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी या दुर्घटनेसाठी प्रशासन आणि संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे. ही दुर्घटना केवळ एक अपघात नसून निष्काळजीपणाचाच परिणाम असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी संबंधित अधिकारी, कंपनी व्यवस्थापन आणि जबाबदार प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यासोबतच, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सन्मानपूर्वक आणि योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच जखमींवर सर्वोत्तम उपचार केले जावेत, अशी मागणी करत त्यांनी कामगारांना न्याय देण्याची जोरदार वकिली केली.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.