logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नांद्रा येथे शॉर्टसर्किटमुळे गहू पीक जळून खाक; शेतकऱ्याचे सुमारे ५० हजारांचे नुकसान नांद्रा येथे शॉर्टसर्किटमुळे गहू पीक जळून खाक; शेतकऱ्याचे सुमारे ५० हजारांचे नुकसान नांद्रा ता. पाचोरा प्रतिनिधी – नांद्रा येथील शेतकरी राहुल देविदास सूर्यवंशी यांच्या शेतात वीज तारांच्या शॉर्टसर्किटमुळे गहू पीक जळून खाक झाल्याची घटना घडली असून यामध्ये सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राहुल सूर्यवंशी यांच्या गट क्रमांक २७८/२/१ मधील सुमारे तीन एकर शेतात गव्हाची पेरणी करण्यात आली होती. पीक पूर्णपणे पिकून काढणीस तयार झाले होते. हार्वेस्टर मशीन मिळत नसल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गहू काढणीची तयारी सुरू होती. दरम्यान, शेतातून गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या लोंबकळणाऱ्या तारांमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन ठिणगी पडल्याने सुमारे दोन एकरांवरील गहू पीक आगीत जळून खाक झाले. या घटनेत शेतकऱ्याचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले. घटनेनंतर वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अनिकेत सावळे, लाईनमन सागर पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन जळालेल्या पिकाची पाहणी केली. पुढील पंचनाम्यासाठी वरिष्ठ अधिकारी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले की, त्यांच्या शेतातून गेलेल्या वीज तारा बराच काळ लोंबकळत असून त्या डोक्याला लागतील अशा स्थितीत आहेत. याबाबत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वारंवार तोंडी सूचना देऊनही कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही. ऐन उन्हाच्या दाहकतेत पडलेल्या छोट्या ठिणगीमुळे संपूर्ण पीक जळून गेल्याने त्यांनी वीज वितरणाच्या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्यावी तसेच शेतातील लोंबकळणाऱ्या तारांची दोन दिवसांत दुरुस्ती करावी, अन्यथा माहेजी उपकेंद्रावर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा राहुल सूर्यवंशी यांनी दिला आहे. या वेळी समाधान सूर्यवंशी, बाळू सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. तसेच उन्हाळ्यात वीज तारांमुळे अशा घटना घडू नयेत यासाठी शेतकरी बंधूंनी गुरे-ढोरे व शेतमाल वीज तारांच्या खाली ठेवताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

6 hrs ago
user_Pramod dada bari
Pramod dada bari
Pachora, Jalgaon•
6 hrs ago
84426c43-d25e-410e-8eb2-40ac8caf5b36

नांद्रा येथे शॉर्टसर्किटमुळे गहू पीक जळून खाक; शेतकऱ्याचे सुमारे ५० हजारांचे नुकसान नांद्रा येथे शॉर्टसर्किटमुळे गहू पीक जळून खाक; शेतकऱ्याचे सुमारे ५० हजारांचे नुकसान नांद्रा ता. पाचोरा प्रतिनिधी – नांद्रा येथील शेतकरी राहुल देविदास सूर्यवंशी यांच्या शेतात वीज तारांच्या शॉर्टसर्किटमुळे गहू पीक जळून खाक झाल्याची घटना घडली असून यामध्ये सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राहुल सूर्यवंशी यांच्या गट क्रमांक २७८/२/१ मधील सुमारे तीन एकर शेतात गव्हाची पेरणी करण्यात आली होती. पीक पूर्णपणे पिकून काढणीस तयार झाले होते. हार्वेस्टर मशीन मिळत नसल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गहू काढणीची तयारी सुरू होती. दरम्यान, शेतातून गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या लोंबकळणाऱ्या तारांमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन ठिणगी पडल्याने सुमारे दोन एकरांवरील गहू पीक आगीत जळून खाक झाले. या घटनेत शेतकऱ्याचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले. घटनेनंतर वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अनिकेत सावळे, लाईनमन सागर पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन जळालेल्या पिकाची पाहणी केली. पुढील पंचनाम्यासाठी वरिष्ठ अधिकारी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले की, त्यांच्या शेतातून गेलेल्या वीज तारा बराच काळ लोंबकळत असून त्या डोक्याला लागतील अशा स्थितीत आहेत. याबाबत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वारंवार तोंडी सूचना देऊनही कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही. ऐन उन्हाच्या दाहकतेत पडलेल्या छोट्या ठिणगीमुळे संपूर्ण पीक जळून गेल्याने त्यांनी वीज वितरणाच्या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्यावी तसेच शेतातील लोंबकळणाऱ्या तारांची दोन दिवसांत दुरुस्ती करावी, अन्यथा माहेजी उपकेंद्रावर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा राहुल सूर्यवंशी यांनी दिला आहे. या वेळी समाधान सूर्यवंशी, बाळू सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. तसेच उन्हाळ्यात वीज तारांमुळे अशा घटना घडू नयेत यासाठी शेतकरी बंधूंनी गुरे-ढोरे व शेतमाल वीज तारांच्या खाली ठेवताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सोयगाव पंचायत समिती सभापतीपदी उत्तम चव्हाण; उपसभापतीपदी गयाबाई घोडे सोयगाव प्रतिनिधी : सोयगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे उत्तम महारू चव्हाण यांची तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) च्या गयाबाई गोविंदा घोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे सोयगाव पंचायत समितीवर भाजप-शिवसेना (शिंदे) युतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे. मंगळवारी (दि. १० मार्च) पंचायत समिती सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी एकनाथ बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी उत्तम चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, तर उपसभापती पदासाठी गयाबाई गोविंदा घोडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले. यावेळी ईदरीस मुलतानी, पुष्पाताई काळे नारायण कोलते, शिवाजी बुढाळ, प्रदीप चव्हाण, दारासिंग शेषमल चव्हाण, रहीम पठाण, गुलाबराव कोलते, जयप्रकाश चव्हाण, गणेश लोखंडे, युसुफ पठाण, शेख निसार, मोहम्मद नूर, अजित खान, अजीज खान, हरी भांबरे, प्रभाकर सूर्यवंशी व भाजपा तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    1
    सोयगाव पंचायत समिती सभापतीपदी उत्तम चव्हाण; उपसभापतीपदी गयाबाई घोडे
सोयगाव प्रतिनिधी :
सोयगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे उत्तम महारू चव्हाण यांची तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) च्या गयाबाई गोविंदा घोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे सोयगाव पंचायत समितीवर भाजप-शिवसेना (शिंदे) युतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे.
मंगळवारी (दि. १० मार्च) पंचायत समिती सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी एकनाथ बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी उत्तम चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, तर उपसभापती पदासाठी गयाबाई गोविंदा घोडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले. यावेळी ईदरीस मुलतानी, पुष्पाताई काळे  नारायण कोलते, शिवाजी बुढाळ, प्रदीप चव्हाण, दारासिंग शेषमल चव्हाण, रहीम पठाण, गुलाबराव कोलते, जयप्रकाश चव्हाण, गणेश लोखंडे, युसुफ पठाण, शेख निसार, मोहम्मद नूर, अजित खान, अजीज खान, हरी भांबरे, प्रभाकर सूर्यवंशी व भाजपा तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ लेणीतील दहा नंबरच्या लेणीतील बौद्ध मूर्तिवर किरणोत्सव या सोळाव्याला मोठ्या संख्येने पर्यटकासह भाविकांना अनुभवयास मिळाला. स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण चौतीस लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार असून यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात. हीच सूर्यकिरणें मूर्तिच्या चेहऱ्यावरती आले. आगामी पाच ते सहा दिवस हा सोहळा भाविकासह पर्यटकाना अनुभवता येईल..
    1
    जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ लेणीतील दहा नंबरच्या लेणीतील बौद्ध मूर्तिवर किरणोत्सव या सोळाव्याला मोठ्या संख्येने पर्यटकासह भाविकांना अनुभवयास मिळाला. स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये एकूण चौतीस लेण्या आहेत. यामध्ये बारा बौद्ध लेणी आहेत. तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार असून यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात. हीच सूर्यकिरणें मूर्तिच्या चेहऱ्यावरती  आले. आगामी पाच ते सहा दिवस हा सोहळा भाविकासह पर्यटकाना अनुभवता येईल..
    user_Vishal Chavan
    Vishal Chavan
    Photographer सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • लाखोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती
    1
    लाखोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती
    user_SUPER MAHARASHTRA NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    SUPER MAHARASHTRA NEWS TV CHANNEL SANDIP SHAHANE
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • क्रांती चौकात 'पुतळा युद्ध'! आंदोलकांचा एल्गार की पोलिसांची धावपळ? सत्तेच्या रक्षणार्थ खाकी मैदानात! ​छत्रपती संभाजीनगर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार देशासाठी 'धोकादायक' असल्याचा गंभीर आरोप करत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांती चौकात जो 'हायव्होल्टेज ड्रामा' रंगला, त्याने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. आंदोलकांनी निषेधाचा पुतळा उगारला खरा, पण तो जाळण्यापूर्वीच पोलिसांनी जो 'मॅरेथॉन' धावण्याचा पराक्रम केला, तो पाहून उपस्थित नागरिकही अवाक झाले. ​ सवाल: लोकशाही की दडपशाही? ​या घटनेनंतर आता काही ज्वलंत प्रश्न उपस्थित होत आहेत: १. जनतेचा आक्रोश पुतळ्यातच अडकलाय का? जनतेचा निषेध नोंदवण्याचा हक्क पोलिसांच्या बळावर किती काळ दाबला जाणार? २. पोलिसांची ही 'धाव' कोणासाठी? पुतळा वाचवण्यासाठी पोलिसांनी जी तत्परता दाखवली, तीच तत्परता शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी का दिसत नाही? ३. सरकार खरोखरच 'धोकादायक' वळणावर आहे का? वंचितच्या आरोपांमध्ये तथ्य आहे की हे केवळ राजकीय शक्तीप्रदर्शन? ​ काय घडलं नेमकं? ​आज, ११ मार्च २०२६ रोजी क्रांती चौकात वंचितच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने पंतप्रधान मोदींचा पुतळा मैदानात आणला. "देश वाचवा, संविधान वाचवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांनी पुतळा पेटवण्याचा प्रयत्न करताच, पोलिसांनी जी झटापट केली ती एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी होती. आंदोलकांच्या हातातून पुतळा हिसकावून घेऊन पोलीस कर्मचारी अक्षरशः धावत सुटले. जणू काही एखादा जिवंत माणूस वाचवण्यासाठी ही धावपळ होती! ​वाहतुकीचा खोळंबा की प्रशासनाचे अपयश? ​तासभर जालना रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्वसामान्य नागरिक उन्हात होरपळत होते. पण प्रशासनाला मात्र आंदोलकांचे आवाज दाबण्यात आणि पुतळ्याचे रक्षण करण्यातच जास्त रस दिसला. ​कार्यकर्त्यांचा पवित्रा स्पष "आमचा आवाज दाबाल, पण विचारांना कसं रोखाल?" ​सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे आंदोलन आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. ​प्रतिनिधी: गौतम हिवराळे
    1
    क्रांती चौकात 'पुतळा युद्ध'! आंदोलकांचा एल्गार की पोलिसांची धावपळ? सत्तेच्या रक्षणार्थ खाकी मैदानात!
​छत्रपती संभाजीनगर 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार देशासाठी 'धोकादायक' असल्याचा गंभीर आरोप करत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने क्रांती चौकात जो 'हायव्होल्टेज ड्रामा' रंगला, त्याने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. आंदोलकांनी निषेधाचा पुतळा उगारला खरा, पण तो जाळण्यापूर्वीच पोलिसांनी जो 'मॅरेथॉन' धावण्याचा पराक्रम केला, तो पाहून उपस्थित नागरिकही अवाक झाले.
​  सवाल: लोकशाही की दडपशाही?
​या घटनेनंतर आता काही ज्वलंत प्रश्न उपस्थित होत आहेत:
१. जनतेचा आक्रोश पुतळ्यातच अडकलाय का? जनतेचा निषेध नोंदवण्याचा हक्क पोलिसांच्या बळावर किती काळ दाबला जाणार?
२. पोलिसांची ही 'धाव' कोणासाठी? पुतळा वाचवण्यासाठी पोलिसांनी जी तत्परता दाखवली, तीच तत्परता शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी का दिसत नाही?
३. सरकार खरोखरच 'धोकादायक' वळणावर आहे का? वंचितच्या आरोपांमध्ये तथ्य आहे की हे केवळ राजकीय शक्तीप्रदर्शन?
​ काय घडलं नेमकं?
​आज, ११ मार्च २०२६ रोजी क्रांती चौकात वंचितच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने पंतप्रधान मोदींचा पुतळा मैदानात आणला. "देश वाचवा, संविधान वाचवा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांनी पुतळा पेटवण्याचा प्रयत्न करताच, पोलिसांनी जी झटापट केली ती एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी होती. आंदोलकांच्या हातातून पुतळा हिसकावून घेऊन पोलीस कर्मचारी अक्षरशः धावत सुटले. जणू काही एखादा जिवंत माणूस वाचवण्यासाठी ही धावपळ होती!
​वाहतुकीचा खोळंबा की प्रशासनाचे अपयश?
​तासभर जालना रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सर्वसामान्य नागरिक उन्हात होरपळत होते. पण प्रशासनाला मात्र आंदोलकांचे आवाज दाबण्यात आणि पुतळ्याचे रक्षण करण्यातच जास्त रस दिसला.
​कार्यकर्त्यांचा पवित्रा स्पष "आमचा आवाज दाबाल, पण विचारांना कसं रोखाल?"
​सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे आंदोलन आता शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
​प्रतिनिधी:
गौतम हिवराळे
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • धुळे शहरात 8 जून 2018 रोजी घडलेल्या गाजलेल्या रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या पिता-पुत्राच्या दुहेरी खून प्रकरणाचा अंतिम फैसला उद्यावर ढकलण्यात आला आहे. या प्रकरणात धुळ्याचे माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह 12 जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता असल्यामुळे धुळे जिल्हा न्यायालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती. मात्र न्यायमूर्तींनी अंतिम निर्णय उद्या जाहीर करण्याचे निश्चित केले.
    1
    धुळे शहरात 8 जून 2018 रोजी घडलेल्या गाजलेल्या रावसाहेब पाटील आणि वैभव पाटील या पिता-पुत्राच्या दुहेरी खून प्रकरणाचा अंतिम फैसला उद्यावर ढकलण्यात आला आहे. या प्रकरणात धुळ्याचे माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार यांच्यासह 12 जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
आज आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता असल्यामुळे धुळे जिल्हा न्यायालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती. मात्र न्यायमूर्तींनी अंतिम निर्णय उद्या जाहीर करण्याचे निश्चित केले.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • #marathi#newsjalna#
    1
    #marathi#newsjalna#
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    17 hrs ago
  • Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    1
    Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. इराण, इराक आणि अमेरिका या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कालपासून अनेक हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाले आहे.
    1
    धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. इराण, इराक आणि अमेरिका या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कालपासून अनेक हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाले आहे.
    user_Dhule News 24
    Dhule News 24
    Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.