logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित 'मुद्देमाल सुपूर्दगी मोहिमे' अंतर्गत नागरिकांना त्यांचा चोरीला गेलेला एकूण २ कोटी १६ लाख ८४ हजार ९३० रुपयांचा किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भूषवले. चोरीचा मुद्देमाल शोधून तो मूळ मालकांच्या ताब्यात देणे ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून जनतेच्या कष्टाच्या कमाईचा सन्मान करणारी आणि पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेअंतर्गत जळगाव परिमंडळ, चाळीसगाव परिमंडळ व जळगाव जिल्हा सायबर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून चारचाकी वाहने, मोटारसायकल, रोख रक्कम, मोबाईल फोन, सोने आणि चांदीचे मौल्यवान दागिने मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सध्याच्या काळात पोलिसांची जबाबदारी वाढली असून पोलीस व जनता यांच्यातील संबंध मित्रत्वाचे असले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आमदार सुरेश भोळे यांनी या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये पोलिसांप्रती चांगला विश्वास निर्माण झाल्याचे सांगितले. या कार्यक्रमादरम्यान पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, विधी व न्याय विभागाचे कर्मचारी, पोलीस पाटील आणि पोलीस तपासात सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, जळगाव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील नूतनीकरण केलेल्या जिल्हा क्रीडा मैदानाचा शुभारंभ देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. या क्रीडा संकुलातील बहुद्देशीय हॉलमध्ये कोटा फरशीवर सिंथेटिक टेरा फ्लेक्सचे बॅडमिंटन कोर्ट आणि मैदानावर ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक तयार करून लॉन लावण्यात आले आहे. मैदान व गेटवर पिण्याच्या पाण्यासाठी आरओ सिस्टीम बसविण्यात आली असून, गॅलरीसह संपूर्ण मैदानाचा रंगकाम पूर्ण झाले आहे. हे मैदान आता खेळाडूंना वापरासाठी खुले करण्यात आले असून, या कार्यक्रमाला उपमहापौर मनोज चौधरी, माजी महापौर विष्णू भंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

5 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
5 hrs ago
dbe46dff-dee1-4e79-b781-07c1fec4d5d3

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित 'मुद्देमाल सुपूर्दगी मोहिमे' अंतर्गत नागरिकांना त्यांचा चोरीला गेलेला एकूण २ कोटी १६ लाख ८४ हजार ९३० रुपयांचा किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भूषवले. चोरीचा मुद्देमाल शोधून तो मूळ मालकांच्या ताब्यात देणे ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून जनतेच्या कष्टाच्या कमाईचा सन्मान करणारी आणि पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेअंतर्गत जळगाव परिमंडळ, चाळीसगाव परिमंडळ व जळगाव जिल्हा सायबर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून चारचाकी वाहने, मोटारसायकल, रोख रक्कम, मोबाईल फोन, सोने आणि चांदीचे मौल्यवान दागिने मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सध्याच्या काळात पोलिसांची जबाबदारी वाढली असून पोलीस व जनता यांच्यातील संबंध मित्रत्वाचे असले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आमदार सुरेश भोळे यांनी या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये पोलिसांप्रती चांगला विश्वास निर्माण झाल्याचे सांगितले. या कार्यक्रमादरम्यान पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, विधी व न्याय विभागाचे कर्मचारी, पोलीस पाटील आणि पोलीस तपासात सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, जळगाव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील नूतनीकरण केलेल्या जिल्हा क्रीडा मैदानाचा शुभारंभ देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. या क्रीडा संकुलातील बहुद्देशीय हॉलमध्ये कोटा फरशीवर सिंथेटिक टेरा फ्लेक्सचे बॅडमिंटन कोर्ट आणि मैदानावर ४०० मीटरचा सिंथेटिक ट्रॅक तयार करून लॉन लावण्यात आले आहे. मैदान व गेटवर पिण्याच्या पाण्यासाठी आरओ सिस्टीम बसविण्यात आली असून, गॅलरीसह संपूर्ण मैदानाचा रंगकाम पूर्ण झाले आहे. हे मैदान आता खेळाडूंना वापरासाठी खुले करण्यात आले असून, या कार्यक्रमाला उपमहापौर मनोज चौधरी, माजी महापौर विष्णू भंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

More news from Jalgaon and nearby areas
  • पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसराचे रहिवासी, 'जनलक्ष्य न्यूज'चे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुपडू बारी यांना सामाजिक, पत्रकारिता आणि जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार - २०२६" प्रदान करण्यात आला आहे. यशवंत सेना महाराष्ट्र राज्य आणि जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशिराम भोजने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील नजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय जाडकर यांनी मानले. प्रमोद बारी यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे पाचोरा शहरासह कृष्णापुरी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    1
    पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसराचे रहिवासी, 'जनलक्ष्य न्यूज'चे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सुपडू बारी यांना सामाजिक, पत्रकारिता आणि जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार - २०२६" प्रदान करण्यात आला आहे. यशवंत सेना महाराष्ट्र राज्य आणि जय मल्हार शैक्षणिक, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अरणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशिराम भोजने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अहिल्यानगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील नजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय जाडकर यांनी मानले. प्रमोद बारी यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे पाचोरा शहरासह कृष्णापुरी परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    6 hrs ago
  • धुळे जिल्ह्यातील मौजे दभाषी येथे माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल साहेब यांच्या माध्यमातून भीमक्रांती नगर सामाजिक सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या सभागृहालगतून जाणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे कामात अडथळा निर्माण होत असून सार्वजनिक सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी याच परिसरात विजेच्या धक्क्यामुळे दुर्दैवी घटना घडलेली असल्याने, येथे तातडीने भूमिगत केबल टाकणे अत्यंत आवश्यक आहे. याचप्रमाणे श्रीराम नगर येथील राम मंदिर सभामंडपाच्या बांधकामालाही वीज पोल आणि तारा अडथळा ठरत आहेत. सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी आणि ही विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी या पोलचे त्वरित स्थलांतर होणे गरजेचे आहे. याशिवाय गावातील मुख्य रस्त्यासाठी माननीय मंत्रीमहोदयांनी ₹१० लाखांचा निधी मंजूर केला असला, तरी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या वीज पोलमुळे हे कामही रखडले आहे. कोणावरही टीका न करता केवळ गावाच्या विकासाला गती मिळावी, अडथळे दूर व्हावेत आणि जनहिताची कामे तातडीने पूर्ण व्हावीत, अशी ग्रामस्थांची विनंती आहे. महावितरण प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, ही संपूर्ण दभाषी ग्रामस्थांची अपेक्षा असून "विकास थांबू नये... सुरक्षितता अबाधित राहावी..." हीच त्यांची प्रमुख मागणी आहे.
    1
    धुळे जिल्ह्यातील मौजे दभाषी येथे माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल साहेब यांच्या माध्यमातून भीमक्रांती नगर सामाजिक सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या सभागृहालगतून जाणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे कामात अडथळा निर्माण होत असून सार्वजनिक सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी याच परिसरात विजेच्या धक्क्यामुळे दुर्दैवी घटना घडलेली असल्याने, येथे तातडीने भूमिगत केबल टाकणे अत्यंत आवश्यक आहे.

याचप्रमाणे श्रीराम नगर येथील राम मंदिर सभामंडपाच्या बांधकामालाही वीज पोल आणि तारा अडथळा ठरत आहेत. सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी आणि ही विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी या पोलचे त्वरित स्थलांतर होणे गरजेचे आहे. याशिवाय गावातील मुख्य रस्त्यासाठी माननीय मंत्रीमहोदयांनी ₹१० लाखांचा निधी मंजूर केला असला, तरी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या वीज पोलमुळे हे कामही रखडले आहे.

कोणावरही टीका न करता केवळ गावाच्या विकासाला गती मिळावी, अडथळे दूर व्हावेत आणि जनहिताची कामे तातडीने पूर्ण व्हावीत, अशी ग्रामस्थांची विनंती आहे. महावितरण प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, ही संपूर्ण दभाषी ग्रामस्थांची अपेक्षा असून "विकास थांबू नये... सुरक्षितता अबाधित राहावी..." हीच त्यांची प्रमुख मागणी आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. येथे थेट 'हल्लाबोल' आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. येथे थेट 'हल्लाबोल' आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील 'सिल्लोड भवन' परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. या भागात पाणी टंचाईची ही समस्या सातत्याने बिकट होत चालली आहे.
    1
    औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील 'सिल्लोड भवन' परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. या भागात पाणी टंचाईची ही समस्या सातत्याने बिकट होत चालली आहे.
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • 'अबकड' उप वर्गीकरणाच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक खास मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी या उप वर्गीकरणाच्या संपूर्ण विषयावर आपली मते मांडली आहेत.
    1
    'अबकड' उप वर्गीकरणाच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक खास मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी या उप वर्गीकरणाच्या संपूर्ण विषयावर आपली मते मांडली आहेत.
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    4 hrs ago
  • बुलढाणा येथील आमदार मनोज कायंदे यांनी शिक्षकांवरील अतिरिक्त भार कमी करून यावर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
    1
    बुलढाणा येथील आमदार मनोज कायंदे यांनी शिक्षकांवरील अतिरिक्त भार कमी करून यावर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पाचोरा शहरातील लोकप्रिय आणि आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या PMJ ॲडव्हेंचर पार्कला खान्देशातील सुप्रसिद्ध कलाकार आणि बिग बॉस फेम सचिन कुमावत यांनी आपल्या कुटुंबासह सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमनामुळे पार्क परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी PMJ ॲडव्हेंचर पार्कचे संचालक संदीप जैन आणि अमोल जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन सचिन कुमावत यांचे मनःपूर्वक स्वागत व सत्कार केला. सचिन कुमावत यांनी पार्कमधील विविध साहसी खेळ, मनोरंजनाच्या सुविधा आणि पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध आकर्षक उपक्रमांची पाहणी करत येथील सुविधांचे आणि संकल्पनेचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे पाचोरा शहराची एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. याच कार्यक्रमात, नुकताच 'लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार' प्राप्त झालेले पत्रकार, जनलक्ष्य न्यूजचे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बारी यांचा बिग बॉस फेम सचिन कुमावत यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला दीपक माने, प्रशांत सोनार, सचिन चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला.
    1
    पाचोरा शहरातील लोकप्रिय आणि आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या PMJ ॲडव्हेंचर पार्कला खान्देशातील सुप्रसिद्ध कलाकार आणि बिग बॉस फेम सचिन कुमावत यांनी आपल्या कुटुंबासह सदिच्छा भेट दिली. त्यांच्या आगमनामुळे पार्क परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी PMJ ॲडव्हेंचर पार्कचे संचालक संदीप जैन आणि अमोल जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन सचिन कुमावत यांचे मनःपूर्वक स्वागत व सत्कार केला. सचिन कुमावत यांनी पार्कमधील विविध साहसी खेळ, मनोरंजनाच्या सुविधा आणि पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध आकर्षक उपक्रमांची पाहणी करत येथील सुविधांचे आणि संकल्पनेचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे पाचोरा शहराची एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

याच कार्यक्रमात, नुकताच 'लोकमाता अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार' प्राप्त झालेले पत्रकार, जनलक्ष्य न्यूजचे संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बारी यांचा बिग बॉस फेम सचिन कुमावत यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला दीपक माने, प्रशांत सोनार, सचिन चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला.
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    6 hrs ago
  • दक्षिणी विएतनाममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या फू क्वोक बेटाजवळ शनिवारी एक अत्यंत वेदनादायक दुर्घटना घडली. ३२ भारतीय पर्यटक आणि चालक दलाच्या ४ सदस्यांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट समुद्रात उलटली. या भीषण अपघातात १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही बोट एका बेटाच्या सफरीवरून परतत होती. किनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच, समुद्रातील प्रचंड लाटा आणि खराब हवामानामुळे बोट उलटली. या दुर्घटनेनंतर स्थानिक मच्छिमार आणि बचाव पथकाने तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले आणि २१ लोकांना सुखरूप बाहेर काढले।
    1
    दक्षिणी विएतनाममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या फू क्वोक बेटाजवळ शनिवारी एक अत्यंत वेदनादायक दुर्घटना घडली. ३२ भारतीय पर्यटक आणि चालक दलाच्या ४ सदस्यांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट समुद्रात उलटली. या भीषण अपघातात १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही बोट एका बेटाच्या सफरीवरून परतत होती. किनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच, समुद्रातील प्रचंड लाटा आणि खराब हवामानामुळे बोट उलटली. या दुर्घटनेनंतर स्थानिक मच्छिमार आणि बचाव पथकाने तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले आणि २१ लोकांना सुखरूप बाहेर काढले।
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.