आरपीआय नवीन कार्यकारणी जोमाने काम करेल - बाळासाहेब भागवत आरपीआय शहराध्यक्षपदी विलास कांबळे आणि सरचिटणीस पदावर दयानंद वाघमारे यांची निवड जाहीर पिंपरी, पुणे (दि. २५ मार्च २०२६) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक असणारा मोठा वर्ग पिंपरी चिंचवड शहरात वर्षानुवर्ष कार्यरत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिव, फुले, शाहू यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम पिंपरी चिंचवड शहरात करीत आहोत, हेच काम आणखी जोमाने करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची पिंपरी चिंचवड शहर नवीन कार्यकारणी जाहीर करत असल्याची माहिती आरपीआय प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत यांनी बुधवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष पदावर विलास कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सरचिटणीस दयानंद वाघमारे, कार्याध्यक्ष बाळासाहेब रोकडे आणि लिंबराज कांबळे, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप नाना साळवे यांच्यासह इतर पदांवर देखील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे अशी माहिती आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष के. एम. बुक्तर यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेस सरचिटणीस, अ.आ.म.प. खाजाभाई शेख, पश्चिम महाराष्ट्र सचिव रमेश चिमूरकर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश कानडी, जेष्ठ आरपीआय नेत्या लताताई ओव्हाळ, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, महिला शहराध्यक्ष कमलताई कांबळे आदींसह नवनियुक्त कार्यकारणी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. गेल्या ३० ते ४० वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शहरात रुजवणारे व चळवळीमध्ये काम केलेले जेष्ठ वरिष्ठ पॅंथर कार्यकर्ते आणि नव्याने चळवळीत सहभाग घेणारे युवा पॅंथर यांना एकत्र करून नवीन कार्यकारणी निवडण्यात आली आहे अशी माहिती आरपीआय पश्चिम महाराष्ट्र सचिव रमेश चिमूरकर यांनी यावेळी दिली. शहरातील सामान्य, गोरगरीब, दुर्लक्षित, वंचित, झोपडीधारकांना न्याय देण्यासाठी नवीन कार्यकारणी सक्षमपणे काम करेल. वेळप्रसंगी धार्मिक व राजकीय प्रश्नांवर देखील रस्त्यावर उतरून आरपीआय आंदोलन करेल, सर्व वरिष्ठ पदाधिकारी नव्या कार्यकारणीला मार्गदर्शन करेल असे आरपीआयच्या वरिष्ठ नेत्या माजी नगरसेविका लताताई ओव्हाळ यांनी सांगितले. आरपीआय पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी नव्याने नियुक्त झालेले विलास कांबळे यांनी उपाध्यक्ष बाळासाहेब जोगदंड, रमेश गजरमल, विशाल कदम, रघु गव्हाळे, प्रकाश बुक्तर, अशोक कांबळे, सुरेश आठवले, नंदू मस्के; पक्षप्रवक्ता भारत बनसोडे, संपर्क प्रमुख विकास कडलक, प्रसिद्धी प्रमुख अभिजीत चव्हाण, सदस्य सुंदर कांबळे, संघटक पांडुरंग कांबळे, दुर्गाप्पा देवकर, सह संघटक सुभाष मस्के, शरणू नाटेकर, सहसचिव तुकाराम गायकवाड, सचिव बालाजी जाधव, सल्लागार गोरख गायकवाड, विठ्ठल माने यांची निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले. -

- अतिक्रम विभागांच्या बीटनिरक्षकाच काम फक्त नोटीस देणंच नव्हे .कारवाई करणे देखील त्यांचे कर्तव्य आहे1
- वरुडमध्ये शेतातील नाल्यात अर्धवट जळालेला अज्ञात मृतदेह सापडला1
- पिंपरी चिंचवड : - हिंजवडीच्या ब्लु रिच सोसायटी आणि परिसरात मोठी गारपीट झाली. या गारपिटीची दृश्य इथल्या रहिवाश्यांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. अतिशय विलोभनीय अशी ही दृश्य आहेत, जणू आपण बर्फाळ प्रदेशात आहोत, असं वाटावं... #हिंजवडी #पिंपरीचिंचवड #गारपीट #अवकाळीपाऊस #हवामानबदल #निसर्गचमत्कार #व्हायरलव्हिडिओ #ब्लुरिचसोसायटी #पुणेन्यूज #गारांचा_वर्षाव #Hinjewadi #PimpriChinchwad #Hailstorm #UnseasonalRain #WeatherUpdate #Nature #ViralVideo #BlueRidge #PuneNews #ClimateChange3
- पुण्यात पावसाचा तडाका पुणेकर गाराठले भर उन्हात पावसाचा तडाका1
- Post by Kishor subhash jadhav1
- विक्रम शिंदे / भोर दि.30 भोर शहराला अवकाळी पावसाने झोडपले.बऱ्याच ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने नदी नाल्याचे स्वरूप.पावसाच्या पाण्यामुळे अनंत नगर भोर येथे ये जा करण्यासाठी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता आणि ड्रेन लाईन नगरपालिकेने करून दिलं असतं तर बर झालं असतं. असे नागरिकांचे म्हणणे. वस्ती साठी पैसे आले होते त्यानुत काम करता आले असते पण तसे न करता त्यावेळी दुसरी कडील रस्ता केला गेला. नागरिकाची संतप्त प्रतिकिया .1
- शिरूर तालुक्यातील वरुडे-धामारी रोडवर भरधाव वेगातील कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळून खड्ड्यात कोसळली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे.1
- आठवले साहेबांच्या आदेशाने निवडणुकीत काम केलं 'आरपीआय वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख1