वृक्ष रक्षाबंधन: 'ही राखी दोऱ्याची नाही, तर श्वासाची!' ग्रीन लातूर वृक्ष टीमचा एक स्तुत्य कार्यक्रम. वृक्ष रक्षाबंधन: 'ही राखी दोऱ्याची नाही, तर श्वासाची!' ग्रीन लातूर वृक्ष टीमचा एक स्तुत्य कार्यक्रम. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला पर्यावरणीय जाणीवेची जोड देत 'ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन'तर्फे शहरात आगळ्यावेगळ्या पद्धतीने 'वृक्ष रक्षाबंधन' साजरा करण्यात आला. आपल्याला आयुष्यभर प्राणवायू आणि सावली देणाऱ्या वृक्षांचे रक्षण व संवर्धन करण्याची शपथ घेत सदस्यांनी झाडांना रक्षासूत्र बांधले. उपक्रमातील प्रमुख कामे: टॅक्सी पॉईंट: तोडलेल्या ३ झाडांच्या जागी नवीन झाडे लावली. स्मृती वृक्ष परिसर: तोडलेल्या ६ झाडांच्या ठिकाणी ट्रिगार्डसह नवीन झाडे लावून पिंपळाच्या झाडाला मोठी राखी बांधली. भुयारी मार्ग: चोरीला गेलेल्या व फुटलेल्या कुंड्यांची डागडुजी करून नवीन झाडे व कुंड्या बसवल्या. शहराला हरित करण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या या फाऊंडेशनने, प्रत्येक लातूरकराने किमान एका झाडाचे पालकत्व स्वीकारावे असे आवाहन केले आहे.
वृक्ष रक्षाबंधन: 'ही राखी दोऱ्याची नाही, तर श्वासाची!' ग्रीन लातूर वृक्ष टीमचा एक स्तुत्य कार्यक्रम. वृक्ष रक्षाबंधन: 'ही राखी दोऱ्याची नाही, तर श्वासाची!' ग्रीन लातूर वृक्ष टीमचा एक स्तुत्य कार्यक्रम. सुरू ॲप इन मराठी न्यूज
लातूर. शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला पर्यावरणीय जाणीवेची जोड देत 'ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन'तर्फे शहरात आगळ्यावेगळ्या पद्धतीने 'वृक्ष रक्षाबंधन' साजरा करण्यात आला. आपल्याला आयुष्यभर प्राणवायू आणि सावली देणाऱ्या वृक्षांचे रक्षण
व संवर्धन करण्याची शपथ घेत सदस्यांनी झाडांना रक्षासूत्र बांधले. उपक्रमातील प्रमुख कामे: टॅक्सी पॉईंट: तोडलेल्या ३ झाडांच्या जागी नवीन झाडे लावली. स्मृती वृक्ष परिसर: तोडलेल्या ६ झाडांच्या ठिकाणी ट्रिगार्डसह नवीन झाडे लावून पिंपळाच्या झाडाला मोठी राखी
बांधली. भुयारी मार्ग: चोरीला गेलेल्या व फुटलेल्या कुंड्यांची डागडुजी करून नवीन झाडे व कुंड्या बसवल्या. शहराला हरित करण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या या फाऊंडेशनने, प्रत्येक लातूरकराने किमान एका झाडाचे पालकत्व स्वीकारावे असे आवाहन केले आहे.
- धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* *धनंजय मुंडेंचे रक्षाबंधन; मंत्री पंकजाताई मुंडे, आदिती ताई तटकरे तसेच प्रमिलाताई केंद्रे यांनी बांधली राखी* मुंबई (प्रतिनिधी) - माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मुंबई येथे आपल्या भगिनी मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री आदिती ताई तटकरे तसेच पुणे येथे सौ. प्रमिलाताई पुरुषोत्तम केंद्रे यांच्या कडून राखी बांधून रक्षा बंधन साजरे केले आहे. तीनही बहिणींकडून राखी बांधून तिघींच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा तसेच कायम जनतेची सेवा घडावी, अशा शुभेच्छा धनंजय मुंडे यांनी आपल्या बहिणींना दिल्या. पंकजाताई मुंडे, प्रमिलाताई केंद्रे तसेच आपल्या सर्व बहिणी यांच्याबरोबरच आदितीताई तटकरे यांच्या समवेत धनंजय मुंडे हे दरवर्षी न चुकता रक्षा बंधन साजरे करतात, ही परंपरा त्यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे.2
- DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं? धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा. DHARASHIV चला पाहू आज कुठे काय घडलं? धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील आणि परिसरातील दिनांक २७/०८/२०२६ रोजीच्या दहा ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा हा विशेष आढावा. या व्हिडिओमध्ये धाराशिव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, गुन्हेगारी, विकासकामे, स्थानिक समस्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे. 📍 धाराशिव | उस्मानाबाद व परिसर 🗓️ दिनांक : २७ ऑगस्ट २०२६ अशाच स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी झुंजार SC 37 NEWS OSMANABAD चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबा. 📞 संपर्क : 08805974164 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share ↗️ करा आणि तुमचे मत Comment मध्ये नक्की कळवा.1
- शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड शेख फयाज शेख शब्बीर यांची शिवसेना अल्पसंख्याक पाथरी विधानसभा तालुकाप्रमुख पदी निवड1
- ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न ३५ वर्षांनंतर शालेय आठवणींना उजाळा: श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील श्री लक्ष्मणराव जाहेर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. २६ ऑगस्ट २०२६ रोजी बीड येथील जालना रोडवरील विठ्ठल साई प्रतिष्ठान येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर भेटलेल्या बालपणीच्या मैत्रिणींनी शालेय जीवनातील जुन्या आणि सोनेरी आठवणींना उजाळा दिला. संसाराच्या व्यापातून स्वतःसाठी एक दिवस सामाजिक कार्यकर्त्या रुक्मिणी नागापुरे (कळसकर) यांच्या विशेष पुढाकाराने या अनोख्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लग्नानंतर संसाराच्या व्यापात आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या महिलांना एक दिवस स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी जगता यावा, हा यामागचा प्रमुख उद्देश होता. यासाठी कुमशी, घोसापुरी आणि नामलगाव परिसरातील १९९०-९१ या बॅचच्या (इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वी) माजी विद्यार्थिनींना एकत्र आणण्यात आले. खेळ, शिदोरी आणि मनमोकळ्या गप्पा तब्बल साडेतीन दशकांनंतर भेटल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता. या सर्वजणींनी संपूर्ण दिवस एकमेकींना गजरे लावून, सुख-दुःखाच्या गप्पा मारत आणि मनमोकळेपणाने संवाद साधत (शेअरिंग करून) बालपणातील ते दिवस पुन्हा अनुभवले. या मेळाव्यातील काही खास क्षण: पारंपरिक खेळ: या वयातही महिलांनी शाळेच्या मैदानावर खेळले जाणारे खो-खो, आंधळी कोशिंबीर आणि पायदोड यांसारखे पारंपरिक खेळ खेळून मनसोक्त आनंद लुटला. सहभोजन: प्रत्येकीने घरून आणलेली 'शिदोरी' एकत्र करून सर्वजणींनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला. रक्षाबंधन व स्नेहभेट: मैत्रिणींनी एकमेकींना राखी बांधून मैत्रीचे हे अतूट नाते अधिक घट्ट केले आणि एकमेकींना स्नेहभेटही दिली. या आनंददायी आणि भावपूर्ण मेळाव्याला मीरा बांड, शिवकन्या बांड, शारदा शेळके, किस्किनदा बांड, मंगल करपे, कांता शिंदे, उषा जाधव, शालिनी नेरे, दैवशाला डोळस आणि रुक्मिणी नागापुरे आदी माजी विद्यार्थिनींची प्रमुख उपस्थिती होती. ३५ वर्षांनंतरचा हा मेळावा सर्वांसाठीच एक अविस्मरणीय अनुभव ठरला.2
- मुखेडमध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा सामाजिक संदेश; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या शिबिरात ६४ जणांचे रक्तदान1
- नांदेड महापालिकेतील भ्रष्टाचार कधी थांबणार..... उपमहापौर दीपक सिंह रावत, प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक तुलजेश यादव, बजरंग ठाकूर नगरसेवक प्रतिनिधी यांनी केले स्टिंग ऑपरेशन जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी पहा पूर्ण प्रकरण काय आहे संपूर्ण व्हिडिओ हेडफोन लावून ऐकणे1
- 🚨 Nanded Crime | किनवटमध्ये गुटखा निर्मितीचे साहित्य जप्त; ₹१.०३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात 📍किनवट | २७ ऑगस्ट २०२६ महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या कथित निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात किनवट पोलिसांना यश आले आहे. फुलेनगर, गोकुंदा येथील एका घरावर छापा टाकून पोलिसांनी ₹१,०३,८०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त मुद्देमालात गुटखा निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या ३ लोखंडी मशीन, चुना, तंबाखूजन्य पदार्थ, सुपारी, प्लास्टिक पिशव्या, मिश्रित तंबाखूजन्य पदार्थ आणि ॲल्युमिनियमची पात्रे यांचा समावेश आहे. या प्रकरणी व्यंकट गंगाराम नागनुरवार (रा. फुलेनगर, गोकुंदा, किनवट) याच्याविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली. 💰 एकूण जप्त मुद्देमाल : ₹१,०३,८०० या कारवाईबद्दल तुमचं मत कमेंट करा आणि नांदेडमधील बातम्यांसाठी चॅनलला फॉलो करा! #NandedCrime #Kinwat #NandedNews #Gutkha #NandedPolice #PoliceAction #NandedUpdates #NandigramTimes1
- बीडमध्ये हजरत मन्सूर शाहवली बाबांच्या उरूस सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांडून दर्ग्यात पारंपरिक चादर अर्पण! बीडमध्ये हजरत मन्सूर शाहवली बाबांच्या उरूस सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांडून दर्ग्यात पारंपरिक चादर अर्पण! बीड शहरातील मोंढा भागातील सुप्रसिद्ध आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या दर्गाह हजरत मन्सूर शाहवली सहरवर्दी (रहे.अ.) यांचा वार्षिक संदल व उरूस शरीफ सोहळा २७ ऑगस्ट रोजी अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात संपन्न होत असतो. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्थानिक नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या सह दर्ग्यात बीड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुक पटेल, अशफाक इनामदार, प्रमोद शिंदे, भैय्यासाहेब मोरे, रणजीत बनसोडे, मनोज गोडसे यांच्यासह इतर नगरसेवकांकडून पवित्र चादर चढवून देश आणि राज्यात शांतता, सलोखा व समृद्धी नांदण्यासाठी विशेष दुवा करण्यात आली. गुरुवारी दुपारी दर्गाह शरीफ येथे सुगंधी संदल आणि अत्तराचा शिडकाव करत, बाबांच्या मजारवर अकीदतीने पवित्र चादर अर्पण करण्यात आली.2