लग्नाआधी थॅलेसेमिया तपासणी करणे काळाची गरज : डॉ. वरुण बाफना भगवान महावीर सेवा धाम युवा मंच आयोजित शिबिरात ४५ जणांचे रक्तदान कोल्हापूर ११ सिटी न्यूज नेटवर्क “थॅलेसेमिया हा गंभीर अनुवांशिक आजार असून, त्याबाबत समाजात जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. पती-पत्नी दोघेही थॅलेसेमियाग्रस्त असतील तर त्यांच्या मुलाला मेजर थॅलेसेमिया होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे लग्नाआधी थॅलेसेमिया तपासणी करणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन डॉ. वरुण बाफना यांनी केले. विश्व थॅलेसेमिया दिनानिमित्त येथील भगवान महावीर सेवा धाम युवा मंचतर्फे थॅलेसेमिया जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमानंतर झालेल्या शिबिरात ४५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. डॉ. बाफना म्हणाले, थॅलेसेमिया आजारामध्ये रुग्णाच्या शरीरात नवीन रक्तनिर्मिती होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना वारंवार रक्त चढवावे लागते. सतत रक्त संक्रमण होत असल्याने विविध आजारांचे संक्रमण होण्याचाही धोका निर्माण होतो. थॅलेसेमियाचे मायनर आणि मेजर असे दोन प्रकार असून, योग्य वेळी तपासणी आणि जनजागृती हाच या आजारावरील प्रभावी उपाय आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. हिमांशु ओसवाल यांनी सूत्रसंचालन केले. संयम गांधी यांनी डॉ. वरुण बाफना यांचे स्वागत केले. जिनाल परमार यांनी आभार मानले. यावेळी डॉ. शुभांगी खारकांडे, नरेंद्र ओसवाल आदी उपस्थित होते. प्रतीक गांधी, हर्ष ओसवाल, वृषभ ओसवाल आणि संयम ओसवाल यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
लग्नाआधी थॅलेसेमिया तपासणी करणे काळाची गरज : डॉ. वरुण बाफना भगवान महावीर सेवा धाम युवा मंच आयोजित शिबिरात ४५ जणांचे रक्तदान कोल्हापूर ११ सिटी न्यूज नेटवर्क “थॅलेसेमिया हा गंभीर अनुवांशिक आजार असून, त्याबाबत समाजात जागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. पती-पत्नी दोघेही थॅलेसेमियाग्रस्त असतील तर त्यांच्या मुलाला मेजर थॅलेसेमिया होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे लग्नाआधी थॅलेसेमिया तपासणी करणे काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन डॉ. वरुण बाफना यांनी केले. विश्व थॅलेसेमिया दिनानिमित्त येथील भगवान महावीर सेवा धाम युवा मंचतर्फे थॅलेसेमिया जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमानंतर झालेल्या शिबिरात ४५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. डॉ. बाफना म्हणाले, थॅलेसेमिया आजारामध्ये रुग्णाच्या शरीरात नवीन रक्तनिर्मिती होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांना वारंवार रक्त चढवावे लागते. सतत रक्त संक्रमण होत असल्याने विविध आजारांचे संक्रमण होण्याचाही धोका निर्माण होतो. थॅलेसेमियाचे मायनर आणि मेजर असे दोन प्रकार असून, योग्य वेळी तपासणी आणि जनजागृती हाच या आजारावरील प्रभावी उपाय आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. हिमांशु ओसवाल यांनी सूत्रसंचालन केले. संयम गांधी यांनी डॉ. वरुण बाफना यांचे स्वागत केले. जिनाल परमार यांनी आभार मानले. यावेळी डॉ. शुभांगी खारकांडे, नरेंद्र ओसवाल आदी उपस्थित होते. प्रतीक गांधी, हर्ष ओसवाल, वृषभ ओसवाल आणि संयम ओसवाल यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
- सरसकट कर्जमाफीसाठी मनसेचे ‘बळीराजा आक्रोश आंदोलन’; जाचक अटी रद्द करण्याची मागणी कोल्हापूर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी ‘बळीराजा आक्रोश आंदोलन’ करण्यात आले. शेतकऱ्यांवरील जाचक अटी तात्काळ रद्द करून comprehensive loan waiver जाहीर करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. कर्जबाजारीपणा, नापिकी आणि आर्थिक तणावामुळे अनेक शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे सरकारने कोणत्याही अटींशिवाय सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. या आंदोलनावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी बावनकुळे यांची उपहासात्मक वेशभूषा परिधान करून जोरदार घोषणाबाजी केली. बंगला, गाडी किंवा आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे वक्तव्य केल्याचा उल्लेख करत मनसेने सरकारवर टीका केली. “शेतकरी देशाचा अन्नदाता असून तो विविध प्रकारचे कर भरतो. मात्र मदतीच्या वेळी त्याच्यावर अटींचा बोजा टाकला जातो. दुसरीकडे आमदार आणि मंत्र्यांना मानधन व pension देताना कोणतीही अट लावली जात नाही,” असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. सरकारने शेतकऱ्यांबाबत दुजाभाव न करता तातडीने सर्वसमावेशक कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, दौलत पाटील, नागेश चौगुले, रवी गोंदकर, राजू पाटील, अभिजित पाटील, संजय चौगुले, राजेंद्र निकम, प्रताप पाटील, स्वाती पाटील, रेश्मा सावंत, प्रिया चंदन, निलेश पाटील, कुमार पुदाले, बाळासाहेब कदम, वैभव भोसले, विश्वजित पाटील, वृषभ आमते, युवराज येडुरे, संजय पाटील, राहुल पाटील, निलेश धुम्मा, भगवंत जांभळे, राजेंद्र चव्हाण, निलेश भिसे, तुषार मालवेकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.2
- आजचे राशीभविष्य आपला दिवस कसा जाईल जाणून घ्या बारा राशीचे राशिफल1
- छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पलूस येथे १४ ते १७ मे दरम्यान 'यशवंत फेस्टिव्हल २०२६' आयोजित करण्यात आला आहे. गुंडादाजी लॉन, कराड पलूस रोडवर प्रदीप (अप्पा) कदम यांच्यावतीने हा भव्य उत्सव साजरा होणार आहे.1
- महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विठ्ठल कांगणे यांचा अंधश्रद्धेवर बोलणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी लोकांना अंधश्रद्धा सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगी बाणवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांची विनोदी आणि शैलीदार मांडणी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.1
- रत्नागिरीत महामार्गाच्या ठेकेदारामुळे संपूर्ण गाव जलमय1
- राहुल गांधींसारखा 'बुद्धू' राजकारणी मी पाहिला नाही; नारायण राणेंचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन टंचाई आणि सोने खरेदीबाबत केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी आणि एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेला माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "राहुल गांधींना जागतिक अर्थव्यवस्थेचे अज्ञान असून त्यांच्यासारखा 'बुद्धू' राजकारणी मी आजवर पाहिला नाही," अशा शब्दांत राणेंनी राहुल गांधींवर निशाणा साधला. अर्थव्यवस्थेचे अज्ञान आणि राहुल गांधींवर टीका पंतप्रधानांच्या विधानावर राहुल गांधींनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना राणे म्हणाले की, जेव्हा एखादा देश आयात कमी करतो आणि निर्यात वाढवतो, तेव्हाच त्याची अर्थव्यवस्था मजबूत होते आणि जीडीपी वाढतो. हे साधे गणित राहुल गांधींना समजत नाही. "लोकसभेत राहुल गांधी ज्या प्रकारे वावरतात आणि बोलतात, त्यावरून त्यांना पंतप्रधानांशी कसं बोलायचं हे देखील कळत नाही. त्यांनी काँग्रेसच्या राजवटीत काही चांगलं केलं असतं, तर आज त्यांच्या पक्षाची ही दयनीय अवस्था झाली नसती," असेही राणे म्हणाले. तसेच, एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपने बाहेर काढल्यामुळे आता त्यांना शहाणपण सुचत असून, त्यांना आता निवृत्तीचे वेध लागले आहेत. इंधन बचत: पंतप्रधानांच्या आवाहनाचे स्वागत पंतप्रधानांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांना आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करून इंधन बचतीचा जो संदेश दिला आहे, त्याचे राणेंनी स्वागत केले. ते म्हणाले की, पेट्रोल-डिझेलची समस्या ही देशापुढील मोठी समस्या आहे. मंत्री स्वतःहून गाड्यांची मागणी करत नाहीत, तर सुरक्षा व्यवस्थेनुसार ताफा दिला जातो. मात्र, पंतप्रधानांनी दिलेले मार्गदर्शन योग्य असून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी यात पुढाकार घेणे गरजेचे आहे. राजू शेट्टींच्या आंदोलनावर टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी १५ मे रोजी 'वर्षा' बंगल्यावर काढणाऱ्या मोर्चाबाबत बोलताना राणे यांनी त्यांना टोला लगावला. शेट्टींचे काम: "राजू शेट्टींना आंदोलनाशिवाय दुसरे काहीच माहित नाही. ते ना शेती करतात, ना धंदा. फक्त काहीतरी करायचं म्हणून ते आंदोलन करतात," असे राणे म्हणाले. शेतकरी मदत: कोकणातील आंबा आणि काजू पिकांच्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन काही निधी मंजूर केला आहे. ही मदत शेवटची नसून जून महिन्यात ती वाढवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेवटी, राजू शेट्टी माझे मित्र आहेत आणि त्यांना योग्य वेळी मी नक्कीच सल्ला देईन, असेही राणे यांनी मिश्किलपणे नमूद केले.1
- सांगली: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई; विठ्ठरायचीवाडीचा तरुण पिस्टलसह जेरबंद क्रांती न्यूज -सांगली (प्रतिनिधी) किरण देशमुख : सांगली : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सांगली पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) नागठाणे परिसरात सापळा रचून एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. नेमकी घटना काय? सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रे आणि गंभीर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी एक विशेष पथक तैनात केले होते. हे पथक भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कनप यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत गुंडा करांडे (वय २४, रा. विठ्ठरायचीवाडी, ता. कवठेमहांकाळ) हा नागठाणे फाटा ते वाळवा जाणाऱ्या रोडवरील चोपण रस्ता येथे कमरेला पिस्टल लावून थांबला आहे. पोलिसांचा धाडसी सापळा मिळालेल्या माहितीवरून पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनिकेत करांडे याला पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे: ०१ देशी बनावटीचे पिस्टल ०१ जिवंत काडतूस (राऊंड) मिळून आले. या शस्त्राबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. तपासात धक्कादायक खुलासा अटक करण्यात आलेल्या आरोपीने चौकशीत सांगितले की, त्याने हे पिस्टल आपल्या सुरक्षिततेसाठी अक्षय पाटील (रा. डफळापूर, ता. जत) याच्याकडून विकत घेतले होते. पोलिसांनी पिस्टल आणि काडतूस जप्त केले असून या प्रकरणाचा अधिक तपास आता जत कनेक्शनच्या दिशेने सुरू आहे. न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी याप्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, माननीय न्यायालयाने त्याला ११ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कोळी करत आहेत. "जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे." — स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली.2
- आमदार सुहास बाबर यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघात 'ट्री आर्मी'च्या मदतीने मोठ्या वृक्षारोपण मोहिमेची घोषणा केली आहे. पिंपळाची व इतर झाडे लावून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा त्यांचा संकल्प असून, यात वन विभागाचीही मदत घेतली जाईल.1