logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

प्रल्हाद राम मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ; नागरिकांना दिलासा परभणी (प्रतिनिधी): परभणी महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १० मधील श्री प्रल्हाद राम मंदिर समोरील मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या विकासकामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. या कामासाठी राज्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक विजयराव जामकर, नगरसेवक बालासाहेब बुलबुले, अर्जुन सामाले, अमोल वाघमारे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास गजाननराव कुंडीकर, सतीश कोटीकर, किशोर देशमुख, संजय गुरु जोशी, अभिजित कुंडीकर, संदीप देशपांडे, गुंजकर काका, जोशी मामा, दगडगावकर साहेब, अंकित शर्मा, शिवा खरदे, प्रकाशराव कुंडीकर, अरुण कुंडीकर तसेच प्रभाग क्रमांक १० मधील अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विकासकामाचा शुभारंभ करून परिसराच्या सुशोभीकरणासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी अशा विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. पेव्हर ब्लॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर अधिक स्वच्छ, सुस्थितीत आणि आकर्षक होणार असून नागरिकांना ये-जा करण्यास मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. याबद्दल परिसरातील नागरिकांनी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले.

16 hrs ago
user_जागर महाराष्ट्राचा न्यूज
जागर महाराष्ट्राचा न्यूज
मानवत, परभणी, महाराष्ट्र•
16 hrs ago
6bc62d8b-7ce8-4222-a9c2-580711b654f3

प्रल्हाद राम मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ; नागरिकांना दिलासा परभणी (प्रतिनिधी): परभणी महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १० मधील श्री प्रल्हाद राम मंदिर समोरील मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या विकासकामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. या कामासाठी राज्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक विजयराव जामकर, नगरसेवक बालासाहेब बुलबुले, अर्जुन सामाले, अमोल वाघमारे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास गजाननराव कुंडीकर, सतीश कोटीकर, किशोर देशमुख, संजय गुरु जोशी, अभिजित कुंडीकर, संदीप देशपांडे, गुंजकर काका, जोशी मामा, दगडगावकर साहेब, अंकित शर्मा, शिवा खरदे, प्रकाशराव कुंडीकर, अरुण कुंडीकर तसेच प्रभाग क्रमांक १० मधील अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विकासकामाचा शुभारंभ करून परिसराच्या सुशोभीकरणासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी अशा विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. पेव्हर ब्लॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिर परिसर अधिक स्वच्छ, सुस्थितीत आणि आकर्षक होणार असून नागरिकांना ये-जा करण्यास मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. याबद्दल परिसरातील नागरिकांनी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि लोकप्रतिनिधींचे आभार मानले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    1
    जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर) ३१ जुलै : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०१ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०२ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०३ ऑगस्ट : कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ०४ ऑगस्ट : विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण) रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता. दृश्यमानता कमी होण्याची शक्यता. कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान. असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान. स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना. विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे: नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता. सर्वसाधारण सूचना जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात: प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी. प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे. पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे. धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात: मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे. झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये. विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत. हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे. भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे. नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे. सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे. भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे. वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे. कृषी सल्ला उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा. खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी. मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी. भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.
    1
    हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर)
३१ जुलै :
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
हवामान इशारे (हवामान-उपविभाग स्तरावर)
३१ जुलै :
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे (३०–४० किमी/तास) वाहण्याची शक्यता आहे.
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०१ ऑगस्ट :
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०२ ऑगस्ट :
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०३ ऑगस्ट :
कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
०४ ऑगस्ट :
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
हवामान इशाऱ्यांचे संभाव्य परिणाम (सर्वसाधारण)
रस्त्यांवर पाणी साचणे, सखल भागात जलभराव होणे, विशेषतः शहरी अंडरपास बंद होण्याची शक्यता.
दृश्यमानता कमी होण्याची शक्यता.
कच्च्या रस्त्यांचे किरकोळ नुकसान.
असुरक्षित किंवा कमकुवत संरचनांचे नुकसान.
स्थानिक पातळीवर भूस्खलन, चिखलयुक्त भूस्खलन किंवा जमीन खचण्याच्या घटना.
विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटामुळे:
नवीन लागवड, फळबागा व उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता.
सर्वसाधारण सूचना
जोरदार/अतिजोरदार/मुसळधार पावसाच्या काळात:
प्रवासापूर्वी वाहतूक कोंडीची माहिती घ्यावी.
प्रशासनाच्या वाहतूक सूचनांचे पालन करावे.
पाणी साचणाऱ्या भागात जाणे टाळावे.
धोकादायक किंवा कमकुवत बांधकामांमध्ये राहणे टाळावे.
मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या काळात:
मोकळ्या जागेत किंवा शेतात काम करणे टाळावे.
झाडाखाली किंवा असुरक्षित बांधकामांचा आसरा घेऊ नये.
विद्युत/इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्लगमधून वेगळी करावीत.
हवामान इशाऱ्यांचा पिकांवर संभाव्य परिणाम
बुरशीनाशके व कीटकनाशकांचा परिणाम कमी होणे किंवा वाहून जाणे.
भात पिकात मुळांची अपुरी वाढ, पाने पिवळी पडणे व रोपे जळणे.
नाचणीमध्ये रोपांचे नुकसान, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व बुरशीजन्य रोग वाढणे.
सोयाबीन व भुईमूगात मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट येणे.
भुईमूग व करडईमध्ये झाडे पिवळी पडणे, कोमेजणे व मुळांची वाढ खुंटणे.
वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला व फळबागांमध्ये रोपे आडवी पडणे (लॉजिंग) किंवा नुकसान होणे.
कृषी सल्ला
उभी पिके, फळबागा व भाजीपाला पिकांतील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा.
खत व कीड-रोग नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी पुढे ढकलावी.
मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर परिपक्व भाजीपाला व फळपिकांची शक्य तितक्या लवकर काढणी करून सुरक्षित साठवण करावी.
भाजीपाला पिकांना आवश्यक ते आधार (स्टेकिंग) द्यावा.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.
    1
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रभावीपणे राबविणार; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती
राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची नांदेड जिल्ह्यात प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी सांगितले की, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांची माहिती, पात्रता पडताळणी, बँकांशी समन्वय तसेच अर्ज प्रक्रियेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्यात आले असून कोणताही पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासन दक्षता घेणार आहे.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जालना महानगरपालिकेचा निष्काळजीपणा पौसाचा घाण पाणी रस्त्यावर शिरले नाळ्या तुबले
    1
    जालना महानगरपालिकेचा निष्काळजीपणा पौसाचा घाण पाणी रस्त्यावर शिरले नाळ्या तुबले
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर असून मात्र या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार आहे. आजेगाव जवळील ओड्याला मध्यरात्रीच्या सुमारास पूर आला होता तसेच विविध नदी,नाले व ओढे हे तुटुंब भरून वाहत आहेत. हिंगोली जिल्ह्यांमध्ये पाऊस थैमान घालत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
    1
    हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत 
हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर असून मात्र या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार आहे. आजेगाव जवळील ओड्याला मध्यरात्रीच्या सुमारास पूर आला होता तसेच विविध नदी,नाले व ओढे हे तुटुंब भरून वाहत आहेत. हिंगोली जिल्ह्यांमध्ये पाऊस थैमान घालत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पुरात कार गेली वाहून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर गावजवळील पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार पाण्यात वाहून गेली असुन सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसुन ड्रायव्हरने तात्काळ गाडीचा दरवाजा उघडून बाहेर सुखरूप पणे निघून आले. गाडी क्र MH14EH9382 ह्या क्रमांकाची गाडी सालेगाव येथील प्रल्हाद थोरात यांची असल्याची माहिती मिळाली आहे. सेनगाव तालुक्यातील हत्ता ते तळणी या राज्य मार्गचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे कापडशिंगी जावळील रामप्रसाद नगर येथील पुलाचे काम पूर्ण झाले होते मात्र केवळ पुलाच्या दोन्ही बाजूने भराव न भरल्यामुळे हा पुल वाहतुकी साठी सुरू करण्यात आला नाही पुलाच्या साईडने जो रस्ता काढून दिला होता त्या रस्त्यावर नदीला पूर आल्यावर रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होत आहे. त्यामुळे सुमारे दहा ते पंधरा गावाचा संपर्क तुटत आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराच्या वतीने जेव्हा काल पुलाच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली वाहून गेलेली गाडी आज क्रेनच्या साह्याने बाहेर काढली आहे या मध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
    2
    पुरात कार गेली वाहून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, धक्कादायक घटना 
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील रामप्रसाद नगर गावजवळील पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार पाण्यात वाहून गेली असुन सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसुन ड्रायव्हरने तात्काळ गाडीचा दरवाजा उघडून बाहेर सुखरूप पणे निघून आले. गाडी क्र MH14EH9382 ह्या क्रमांकाची गाडी सालेगाव येथील प्रल्हाद थोरात यांची असल्याची माहिती मिळाली आहे. सेनगाव तालुक्यातील हत्ता ते तळणी या राज्य मार्गचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे कापडशिंगी जावळील रामप्रसाद नगर येथील पुलाचे काम पूर्ण झाले होते मात्र केवळ पुलाच्या दोन्ही बाजूने भराव न भरल्यामुळे हा पुल वाहतुकी साठी सुरू करण्यात आला नाही पुलाच्या साईडने जो रस्ता काढून दिला होता त्या रस्त्यावर  नदीला पूर आल्यावर रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद होत आहे. त्यामुळे सुमारे दहा ते पंधरा गावाचा संपर्क तुटत आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराच्या वतीने जेव्हा काल पुलाच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली  वाहून गेलेली गाडी आज क्रेनच्या साह्याने बाहेर काढली आहे या मध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.