केळी उत्पादकांना दिलासा मिळणार; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार – मंत्री भरत गोगावले टेंभुर्णी : केळी पिकाच्या निर्यातीतील अडचणीमुळे अडकून पडलेल्या शेतकऱ्यांच्या पैशाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, संबंधित अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले. टेंभुर्णी येथे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांच्या पुढाकारातून केळी उत्पादक शेतकरी व विक्रेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. माढा, करमाळा व पंढरपूर तालुक्यातील केळी निर्यातीचे गेल्या तीन महिन्यांपासून अडकलेले पेमेंट हा मुख्य मुद्दा यावेळी चर्चेला आला. यावेळी बोलताना ना. गोगावले म्हणाले की, शेतकरी प्रचंड मेहनतीने शेती करतो; मात्र पेमेंट अडकून पडल्याने तो आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या बंदरांवर मोठ्या प्रमाणात केळीचे कंटेनर अडकून पडले आहेत. विक्रेते हे शेतकरी व व्यापारी यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून त्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रश्नावर तोडगा काढणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

- सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.1
- Post by Vijay Meher1
- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. येत्या दोन दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे देखील पत्रात अभिजित बिचुकले म्हणाले आहेत...1
- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतीथी निमीत्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने सालाबादा प्रमाणे आयोजीत करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवास आज मोठ्या भक्तीभावाने सुरूवात करण्यात आली. या धर्मसंकीर्तन महोत्सवातील पहिले पुष्प आज नाशिकच्या गायिका मीरा कुलकर्णी व सहगायिकांच्या भक्तीसंगीत गायनाने फुलले. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी गायिका मीरा कुलकर्णी व सहकलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. पुढे या भक्ती संगीत गायन सेवेत गायिका मीरा कुलकर्णी व सहगायिका अर्चना कुलकर्णी, वीणा देशपांडे यांनी एकल व समिश्र गायन सेवेतून भक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, शंभू शिवशंकर, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, निघालो घेऊनी दत्ताची पालखी, तारकमंत्र आदीसह अनेक भावगीते गाऊन श्री चरणी सेवा समर्पित केली. या गायन सेवेत त्यांना तबल्यावर जगदीश सोनवणे, हार्मोनियमवर ओंकार पाठक, टाळवर अक्षय सरदेशमुख यांनी साथ संगत केली. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, बाळासाहेब सरदेशमुख, राजाभाऊ सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, मल्लिनाथ बोधले, प्रा.शिवशरण अचलेर, राजू भोसले सर, रमेश शिंदे सर, अमर पाटील, बाळासाहेब एकबोटे, संतोष पराणे, ज्ञानेश्वर भोसले, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, रविराव महिंद्रकर, ऋषिकेश लोणारी, गिरीश पवार, नरसिंग क्षीरसागर, सागर गोंडाळ, महेश मस्कले, चंद्रकांत गवंडी यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले बहुसंख्य स्वामी भक्त उपस्थित होते.1
- Post by कर्जत लाईव्ह1
- Post by E city news network1
- Post by Vijay Meher1