लेंगरे येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख संजय काटे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीनजी बानगुडे पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी पक्षाचे '80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण' हे ध्येयधोरण पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले. तसेच, 'गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक' हा संकल्पही यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत सफाई कामगार, उत्तीर्ण विद्यार्थी, माजी सैनिक आणि शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, जत तालुकाप्रमुख अमित दुधाळ, जत विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय बगले पाटील, उपसंघटक रमेश कदम, तासगाव तालुकाप्रमुख पुरण मलमे, उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते, सांगली शहर प्रमुख मयूर घोडके, उपजिल्हाप्रमुख गौरीशंकर भोसले, आटपाडी तालुकाप्रमुख शंकर गलवे, जिल्हा संघटक अजित खंदारे, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख सादिक भाई काजी तसेच कार्यक्रमाचे नियोजक खानापूर तालुकाप्रमुख प्रवीण चंदनशिवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या 'भगव्या एल्गार'च्या माध्यमातून घराघरात शिवसैनिक घडवण्याचा निर्धार पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आला.

- Post by होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन1
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अहिल्यानगर येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, मराठा समाजाला न्याय देणे हीच त्यांच्या सरकारची भूमिका राहिली आहे. पत्रकारांच्या समोरच अंतरवाली सराटी येथे मंत्री विखे पाटील आणि आमदार लाड यांनीही हेच विधान वाचून दाखवले.1
- हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे माती टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर सात जणांनी एकत्र येत एका कुटुंबावर हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या रक्तरंजित मारहाणीमध्ये महिलेसह कुटुंबातील सदस्यांवर काठीने हल्ला करण्यात आला. या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित सात जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गतही कलम लावण्यात आले असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.1
- कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 'थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर अभियान' या उपक्रमाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे.1
- गुजरातमध्ये एका रस्त्याच्या मधोमध एक होर्डिंग अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.1
- बारामती शहर आणि परिसरातील अवैध दारू व्यवसायावर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. या कारवाई अंतर्गत अवैध हातभट्ट्यांवर छापे टाकण्यात आले, ज्यामुळे अवैध दारू व्यवसायाला मोठा दणका बसला आहे.1
- भोर तालुक्यातील नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील त्रुटी आणि निकृष्ट कामकाजाबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत आमदार शंकर मांडेकर यांनी दि.31 रोजी आरोग्य केंद्राला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी इमारतीतील विविध त्रुटी, अपूर्ण कामे तसेच नागरिकांनी केलेल्या तक्रारींची पाहणी केली. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून, आमदार मांडेकर यांनी आढळलेल्या सर्व त्रुटींची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत, यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.1
- जेजुरी येथील एका टोल नाक्यावर रील स्टार महेश मोटे यांनी टोल भरण्यास नकार देत गोंधळ घातला. 'मी रील स्टार आहे, मी टोल देणार नाही,' असे म्हणत मोटे यांनी टोलनाक्यावर राडा केला होता. या घटनेनंतर, पुण्याच्या रील स्टार अमृता कुलकर्णी यांनी महेश मोटे यांच्या या कृतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. टोल भरण्यावरून महेश मोटे यांनी घातलेल्या या राड्यानंतर इतर अनेक रील स्टार्सनीही त्यांच्यावर टीका केली आहे.1