Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाला उद्या दिनांक १९ फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य रोषणाई करण्यात आली आहे. चौक परिसर आकर्षक विद्युत सजावटीने उजळून निघाला असून संपूर्ण परिसर लखलखत्या प्रकाशात न्हाऊन निघेलाआहे. भगव्या पताका, प्रकाशमाळा व देखण्या सजावटीमुळे वातावरणात उत्साह आणि शिवभक्तीची भावना अधिक दृढ झाले आहे. शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रोषणाई सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 🚩 जय भवानी! जय शिवाजी
उमेश राजगुरे
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाला उद्या दिनांक १९ फेब्रुवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य रोषणाई करण्यात आली आहे. चौक परिसर आकर्षक विद्युत सजावटीने उजळून निघाला असून संपूर्ण परिसर लखलखत्या प्रकाशात न्हाऊन निघेलाआहे. भगव्या पताका, प्रकाशमाळा व देखण्या सजावटीमुळे वातावरणात उत्साह आणि शिवभक्तीची भावना अधिक दृढ झाले आहे. शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या रोषणाई सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 🚩 जय भवानी! जय शिवाजी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- खामगाव : शिवजयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली आज शहराच्या मुख्य भागातून आणि मिरवणूक मार्गावरून 'रूट मार्च' काढण्यात आला. मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शिवजयंती मिरवणुकीच्या पारंपारिक मार्गाची पायी चालत पाहणी केली. मार्गावरील संवेदनशील ठिकाणे, सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. या रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि कोणत्याही अफवांना थारा मिळू नये, हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता.मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून संशयास्पद हालचालींवर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.4
- 🚨 BREAKING: खामगाव दगडफेक प्रकरणाचे सत्य समोर! 🚨 खामगावातील दगडफेकीची घटना ही कोणत्याही समुदायाशी संबंधित नसून ती वैयक्तिक वादातून घडली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी केले आहे. 📢 #Khamgaon #BreakingNews #PoliceUpdate #KhamgaonCity #Alert #Truth #MaharashtraPolice1
- Post by Asgar Khan in BCN news nagpur1
- चुकीची आकडेवारी अन् लोकांचा विरोध; बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात.1
- कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Raghunath Aghao1
- खामगाव : शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एका घरावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून करण्यात आला. मात्र, ही घटना पूर्णपणे वैयक्तिक वादातून घडली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे जाहीर आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. काल रात्री च्या सुमारास शिवाजीनगर परिसरातील एका कुटुंबाच्या घरावर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या दुर्दैवी घटनेत घरातील एका मुलीला दुखापत झाली आहे. मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल केला.ही घटना घडल्यानंतर शहरात काही समाजकंटकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवण्यास सुरुवात केली. दोन समुदायांमध्ये वाद झाल्याच्या किंवा धार्मिक स्थळावर दगडफेक झाल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि नागरिकांची गर्दी जमा झाली होती. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेता, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला भेट दिली. त्यांनी दोन्ही समुदायातील प्रमुख व्यक्तींची तातडीची बैठक घेतली. "ही घटना दोन समाजातील नसून वैयक्तिक वादाचा परिणाम आहे. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही," अशा शब्दांत त्यांनी संबंधितांना समज दिली आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी जनतेला खालील बाबींचे आवाहन केले आहे: अफवांकडे दुर्लक्ष करा: सोशल मीडियावरील मेसेजची खातरजमा केल्याशिवाय ते फॉरवर्ड करू नका. उद्या शिवजयंतीचा मोठा सण आहे. हा उत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करा, अफवा पसरवणाऱ्या आयडीवर सायबर सेलचे बारीक लक्ष असून, दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,शहरात शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही चिथावणीखोर गोष्टींना बळी पडू नये.3