logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

भारत अध्यात्माची मोठी परंपरा असलेला आणि विविधतेने नटलेला देश आहे, जिथे कुलदेवता आणि इष्ट देवतांना सर्वोच्च स्थान दिले जाते. लग्नकार्ये किंवा इतर शुभ कार्यांपूर्वी किंवा नंतर देवाचे दर्शन घेणे ही हजारो वर्षांची परंपरा आहे. कोट्यवधी भाविक सांसारिक अडचणी, आजारपण, धनप्राप्ती, पुत्रप्राप्ती किंवा केवळ मनाच्या शांतीसाठी दरवर्षी विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देतात. मात्र, आजच्या काळात धार्मिक स्थळांवरील ही अफाट गर्दी आणि तिचे बदललेले स्वरूप खरंच आवश्यक आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या धार्मिक क्षेत्रांचे मोठ्या प्रमाणावर 'पर्यटनात' रूपांतर झाले असून, भाविकांची संख्या प्रचंड वाढत आहे. दुर्दैवाने, मंदिर प्रशासनाचा कारभार अत्यंत नियोजनशून्य असल्याचा अनुभव पावलोपावली येतो. तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतर मुख्य गाभाऱ्याजवळ पोहोचलेल्या भाविकांना मंदिरातील कर्मचाऱ्यांकडून अरेरावी, उद्धट भाषा आणि ढकलाढकलीला सामोरे जावे लागते. ज्या देवाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेले असतात, त्या देवाचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी त्यांना साधे पाच सेकंदही दिले जात नाहीत आणि वस्तूसारखे बाहेर हाकलले जाते. आजच्या महागाईच्या काळात एका सामान्य भाविकाला आपल्याच राज्यातील एखाद्या मोठ्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी किमान १,००० ते ५,००० रुपये खर्च येतो. परराज्यातील मंदिरासाठी तर हा खर्च १०,००० ते १ लाखांपर्यंत पोहोचतो. 'चारधाम' सारख्या पवित्र यात्रेसाठी तर लोक आयुष्याची पुंजी, म्हणजेच लाखो रुपये खर्च करतात, ते केवळ आणि केवळ आस्थेपोटी. या प्रवासात होणारा शारीरिक त्रास, वाहतुकीची कोंडी, राहण्या-खाण्याची गैरसोय हे सर्व सोसून जेव्हा भाविक मंदिराबाहेर पडतो, तेव्हा त्याच्या मनात एकच विचार येतो की, "इतका पैसा खर्च करून, एवढा त्रास सहन करून मी स्वतःला अपमानित करून घेण्यासाठी इथे आलो होतो का?" परिणामी, मनशांतीसाठी गेलेला माणूस मनावर खोल जखम आणि यातना घेऊन घरी परततो. पूर्वी देवदर्शन शांततेत, एकांतात आणि श्रद्धेने केले जायचे. परंतु आज तिथे सोशल मीडियावरील 'रील्स', 'स्टेटस' आणि व्ही.आय.पी. (VIP) संस्कृतीचा सुळसुळाट झाला आहे. पैशांच्या जोरावर मिळणारे व्ही.आय.पी. दर्शन हे खऱ्या आणि गरीब भाविकाच्या श्रद्धेचा अपमान करणारे आहे. देव कधीच सांगत नाही की माझ्या दर्शनासाठी स्वतःचा अपमान करून घ्या किंवा हजारो-लाखो रुपये खर्च करून गर्दीचा हिस्सा बना. मंदिर कमिटी, प्रशासन आणि ट्रस्टींनी आता या विषयावर गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांनी आपल्या अंतर्गत असलेल्या सेवेकरी, पुजारी, सुरक्षा रक्षक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना शिस्त व शिष्टाचाराचे धडे दिले पाहिजेत, तसेच भाविकांशी प्रेमळ व आदराची भाषा वापरण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले पाहिजे. मंदिराच्या प्रशासनाने एक कटू पण त्रिकालबाधित सत्य लक्षात ठेवले पाहिजे की, मंदिरात येणारी प्रत्येक व्यक्ती केवळ एक साधा भाविक नसून, ती या संपूर्ण व्यवस्थेचा 'मालक' आहे. भाविक श्रद्धेने दानपेटीत टाकतात आणि विविध सेवांचे शुल्क भरतात, त्याच पैशातून तिथल्या पुजाऱ्यांपासून ते सुरक्षारक्षकांपर्यंत सर्वांचे पगार होतात आणि त्यांचे संसार चालतात. ज्यांच्या पैशावर आपला उदरनिर्वाह चालतो, त्यांचाच अपमान करण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांना कोणी दिला? हा कृतघ्नपणा थांबायलाच हवा. केवळ मंदिर प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही, तर शासनानेही या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक मोठ्या मंदिरांवर सरकारी नियंत्रण किंवा प्रशासकीय बोर्ड असतात. शासनाने कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करून, मंदिर ट्रस्टी आणि नियुक्त अधिकाऱ्यांवर भाविकांच्या वाढत्या तक्रारींनुसार थेट कारवाईची तरतूद करायला हवी. जर एखाद्या मंदिरात भाविकांशी गैरवर्तन होत असेल, तर तिथल्या प्रशासकीय प्रमुखाला थेट जबाबदार धरून त्यांच्यावर दंडात्मक किंवा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, तरच या व्यवस्थेला वचक बसेल. या सगळ्या मनस्तापातून मार्ग काढण्यासाठी भाविकांनीही आता आपली मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. "सेवा परमो धर्मः" आणि "मानव सेवा हीच ईश्वर सेवा" हा आपल्या संस्कृतीचा मूळ गाभा आहे. हजारो-लाखो रुपये खर्च करून, रांगेत अपमान सोसून देवदर्शन घेण्याऐवजी, 'माणसात देव शोधण्याची' प्रवृत्ती आपण वाढीस लावली पाहिजे. आपल्या आजूबाजूला अनेक गरजू, गरीब, अनाथ मुले आणि वृद्ध व्यक्ती असतात. मंदिराच्या पेटीत लाखो रुपये अर्पण करण्याऐवजी, जर आपण आपल्या परिसरातील एखाद्या भुकेलेल्याला अन्न दिले, एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला, किंवा रुग्णाला उपचारासाठी मदत केली, तर त्यातून मिळणारा आनंद आणि मनशांती कोणत्याही मंदिरात मिळणाऱ्या शांतीपेक्षा नक्कीच मोठी असेल. तोच खऱ्या अर्थाने ईश्वराचा आशीर्वाद ठरेल. सादरकर्ता: गजानन गंगाधरराव बिडकर मुख्य संपादक: साप्ताहिक महिमा खादीचा तेलंगणा राज्यध्यक्ष: पुरोगामी पत्रकार संघ (भारत)

1 hr ago
user_Gajanan Bidkar
Gajanan Bidkar
Nanded, Maharashtra•
1 hr ago
0c04e919-958e-4119-8b02-9b5c5de5bb5f

भारत अध्यात्माची मोठी परंपरा असलेला आणि विविधतेने नटलेला देश आहे, जिथे कुलदेवता आणि इष्ट देवतांना सर्वोच्च स्थान दिले जाते. लग्नकार्ये किंवा इतर शुभ कार्यांपूर्वी किंवा नंतर देवाचे दर्शन घेणे ही हजारो वर्षांची परंपरा आहे. कोट्यवधी भाविक सांसारिक अडचणी, आजारपण, धनप्राप्ती, पुत्रप्राप्ती किंवा केवळ मनाच्या शांतीसाठी दरवर्षी विविध तीर्थक्षेत्रांना भेटी देतात. मात्र, आजच्या काळात धार्मिक स्थळांवरील ही अफाट गर्दी आणि तिचे बदललेले स्वरूप खरंच आवश्यक आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या धार्मिक क्षेत्रांचे मोठ्या प्रमाणावर 'पर्यटनात' रूपांतर झाले असून, भाविकांची संख्या प्रचंड वाढत आहे. दुर्दैवाने, मंदिर प्रशासनाचा कारभार अत्यंत नियोजनशून्य असल्याचा अनुभव पावलोपावली येतो. तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतर मुख्य गाभाऱ्याजवळ पोहोचलेल्या भाविकांना मंदिरातील कर्मचाऱ्यांकडून अरेरावी, उद्धट भाषा आणि ढकलाढकलीला सामोरे जावे लागते. ज्या देवाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेले असतात, त्या देवाचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी त्यांना साधे पाच सेकंदही दिले जात नाहीत आणि वस्तूसारखे बाहेर हाकलले जाते. आजच्या महागाईच्या काळात एका सामान्य भाविकाला आपल्याच राज्यातील एखाद्या मोठ्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी किमान १,००० ते ५,००० रुपये खर्च येतो. परराज्यातील मंदिरासाठी तर हा खर्च १०,००० ते १ लाखांपर्यंत पोहोचतो. 'चारधाम' सारख्या पवित्र यात्रेसाठी तर लोक आयुष्याची पुंजी, म्हणजेच लाखो रुपये खर्च करतात, ते केवळ आणि केवळ आस्थेपोटी. या प्रवासात होणारा शारीरिक त्रास, वाहतुकीची कोंडी, राहण्या-खाण्याची गैरसोय हे सर्व सोसून जेव्हा भाविक मंदिराबाहेर पडतो, तेव्हा त्याच्या मनात एकच विचार येतो की, "इतका पैसा खर्च करून, एवढा त्रास सहन करून मी स्वतःला अपमानित करून घेण्यासाठी इथे आलो होतो का?" परिणामी, मनशांतीसाठी गेलेला माणूस मनावर खोल जखम आणि यातना घेऊन घरी परततो. पूर्वी देवदर्शन शांततेत, एकांतात आणि श्रद्धेने केले जायचे. परंतु आज तिथे सोशल मीडियावरील 'रील्स', 'स्टेटस' आणि व्ही.आय.पी. (VIP) संस्कृतीचा सुळसुळाट झाला आहे. पैशांच्या जोरावर मिळणारे व्ही.आय.पी. दर्शन हे खऱ्या आणि गरीब भाविकाच्या श्रद्धेचा अपमान करणारे आहे. देव कधीच सांगत नाही की माझ्या दर्शनासाठी स्वतःचा अपमान करून घ्या किंवा हजारो-लाखो रुपये

8ed54e18-a10f-4ee3-828e-aee742a031e1

खर्च करून गर्दीचा हिस्सा बना. मंदिर कमिटी, प्रशासन आणि ट्रस्टींनी आता या विषयावर गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांनी आपल्या अंतर्गत असलेल्या सेवेकरी, पुजारी, सुरक्षा रक्षक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना शिस्त व शिष्टाचाराचे धडे दिले पाहिजेत, तसेच भाविकांशी प्रेमळ व आदराची भाषा वापरण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले पाहिजे. मंदिराच्या प्रशासनाने एक कटू पण त्रिकालबाधित सत्य लक्षात ठेवले पाहिजे की, मंदिरात येणारी प्रत्येक व्यक्ती केवळ एक साधा भाविक नसून, ती या संपूर्ण व्यवस्थेचा 'मालक' आहे. भाविक श्रद्धेने दानपेटीत टाकतात आणि विविध सेवांचे शुल्क भरतात, त्याच पैशातून तिथल्या पुजाऱ्यांपासून ते सुरक्षारक्षकांपर्यंत सर्वांचे पगार होतात आणि त्यांचे संसार चालतात. ज्यांच्या पैशावर आपला उदरनिर्वाह चालतो, त्यांचाच अपमान करण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांना कोणी दिला? हा कृतघ्नपणा थांबायलाच हवा. केवळ मंदिर प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही, तर शासनानेही या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक मोठ्या मंदिरांवर सरकारी नियंत्रण किंवा प्रशासकीय बोर्ड असतात. शासनाने कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करून, मंदिर ट्रस्टी आणि नियुक्त अधिकाऱ्यांवर भाविकांच्या वाढत्या तक्रारींनुसार थेट कारवाईची तरतूद करायला हवी. जर एखाद्या मंदिरात भाविकांशी गैरवर्तन होत असेल, तर तिथल्या प्रशासकीय प्रमुखाला थेट जबाबदार धरून त्यांच्यावर दंडात्मक किंवा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, तरच या व्यवस्थेला वचक बसेल. या सगळ्या मनस्तापातून मार्ग काढण्यासाठी भाविकांनीही आता आपली मानसिकता बदलण्याची वेळ आली आहे. "सेवा परमो धर्मः" आणि "मानव सेवा हीच ईश्वर सेवा" हा आपल्या संस्कृतीचा मूळ गाभा आहे. हजारो-लाखो रुपये खर्च करून, रांगेत अपमान सोसून देवदर्शन घेण्याऐवजी, 'माणसात देव शोधण्याची' प्रवृत्ती आपण वाढीस लावली पाहिजे. आपल्या आजूबाजूला अनेक गरजू, गरीब, अनाथ मुले आणि वृद्ध व्यक्ती असतात. मंदिराच्या पेटीत लाखो रुपये अर्पण करण्याऐवजी, जर आपण आपल्या परिसरातील एखाद्या भुकेलेल्याला अन्न दिले, एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला, किंवा रुग्णाला उपचारासाठी मदत केली, तर त्यातून मिळणारा आनंद आणि मनशांती कोणत्याही मंदिरात मिळणाऱ्या शांतीपेक्षा नक्कीच मोठी असेल. तोच खऱ्या अर्थाने ईश्वराचा आशीर्वाद ठरेल. सादरकर्ता: गजानन गंगाधरराव बिडकर मुख्य संपादक: साप्ताहिक महिमा खादीचा तेलंगणा राज्यध्यक्ष: पुरोगामी पत्रकार संघ (भारत)

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमात हजारो महिला भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आपली उपस्थिती दर्शवली.
    1
    नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमात हजारो महिला भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आपली उपस्थिती दर्शवली.
    user_माधव गायकवाड
    माधव गायकवाड
    माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सध्या पेरणीपूर्व कामांमध्ये व्यस्त असून, मशागत, खत व्यवस्थापन आणि बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. मात्र, याच काळात सोयाबीन बियाण्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी २१५० रुपयांना मिळणारी सोयाबीन बियाण्याची बॅग आता ३२०० ते ३४०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. तसेच, मशागतीसाठी लागणारे डिझेल आणि पेट्रोल सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. शेतकरी वर्गाने सरकारकडे शेतीसाठी लागणारे बियाणे, खत, कीटकनाशके आणि शेती अवजारे यांच्या किमती नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे. जर किमती नियंत्रित केल्या नाहीत, तर आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
    1
    खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सध्या पेरणीपूर्व कामांमध्ये व्यस्त असून, मशागत, खत व्यवस्थापन आणि बियाणे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहेत. मात्र, याच काळात सोयाबीन बियाण्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी २१५० रुपयांना मिळणारी सोयाबीन बियाण्याची बॅग आता ३२०० ते ३४०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. तसेच, मशागतीसाठी लागणारे डिझेल आणि पेट्रोल सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.

शेतकरी वर्गाने सरकारकडे शेतीसाठी लागणारे बियाणे, खत, कीटकनाशके आणि शेती अवजारे यांच्या किमती नियंत्रणात आणण्याची मागणी केली आहे. जर किमती नियंत्रित केल्या नाहीत, तर आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • आज लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने नांदेड येथे एक बैठक यशस्वीपणे पार पडली आहे. या बैठकीमध्ये संघटनेच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाली आणि ती निर्धारित वेळेत संपन्न झाली.
    1
    आज लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने नांदेड येथे एक बैठक यशस्वीपणे पार पडली आहे. या बैठकीमध्ये संघटनेच्या कार्यपद्धतीवर चर्चा झाली आणि ती निर्धारित वेळेत संपन्न झाली.
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • वामनराव पाटिल वडगांवकर यांनी शेतकऱ्यांना एकत्र गट तयार करून खताची मागणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे आवश्यक खत वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सामूहिक सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
    1
    वामनराव पाटिल वडगांवकर यांनी शेतकऱ्यांना एकत्र गट तयार करून खताची मागणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे आवश्यक खत वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सामूहिक सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
    user_ALM Bharat
    ALM Bharat
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    15 min ago
  • अनुसूचित जाती आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेने वज्रमुठ महाआंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलन २७ एप्रिल २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलनाच्या स्वरूपात सुरू आहे. याच आंदोलनाच्या अनुषंगाने आज नांदेड येथे लोकस्वराज्य आंदोलन नांदेडच्या वतीने एक बैठक आयोजित करण्यात आली होती, जी नुकतीच संपन्न झाली. या बैठकीला लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. रामचंद्र भरांडे सर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
    1
    अनुसूचित जाती आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलन संघटनेने वज्रमुठ महाआंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलन २७ एप्रिल २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलनाच्या स्वरूपात सुरू आहे.

याच आंदोलनाच्या अनुषंगाने आज नांदेड येथे लोकस्वराज्य आंदोलन नांदेडच्या वतीने एक बैठक आयोजित करण्यात आली होती, जी नुकतीच संपन्न झाली. या बैठकीला लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. रामचंद्र भरांडे सर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लॉकरमधून 800 ग्रॅम सोने लंपास केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन कर्मचाऱ्यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
    1
    स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लॉकरमधून 800 ग्रॅम सोने लंपास केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन कर्मचाऱ्यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.